Thursday, August 26, 2021

*चालू घडामोडी २६ ऑगस्ट


*चालू घडामोडी २६ ऑगस्ट 

 *जन्म  -१.१९१०-भारतरत्न व नोबल पारितोषिक विजेत्या मदर टेरेसा 

२.१९२२-गणेश प्रधान -शिक्षणतज्ञ 

*मृत्यू-१९४८-केसरी वृत्तपत्राचे संपादक -कृष्णाजी खाडिलकर 


१.कृषी या विषयाचा शालेय शिक्षण अभ्यासक्रमात समावेश करण्यात येणार आहे.यावरील अभ्यासक्रम हा शालेय शिक्षण विभाग व कृषी विभाग मिळून या विषयाचा अभ्यासक्रम तयार करणार आहेत .राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद व महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषद यांनी संयुक्तपणे अभ्यासक्रम तयार करावा असा निर्णय महाराष्ट्र राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्ष गायकवाड व कृषिमंत्री दादा भुसे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत घेण्यात आला आहे .


२.कृषी संशोधक पद्मश्री बी.व्ही.निंबकर यांचे निधन झाले आहे.ते फलटण मधील प्रसिद्ध निंबकर अग्रीकाल्चरल इंस्तीत्युट चे संस्थापक होते.


3.कोरोना महामारीमुळे वैधव्य आलेल्या ग्रामीण उपेक्षित,वंचित घटकातील महिलांचे जीवनस्तर उंचावण्यासाठी राज्य सरकार वात्सल्य योजना राबवणार आहे .या योजनेंतर्गत या महिलांना मदत करण्यासाठी तसेच त्यांना लागणारी प्रमाणपत्रे मिळून देण्यासाठी १८ विविध सेवा देण्याचा प्रयत्न महिला व बाल कल्याण विभागातर्फे सुरु करण्यात आला आहे .


४.अंतरराष्ट्रीय ख्याती असलेल्या जेष्ठ समाजशास्त्रज्ञ डॉ.गेल ओम्वेट यांचे निधन झाले आहे .त्या संशोधक,लेखक व स्त्री मुक्ती चळवळीच्या कार्यकर्त्या होत्या.


५.सलग पाच वर्षे तोटा नोंदविनाऱ्या सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी आर्थिक वर्ष २०२०-२१ मध्ये पहिल्यांदाच ३१८१७ कोटी रुपयांच्या नफ्याची नोंद केली आहे .बँकांनी आता आर्थिकदृष्ट्या सक्षमता प्राप्त केली असून त्यांना आता आर्थिक कुबड्यांची गरज नाही असे देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटले आहे .


6.केंद्र सरकार माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील ३०० नवीन नव उद्यमिना startup चालना देणारा प्रकल्प करण्यात येत आहे.या अंतर्गत १०० नव उद्यमिना ,निधी सहाय्य ,मार्गदर्शन,बाजार्प्र्थ उपलब्ध करून देण्यात येणार आहे .


७.राज्यांना केवळ आर्थी निकषांवर इतर मागासवर्गीयात क्रिमिलेअर मिर्धारित करता येउ शकत नाही असे स्पष्ट करीत सर्वोच्च न्यायालयाने हरियाना सरकारची १७ ऑगस्ट २०१६ चि अधिसूचना रद्द करून नव्याने क्रिमिलेअर चि व्याख्या निश्चित करण्यास सांगितले आहे .


८.भारताचा आघाडीचा टेबल टेनिसपटू ज्ञानशेखरन साठीयनने युक्रेनच्या युव्हेन प्रायचेपाला ४-0 ने हरवत 'आयटीटीएफ ' चेक आंतरराष्ट्रीय टेबल टेनिस स्पोर्धेच्या पुरुष एकेरीचे जेतेपद पटकावले .


९.भारतात कोरोनाची साथ आता इंडेमिक टप्प्यात पोहचली आहे .येथे कोरोन विषाणूची लग्न होण्याचे प्रमाण आधीपेक्षा खूप कमी आहे असे मत WHO च्या मुख्य शास्त्रद्न्य डॉ.सौम्य स्वामिनाथन यांनी म्हटले आहे .


१० तालिबानची सत्ता अफगानिस्तान मध्ये आल्यानंतर बदललेल्या परीस्तीतीमुळे अफगाण नागरिकांना आता भारतात केवळ ई-विसावर प्रवास  करता येईल भारत सरकारने अफगाण नागरिकांसाठी ई-इमर्जन्सी व्हिसा ही नवी श्रेणी सुरु केली होती त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे .





No comments:

Post a Comment