व्यक्तीविशेष

गुरुदेव रवींद्रनाथ टागोर -

जन्म-०९ मे १८६१ 
मृत्यु -०७ ऑगस्ट १९४१ 


                       गुरुदेव रवींद्रनाथ टागोर .यांना कोण ओळखत नाही !संपूर्ण जगाला ज्यांनी स्वताच्या काव्याने व अफाट ग्रंथ साम्प्देने भरभरून दिल .चित्रकार ,नाटककार ,कवी ,संगीतकार अशा कितीतरी कलानी ते स्वयंपूर्ण होते.रवींद्रनाथ यांनी विवध व्य्क्तीच्रित्र ,महान कवी कालिदास ,संत तुकाराम यांच्या रचनांचा अभ्यास केला होता कारवर येथील सौदर्य सृष्टीमुळे त्यांना पहिले नाटक रचण्याची प्रेरणा मिळाली तसेच छत्रपती शिवाजी महाराजान्द्वारेही त्यांना प्रेरणा मिळाली व त्यांच्यावर त्यांनी काव्यलेखनही केले आहे .
गुरुदेव रवींद्रनाथ टागोर 



                      १९ व्या शतकात व विसाव्या शतकाच्या सुरुवातीला त्यांनी बंगाली साहित्यात त्यांच्या कार्यामुळे अमुलाग्र भर पडली .रवींद्रनाथ यांनी ८ व्या वर्षाचे असल्यापासून कविता करण्यास सुरवात केली .भानुसिंह या नावाने १६ व्या वर्षापर्यंत बर्याच कविता लिहिल्या .

                १८७७ साली प्रकाशित झालेल्या त्यांच्या काव्य संग्रहामुळे ते प्रकाशात आले .त्यांनी शांतीनिकेतन या वस्तूची  स्थापना केली १४ नोवेंबर १९१३ रोजी ब्रिटीश अकादमीचा नोबल पुरस्कार 'गीतांजली' या रचनेबद्दल त्यांना देण्यात आला .१९१५ साली ब्रिटीश सरकारने त्यांचा गौरव करण्यासाठी त्यांना 'सर ' हि पदवी दिली .पण १९१९ च्या जालियानवाला बाग हत्यकांडाचा निषेध म्हणून त्यांनी या पदवीचा त्याग केला .१९२१ साली रवींद्रनाथ व कृशित्द्न्य एल्म्हीर्स्त यांनी शांतीनिकेतन जवळ ग्रामीण पुनर्निर्माण संस्थेची स्थापना केली पुढे याचेच श्रीनेकेतन असे नामकरण झाले .१९३० सालापासून देशातील जातीय्तेविरूढ  प्रचार सुरु केला व कविता ,नाटकांद्वारे समाजात जागृती निर्माण करण्याचा प्रयत्न केला .गुरुदेव रर्विन्द्र्नाथानी कथा ,लघुकथा यांचेही लेखन केले व बंगाली भाषा व भारतीय साहित्याची नवी ओळख जगाला करवून दिली .अशा या थोर साहितीकाचा आज स्मृतिदिन आहे  .त्यांच्या या स्मृतिदिनानिमित त्यांना अभिवादन  !

No comments:

Post a Comment