Wednesday, August 18, 2021

चालू घडामोडी १८ ऑगस्ट

 


इतिहासात डोकावताना -

जन्म -१९०० -विजयालक्ष्मी पंडित -भारताचे पहिले पंतप्रधान पंडित नेहरूंच्या बहिण ,तसेच भारताच्या प्रथम कॅबिनेट महिला मंत्र्यांपैकी एक .

मृत्यू -१९४५ -सुभाषचंद्र बोस-भारतीय क्रांतिकारी तसेच भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस चे अध्यक्ष .

१.दादर येथे  इलेक्ट्रिक  वाहन चार्जिंग स्टेशन  चे पर्याव्र्न्मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले .राज्यातील हे पहिले इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग स्टेशन असल्याचा मुंबई महानगरपालिकेचा दावा आहे .

२.महाराष्ट्रात ५० हजार कोटी रुपयांच्या डेडीकेटेड कॅरीडोर उभारण्यात येणार असल्याचे रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी एका मुलाखतीदरम्यान  सांगितले.

३.Antigen टेस्ट किटच्या निर्यातीवर राज्य सरकारने तत्काळ निर्बंध लागू केले आहेत .कोरोन विषाणूच्या तिसर्या लाटेचा संभाव्य इशारा तज्ञांनी दिल्याने राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे .

४.समान कामासाठी समान वेतन हे तत्व सरसकट लागू केले जाऊ शकत नाही तसेच वेतन निश्चिती कर्तन कर्मचार्यांचे शिक्षण ,जबाबदारी इत्यादी गोष्टी महत्वपूर्ण ठरतात असे मुबई उच्च न्यायालयाने एका निकालात स्पष्ट केले आहे .

५.कोष्टी हे हलबा किवा हलबी नाहीत व यामुळे ते आरक्षणासाठी अपात्र आहेत .ते अन्सुचीत जमातींसाठीच्या आरक्षणाचा लाभ घेऊ शकत नाहीत ,असा महत्वपूर्ण नीकाल सर्वोच्च न्यायालयाने एका पोलीस अधिकार्याच्या प्रकरणात दिला आहे .

६.जुलै महिन्यामध्ये घाऊक निर्देशांकावर आधारित असणारा महागाई दर ११.१६ टक्के इतका नोंदविण्यात आला आहे .अन्नधान्याच्या किमती घसरल्याने महागाई दरात घट झाली आहे .


७.अफगाणिस्तानवर ताबा मिळवत तालिबान्यांनी तेथिल सत्ता काबीज केली आहे .तालिबान्यांशी मैत्री करण्यास चीन मात्र तयार आहे .तसेच चीनने अफगाणिस्तान मधील दूतावास सुरु ठेवण्याचा निर्णय घेतला आहे .चीनबरोबर रशिया व अमेरिकेने देखील अफगाणिस्तानमधील दूतावास सुरु ठेवणार असल्याचा निर्णय घेतला आहे .


८.कुठल्याही प्रतिकाराविना तालिबानला काबुलवर ताबा मिळणे हि अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात मोठी हार असल्याचे अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे .

९.म्यत्रिअल ओपन टेनिस स्पर्धेचे इटलीच्या कॅमिला जीओर्जी हिने विजेतेपद पटकावले .अंतिम सामन्यात तिने विम्बल्डन च्या उपविजेत्या कॅरोलीन प्लीस्कोवाचा पराभव केला .

१०.तालिबानने अफगाणिस्तानवर ताबा मिळवल्यानंतर अफगाणिस्तानची हवी हद्द बंद करण्यात आली आहे .याचा विमान प्र्च्लनाव्र मोठा परिणाम होत असून अनेक फ्लाईट चे मार्ग बदलण्यात आले आहेत .


No comments:

Post a Comment