Friday, August 13, 2021

चालू घडामोडी 13ऑगस्ट

 इतिहासात डोकावताना 


*जन्म-1890-बालकवी त्र्यंबक बापूजी ठोंबरे

1898-प्रल्हाद केशव अत्रे 

*मृत्यू-1795-अहिल्याबाई होळकर 

1980-मराठी साहित्यिक पुरुषोत्तम भावे


चालू घडामोडी 13ऑगस्ट 


1.कोकणासाठी स्वतंत्र नागरी संरक्षण दलाच कार्यालय स्थापन करण्यात दिरंगाई का केली जात आहे असा सवाल उच्च न्यायालयाने राज्य सरकारला विचारला आहे.


2.महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आज इ पीक पाणी योजनेचे ऑनलाईन लोकार्पण केले.


03.महाराष्ट्र राज्य शिक्षण विभागाने राज्यातील शिक्षण शुल्कात 15 टक्के कपात करण्याचा आदेश दिला होता त्याचा शासकीय gr निघाला  आहे.


04.महाराष्ट्र पोलीस दलातील 11 पोलीस अधिकाऱ्यांना यावर्षीच्या केंद्रीय गृहमंत्री पदकाने सन्मानित करण्यात आले आहे.देशभरातील एकूण 152 अधिकारी व 15 सीबीआय अधिकारी यांचा उत्कृष्ट कामगिरी साठी गौरव करण्यात आला आहे.


05.भारतात आहे जगातील सर्वात श्रीमंत खेडे .गुजरात राज्याच्या कच्छ जिल्ह्यातील मधापार हे हे गाव सर्वात श्रीमंत खेडे म्हणून ओळखले जात आहे .


06.इस्रो अर्थात भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचा महत्वाचा निरीक्षण उपग्रह मोहीम अयशस्वी ठरली.निरीक्षण उपग्रहास घेऊन जाणारे रॉकेटचे इंजिन सुरू न झाल्याने रॅकेटचा मार्ग भरकटला.


07.इंग्लंड क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसन हा 35000 चेंडू टाकणारा जगातील पहिला जलदगती गोलंदाज ,तर 4 था गोलंदाज बनला आहे.


08.आता एटीएम मध्ये पैसे नसल्यास बँकांना दंड भरावा लागणार आहे .एटीएम मध्ये पैसे नसल्याने ग्राहकांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी रिजर्व बँकेने हा महत्वाचा निर्णय घेतला आहे 1 ऑक्टोबर पासून याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.


09.ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये सुवर्णपदक पटकावल्यामुळे भारताचा भालाफेकपटू नीरज चोप्रा  जागतिक मानांकणात दुसऱ्या स्थानी पोहचला आहे.


10.अफगाणिस्तान मधील सर्व भारतीयांनि तेथील हवाई सेवा बंद होण्याच्या आत मायदेशी परतावे आशा सूचना भारत सरकारने अफगाणिस्तान मधील भारतीय नागरिकांसाठी जारी केल्या आहेत.अमेरिकेने अफगाणिस्तान मधून सैन्य माघार घेण्याच्या घोषणेपासून अफगाणिस्तान मध्ये हिंसंचार वाढला असून भारतीय दूतावसातील कर्मचाऱ्यांना भारत सरकारने माघारी नेण्याच्या प्रक्रियेस सुरुवात झाली आहे.

No comments:

Post a Comment