Wednesday, August 25, 2021

चालू घडामोडी २५ ऑगस्ट

 जन्म-१९२३-मराठी लेखक गंगाधर गाडगीळ 

१९६२-बांगलादेशी स्त्रीमुक्तिवादी लेखिका तस्लिमा नसरीन 

मृत्यु -

२००१-मराठी समीक्षक व.दि.कुलकर्णी 


*चालू घडामोडी २५ ऑगस्ट 


१.भारताचे माजी फुटबॉल पटू ओ.चंद्रशेखर मेनन यांचे वृद्धापकाळाने निधन झाले .१९५८ ते १९६६ या काळात २५ सामन्यांमध्ये त्यांनी भारतीय संघाचे प्रतिनिधत्व केले होते.१९६२ च्या आशिआइ क्रीडा स्पर्धेतील सुवर्पद्क विजेत्या भारतीय फुटबॉल संघाचे ते सदस्य होते .


२.राजनीतीतज्ञ हरीश पवर्थनेनी यांची जर्मनीतील भारतीय राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.ते भारतीय विदेश सेवेच्या १९९९ च्या तुकडीचे अधिकारी आहेत.


३.टोकिओ येथे परालाम्पिक स्पर्धेला सुरुवात झाली आहे.भारतातर्फे भालाफेकपटू टेकचंद याला भारतीय संघाचा ध्वजवाहक बनवण्यात आले होते.


४..केंद्रीय मंत्री पदावर असताना अटक होणारे नारायण राणे हे तिसरे मंत्री आहेत .महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात आक्षेपार्ह्य वक्तव्य केल्याच्या आरोपांवरून महाराष्ट्र पोलिसांनी त्यांना अटक केली होती .गेल्या २० वर्षांमध्ये  महाराष्ट्र राज्य पोलिसांनी अटक केलेले ते १ ले केंद्रीय कॅबिनेट मंत्री व मंत्रीपदावर असताना अटक झालेले तिसरे नेते आहेत.


५.झाय्दस कॅडिला या लस उत्पादक कंपनीच्या झाय्कोव्ह डी या तीन मात्रांच्या लसिला भारताच्या औषध महानियान्त्र्कानी मान्यता दिली आहे.ती जगातील पहिली डीएनए लस आहे.


६.उच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त न्यायाधीश विद्यासागर कानडे यांची महाराष्ट्र राज्याच्या नव्या लोकायुक्त पदी नियुक्ती करण्यात आली .

७सन्शोधन आणि विकास संस्था अर्थात डीआरडीओ ने भारतीय हवाई दलासाठी आधुनिक अशा शाफ तंत्रज्ञान विकसित केले आहे या तंत्रज्ञानाच्या मदतीने हवाई दलाच्या लढाऊ विमान शत्रूच्या रडारच्या धोक्यापासून चविणे शक्य आहे 

८महाराष्ट्र राज्य महाकवी कालिदास संस्कृत साधना पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत 


९.कंपन्यांच्या सीएसआर खर्चात 3.६६ टक्के वाढ नोंदवण्यात आली आहे.भारतीय कंपन्यांनी २०-२१ मध्ये सिएसआर अर्थात सामाजिक दायित्व उपक्रमामध्ये २२००० कोटी रुपये खर्च केले आहेत.

१०.चीनने त्यांचे लोकसंख्येचे धोरण शिथिल केले आहे.आता चीनी दाम्पत्याला तीन अपत्यांना जन्म देण्याची परवानगी देण्यात आली आहे.


No comments:

Post a Comment