इतिहासात डोकावताना
जन्म-
१७३०-पेशवा साम्राज्याचे सेनापती सदाशिवराव भाऊ पेशवा
१९५६-बलविंदरसिंग संधू -भारतीय क्रिकेटर
मृत्यू-
१९९३-भारतीय तत्वज्ञानी स्वामी चिन्मयानंद
२००७-मराठी लेखिका सरोजिनी वैद्य
०१.पंतप्रधान नरेंद्र मोदींचे सल्लागार अमरजित सिन्हा यांनी मुदतीआधीच आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे .पंतप्रधान कार्यालयातील अधिकारी वर्गामध्ये फेरबदल होण्याची शक्यता आहे .
०२.मराठा उमेदवारांच्या शासन सेवेतील नियुक्त्यांबाबत शासन निर्णय काढण्यात आला आहे राज्यातील मराठा विद्यार्थ्यांकरिता १४ ठिकाणी वसतिगृहे तयार करण्यात आली आहेत असे राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तसेच तसेच मराठा आरक्ष न्स्मितीचे प्रमुख अशोक चव्हान यांनी स्पष्ट केले अआहे .
०३.डिजिटल पेमेंत्साठी देशात आता एक नवा पर्याय उपलब्ध होणार आहे .ई रुपी हे नवीन डिजिटल पेमेंट मध्यम उपलब्ध झाले आहे .national paments corporation of india ने याची निर्मिती केली आहे .पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते त्याचे अनावरण करण्यात आले .
०४.नागपूर- मुंबई हायस्पीड रेल्वे कारीडोर चा हवाई सर्वे करण्याचे काम पूर्ण झाले आहे .
०५.राज्यातील चिखली जि.बुलढाणा येथील लष्करात असलेले जवान कैलास भारत पवार यांना वीरमरण आले.ते महार बटालिअन मध्ये कार्यरत होते .सियाचीन मध्ये बर्फाळ डोंगरावरून ते खाली कोसळले .
०६.आज महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने इयत्ता 12 विचा निकाल जाहीर केला.वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे राज्य शासनाने परीक्षा न घेता अंतर्गत मूल्यमापनच्या आधारे निकाल जाहीर केला आहे.
०७.इतर मागासवर्गीयांची संशोधनात्मक माहिती(imperils data)उपलब्ध नसल्याने राज्यात जातीनिहाय जनगणना करण्याचा महाराष्ट्र राज्य मागास वर्ग आयोगाच्या बैठकीत निर्णय झाला.
०८.भारतीय जीवन विमा निगम LIC च्या व्यवस्थापकीय संचालकपदाचा कार्यभार मिनी आईप यांनी स्वीकारला.
०९.देशाच्या अनेक भागात पाऊस न झाल्याने देशातील खत विक्रीवर त्याचा परिणाम झाला आहे.जून-जुलै महिन्यात रासायनिक खतांची विक्री 12 टक्क्यांनी घसरली आहे.
१०.जेष्ठ चित्रपट समीक्षक रशीद इराणी यांचे निधन झाले आहे.
No comments:
Post a Comment