Sunday, August 29, 2021

चालू घडामोडी २९ ऑगस्ट

 

जन्म-१८८०-माधव श्रीहरी अने -भारतीय स्वातंत्र्यसैनिक 

१९०१-विठ्ठलराव विखे पाटील-भारतातील सहकार च्ल्व्लीम्धील अग्रणी नेते .

१९०५-हॉकीचा जादुगार म्हणून ओळख असणारे मेजर ध्यानचंद 

*मृत्यू-१९०६-मराठी ख्रिस्ती सह्त्यिक व धर्मप्रसारक -बाबा पदमनजी 

१९६९-मराठी शाहीर शाहीर अमर शेख 

चालू घडामोडी २९ ऑगस्ट 

१.महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या 'भारतीय संसद मे भगतसिंग कोश्यारी 'या पुस्तकाचे नवी दिल्ली येथे प्रकाशन करण्यात आले.

२.जगप्रसिद्ध चित्रकार रोबी जेम्स फ्रान्सिस डिसिल्वा यांचे निधन झाले आहे. 

३.देशातील सर्वात जुन्या दंत महाविद्यालयामध्ये दुसर्या क्रमांकाचे रुग्णालय असा नावलौकिक असणार्या आणि दरवर्षी तब्बल साडेतीन लाखांपेखा अधिक रुग्णावर  दंतोपचार करणाऱ्या बृहन्मुंबई महानगर पालिकेच्या महाविद्यालयाच्या शैक्षणिक व सोयी सुविधांची दाखल राष्ट्रीय स्तरावरील सर्वेक्षणात घेण्यात आले आहे .

४.'एकाधीर्वादी सरकारे सातत्याने असत्यावर अवलंबून असतात .सरकारी संस्था माजुत करण्यासाठी आणि सत्याच्या आग्रहासाठी सरकारला जाब विचारणे हे नागरिकांचे कर्तव्य आहे 'असे प्रतिपादन सर्वोच न्यायालयाचे न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांनी एका कार्यक्रम दरम्यान केले आहे.

५ .लेखक आनंद अंतरकर यांचे निधन झाले आहे.हंस,मोहिनी,व नवल या मासिकांचे संपादक ते होते.

६.केंद्रीय रस्ते व वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने वाहन नोंदणीसाठी नवा निर्णय घेतला आहे.मंत्रालयाने बीएच हि नवीन मालिका सादर केली आहे.वाहनधारकांना त्यांचे वाहन देशात कुठेही आणि कधीहि बिनधास्तपणे नेता येणार आहे.

७.टेबल टेनिसपटू भाविनाबेन पटेलने टोकिओ परालाम्पिक क्रीडा स्पर्धेत ऐतिहासिक कामगिरी करत रौप्य पदकाची कमाई केली आहे.टेबल टेनिस या  क्रीडा प्रकारात ऑलिम्पिक पदक मिळवणारी पहिली खेळाडू ठरली आहे.

८.आज राष्ट्रीय क्रीडा दिन आहे.होकीचा जादुगार म्हणून ओळखल्या जाणार्या मेजर ध्यानचंद यांची आज जयंती आहे.हा दिन राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा केला जातो .

९.पंतप्रधान नरेंद्र मोदि यांनी जालियानवाला बाग चे नुत्नीकर्ण करण्यांत आलेल्या संकुलाचे लोकार्पण केले .

१०अंतरराष्ट्रीय प्रवासासाठी आता 'आर्तीपिसिआर' चाचणीचा अह्वाल बंधनकारक करण्यात  आला आहे .केंद्रीय आरोग्य विभागाने जरी केलेल्या नव्या नियमावलीनुसार महाराष्ट्र राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे .त्यानुसार प्रदेशातून राज्यात येणाऱ्या प्रवाशांना लशीच्या  दोन्ही मात्रा घेतल्या असल्या तरीही आर्तीपिसिआर' चाचणीचा अह्वाल दाखवावा लागेल .


No comments:

Post a Comment