Monday, August 16, 2021

चालू घडामोडी 16 ऑगस्ट

 

इतिहासात डोकावताना-

निधन-

1886-अध्यात्मिक संत रामकृष्ण परमहंस

2018-अटलबिहारी वाजपेयी


चालू घडामोडी 16 ऑगस्ट

1.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून स्वातंत्र्य दिनादिवशी मुलींनाही सैनिकी शाळेमध्ये प्रवेश देण्याची महत्वपूर्ण घोषणा केली आहे.


2.ठाणे येथे राज्यातील पहिले मराठा वसतिगृह सुरू करण्यात आले आहे.


3.100लाख कोटी रुपयांची प्रधानमंत्री गती शक्ती योजना लवकरच केंद्र सरकारद्वारे राबवण्यात येणार आहे.या योजने अंतर्गत अर्थव्यवस्थेला चालना देणे,व रोजगाराच्या निर्मिती ही प्रमुख लक्ष असेल.


4.राज्यातील कुपोषित बालकांच्या आकडेवारी बाबत साशंकता असल्याने महाराष्ट्र राज्य सरकार कुपोषित बालकांचा शोध घेण्यासाठी राज्य भरात शोध मोहीम राबवणार आहे.15 ते 31 ऑगस्ट दरम्यान ही मोहीम राबविण्यात येणार आहे.


5.जेष्ट गायिका जगजीत कौर यांचे निधन झाले आहे.


6.केंद्रीय कृषी मंत्रालयाने जाहीर केलेल्या माहितीनुसार मागील वर्षी झालेल्या चांगल्या पावसामुळे यावर्षी धान्याचे उत्पादन 86 लाख 50 हजार टन इतक्या विक्रमी प्रमाणात होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.


7.राज्यांना होणाऱ्या महसुलाच्या नुकसानापोटी केंद्राकडून दिल्या जाणाऱ्या अनुदानापैकी 9871 कोटी रुपयांचा हप्ता राज्यांना देण्यात आला आहे.


8.वरक्लॉव येथे सुरू असलेल्या जागतिक तिरंदाजी अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या रिकर्व्ह संघाने 8 पदकांची तर यात 5 सुवर्णपदकाची कमाई केली आहे.


9.जर्मनी फुटबॉल संघाचे महान फुटबॉलपटू गर्ड म्युलार यांचे निधन झाले आहे.1974 च्या फिफा विश्वचषक पश्चिम जर्मनीला मिळवुन देण्यात त्यांनी महत्वपुर्ण भूमिका निभावली.


10.तालिबानी बंडखोरांनी अफगाणिस्तानवर कब्जा केला आहे.अफगाणिस्तान सैन्याने तालिबान्यांपुढे शरणागती पत्करली आहे,तेथील राष्ट्रपती अश्रफ गणी यांनी राजीनामा देत देश सोडला आहे.तालिबान्यांनी अफगाणिस्तान चे नाव बदलून इस्लामिक अमिरात ऑफ अफगाणिस्तान असे केले आहे.


No comments:

Post a Comment