जन्म-1890-मराठी इतिहास संशोधक दत्तो पोतदार
1969-व्यंकटेश प्रसाद भारतीय क्रिकेटर
चालू घडामोडी 05 ऑगस्ट
01.कला ,वाणीज्य,विज्ञान या पारंपरिक पदवी अभ्यासक्रमांना शाखांना बारावीनंतर थेट प्रवेश दिला जाणार आहे अशी माहिती महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्रसशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे.
02.केंद्रीय मंत्रिमंडळाने इसीबीसीनुसार आरक्षण देण्याचा राज्यांना अधिकार राज्यांना बहाल करण्याचा निर्णय घेतला आहे.याबद्दलचे विधेयक संसदेत लवकरच मांडण्यात येणार आहे.
03.अकरावी साठीच्या प्रवेश परीक्षेचे स्वरूप शिक्षण मंडळाने उच्च न्यायालयाच्या समोर मांडले आहे.यानुसार एकूण 175 प्रश्न असणार आहेत यापैकी विद्यार्थ्यांला 100 प्रश्न सोडवायचे आहेत.
04.महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयातील वि.स.पागेसंसदीय प्रशिक्षण केंद्राच्या प्रमुख सल्लागार पदी हेमंत टकले यांची निवड करण्यात आली आहे.
05.सम्पूर्ण भारतीय बनावटीच्या आयएनएस विक्रांत या विमानवाहू युद्धनौकेच्या सागरी चाचण्यांना यशस्वी रित्या सुरुवात झाली आहे.यशस्वी सागरी चाचण्यांच्या नंतर पुढीलवर्षी ऑगस्ट पर्यंत ही युद्धनौका नौदलात सामील होऊ शकते.
06.देशातील वाहन उद्योग क्षेत्रात मोठी वाढ नोंदवण्यात आली आहे.देशात मोटारसायकल व स्कुटर च्या विक्रीत जुलै महिन्यात वाढ नोंदवण्यात आली आहे .
07.भारतीय रिझर्व्ह बँकेने धनादेशाच्या बाबतीतिल नियमात बदल केले आहेत त्यानुसार धनादेशांचा क्लिअरन्स करणारी व्यवस्था दिवसाचे 24 तास व संपूर्ण आठवडाभर सुरू राहणार आहे.
08.टोकियो येथे सुरू असलेल्या ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये कुस्ती या क्रीडा प्रकारात भारताचा रविकुमार दहीया याने रौप्य पदकाची कमाई केली आहे.ऑलिम्पिक मध्ये कुस्ती या खेळात भारतातर्फे पदक पटकवणारा तो सहावा खेळाडू ठरला आहे.
09.टोकियो येथे सुरू असलेल्या ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये भारतीय हॉकी संघाने उत्तम कामगिरी करत तब्बल 41वर्षांनंतर भारताला पदक मिळून दिले आहे.हॉकी संघाने कांस्य पदक पटकावले .
10.टोकियो येथे सुरू असलेल्या ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये
जमैका या देशाची धावपटू एलिना हेरह हिने 100 मिटर व 200 मिटर या दोन्ही धावणे या क्रीडा प्रकारात सुवर्ण पदक पटकावले अशी कामगिरी करणारी ती जगातील पहिली महिला ठरली आहे.
No comments:
Post a Comment