Saturday, August 7, 2021

चालू घडामोडी ०७ ऑगस्ट

 

इतिहासात डोकावताना -

जन्म -

१९२५-भारतीय शेतीतज्ञ  एम.एस.स्वामिनाथन 

मृत्यु-

१९४१- भारतीय  कवी ,लेखक व नोबल पारितोषिक विजेते गुरुदेव र्विद्र्नाथ टागोर 

२०१८-भारतीय राजकारणी व तमिळनाडू राज्याचे  ३ रे मुख्यमंत्री एम.करुणानिधी  

चालू घडामोडी ०७ ऑगस्ट 


०१.महाराष्ट्रातील आत्रेय संस्थेद्वारे दिला जानाऱ्या  मानाच्या  आचार्य अत्रे पुरस्कारासाठी यावर्षी पद्मश्री पुरस्कार विजेते डॉ.तात्याराव लहाने यांची निवड झाली आहे .


०२.महाराष्ट्रातील कोरोना रुग्णसंख्या कमी असणार्या जिल्ह्यांमध्ये 17 ऑगस्ट पासून इयत्ता १ ली  ते ७ वी या शाळांचे वर्ग सुरु करण्याचा निर्णय राज्याच्या शिक्षण विभागाने घेतला आहे .


०३.सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द ठरवल्यानंतर राज्य सरकारने मराठा  उमेदवारांना आर्थक दुर्बल प्रवर्गाचा लाभ देण्याचा  निर्णय घेतला होता व हा निर्णय शासनाच्या विवध पद भरतीसाठी लागू करण्यात आला होता .या शासनाच्या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे .शासन निर्णयाच्या अनुषंगाने एम्पिएस्सिने अभियांत्रिकी सेवांकरिता प्रसिद्ध केलेल्या सुधारित यादीला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे.



०४ .भारतीय रिजर्व बँकेने द्विमासिक पतधोरण जारी केले आहे . रिजर्व बँकेने पतधोरण जारी करताना रेपो दर ४ टक्क्यांवर तर रिवर्स रेपो ३.३५ टक्क्यांवर ठेवला व व्याजदरात कसलीही सूट देण्यात आलेली नाही .


०५. कोवव्याक्स हि लस येत्या ऑक्टोबर महिन्यामध्ये प्रौढ व्यक्तीसाठी तर २०२२ च्या पहिल्या तिमाहीत लहान मुलांसाठी उपलब्ध असे सिरम इंस्तीट्युत  ऑफ इंडिया चे अध्यक्ष आदर पूनावाला यांनी सांगितले आहे .


०६...टोकिओ येथे सुरु असलेल्या ऑलिम्पिक स्पर्धा २०२० मध्ये भारताची गोल्फपटू आदिती अशोक हिने नवीन विक्रमाची नोंद केली आहे .उत्कृष्ट कामगिरी करताना आदिती अशोक भारतातर्फे गोल्फ खेळामध्ये अंतिम चार खेळाडू मध्ये येण्याचा मन मिळवणारी पहिली भारतीय महिला गोल्फर ठरली आहे .तिचे कांस्य पदक थोडक्यात हुकले .


०७. .टोकिओ येथे सुरु असलेल्या ऑलिम्पिक स्पर्धा २०२० मध्ये भारताच्या पुरुष ४ बाय ४ ०० रिले संघाने आशियाई विक्रम मोडीत काढला .भारतीय संघाने तीन मिनिटे ०.२५ सेकंदांची वेळ नोंदवत  हा विक्रम रचला .


०८.अमेरिकेतील कंपनी जॉन्सन &जॉन्सन या कंपनीने एका डोसच्या कोरोन लसिला भारतात आपत्कालीन वापरासाठी मंजुरी मिळण्यासाठी केंद्र सरकारकडे अर्ज केला आहे .हि लस बायोलोजीकाल ई या कंपनीच्या भारतात व जगात वितरीत करण्यात येणार आहे.


०९.पूर्व लडाखमधील गोगोरामधून भारत व चीन या दोन्ही देशांच्या सैन्याने माघार घेण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे .दोन्ही सैन्यात सैन्य माघार घेण्याच्या करारानुसार दोन्ही लष्कराने टप्प्याटप्याने परस्पर समन्वयाने तैनात बंदी केली आहे.असे भारतीय लष्कराने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे.


१०.जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत टेसला चे प्रमुख एलन मस्क व ,amezon या इ कॉमर्स कंपनीचे संस्थापक जेफ बेझोझ यांना मागे टाकत आता लुई विटोन या कंपनीचे मालक 'बर्नाल्ड अर्नाल्त 'जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहेत .त्यांच्याकडे १९८.९ अब्ज डॉलरची संपत्ती आहे.

११.भरतासाठीचा टोकियो ऑलिम्पिक 2020 मधला सुवर्णपदकाचा दुष्काळ सम्पला.भारताचा भालाफेकपटू नीरज चोप्राने 100 वर्षांनंतर अथलेटने सुवर्णपदक पटकावले आहे.


१२.भारताचा कुस्तीपटू बजरंग पुनिया याने टोकियो ऑलिम्पिक 2020 मध्ये कांस्य पदक कमावले.

No comments:

Post a Comment