चालू घडामोडी 06 ऑगस्ट
01.कोरोनामुळे आर्थिक संकटांना सामोरे जाणाऱ्या राज्यातील जवळपास 56 हजार कलाकारांना महाराष्ट्र राज्य सरकार ने 5 हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे.
02.कोरोनामुळे निराधार झालेल्या राज्यातील मुले,महिला यांचे पुनर्वसन करण्यासाठी महाराष्ट्र राज्य सरकार विविध योजनांची सांगड घालणारी वात्सल्य योजना राबवणार आहे.
03.राजर्षी शाहू महाराज परदेश शिष्यवृत्ती योजनेतील जागांमध्ये 50 ची भर पडणार आहे.फाईन आर्टस्,फिल्म मेकिंग,अनिमेशन डिजाईन ,व कला शाखेतील उच्च शिक्षणाच्या निकषात बदल करण्यात येणार आहे.
04.कोरोना काळात इयत्ता पहिली ते 8 वीच्या विद्यार्थ्यांसाठी दूरदर्शनवर शैक्षणिक कार्यक्रम सुरू करण्यात येणार आहे अशी महिती राज्य सरकारने उच्च न्यायालयात दिली आहे.
05.महाराष्ट्रातील कोकण व पश्चिम महाराष्ट्रात पावसामुळे बाधित झालेल्या रस्त्यांच्या पुनर्बांधणी साठी केंद्र सरकारने 100 कोटी मंजूर केले आहेत अशी माहिती देशाचे रस्ते व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी दिली आहे.
06.महाराष्ट्र लोकसेवा आयोगावर तीन सदस्यांची निवड करण्यात आली आहे.शिवाजी विद्यालयाचे माजी कुलगुरू डॉ.देवानंद शिंदे ,निवृत्त सनदी अधिकारी राजीव जाधव व
सेवानिवृत्त पोलीस अधिकारी प्रताप दिघावकर यांची निवड करण्यात आली आहे.
07.कोविशिल्ड घेतलेल्या विद्यार्थ्यांना इतर देशात जाताना स्व विलगिकर्णाची सोया स्वतः करावी लागत असेल तर त्याचा खर्च आता सिरम इन्स्टिट्यूट देणार आहे.
08.पूर्वलक्षी प्रभावाने कर होणार नाहीत लागू .अनेक कंपण्यांबाबत सुरू असलेला करविवाद सम्पवण्याच्या दृष्टीने सरकारने हे विधेयक आणले आहे.रेट्रोस्पेकटिव्ही कॅपिटल गेनवर कर आकारण्याची तरतूद रद्द करणारा प्रस्ताव आहे.
09.राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचे नाव बदलून हॉकीचे जादूगार म्हनून ओळखल्या जाणाऱ्या हॉकीपटू मेजर ध्यानचंद यांच्या नावाने हा पुरस्कार असे करण्यात आले आहे.
10.कोरोनाच्या प्रदूर्भावाच्या काळात राज्यातील 790 बालविवाह थांबवण्यास आले आहेत.तसेच यापुढेही बालविवाहना आला घालण्यासाठी महिला व बालविकास विभाग ,अक्षरा सेंटर व युनिसेफ द्वारे महाराष्ट्र राज्यात ऑगस्ट सप्टेंबर महिन्यात राज्यव्यापी मोहीम राबवण्यात येणार आहे.
No comments:
Post a Comment