*पाकिस्तानचा आज स्वातंत्र्यदिन.
चालू घडामोडी 14ऑगस्ट
1.केंद्र सरकारने देशातील124 प्रदूषित शहरांची यादी केंद्र सरकारने जाहीर केली आहे.त्यानुसार देशाच्या राजधानीचे शहर असणारे दिल्ली सर्वाधिक प्रदूषित शहर आहे.तर महाराष्ट्रामध्ये चंद्रपूर व पुणे हे सर्वाधिक प्रदूषित शहर आहे.
2.एकेरी वापराच्या प्लास्टिकच्या उत्पादन व विक्रीवर 01 जुलै 2022 पासून बंदी व्हाळण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.
03.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय वाहन भंगार निर्धारण धोरण जाहीर केले आहे वैयक्तिक कारणासाठी 2024 तर ट्रकसारख्या अवजड वाहनांसाठी 2023 पासून हे धोरण लागू होणार आहे.
04.माहिती व तंत्रज्ञान नियम 2001 अस्तित्वात असताना नवीन अधिसूचित माहिती तंत्रज्ञान नियमाची ची आवश्यकता काय ?तुम्ही लोकांच्या विचार स्वातंत्र्यावर निर्बंध कसे घालू शकता असा सवाल उच्च न्यायालयाने विचारला आहे.
05.फाळणीमुळे अनेक लोकांचे स्थलांतर झाले.कित्येक लोकांची कुटुंबे उध्वस्त झाली .फाळणीच्या काळी कित्येक लोकांचे हिंसेट प्राण गेले त्या सर्व लोकांच्या संघर्ष व बलिदानाच्या आठवणीत 14 ऑगस्ट हा 'विभाजन विभाशिका ' स्मृती दिन म्हणून पाळण्याचा निर्णय केंद्र सरकारणे घेतला आहे.
06.ओडिशातील भुवनेश्वर पुरी रस्त्यावर लाऊंडकी नावाच्या गावात प्राचीन मंदिर व मूर्तीचे अवशेष सापडले आहेत.या जवळपास दोन डझन मूर्ती आहेत.
07.भारताच्या वरिष्ठ महिला फुटबॉल संघाच्या प्रशिक्षकपदी थॉमस देनरबी यांची निवड करण्यात आली आहे.
No comments:
Post a Comment