Monday, August 9, 2021

चालू घडामोडी ०९ ऑगस्ट

 चालू घडामोडी ०९ ऑगस्ट 

इतिहासात डोकावताना  -

*०८ ऑगस्ट १९४२ रोजी मुंबईच्या गवालिया टयांक मैदानात 'भारत छोडो 'आंदोलनाची गांधीजीनी घोषणा केली .तसेच ०९ ऑगस्ट हा दिवस 'क्रांती दिन 'म्हणून पाळण्यात यावा असे ठरले आणि हाच दिवस भारताच्या इतिहासातील क्रांती दिन म्हणून अजरामर झाला .ब्रिटीशांच्या १५० वर्षांच्या गुलामीच्या बेड्या तोडून टाकण्यासाठी प्रत्येक भारतीय उत्साही होता .अहिंसा हे तत्व जीवनभर पाळणाऱ्या गांधीजीनीच तेव्हा स्व्तान्त्र्यांची अंतिम लढाई म्हणून भारतीयांना 'करो या मरो ' हा संदेश दिला .


०१.संत साहित्याचे अभ्यासक व पत्रकार नरेंद्र कुंटे यांचे निधन .

०२.०९ ऑगस्ट हा जागतिक आदिवासी दिन म्हणून साजरा करण्यात येतो . 

०३.अकरावीच्या ऑनलाइन प्रवेश अर्ज भरण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे .मुंबई,पुणे,पिंपरी-चिंचवड,अमरावती,नाशिक नागपूर महापालिका क्षेत्रात राबवल्या जाणार्या अकरावीच्या केंद्रीय प्रवेश प्रक्रियेस १६ ऑगस्टपासून प्रवेश अर्ज भाग १ भरता येणार .

०४.मुंबईमधील लोकल रेल्वे १५ ऑगस्टपासून सुरु करण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य शासनाने घेतला आहे.मात्र यात केवळ कोरोना प्रतिबंधक लसीच्या दोन मात्रा घेनार्यानाच प्रवास करण्याची मुभा देण्यात येणार आहे .

०५.जेष्ठ अभिनेते अनुपम श्याम यांचे निधन झाले आहे .

०६.दोन वेगवेगळ्या कोरोन प्रतिबंधक लसीच्या मात्रांचा समिश्र वापर जास्त परिणामकारक ठरत असल्याचा निष्कर्ष आयसीएमआर ने केलेल्या अभ्यासातून निष्कर्ष काढण्यात आला आहे .आयसीएमआर ने चुकून  दोन वेगवेगळ्या लस घेतलेल्या उत्तर प्रदेश मधील १८ नागरिकांवर अभ्यास केला होता .

०७.इंडो तिबेट सीमा पोलीस दलात पहिल्यांदाच दोन महिला अधिकार्यांचा समावेश करण्यात आला आहे .भारत -चीन प्रत्यक्ष नियंत्रण  रेषेवर इंडो तिबेट पोलीस दल गस्त घालत असते .मसुरी येथे झालेल्या प्रशिक्षना नंतर एकूण ५३ अधिकारी आयटीबिपी मध्ये सामील झाले आहेत .या दीक्षांत सोहळ्या वेळी   आयटीबिपी च्या इतिहासावर आधारित असणार्या ६८० पानांच्या पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले .


०८.ब्रिटीशांच्या जाचातून भारतास मुक्त करण्यासाठी ९ ऑगस्ट १९४२ रोजी चले जाव आंदोलन सुरु करण्यात आले होते .या आंदोलनामध्ये स्वतच्या प्राणांचे बलिदान देणाऱ्या शहिदांच्या स्मृतीचे डिजिटल संग्रहालयच्या माध्यमातून जतन करण्यात येणार आहे .पुणे येथील रावसाहेब पटवर्धन प्रशालेच्या आवारात हे डिजिटल संग्रहालय उभारले जात आहे .


०९.टोकिओ ऑलिम्पिक २०२० ची सांगता झाली . या ऑलिम्पिक स्पर्धा २०२० मध्ये आयोजित करण्यात येणार होती मात्र कोरोना  महामारीमुळे १ वर्ष पुढे ढकलण्यात आली होती .भारताने या स्पर्धेत एकूण ७ पदकांची कमाई केली आहे .

१०.अंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीला ऑलिम्पिक खेळामधून खेळ हटवण्याची परवानगी मिळाली आहे .यामुळे येत्या प्यारीस ऑलिम्पिक मध्ये काही खेळ ऑलिम्पिक मधून कमी केलेले आढळून येऊ शकते. 

No comments:

Post a Comment