Monday, August 30, 2021

 1.पेट्रोल डीझेल विना वाहतूक करण्याकडे वाटचाल सुरु आहे.देशातील वाढती लोकसंख्या आणि वाहनांची गर्दी पाहता पेट्रोल आणि डीझेल चा वापर हद्दपार व्हायला हवा यासाठी इथेनॉल -मिथेनोल ,जैव इंधन निर्मितीसाठी देशाचे प्रयत्न सुरु आहेत .तसेच जलमार्गाचा विकास करून त्याद्वारे सर्वाधिक वाहतूक कशी करता येईल याचा विचार सुरु असल्याचे केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केले आहे .


२.लेखक व नाटककार जयंत पवार यांचे निधन  झाले आहे.

३.लोणार सरोवर परिसरातील इजेकटा  ब्लान्केतच्या जतनासाठी नागपूर खंडपीठाने दिलेल्या निर्देशानुसार वन्यजीव विभागाने हालचाली सुरु केले आहे .

४.राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी नवीन शैक्षणिक धोरनाची उच्च व तंत्र शिक्षण क्षेत्रात अमलबजावणी कशी करावी याबाबत राज्य सरकारने स्थापन केलेल्या समितीचे अध्यक्ष डॉ.रघुनाथ माशेलकर आहेत .व यांच्या समितीने नवीन शैक्षणिक धोरणाचा अभ्यास करून अहवाल तयार केला आहे अशी माहिती दिली .


५.टोकिओ येथे सुरु असलेल्या परालाम्पिक स्पर्धेमध्ये भारताला गोल्ड मेडल मिळाले आहे .निषाद कुमारने उंच उडीमध्ये रौप्य पदक तर विनोद कुमारने थाळी फेक्म्ध्ये कांस्य पदक पटकावले आहे.तर  अवनी लेख्राने दहा मीटर standing प्रकारात गोल्ड मेडल पटकावले आहे .



Sunday, August 29, 2021

चालू घडामोडी २९ ऑगस्ट

 

जन्म-१८८०-माधव श्रीहरी अने -भारतीय स्वातंत्र्यसैनिक 

१९०१-विठ्ठलराव विखे पाटील-भारतातील सहकार च्ल्व्लीम्धील अग्रणी नेते .

१९०५-हॉकीचा जादुगार म्हणून ओळख असणारे मेजर ध्यानचंद 

*मृत्यू-१९०६-मराठी ख्रिस्ती सह्त्यिक व धर्मप्रसारक -बाबा पदमनजी 

१९६९-मराठी शाहीर शाहीर अमर शेख 

चालू घडामोडी २९ ऑगस्ट 

१.महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या 'भारतीय संसद मे भगतसिंग कोश्यारी 'या पुस्तकाचे नवी दिल्ली येथे प्रकाशन करण्यात आले.

२.जगप्रसिद्ध चित्रकार रोबी जेम्स फ्रान्सिस डिसिल्वा यांचे निधन झाले आहे. 

३.देशातील सर्वात जुन्या दंत महाविद्यालयामध्ये दुसर्या क्रमांकाचे रुग्णालय असा नावलौकिक असणार्या आणि दरवर्षी तब्बल साडेतीन लाखांपेखा अधिक रुग्णावर  दंतोपचार करणाऱ्या बृहन्मुंबई महानगर पालिकेच्या महाविद्यालयाच्या शैक्षणिक व सोयी सुविधांची दाखल राष्ट्रीय स्तरावरील सर्वेक्षणात घेण्यात आले आहे .

४.'एकाधीर्वादी सरकारे सातत्याने असत्यावर अवलंबून असतात .सरकारी संस्था माजुत करण्यासाठी आणि सत्याच्या आग्रहासाठी सरकारला जाब विचारणे हे नागरिकांचे कर्तव्य आहे 'असे प्रतिपादन सर्वोच न्यायालयाचे न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांनी एका कार्यक्रम दरम्यान केले आहे.

५ .लेखक आनंद अंतरकर यांचे निधन झाले आहे.हंस,मोहिनी,व नवल या मासिकांचे संपादक ते होते.

६.केंद्रीय रस्ते व वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने वाहन नोंदणीसाठी नवा निर्णय घेतला आहे.मंत्रालयाने बीएच हि नवीन मालिका सादर केली आहे.वाहनधारकांना त्यांचे वाहन देशात कुठेही आणि कधीहि बिनधास्तपणे नेता येणार आहे.

७.टेबल टेनिसपटू भाविनाबेन पटेलने टोकिओ परालाम्पिक क्रीडा स्पर्धेत ऐतिहासिक कामगिरी करत रौप्य पदकाची कमाई केली आहे.टेबल टेनिस या  क्रीडा प्रकारात ऑलिम्पिक पदक मिळवणारी पहिली खेळाडू ठरली आहे.

८.आज राष्ट्रीय क्रीडा दिन आहे.होकीचा जादुगार म्हणून ओळखल्या जाणार्या मेजर ध्यानचंद यांची आज जयंती आहे.हा दिन राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा केला जातो .

९.पंतप्रधान नरेंद्र मोदि यांनी जालियानवाला बाग चे नुत्नीकर्ण करण्यांत आलेल्या संकुलाचे लोकार्पण केले .

१०अंतरराष्ट्रीय प्रवासासाठी आता 'आर्तीपिसिआर' चाचणीचा अह्वाल बंधनकारक करण्यात  आला आहे .केंद्रीय आरोग्य विभागाने जरी केलेल्या नव्या नियमावलीनुसार महाराष्ट्र राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे .त्यानुसार प्रदेशातून राज्यात येणाऱ्या प्रवाशांना लशीच्या  दोन्ही मात्रा घेतल्या असल्या तरीही आर्तीपिसिआर' चाचणीचा अह्वाल दाखवावा लागेल .


Saturday, August 28, 2021

चालू घडामोडी 28 ऑगस्ट

 चालू घडामोडी 28 ऑगस्ट


1.मराठवाड्याचा केशर आंबा ,व मंगळवेढ्याच्या ज्वारीला भारतीय टपाल खात्याने तिकिटांवर स्थान दिले आहे.


2.गुजरात,दिल्ली,पडूचेरी तील राज्य सरकारने 1 सप्टेंबर पासून शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.


3.एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनाकरिता 500 कोटी रुपयांच्या निधीला राज्य सरकारने मंजुरी दिली आहे. 


4.नेदरलँड ची महिला क्रिकेटपटू वेगवान गोलंदाज फ्रेडक्वि  ओवरडविक t20 क्रिकेटच्या इतिहासात 7 विकेट घेणारी पहिली महिला वेगवान गोलंदाज ठरली आहे.


5.कबुलच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर झालेल्या हल्ल्याचा हिशेब चुकता करण्यात येईल असे अमेरिकेने तालिबान व आयसिस ला इशारा दिला आहे.

Friday, August 27, 2021

चालू घडामोडी 27 ऑगस्ट

 1.राज्यातील प्रादेशिक वैशिष्ट्ये व साधनसंपत्ती लक्षात घेऊन राज्याचा औद्योगिक नकाशा तयार करण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली.लोकसत्ता काँकेव कार्यक्रमात ते बोलत होते.


2.राज्यातील आशा सेविकांचे मानधन 1000 रुपयांनी वाढवण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.राज्यात जवळपास 65 हजार आशा सेविका आहेत.


3.तंत्रशिक्षणाच्या नवीन शैक्षणिक संस्थांच्या परवानगीसाठी आता 15 सप्टेंबर पर्यंत अर्ज करता येणार आहे.असा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला .


4.राष्ट्रकुल स्पर्धेतील सुवर्णपदक विजेता महाराष्ट्र केसरी असणारे मल्ल अप्पालाल शेख यांचे निधन झाले.


5.शासकीय सेवेत असताना मृत पावलेल्या गट अ-ब शासकीय अधिकाऱ्याच्या कुटुंबातील एकास अनुकंपा तत्वावर शासकीय नोकरी देण्यात येणार आहे .राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.


6.संविधान सभेने राखीव जागा लागू करताना ती मर्यादित काळासाठी असेल अशी कल्पना केली होती मात्र यात वेळोवेळी वाढ केल्यामुळे जाती व्यवस्था आणखी मजबुतीने कायम होत आहे असे मत मद्रास उच्च न्यायालयाने व्यक्त केले आहे.


7.अफगाणिस्तान बाबत भारत सरकारने भौगोलिक राजकीय परिस्थिती बाबत आखलेल्या धोरणाला विरोधकांनी पाठिंबा जाहीर केला आहे.भारताने थांबा व वाट पाहू हे धोरण आखले आहे.


8.कर्नाटक उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती न्या.अभय ओक यांची सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती पदी नियुक्ती करण्यात आली आहे.


9.इंग्लंडचे क्रिकेट संघाचे  माजी कर्णधार टेड टेक्स्टार यांचे निधन झाले आहे.1958 ते 68 या काळात त्यांनी नेतृत्व केले होते.


10.काबुल विमान तळावर दहशतवादी हल्ला करण्यात आला आहे.

Thursday, August 26, 2021

*चालू घडामोडी २६ ऑगस्ट


*चालू घडामोडी २६ ऑगस्ट 

 *जन्म  -१.१९१०-भारतरत्न व नोबल पारितोषिक विजेत्या मदर टेरेसा 

२.१९२२-गणेश प्रधान -शिक्षणतज्ञ 

*मृत्यू-१९४८-केसरी वृत्तपत्राचे संपादक -कृष्णाजी खाडिलकर 


१.कृषी या विषयाचा शालेय शिक्षण अभ्यासक्रमात समावेश करण्यात येणार आहे.यावरील अभ्यासक्रम हा शालेय शिक्षण विभाग व कृषी विभाग मिळून या विषयाचा अभ्यासक्रम तयार करणार आहेत .राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद व महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषद यांनी संयुक्तपणे अभ्यासक्रम तयार करावा असा निर्णय महाराष्ट्र राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्ष गायकवाड व कृषिमंत्री दादा भुसे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत घेण्यात आला आहे .


२.कृषी संशोधक पद्मश्री बी.व्ही.निंबकर यांचे निधन झाले आहे.ते फलटण मधील प्रसिद्ध निंबकर अग्रीकाल्चरल इंस्तीत्युट चे संस्थापक होते.


3.कोरोना महामारीमुळे वैधव्य आलेल्या ग्रामीण उपेक्षित,वंचित घटकातील महिलांचे जीवनस्तर उंचावण्यासाठी राज्य सरकार वात्सल्य योजना राबवणार आहे .या योजनेंतर्गत या महिलांना मदत करण्यासाठी तसेच त्यांना लागणारी प्रमाणपत्रे मिळून देण्यासाठी १८ विविध सेवा देण्याचा प्रयत्न महिला व बाल कल्याण विभागातर्फे सुरु करण्यात आला आहे .


४.अंतरराष्ट्रीय ख्याती असलेल्या जेष्ठ समाजशास्त्रज्ञ डॉ.गेल ओम्वेट यांचे निधन झाले आहे .त्या संशोधक,लेखक व स्त्री मुक्ती चळवळीच्या कार्यकर्त्या होत्या.


५.सलग पाच वर्षे तोटा नोंदविनाऱ्या सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी आर्थिक वर्ष २०२०-२१ मध्ये पहिल्यांदाच ३१८१७ कोटी रुपयांच्या नफ्याची नोंद केली आहे .बँकांनी आता आर्थिकदृष्ट्या सक्षमता प्राप्त केली असून त्यांना आता आर्थिक कुबड्यांची गरज नाही असे देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटले आहे .


6.केंद्र सरकार माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील ३०० नवीन नव उद्यमिना startup चालना देणारा प्रकल्प करण्यात येत आहे.या अंतर्गत १०० नव उद्यमिना ,निधी सहाय्य ,मार्गदर्शन,बाजार्प्र्थ उपलब्ध करून देण्यात येणार आहे .


७.राज्यांना केवळ आर्थी निकषांवर इतर मागासवर्गीयात क्रिमिलेअर मिर्धारित करता येउ शकत नाही असे स्पष्ट करीत सर्वोच्च न्यायालयाने हरियाना सरकारची १७ ऑगस्ट २०१६ चि अधिसूचना रद्द करून नव्याने क्रिमिलेअर चि व्याख्या निश्चित करण्यास सांगितले आहे .


८.भारताचा आघाडीचा टेबल टेनिसपटू ज्ञानशेखरन साठीयनने युक्रेनच्या युव्हेन प्रायचेपाला ४-0 ने हरवत 'आयटीटीएफ ' चेक आंतरराष्ट्रीय टेबल टेनिस स्पोर्धेच्या पुरुष एकेरीचे जेतेपद पटकावले .


९.भारतात कोरोनाची साथ आता इंडेमिक टप्प्यात पोहचली आहे .येथे कोरोन विषाणूची लग्न होण्याचे प्रमाण आधीपेक्षा खूप कमी आहे असे मत WHO च्या मुख्य शास्त्रद्न्य डॉ.सौम्य स्वामिनाथन यांनी म्हटले आहे .


१० तालिबानची सत्ता अफगानिस्तान मध्ये आल्यानंतर बदललेल्या परीस्तीतीमुळे अफगाण नागरिकांना आता भारतात केवळ ई-विसावर प्रवास  करता येईल भारत सरकारने अफगाण नागरिकांसाठी ई-इमर्जन्सी व्हिसा ही नवी श्रेणी सुरु केली होती त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे .





Wednesday, August 25, 2021

चालू घडामोडी २५ ऑगस्ट

 जन्म-१९२३-मराठी लेखक गंगाधर गाडगीळ 

१९६२-बांगलादेशी स्त्रीमुक्तिवादी लेखिका तस्लिमा नसरीन 

मृत्यु -

२००१-मराठी समीक्षक व.दि.कुलकर्णी 


*चालू घडामोडी २५ ऑगस्ट 


१.भारताचे माजी फुटबॉल पटू ओ.चंद्रशेखर मेनन यांचे वृद्धापकाळाने निधन झाले .१९५८ ते १९६६ या काळात २५ सामन्यांमध्ये त्यांनी भारतीय संघाचे प्रतिनिधत्व केले होते.१९६२ च्या आशिआइ क्रीडा स्पर्धेतील सुवर्पद्क विजेत्या भारतीय फुटबॉल संघाचे ते सदस्य होते .


२.राजनीतीतज्ञ हरीश पवर्थनेनी यांची जर्मनीतील भारतीय राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.ते भारतीय विदेश सेवेच्या १९९९ च्या तुकडीचे अधिकारी आहेत.


३.टोकिओ येथे परालाम्पिक स्पर्धेला सुरुवात झाली आहे.भारतातर्फे भालाफेकपटू टेकचंद याला भारतीय संघाचा ध्वजवाहक बनवण्यात आले होते.


४..केंद्रीय मंत्री पदावर असताना अटक होणारे नारायण राणे हे तिसरे मंत्री आहेत .महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात आक्षेपार्ह्य वक्तव्य केल्याच्या आरोपांवरून महाराष्ट्र पोलिसांनी त्यांना अटक केली होती .गेल्या २० वर्षांमध्ये  महाराष्ट्र राज्य पोलिसांनी अटक केलेले ते १ ले केंद्रीय कॅबिनेट मंत्री व मंत्रीपदावर असताना अटक झालेले तिसरे नेते आहेत.


५.झाय्दस कॅडिला या लस उत्पादक कंपनीच्या झाय्कोव्ह डी या तीन मात्रांच्या लसिला भारताच्या औषध महानियान्त्र्कानी मान्यता दिली आहे.ती जगातील पहिली डीएनए लस आहे.


६.उच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त न्यायाधीश विद्यासागर कानडे यांची महाराष्ट्र राज्याच्या नव्या लोकायुक्त पदी नियुक्ती करण्यात आली .

७सन्शोधन आणि विकास संस्था अर्थात डीआरडीओ ने भारतीय हवाई दलासाठी आधुनिक अशा शाफ तंत्रज्ञान विकसित केले आहे या तंत्रज्ञानाच्या मदतीने हवाई दलाच्या लढाऊ विमान शत्रूच्या रडारच्या धोक्यापासून चविणे शक्य आहे 

८महाराष्ट्र राज्य महाकवी कालिदास संस्कृत साधना पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत 


९.कंपन्यांच्या सीएसआर खर्चात 3.६६ टक्के वाढ नोंदवण्यात आली आहे.भारतीय कंपन्यांनी २०-२१ मध्ये सिएसआर अर्थात सामाजिक दायित्व उपक्रमामध्ये २२००० कोटी रुपये खर्च केले आहेत.

१०.चीनने त्यांचे लोकसंख्येचे धोरण शिथिल केले आहे.आता चीनी दाम्पत्याला तीन अपत्यांना जन्म देण्याची परवानगी देण्यात आली आहे.


Thursday, August 19, 2021

*चालू घडामोडी १९ ऑगस्ट

 *चालू घडामोडी १९ ऑगस्ट 

१.महाराष्ट्र राज्यातील जवळपास साडे नाऊ लाख यांत्र्मागांशी निगडीत साडेचार लाख कामगारांकरिता यंत्रमाग कामगार महामंडळ स्थापन करण्यात येणार आहे .कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांनी यंत्रमाग कामगार महा मंडळ स्थापन करण्यास मंजुरी देण्यात आल्याची घोषणा केली .

२.शिक्षक दिनी दिले जाणारे राष्ट्रपती पुरस्कार जाहीर झाले आहेत .देशातील एकूण ४५ शिक्षकांना हे पुरस्कार देण्यात येणार आहेत .यात महारष्ट्रातील दोन शिक्षकांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे .उस्मानाबाद जिल्ह्यातील कडोदरा जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक उमेश खोसे व गडचिरोली जिल्ह्यातील जिल्हा परिषद उच्च प्रठ्मील शाळेतील कुर्शीद शेख यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे . 

३.मुलीनही आता NDA राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी ची प्रवेश परीक्षा देता येणार आहे .सुप्रीम कोर्टात दाखल याबाबतच्या प्रकरणात सर्वोच न्यायालयाने हा निर्णय दिला आहे .मुलीना NDA मध्ये  संधी नाकारून सैन्य दलात अधिकारी बनण्यापासून नाकारत NDA राज्यघटनेच्या १४,१५,१६,व १९ या कलमाचे उल्लंघन करत असल्याचा आरोप या याचीलेत करण्यात आला होता .

४.खासगी क्षेत्रामध्ये अग्रगण्य असणारी HDFC बॅंकेवरील निर्बंध रिजर्व बँकेने काही प्रमाणात शिथिल केले आहेत .त्यामुळे आठ महिने सुरु राहिलेल्या बंदी नंतर बँकेला नवीन क्रेडीट कार्ड वितरण करणे शक्य होणार आहे .


५.देशातील वित्तीय स्मावेश्क्तेचे प्रमाण मोजण्यासाठी आणि त्यात सुरु असणार्या सुधारणांना जोखण्यासाठी वार्षिक निर्देशांकाची घोषणा रिजर्व बँकेने केली आहे .


६.20 वर्षांखालील जागतिक युवा आथलेटिक्स स्पर्धेत भारताच्या मिश्र रिले संघाने 400 मीटरच्या स्पर्धेत कांस्ययपदक कमावले आहे.



7.खाद्य तेलाच्या स्वताईसाठी केंद्र सरकारने पाऊले उचलली आहेत.केंद्र सरकारने खाद्य तळावरील आयातिवरील भारताचे अवलंबित्व कमी करण्याच्या दृष्टीने महत्वाच्या असणाऱ्या योजनेला मंजुरी दिली आहे.राष्ट्रीय खाद्यतेल मिशन पामतेल ही ती योजना आहे ,या योजनेकरिता पाच वरशांसाठी 11040 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.


8.बँक लोकरबाबत रिजर्व बँकेव नवीन नियम लागू केले आहेत.


9.विविध अर्थ तज्ञांनी चालू आर्थिक वर्षात एप्रिल ते जून या पहिल्या तिमाहीत देशाचा gdp सकळ राष्ट्रीय उत्पादन दर हब13ते 23 टक्क्यांपर्यंत वाढण्याचा अंदाज व्यक्त केला आहे.

Wednesday, August 18, 2021

चालू घडामोडी १८ ऑगस्ट

 


इतिहासात डोकावताना -

जन्म -१९०० -विजयालक्ष्मी पंडित -भारताचे पहिले पंतप्रधान पंडित नेहरूंच्या बहिण ,तसेच भारताच्या प्रथम कॅबिनेट महिला मंत्र्यांपैकी एक .

मृत्यू -१९४५ -सुभाषचंद्र बोस-भारतीय क्रांतिकारी तसेच भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस चे अध्यक्ष .

१.दादर येथे  इलेक्ट्रिक  वाहन चार्जिंग स्टेशन  चे पर्याव्र्न्मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले .राज्यातील हे पहिले इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग स्टेशन असल्याचा मुंबई महानगरपालिकेचा दावा आहे .

२.महाराष्ट्रात ५० हजार कोटी रुपयांच्या डेडीकेटेड कॅरीडोर उभारण्यात येणार असल्याचे रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी एका मुलाखतीदरम्यान  सांगितले.

३.Antigen टेस्ट किटच्या निर्यातीवर राज्य सरकारने तत्काळ निर्बंध लागू केले आहेत .कोरोन विषाणूच्या तिसर्या लाटेचा संभाव्य इशारा तज्ञांनी दिल्याने राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे .

४.समान कामासाठी समान वेतन हे तत्व सरसकट लागू केले जाऊ शकत नाही तसेच वेतन निश्चिती कर्तन कर्मचार्यांचे शिक्षण ,जबाबदारी इत्यादी गोष्टी महत्वपूर्ण ठरतात असे मुबई उच्च न्यायालयाने एका निकालात स्पष्ट केले आहे .

५.कोष्टी हे हलबा किवा हलबी नाहीत व यामुळे ते आरक्षणासाठी अपात्र आहेत .ते अन्सुचीत जमातींसाठीच्या आरक्षणाचा लाभ घेऊ शकत नाहीत ,असा महत्वपूर्ण नीकाल सर्वोच्च न्यायालयाने एका पोलीस अधिकार्याच्या प्रकरणात दिला आहे .

६.जुलै महिन्यामध्ये घाऊक निर्देशांकावर आधारित असणारा महागाई दर ११.१६ टक्के इतका नोंदविण्यात आला आहे .अन्नधान्याच्या किमती घसरल्याने महागाई दरात घट झाली आहे .


७.अफगाणिस्तानवर ताबा मिळवत तालिबान्यांनी तेथिल सत्ता काबीज केली आहे .तालिबान्यांशी मैत्री करण्यास चीन मात्र तयार आहे .तसेच चीनने अफगाणिस्तान मधील दूतावास सुरु ठेवण्याचा निर्णय घेतला आहे .चीनबरोबर रशिया व अमेरिकेने देखील अफगाणिस्तानमधील दूतावास सुरु ठेवणार असल्याचा निर्णय घेतला आहे .


८.कुठल्याही प्रतिकाराविना तालिबानला काबुलवर ताबा मिळणे हि अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात मोठी हार असल्याचे अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे .

९.म्यत्रिअल ओपन टेनिस स्पर्धेचे इटलीच्या कॅमिला जीओर्जी हिने विजेतेपद पटकावले .अंतिम सामन्यात तिने विम्बल्डन च्या उपविजेत्या कॅरोलीन प्लीस्कोवाचा पराभव केला .

१०.तालिबानने अफगाणिस्तानवर ताबा मिळवल्यानंतर अफगाणिस्तानची हवी हद्द बंद करण्यात आली आहे .याचा विमान प्र्च्लनाव्र मोठा परिणाम होत असून अनेक फ्लाईट चे मार्ग बदलण्यात आले आहेत .


Monday, August 16, 2021

चालू घडामोडी 16 ऑगस्ट

 

इतिहासात डोकावताना-

निधन-

1886-अध्यात्मिक संत रामकृष्ण परमहंस

2018-अटलबिहारी वाजपेयी


चालू घडामोडी 16 ऑगस्ट

1.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून स्वातंत्र्य दिनादिवशी मुलींनाही सैनिकी शाळेमध्ये प्रवेश देण्याची महत्वपूर्ण घोषणा केली आहे.


2.ठाणे येथे राज्यातील पहिले मराठा वसतिगृह सुरू करण्यात आले आहे.


3.100लाख कोटी रुपयांची प्रधानमंत्री गती शक्ती योजना लवकरच केंद्र सरकारद्वारे राबवण्यात येणार आहे.या योजने अंतर्गत अर्थव्यवस्थेला चालना देणे,व रोजगाराच्या निर्मिती ही प्रमुख लक्ष असेल.


4.राज्यातील कुपोषित बालकांच्या आकडेवारी बाबत साशंकता असल्याने महाराष्ट्र राज्य सरकार कुपोषित बालकांचा शोध घेण्यासाठी राज्य भरात शोध मोहीम राबवणार आहे.15 ते 31 ऑगस्ट दरम्यान ही मोहीम राबविण्यात येणार आहे.


5.जेष्ट गायिका जगजीत कौर यांचे निधन झाले आहे.


6.केंद्रीय कृषी मंत्रालयाने जाहीर केलेल्या माहितीनुसार मागील वर्षी झालेल्या चांगल्या पावसामुळे यावर्षी धान्याचे उत्पादन 86 लाख 50 हजार टन इतक्या विक्रमी प्रमाणात होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.


7.राज्यांना होणाऱ्या महसुलाच्या नुकसानापोटी केंद्राकडून दिल्या जाणाऱ्या अनुदानापैकी 9871 कोटी रुपयांचा हप्ता राज्यांना देण्यात आला आहे.


8.वरक्लॉव येथे सुरू असलेल्या जागतिक तिरंदाजी अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या रिकर्व्ह संघाने 8 पदकांची तर यात 5 सुवर्णपदकाची कमाई केली आहे.


9.जर्मनी फुटबॉल संघाचे महान फुटबॉलपटू गर्ड म्युलार यांचे निधन झाले आहे.1974 च्या फिफा विश्वचषक पश्चिम जर्मनीला मिळवुन देण्यात त्यांनी महत्वपुर्ण भूमिका निभावली.


10.तालिबानी बंडखोरांनी अफगाणिस्तानवर कब्जा केला आहे.अफगाणिस्तान सैन्याने तालिबान्यांपुढे शरणागती पत्करली आहे,तेथील राष्ट्रपती अश्रफ गणी यांनी राजीनामा देत देश सोडला आहे.तालिबान्यांनी अफगाणिस्तान चे नाव बदलून इस्लामिक अमिरात ऑफ अफगाणिस्तान असे केले आहे.


Saturday, August 14, 2021

चालू घडामोडी 14ऑगस्ट

 *पाकिस्तानचा आज स्वातंत्र्यदिन.


चालू घडामोडी 14ऑगस्ट 


1.केंद्र सरकारने देशातील124 प्रदूषित शहरांची यादी केंद्र सरकारने जाहीर केली आहे.त्यानुसार देशाच्या राजधानीचे शहर असणारे दिल्ली सर्वाधिक प्रदूषित शहर आहे.तर महाराष्ट्रामध्ये चंद्रपूर व पुणे हे सर्वाधिक प्रदूषित शहर आहे.


2.एकेरी वापराच्या प्लास्टिकच्या उत्पादन व विक्रीवर 01 जुलै 2022 पासून बंदी व्हाळण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.


03.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय वाहन भंगार निर्धारण  धोरण जाहीर केले आहे वैयक्तिक कारणासाठी 2024 तर ट्रकसारख्या अवजड वाहनांसाठी 2023 पासून हे धोरण लागू होणार आहे.


04.माहिती व तंत्रज्ञान नियम 2001 अस्तित्वात असताना नवीन अधिसूचित माहिती तंत्रज्ञान नियमाची ची आवश्यकता काय ?तुम्ही लोकांच्या विचार स्वातंत्र्यावर निर्बंध कसे घालू शकता असा सवाल उच्च न्यायालयाने विचारला आहे.


05.फाळणीमुळे अनेक लोकांचे स्थलांतर झाले.कित्येक लोकांची कुटुंबे उध्वस्त झाली .फाळणीच्या काळी कित्येक लोकांचे हिंसेट प्राण गेले त्या सर्व लोकांच्या  संघर्ष व बलिदानाच्या आठवणीत 14 ऑगस्ट हा 'विभाजन विभाशिका ' स्मृती दिन म्हणून पाळण्याचा निर्णय केंद्र सरकारणे घेतला आहे.


06.ओडिशातील भुवनेश्वर पुरी रस्त्यावर लाऊंडकी नावाच्या गावात प्राचीन मंदिर व मूर्तीचे अवशेष सापडले आहेत.या जवळपास दोन डझन मूर्ती आहेत.


07.भारताच्या वरिष्ठ महिला फुटबॉल संघाच्या प्रशिक्षकपदी थॉमस देनरबी यांची निवड करण्यात आली आहे. 

Friday, August 13, 2021

चालू घडामोडी 13ऑगस्ट

 इतिहासात डोकावताना 


*जन्म-1890-बालकवी त्र्यंबक बापूजी ठोंबरे

1898-प्रल्हाद केशव अत्रे 

*मृत्यू-1795-अहिल्याबाई होळकर 

1980-मराठी साहित्यिक पुरुषोत्तम भावे


चालू घडामोडी 13ऑगस्ट 


1.कोकणासाठी स्वतंत्र नागरी संरक्षण दलाच कार्यालय स्थापन करण्यात दिरंगाई का केली जात आहे असा सवाल उच्च न्यायालयाने राज्य सरकारला विचारला आहे.


2.महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आज इ पीक पाणी योजनेचे ऑनलाईन लोकार्पण केले.


03.महाराष्ट्र राज्य शिक्षण विभागाने राज्यातील शिक्षण शुल्कात 15 टक्के कपात करण्याचा आदेश दिला होता त्याचा शासकीय gr निघाला  आहे.


04.महाराष्ट्र पोलीस दलातील 11 पोलीस अधिकाऱ्यांना यावर्षीच्या केंद्रीय गृहमंत्री पदकाने सन्मानित करण्यात आले आहे.देशभरातील एकूण 152 अधिकारी व 15 सीबीआय अधिकारी यांचा उत्कृष्ट कामगिरी साठी गौरव करण्यात आला आहे.


05.भारतात आहे जगातील सर्वात श्रीमंत खेडे .गुजरात राज्याच्या कच्छ जिल्ह्यातील मधापार हे हे गाव सर्वात श्रीमंत खेडे म्हणून ओळखले जात आहे .


06.इस्रो अर्थात भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचा महत्वाचा निरीक्षण उपग्रह मोहीम अयशस्वी ठरली.निरीक्षण उपग्रहास घेऊन जाणारे रॉकेटचे इंजिन सुरू न झाल्याने रॅकेटचा मार्ग भरकटला.


07.इंग्लंड क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसन हा 35000 चेंडू टाकणारा जगातील पहिला जलदगती गोलंदाज ,तर 4 था गोलंदाज बनला आहे.


08.आता एटीएम मध्ये पैसे नसल्यास बँकांना दंड भरावा लागणार आहे .एटीएम मध्ये पैसे नसल्याने ग्राहकांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी रिजर्व बँकेने हा महत्वाचा निर्णय घेतला आहे 1 ऑक्टोबर पासून याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.


09.ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये सुवर्णपदक पटकावल्यामुळे भारताचा भालाफेकपटू नीरज चोप्रा  जागतिक मानांकणात दुसऱ्या स्थानी पोहचला आहे.


10.अफगाणिस्तान मधील सर्व भारतीयांनि तेथील हवाई सेवा बंद होण्याच्या आत मायदेशी परतावे आशा सूचना भारत सरकारने अफगाणिस्तान मधील भारतीय नागरिकांसाठी जारी केल्या आहेत.अमेरिकेने अफगाणिस्तान मधून सैन्य माघार घेण्याच्या घोषणेपासून अफगाणिस्तान मध्ये हिंसंचार वाढला असून भारतीय दूतावसातील कर्मचाऱ्यांना भारत सरकारने माघारी नेण्याच्या प्रक्रियेस सुरुवात झाली आहे.

Tuesday, August 10, 2021

चालू घडामोडी 10 ऑगस्ट

 




चालू घडामोडी 10 ऑगस्ट



01. कोरोना काळात मानसिक ताण,बेरोजगारी यामुळे मानसिक रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे ,याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य आरोग्य विभागाने राज्यातील चार 100 वर्षे जुन्या मोनोरुग्णालयाच्या पुनर्बांधणी साठी 1500 कोटी रुपयांचीतरतुड केली आहे


02.राज्य मध्यवर्ती ग्रंथालयातील 12 लाख पुस्तके जतन करण्याबरोबरच जगभरातील भावी पिढीला सहज उपलब्ध व्हावी यासाठी ऑनलाइन उपलब्ध करून देण्यात येतील असे उच्च व तंत्र शिक्षन मंत्री उदय सामंत यांनी सांगितले.


03.जनधन योजनेअंतर्गत आतापर्यंत महाराष्ट्रात 3.03कोटींपेक्षा जास्त खाती उघडण्यात आली आहेत.



04.भारतात झाईड्स कॅडीला लसीला लवकरच मान्यता मिळू शकते .ही लस 12 वर्षांवरील मुलांना देण्यात येणार आहे.


05.डिपॉझिट इन्शुरन्स क्रेडिट ग्यारंटी कॉर्पोरेशन हे विधेयक लोकसभेत मंजूर करण्यात आले आहे.



06.कोरोना संसर्गामुळे आंतरराष्ट्रीय सोने चांदीच्या भावांमध्ये घसरण झली आहे.चांदीच्या 2500 तर सोन्यात 1300 रुपयांची घसरण झाली आहे.



07.हिंदी महासगराच्या तापमान वाढीमुळे समुद्र पातळीत वाढ होत आहे.त्यामुळे भारताच्या सखल किनारी भागांमध्ये वारंवार पूर स्थिती निर्माण होईल असे  संयुक्त राष्ट्र समितीच्या अहवालात सांगण्यात आले आहे.


08.इंहनसिंग मेरिटाईम सिक्युरिटी ए केस फॉर इंटरनॅशनल कॉर्पोरेशन या विषयावरील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अध्यक्षस्थान भूषविले.सागरी सुरक्षा सहकार्याचा जागतिक आराखडा ज्या आधारे करता येईल अशी सागरी व्यापारातील अडथळे दूर करणे व वादांवर तोडगा काढणे असे पाच तत्वे त्यांनी सांगितले.


09.पृथ्वीचे वातावरणीय तापमान येत्या दशकात मोठ्या प्रमाणात वाढणार आहे.इंटर गव्हर्नमेंट पॅनल व क्लायमेट चेंज च्या जागतिक हवामान विषयक अहवालात म्हटले आहे.


10.हवामान बदलांना मानवी हालचाली कारणीभूत आहेत .पृथ्वी 1.5अंश सेल्सिअस तापमानावर पोहचेल अस इशारा आंतरराष्ट्रीय समितीने दिला आहे.


Monday, August 9, 2021

चालू घडामोडी ०९ ऑगस्ट

 चालू घडामोडी ०९ ऑगस्ट 

इतिहासात डोकावताना  -

*०८ ऑगस्ट १९४२ रोजी मुंबईच्या गवालिया टयांक मैदानात 'भारत छोडो 'आंदोलनाची गांधीजीनी घोषणा केली .तसेच ०९ ऑगस्ट हा दिवस 'क्रांती दिन 'म्हणून पाळण्यात यावा असे ठरले आणि हाच दिवस भारताच्या इतिहासातील क्रांती दिन म्हणून अजरामर झाला .ब्रिटीशांच्या १५० वर्षांच्या गुलामीच्या बेड्या तोडून टाकण्यासाठी प्रत्येक भारतीय उत्साही होता .अहिंसा हे तत्व जीवनभर पाळणाऱ्या गांधीजीनीच तेव्हा स्व्तान्त्र्यांची अंतिम लढाई म्हणून भारतीयांना 'करो या मरो ' हा संदेश दिला .


०१.संत साहित्याचे अभ्यासक व पत्रकार नरेंद्र कुंटे यांचे निधन .

०२.०९ ऑगस्ट हा जागतिक आदिवासी दिन म्हणून साजरा करण्यात येतो . 

०३.अकरावीच्या ऑनलाइन प्रवेश अर्ज भरण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे .मुंबई,पुणे,पिंपरी-चिंचवड,अमरावती,नाशिक नागपूर महापालिका क्षेत्रात राबवल्या जाणार्या अकरावीच्या केंद्रीय प्रवेश प्रक्रियेस १६ ऑगस्टपासून प्रवेश अर्ज भाग १ भरता येणार .

०४.मुंबईमधील लोकल रेल्वे १५ ऑगस्टपासून सुरु करण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य शासनाने घेतला आहे.मात्र यात केवळ कोरोना प्रतिबंधक लसीच्या दोन मात्रा घेनार्यानाच प्रवास करण्याची मुभा देण्यात येणार आहे .

०५.जेष्ठ अभिनेते अनुपम श्याम यांचे निधन झाले आहे .

०६.दोन वेगवेगळ्या कोरोन प्रतिबंधक लसीच्या मात्रांचा समिश्र वापर जास्त परिणामकारक ठरत असल्याचा निष्कर्ष आयसीएमआर ने केलेल्या अभ्यासातून निष्कर्ष काढण्यात आला आहे .आयसीएमआर ने चुकून  दोन वेगवेगळ्या लस घेतलेल्या उत्तर प्रदेश मधील १८ नागरिकांवर अभ्यास केला होता .

०७.इंडो तिबेट सीमा पोलीस दलात पहिल्यांदाच दोन महिला अधिकार्यांचा समावेश करण्यात आला आहे .भारत -चीन प्रत्यक्ष नियंत्रण  रेषेवर इंडो तिबेट पोलीस दल गस्त घालत असते .मसुरी येथे झालेल्या प्रशिक्षना नंतर एकूण ५३ अधिकारी आयटीबिपी मध्ये सामील झाले आहेत .या दीक्षांत सोहळ्या वेळी   आयटीबिपी च्या इतिहासावर आधारित असणार्या ६८० पानांच्या पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले .


०८.ब्रिटीशांच्या जाचातून भारतास मुक्त करण्यासाठी ९ ऑगस्ट १९४२ रोजी चले जाव आंदोलन सुरु करण्यात आले होते .या आंदोलनामध्ये स्वतच्या प्राणांचे बलिदान देणाऱ्या शहिदांच्या स्मृतीचे डिजिटल संग्रहालयच्या माध्यमातून जतन करण्यात येणार आहे .पुणे येथील रावसाहेब पटवर्धन प्रशालेच्या आवारात हे डिजिटल संग्रहालय उभारले जात आहे .


०९.टोकिओ ऑलिम्पिक २०२० ची सांगता झाली . या ऑलिम्पिक स्पर्धा २०२० मध्ये आयोजित करण्यात येणार होती मात्र कोरोना  महामारीमुळे १ वर्ष पुढे ढकलण्यात आली होती .भारताने या स्पर्धेत एकूण ७ पदकांची कमाई केली आहे .

१०.अंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीला ऑलिम्पिक खेळामधून खेळ हटवण्याची परवानगी मिळाली आहे .यामुळे येत्या प्यारीस ऑलिम्पिक मध्ये काही खेळ ऑलिम्पिक मधून कमी केलेले आढळून येऊ शकते. 

Sunday, August 8, 2021

गाझा पट्टी पुन्हा हादरली !

 *गाझा पट्टी पुन्हा हादरली !


           इज़्राइल व हमास या दोन देशांमध्ये पुन्हा युद्ध परस्थिती पेट घेऊ लागली आहे .२०१४ च्या झालेल्या गाझा पट्टीमध्ये भयाण युद्धामध्ये अनेकांचा हातोनात बली गेला होता .त्यानंतर या दोन देशांदरम्यान युद्ध तणाव परिस्थिती निर्माण होत असते .मागील १० मे रोजी दोन्ही देशांद्वारे एकमेकांवर हल्ले करणे सुरु झाले होते .११ दिवसांच्या संघर्षानंतर अखेर अंतरराष्ट्रीय देशांच्या दबावापुढे नमते घेत दोन्ही देशांकडून युद्धविराम स्वीकारण्यात आला आहे .मात्र तरीही या दोन देशांदरम्यान संघर्ष सुरूच असतो .७ तारखेच्या शनिवारच्या सकाळी गाझातून आग लावणारे फुगे सोडण्यात आल्याच्या कृतीला प्रतिसाद देत इझराईलच्या लढाऊ विमानांनी गाझा पट्टीतील दोन ठिकाणी हल्ले केले .गाझा पट्टीतून सोडण्यात आलेल्या चार 'इन्सेन्दिअरि बलून 'ज्यांना कि आग लावणारे फुगे म्हटले जाते अशा या फुग्यांमुळे इझराईलच्या एका ठिकाणी आग लागण्याची घटना घडली तर एका ठिकाणी शेतीचे नुकसान झाले .यानंतर याला प्रत्युत्तर म्हणून  इझराईलच्या लढाऊ विमानांनी हमासच्या लष्करी परिसरात हल्ले केले .या दोन्ही घटना मध्ये कुठेही जीवितहानी झाली नाही मात्र संघर्षाची शांत होत असणारी ठिणगी मात्र पुन्हा पेट घेऊ  लागली आहे . इझराईल व हमास दरम्यान ११ दिवसांच्या झालेल्या युद्धानंतर दोन महिन्यांनी हि घटना घडली आहे .२००७ साली गाझा या भागाचा ताबा हमास या दहशतवादी गटाने घेतल्यानंतरचे ११ दिवसांचे युद्ध हे चौथे युद्ध ठरले .


*काय आहे गाझा पट्टी? -

                                            

भूमध्य समु द्राच्या काठावर वसलेला एक वादग्रस्त प्रदेश आहे .गाझा पट्टी व वेस्ट बँक हे दोन प्रदेश मिळून  पॅलेस्टाईन प्रांताची स्थापना झाली आहे .पॅलेस्टाईन प्रांताची पॅलेस्टाईन राष्ट्रीय समिती हि  या भागाचा राज्यकारभार करणारी संस्था आहे .गाझा पट्टी सुमारे ४१ किमी लांब व ६ते १२ किमी रुंद आहे .गाझा पट्टीवर हमास या राजकीय दहशतवादी संघटनेचा अमल आहे .

*हमास काय आहे ?-

                                  

        हमास हि एक पॅलेस्टाईन सुन्नी मुस्लीम कट्टर पंथाची एक सैनिकी संघटना /लष्करी विंग आहे .हमास संघटना किवा त्याच्या लष्करी तुकडीला ग यांना ऑस्ट्रेलियाकॅनडाइजिप्त, युरोपियन युनियन, इस्रायलजपानयुनायटेड किंगडमयुनायटेड स्टेट्स आणि जॉर्डन या देशांमध्ये दहशतवादी संघटना म्हणून घोषित केलेलं आहे .तर चीन ,रशिया ,तुर्की दक्षिण आफ्रिका तसेच इतर काही अरब देशांमध्ये या संघटनेला दहशतवादी संघटना मानले जात नाही .या हमास संघटनेचे पॅलेस्टाईन राष्ट्रीय समिती च्या विधानमंडळात वर्चस्व आहे .इझराईल मधील नागरिक व प्रामुख्याने इझराईल ज्यू धर्मीय देश असल्यामुळे त्यांच्यावर हल्ला करण्यासाठी व पॅलेस्टाईन मधील नागरिकांसाठी समाजकार्य करण्यासाठी हि संघटना ओळखली जाते .



खेळाडू का जातात डिप्रेशन मध्ये !

     टोकिओ येथे सुरु असलेल्या ऑलिम्पिक स्पर्धा २०२० मध्ये अनेक  मुद्दे  गाजले .अनेक गोष्टी समोर आल्या .स्टार खेळाडूना प्रायोजकत्व देऊन कंपन्या त्यांना आपले ब्रांड बनवतात.मात्र याच कंपन्या स्टार खेळाडूंवर जिंकण्यासाठी प्रेशर टाकत असल्याचे आढळून आले आहे .जसे कि खेळाडूने जिंकलेच पाहिजे ,त्याचा पर्फोर्मंस उत्तमच व्हयला हवा ,अन्यथा त्याच्यासोबत केलेला करार मोडला जाईल वगेरे .त्यामुळे खेळाडू अधिक तणावग्रस्त होट आहेत व याचा परिणाम म्हणजे मानसिक ताण वाढताना दिसून येतो .अनेक खेळाडू त्यामुळे डिप्रेशन चा सामना करत असतात .स्पर्धा हरल्यावर खेळाडूना अपमानित वाटेल अशी वागणूक देणे कंपनीच्या ट्रेनर द्वारे मानसिक खच्चीकरण करणे असे प्रकार आढळून येत आहेट. यावर काही खेळाडूंनी मोठमोठ्या दबाव टाकणाऱ्या या क्मप्न्याना राम राम ठोकत लहान क्म्पण्याला प्राधान्य देण्यास सुरुवात केली आहे .या कंपन्यांमुळे खेळाडू प्र्सिधीम्ध्ये येतात मात्र त्यांच्या करिअरचे नुकसान होऊ शकते .


american athlet
sprintar alison feliks

चालू घडामोडी 8 ऑगस्ट




चालू घडामोडी 08 ऑगस्ट 


1.महाराष्ट्र राज्य सहकार परिषदेच्या अध्यक्षपदी बँकिंगमधील तज्ञ विद्याधर अनस्कर यांची राज्य सरकारने निवड केली आहे.


2.वनमजुराला तक्रार नोंदवण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देणाऱ्या ताडोबा अंधारी व्यग्र प्रकल्प हे राज्यातील पाहिले प्रकल्प  ठरले.


03.भारताची दूरसंचार कम्पनीचा तोटा 7 हजार कोटी रुपयांवर पोहचला आहे.


04.देशात आत्तापर्यंत कोरोना प्रतिबंधक लसीच्या  50 कोटी लसमात्रा देण्यात आल्या आहेत.


05.भविष्यातील आर्थिक आणि व्यापारातील अडचणीवर मात करण्यासाठी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व्यापार व वाणिज्य क्षेत्रातील मान्यवरांशी ऑनलाइन माध्यमातून बैठक घेतली.यात निर्यात क्षेत्रात 2022 पर्यंत 400 अब्ज डॉलर्सची लक्ष गाठण्याचे उद्दिष्ट  ठेवले आहे.


06.प्रधानमंत्री किसान योजनेच्या लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये 19500 करोड रुपये जमा करण्यात आले.


07.कफ सिरप किंवा इतर माफक पदार्थ असलेली औषध वैध कागदपत्रशिवाय बाळगणे गुन्हा ठरु शकते. एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा ठरू शकते.यात किमान 10 वर्षांची शिक्षा होऊ शकते असा निकाल मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने दिला आहे.


08.अमेरिकन कम्पनी जॉन्सन अँड जॉन्सन कम्पणीच्या लसीला भारतात आपत्कालीन वापरासाठी भारत सरकारने परवानगी दिली आहे.आपत्कालीन वापरासाठी परवानगी दिलेल्या एकूण संख्या आता 5 झाली आहे.


09.अमेरिकेतील अधिकारी किंवा सरकारी सदस्याने पाकिस्तानात लष्करी तळ उभारण्याबाबत चर्चा केलेली नाही असे पाकिस्तानचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मोईड युसूफ म्हटले.अमेरिकन प्रशासनाने पाकिस्तान मध्ये लष्करी तळ उभारल्याचे सांगण्यात येत होते.


10.गाझा तुन आग लावणारे फुगे सोडण्यात आल्याच्या कृतीला प्रतिसाद म्हणून इझ्राइलच्या लढाऊ विमानांनी गाझा पट्टीतील दोन लक्ष्यांवर हल्ले केले .इझ्राईल व हमास मधील संघर्ष पुन्हा पेटण्याची शक्यता आहे.


Saturday, August 7, 2021

चालू घडामोडी ०७ ऑगस्ट

 

इतिहासात डोकावताना -

जन्म -

१९२५-भारतीय शेतीतज्ञ  एम.एस.स्वामिनाथन 

मृत्यु-

१९४१- भारतीय  कवी ,लेखक व नोबल पारितोषिक विजेते गुरुदेव र्विद्र्नाथ टागोर 

२०१८-भारतीय राजकारणी व तमिळनाडू राज्याचे  ३ रे मुख्यमंत्री एम.करुणानिधी  

चालू घडामोडी ०७ ऑगस्ट 


०१.महाराष्ट्रातील आत्रेय संस्थेद्वारे दिला जानाऱ्या  मानाच्या  आचार्य अत्रे पुरस्कारासाठी यावर्षी पद्मश्री पुरस्कार विजेते डॉ.तात्याराव लहाने यांची निवड झाली आहे .


०२.महाराष्ट्रातील कोरोना रुग्णसंख्या कमी असणार्या जिल्ह्यांमध्ये 17 ऑगस्ट पासून इयत्ता १ ली  ते ७ वी या शाळांचे वर्ग सुरु करण्याचा निर्णय राज्याच्या शिक्षण विभागाने घेतला आहे .


०३.सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द ठरवल्यानंतर राज्य सरकारने मराठा  उमेदवारांना आर्थक दुर्बल प्रवर्गाचा लाभ देण्याचा  निर्णय घेतला होता व हा निर्णय शासनाच्या विवध पद भरतीसाठी लागू करण्यात आला होता .या शासनाच्या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे .शासन निर्णयाच्या अनुषंगाने एम्पिएस्सिने अभियांत्रिकी सेवांकरिता प्रसिद्ध केलेल्या सुधारित यादीला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे.



०४ .भारतीय रिजर्व बँकेने द्विमासिक पतधोरण जारी केले आहे . रिजर्व बँकेने पतधोरण जारी करताना रेपो दर ४ टक्क्यांवर तर रिवर्स रेपो ३.३५ टक्क्यांवर ठेवला व व्याजदरात कसलीही सूट देण्यात आलेली नाही .


०५. कोवव्याक्स हि लस येत्या ऑक्टोबर महिन्यामध्ये प्रौढ व्यक्तीसाठी तर २०२२ च्या पहिल्या तिमाहीत लहान मुलांसाठी उपलब्ध असे सिरम इंस्तीट्युत  ऑफ इंडिया चे अध्यक्ष आदर पूनावाला यांनी सांगितले आहे .


०६...टोकिओ येथे सुरु असलेल्या ऑलिम्पिक स्पर्धा २०२० मध्ये भारताची गोल्फपटू आदिती अशोक हिने नवीन विक्रमाची नोंद केली आहे .उत्कृष्ट कामगिरी करताना आदिती अशोक भारतातर्फे गोल्फ खेळामध्ये अंतिम चार खेळाडू मध्ये येण्याचा मन मिळवणारी पहिली भारतीय महिला गोल्फर ठरली आहे .तिचे कांस्य पदक थोडक्यात हुकले .


०७. .टोकिओ येथे सुरु असलेल्या ऑलिम्पिक स्पर्धा २०२० मध्ये भारताच्या पुरुष ४ बाय ४ ०० रिले संघाने आशियाई विक्रम मोडीत काढला .भारतीय संघाने तीन मिनिटे ०.२५ सेकंदांची वेळ नोंदवत  हा विक्रम रचला .


०८.अमेरिकेतील कंपनी जॉन्सन &जॉन्सन या कंपनीने एका डोसच्या कोरोन लसिला भारतात आपत्कालीन वापरासाठी मंजुरी मिळण्यासाठी केंद्र सरकारकडे अर्ज केला आहे .हि लस बायोलोजीकाल ई या कंपनीच्या भारतात व जगात वितरीत करण्यात येणार आहे.


०९.पूर्व लडाखमधील गोगोरामधून भारत व चीन या दोन्ही देशांच्या सैन्याने माघार घेण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे .दोन्ही सैन्यात सैन्य माघार घेण्याच्या करारानुसार दोन्ही लष्कराने टप्प्याटप्याने परस्पर समन्वयाने तैनात बंदी केली आहे.असे भारतीय लष्कराने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे.


१०.जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत टेसला चे प्रमुख एलन मस्क व ,amezon या इ कॉमर्स कंपनीचे संस्थापक जेफ बेझोझ यांना मागे टाकत आता लुई विटोन या कंपनीचे मालक 'बर्नाल्ड अर्नाल्त 'जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहेत .त्यांच्याकडे १९८.९ अब्ज डॉलरची संपत्ती आहे.

११.भरतासाठीचा टोकियो ऑलिम्पिक 2020 मधला सुवर्णपदकाचा दुष्काळ सम्पला.भारताचा भालाफेकपटू नीरज चोप्राने 100 वर्षांनंतर अथलेटने सुवर्णपदक पटकावले आहे.


१२.भारताचा कुस्तीपटू बजरंग पुनिया याने टोकियो ऑलिम्पिक 2020 मध्ये कांस्य पदक कमावले.

Friday, August 6, 2021

चालू घडामोडी 06 ऑगस्ट




चालू घडामोडी 06 ऑगस्ट


01.कोरोनामुळे आर्थिक संकटांना सामोरे जाणाऱ्या राज्यातील जवळपास 56 हजार कलाकारांना महाराष्ट्र राज्य सरकार ने 5 हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे.

02.कोरोनामुळे निराधार झालेल्या राज्यातील मुले,महिला यांचे पुनर्वसन करण्यासाठी  महाराष्ट्र राज्य सरकार विविध योजनांची सांगड घालणारी वात्सल्य योजना राबवणार आहे.

03.राजर्षी शाहू महाराज परदेश शिष्यवृत्ती योजनेतील जागांमध्ये 50 ची भर पडणार आहे.फाईन आर्टस्,फिल्म मेकिंग,अनिमेशन डिजाईन ,व कला शाखेतील उच्च शिक्षणाच्या निकषात बदल करण्यात येणार आहे.


04.कोरोना काळात इयत्ता पहिली ते 8 वीच्या विद्यार्थ्यांसाठी दूरदर्शनवर शैक्षणिक कार्यक्रम सुरू करण्यात येणार आहे अशी महिती राज्य सरकारने उच्च न्यायालयात दिली आहे.

05.महाराष्ट्रातील कोकण व पश्चिम महाराष्ट्रात पावसामुळे बाधित झालेल्या रस्त्यांच्या पुनर्बांधणी साठी केंद्र सरकारने 100 कोटी मंजूर केले आहेत अशी माहिती देशाचे रस्ते व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी दिली आहे.


06.महाराष्ट्र लोकसेवा आयोगावर तीन सदस्यांची निवड करण्यात आली आहे.शिवाजी विद्यालयाचे माजी कुलगुरू डॉ.देवानंद शिंदे ,निवृत्त सनदी अधिकारी राजीव जाधव व 
सेवानिवृत्त पोलीस अधिकारी प्रताप दिघावकर यांची निवड करण्यात आली आहे.


07.कोविशिल्ड घेतलेल्या विद्यार्थ्यांना इतर देशात जाताना स्व विलगिकर्णाची सोया स्वतः करावी लागत असेल तर त्याचा खर्च आता सिरम इन्स्टिट्यूट देणार आहे.

08.पूर्वलक्षी प्रभावाने कर होणार नाहीत लागू .अनेक कंपण्यांबाबत सुरू असलेला करविवाद सम्पवण्याच्या दृष्टीने सरकारने हे विधेयक आणले आहे.रेट्रोस्पेकटिव्ही कॅपिटल गेनवर कर आकारण्याची तरतूद रद्द करणारा प्रस्ताव आहे.

09.राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचे नाव बदलून हॉकीचे जादूगार म्हनून ओळखल्या जाणाऱ्या हॉकीपटू मेजर ध्यानचंद यांच्या नावाने हा पुरस्कार असे करण्यात आले आहे.

10.कोरोनाच्या प्रदूर्भावाच्या काळात राज्यातील 790 बालविवाह थांबवण्यास आले आहेत.तसेच यापुढेही बालविवाहना आला घालण्यासाठी महिला व बालविकास विभाग ,अक्षरा सेंटर व युनिसेफ द्वारे महाराष्ट्र राज्यात ऑगस्ट सप्टेंबर महिन्यात राज्यव्यापी मोहीम राबवण्यात येणार आहे.

Thursday, August 5, 2021

चालू घडामोडी 05 ऑगस्ट

जन्म-1890-मराठी इतिहास संशोधक दत्तो पोतदार

1969-व्यंकटेश प्रसाद भारतीय क्रिकेटर


चालू घडामोडी 05 ऑगस्ट 



01.कला ,वाणीज्य,विज्ञान या पारंपरिक पदवी अभ्यासक्रमांना  शाखांना बारावीनंतर थेट प्रवेश दिला जाणार आहे अशी माहिती महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्रसशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे.


02.केंद्रीय मंत्रिमंडळाने इसीबीसीनुसार आरक्षण देण्याचा राज्यांना अधिकार राज्यांना बहाल करण्याचा निर्णय घेतला आहे.याबद्दलचे विधेयक संसदेत लवकरच मांडण्यात येणार आहे.


03.अकरावी साठीच्या प्रवेश परीक्षेचे स्वरूप शिक्षण मंडळाने उच्च न्यायालयाच्या समोर मांडले आहे.यानुसार एकूण 175 प्रश्न असणार आहेत यापैकी विद्यार्थ्यांला 100 प्रश्न सोडवायचे आहेत.


04.महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयातील  वि.स.पागेसंसदीय प्रशिक्षण केंद्राच्या प्रमुख सल्लागार पदी हेमंत टकले यांची निवड करण्यात आली आहे.



05.सम्पूर्ण भारतीय बनावटीच्या आयएनएस विक्रांत या विमानवाहू  युद्धनौकेच्या सागरी चाचण्यांना यशस्वी रित्या सुरुवात झाली आहे.यशस्वी सागरी चाचण्यांच्या नंतर पुढीलवर्षी ऑगस्ट पर्यंत ही युद्धनौका नौदलात सामील होऊ शकते.


06.देशातील वाहन उद्योग क्षेत्रात मोठी वाढ नोंदवण्यात आली आहे.देशात मोटारसायकल व स्कुटर च्या विक्रीत जुलै महिन्यात वाढ नोंदवण्यात आली आहे .


07.भारतीय रिझर्व्ह बँकेने धनादेशाच्या बाबतीतिल नियमात बदल केले आहेत त्यानुसार धनादेशांचा क्लिअरन्स करणारी व्यवस्था दिवसाचे 24 तास व संपूर्ण आठवडाभर सुरू राहणार आहे.


08.टोकियो येथे सुरू असलेल्या ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये कुस्ती या क्रीडा प्रकारात भारताचा रविकुमार दहीया  याने रौप्य पदकाची कमाई केली आहे.ऑलिम्पिक मध्ये कुस्ती या खेळात भारतातर्फे पदक पटकवणारा तो सहावा खेळाडू ठरला आहे.


09.टोकियो येथे सुरू असलेल्या ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये भारतीय हॉकी संघाने उत्तम कामगिरी करत तब्बल 41वर्षांनंतर भारताला पदक मिळून दिले आहे.हॉकी संघाने कांस्य पदक पटकावले .


10.टोकियो येथे सुरू असलेल्या ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये

जमैका या देशाची धावपटू एलिना हेरह हिने 100 मिटर व 200 मिटर या दोन्ही धावणे या क्रीडा प्रकारात सुवर्ण पदक पटकावले अशी कामगिरी करणारी ती जगातील पहिली महिला ठरली आहे.



Tuesday, August 3, 2021

चालू घडामोडी ०३ ऑगस्ट

 इतिहासात डोकावताना

जन्म-

१७३०-पेशवा साम्राज्याचे सेनापती सदाशिवराव भाऊ पेशवा

१९५६-बलविंदरसिंग संधू -भारतीय क्रिकेटर

मृत्यू-

१९९३-भारतीय तत्वज्ञानी स्वामी चिन्मयानंद

२००७-मराठी लेखिका सरोजिनी वैद्य


०१.पंतप्रधान नरेंद्र मोदींचे सल्लागार अमरजित सिन्हा यांनी मुदतीआधीच आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे .पंतप्रधान कार्यालयातील अधिकारी वर्गामध्ये फेरबदल होण्याची शक्यता आहे .


०२.मराठा उमेदवारांच्या शासन सेवेतील नियुक्त्यांबाबत शासन निर्णय काढण्यात आला आहे राज्यातील मराठा विद्यार्थ्यांकरिता १४ ठिकाणी वसतिगृहे तयार करण्यात आली आहेत असे राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तसेच तसेच मराठा आरक्ष न्स्मितीचे प्रमुख अशोक चव्हान  यांनी स्पष्ट केले अआहे .


०३.डिजिटल पेमेंत्साठी देशात आता एक नवा पर्याय उपलब्ध होणार आहे .ई रुपी हे नवीन डिजिटल पेमेंट मध्यम उपलब्ध झाले आहे .national paments corporation of india ने याची निर्मिती केली आहे .पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते त्याचे अनावरण करण्यात आले .


०४.नागपूर- मुंबई हायस्पीड रेल्वे कारीडोर चा हवाई सर्वे करण्याचे काम पूर्ण झाले आहे .


०५.राज्यातील चिखली जि.बुलढाणा येथील लष्करात असलेले जवान कैलास भारत पवार यांना वीरमरण आले.ते महार बटालिअन मध्ये कार्यरत होते .सियाचीन मध्ये बर्फाळ डोंगरावरून ते खाली कोसळले .  

०६.आज महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने इयत्ता 12 विचा निकाल जाहीर केला.वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे राज्य शासनाने परीक्षा न घेता अंतर्गत मूल्यमापनच्या आधारे निकाल जाहीर केला आहे.


०७.इतर मागासवर्गीयांची संशोधनात्मक माहिती(imperils data)उपलब्ध नसल्याने राज्यात जातीनिहाय जनगणना करण्याचा महाराष्ट्र राज्य मागास वर्ग आयोगाच्या बैठकीत निर्णय झाला.


०८.भारतीय जीवन विमा निगम LIC च्या व्यवस्थापकीय संचालकपदाचा कार्यभार मिनी आईप यांनी स्वीकारला.


०९.देशाच्या अनेक भागात पाऊस न झाल्याने देशातील खत विक्रीवर त्याचा परिणाम झाला आहे.जून-जुलै महिन्यात रासायनिक खतांची विक्री 12 टक्क्यांनी घसरली आहे.


१०.जेष्ठ चित्रपट समीक्षक रशीद इराणी यांचे निधन झाले आहे.



Sunday, August 1, 2021

चालू घडामोडी ०२ ऑगस्ट

चालू घडामोडी ०२ ऑगस्ट 


०१.भारताच्या नौदल उपप्रमुख पदी व्हाईस अडमिरल एस.एन .घोरमाडे टी करण्यात आली आहे.


०२.१५ सदस्यांच्या संयुक्त राष्ट्र  कशा प्रिश्देचेउग्स्त म्हीण्यासाठीचे अध्यक्षपद भारताने स्वीकारले .


०३.अमिरेकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी आंतरराष्ट्रीय धार्मिक स्वातंत्र्यासाठी दूत म्हणून भारतीय-अमेरिकन वंशाचे रशाद हुसेन यांची निवड केली  आहे .


०४.वस्तू व सेवा कर (GST)करापोटी जुलै महिन्यात १.१६ लाख कोटींचा महसूल सरकारकडे जमा झाला आहे .गेल्यावर्षीच्या जुलै महिन्याच्या तुलनेत ३३ टक्क्यांनी वाढ नोंदवण्यात आली आहे .


०५.ईशान्येकडील राज्यातील सीमा वाद सोडवण्यासाठी केंद्र सरकार उपग्रहाची मदत घेणार आहे .ईशान्येकडील राज्यांमध्ये सीमावाद हिंसक बनत चालला आहे .ईशान्येकडील राज्यांच्या सीमा निश्चितीचे काम नॉर्थ इस्टर्न स्पेस अप्प्लीकेष्ण सेंटरला देण्यात आले आहे .


०६.जुलै महिन्यात देशातील प्रमुख वाहन निर्मिती करणाऱ्या कंपन्यांच्या विक्रीमध्ये भरघोस वाढ नोंदवण्यात आली आहे .


०७.कर्करोगाच्या पेशींवर तत्काळ घाव घालण्यासाठी य्प्युक्त ठरत असलेल्या प्रोटोन  थेरपीला खारघर च्या tata रुग्णालयात सुरुवात होत आहे.क्लिनिकल ट्रायल ला मन्जूरि देण्यात आली आहे .


०८.भारताची स्टार ब्याडमिंटन खेळाडू पी.वी.सिंधू हिने टो किओ ऑलिम्पिक स्पर्धा २०२० मध्ये कांस्य पदकाची कमाई केली .यासह ऑलिम्पिक मध्ये दोन वैयक्तिक पदके मिळवणारी सिंधू पहिली भारतीय महिला ठरली .


०९.टोकिओ ऑलिम्पिक २०२० स्पर्धेत तब्बल ४१ वर्षांनी भारतीय  हॉकी संघ उपांत्य फेरीत दाखल झाला आहे .ग्रेट ब्रिटन ला नमवत हि कामगिरी भारतीय हॉकी संघाने केली .


१०.इटलीच्या लेमंट मार्सेल जेक्ब्सेन्ने १०० मीटर पुरुष रनिंग स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले .यासह टो सर्वात वेगवान पुरुष खेळाडू बनला .त्याने ९.८ सेकंदाची वेळ नोंदवली .