Thursday, August 19, 2021

*चालू घडामोडी १९ ऑगस्ट

 *चालू घडामोडी १९ ऑगस्ट 

१.महाराष्ट्र राज्यातील जवळपास साडे नाऊ लाख यांत्र्मागांशी निगडीत साडेचार लाख कामगारांकरिता यंत्रमाग कामगार महामंडळ स्थापन करण्यात येणार आहे .कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांनी यंत्रमाग कामगार महा मंडळ स्थापन करण्यास मंजुरी देण्यात आल्याची घोषणा केली .

२.शिक्षक दिनी दिले जाणारे राष्ट्रपती पुरस्कार जाहीर झाले आहेत .देशातील एकूण ४५ शिक्षकांना हे पुरस्कार देण्यात येणार आहेत .यात महारष्ट्रातील दोन शिक्षकांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे .उस्मानाबाद जिल्ह्यातील कडोदरा जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक उमेश खोसे व गडचिरोली जिल्ह्यातील जिल्हा परिषद उच्च प्रठ्मील शाळेतील कुर्शीद शेख यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे . 

३.मुलीनही आता NDA राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी ची प्रवेश परीक्षा देता येणार आहे .सुप्रीम कोर्टात दाखल याबाबतच्या प्रकरणात सर्वोच न्यायालयाने हा निर्णय दिला आहे .मुलीना NDA मध्ये  संधी नाकारून सैन्य दलात अधिकारी बनण्यापासून नाकारत NDA राज्यघटनेच्या १४,१५,१६,व १९ या कलमाचे उल्लंघन करत असल्याचा आरोप या याचीलेत करण्यात आला होता .

४.खासगी क्षेत्रामध्ये अग्रगण्य असणारी HDFC बॅंकेवरील निर्बंध रिजर्व बँकेने काही प्रमाणात शिथिल केले आहेत .त्यामुळे आठ महिने सुरु राहिलेल्या बंदी नंतर बँकेला नवीन क्रेडीट कार्ड वितरण करणे शक्य होणार आहे .


५.देशातील वित्तीय स्मावेश्क्तेचे प्रमाण मोजण्यासाठी आणि त्यात सुरु असणार्या सुधारणांना जोखण्यासाठी वार्षिक निर्देशांकाची घोषणा रिजर्व बँकेने केली आहे .


६.20 वर्षांखालील जागतिक युवा आथलेटिक्स स्पर्धेत भारताच्या मिश्र रिले संघाने 400 मीटरच्या स्पर्धेत कांस्ययपदक कमावले आहे.



7.खाद्य तेलाच्या स्वताईसाठी केंद्र सरकारने पाऊले उचलली आहेत.केंद्र सरकारने खाद्य तळावरील आयातिवरील भारताचे अवलंबित्व कमी करण्याच्या दृष्टीने महत्वाच्या असणाऱ्या योजनेला मंजुरी दिली आहे.राष्ट्रीय खाद्यतेल मिशन पामतेल ही ती योजना आहे ,या योजनेकरिता पाच वरशांसाठी 11040 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.


8.बँक लोकरबाबत रिजर्व बँकेव नवीन नियम लागू केले आहेत.


9.विविध अर्थ तज्ञांनी चालू आर्थिक वर्षात एप्रिल ते जून या पहिल्या तिमाहीत देशाचा gdp सकळ राष्ट्रीय उत्पादन दर हब13ते 23 टक्क्यांपर्यंत वाढण्याचा अंदाज व्यक्त केला आहे.

No comments:

Post a Comment