Sunday, August 8, 2021

गाझा पट्टी पुन्हा हादरली !

 *गाझा पट्टी पुन्हा हादरली !


           इज़्राइल व हमास या दोन देशांमध्ये पुन्हा युद्ध परस्थिती पेट घेऊ लागली आहे .२०१४ च्या झालेल्या गाझा पट्टीमध्ये भयाण युद्धामध्ये अनेकांचा हातोनात बली गेला होता .त्यानंतर या दोन देशांदरम्यान युद्ध तणाव परिस्थिती निर्माण होत असते .मागील १० मे रोजी दोन्ही देशांद्वारे एकमेकांवर हल्ले करणे सुरु झाले होते .११ दिवसांच्या संघर्षानंतर अखेर अंतरराष्ट्रीय देशांच्या दबावापुढे नमते घेत दोन्ही देशांकडून युद्धविराम स्वीकारण्यात आला आहे .मात्र तरीही या दोन देशांदरम्यान संघर्ष सुरूच असतो .७ तारखेच्या शनिवारच्या सकाळी गाझातून आग लावणारे फुगे सोडण्यात आल्याच्या कृतीला प्रतिसाद देत इझराईलच्या लढाऊ विमानांनी गाझा पट्टीतील दोन ठिकाणी हल्ले केले .गाझा पट्टीतून सोडण्यात आलेल्या चार 'इन्सेन्दिअरि बलून 'ज्यांना कि आग लावणारे फुगे म्हटले जाते अशा या फुग्यांमुळे इझराईलच्या एका ठिकाणी आग लागण्याची घटना घडली तर एका ठिकाणी शेतीचे नुकसान झाले .यानंतर याला प्रत्युत्तर म्हणून  इझराईलच्या लढाऊ विमानांनी हमासच्या लष्करी परिसरात हल्ले केले .या दोन्ही घटना मध्ये कुठेही जीवितहानी झाली नाही मात्र संघर्षाची शांत होत असणारी ठिणगी मात्र पुन्हा पेट घेऊ  लागली आहे . इझराईल व हमास दरम्यान ११ दिवसांच्या झालेल्या युद्धानंतर दोन महिन्यांनी हि घटना घडली आहे .२००७ साली गाझा या भागाचा ताबा हमास या दहशतवादी गटाने घेतल्यानंतरचे ११ दिवसांचे युद्ध हे चौथे युद्ध ठरले .


*काय आहे गाझा पट्टी? -

                                            

भूमध्य समु द्राच्या काठावर वसलेला एक वादग्रस्त प्रदेश आहे .गाझा पट्टी व वेस्ट बँक हे दोन प्रदेश मिळून  पॅलेस्टाईन प्रांताची स्थापना झाली आहे .पॅलेस्टाईन प्रांताची पॅलेस्टाईन राष्ट्रीय समिती हि  या भागाचा राज्यकारभार करणारी संस्था आहे .गाझा पट्टी सुमारे ४१ किमी लांब व ६ते १२ किमी रुंद आहे .गाझा पट्टीवर हमास या राजकीय दहशतवादी संघटनेचा अमल आहे .

*हमास काय आहे ?-

                                  

        हमास हि एक पॅलेस्टाईन सुन्नी मुस्लीम कट्टर पंथाची एक सैनिकी संघटना /लष्करी विंग आहे .हमास संघटना किवा त्याच्या लष्करी तुकडीला ग यांना ऑस्ट्रेलियाकॅनडाइजिप्त, युरोपियन युनियन, इस्रायलजपानयुनायटेड किंगडमयुनायटेड स्टेट्स आणि जॉर्डन या देशांमध्ये दहशतवादी संघटना म्हणून घोषित केलेलं आहे .तर चीन ,रशिया ,तुर्की दक्षिण आफ्रिका तसेच इतर काही अरब देशांमध्ये या संघटनेला दहशतवादी संघटना मानले जात नाही .या हमास संघटनेचे पॅलेस्टाईन राष्ट्रीय समिती च्या विधानमंडळात वर्चस्व आहे .इझराईल मधील नागरिक व प्रामुख्याने इझराईल ज्यू धर्मीय देश असल्यामुळे त्यांच्यावर हल्ला करण्यासाठी व पॅलेस्टाईन मधील नागरिकांसाठी समाजकार्य करण्यासाठी हि संघटना ओळखली जाते .



No comments:

Post a Comment