Wednesday, March 31, 2021

31.03.2021 चालू घडामोडी

 1.मुंबई चे माजी पोलिस आयुक्त धनंजय जाधव यांचे निधन


2.दिल्ली येथील के.के.बिर्ला फाउंडेशन द्वारे देण्यात येणार  'सरस्वती सन्मान 'पुरस्कार जेष्ठ साहित्यिक डॉ.शरणकुमार लिंबाळे यांच्या सनातन या कादंबरीला  जाहीर झाला आहे.यापूर्वी मराठी भ

साहित्यिक विजय एलकुंचवार याना 2002 मध्ये हा पुरस्कार मिळाला होता म्हणजे तब्बल 18 वर्षांनंतर हा पुरस्कार मराठी साहित्यिकाला मिळाला आहे.


3.महाराष्ट्राचा क्रीडा विभाग लवकरच राज्याची क्रीडाविषयक कामगिरी उंचावण्यासाठी लष्कर, एनसीसी यांच्या समन्वय साधून काम करणार आहे.


4.महाराष्ट्रामध्ये कोरोना रुग्णसंखेमध्ये झपाट्याने होणाऱ्या वाढीमुळे महाराष्ट्र राज्य आरोग्य विभागाने ऑक्सिजन उत्पादकांना 80 टक्के साठा वैद्यकीय वापरासाठी देने बंधनकारक केले आहे.याबाबत महाराष्ट्र सरकारने 30 जूनपर्यंत निर्बंध लागू केले आहेत.


5.डिजीसीआय अर्थात नागरी वाहतूक महासंचलयाने विमान प्रवासा साठी आकरण्यात येणाऱ्या सुरक्षेच्या फिसमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.यामुळे विमान प्रवास महाग होणार आहे.


6.व्हाट्सपला टक्कर देण्यासाठी भारत सरकारने स्वदेशी 'संदेस' नावाचे अप्लिकेशन लाँच केले आहे.व्हाट्सपच्या privasy policy मुळे व्हाट्सपला विरोध वाढत आहे मात्र तरीही व्हाट्सप आपल्या भूमिकेवर ठाम आहे.


7.म्यानमार मधून भारतात येणाऱ्या निर्वासितांना भारतात प्रवेश न देन्याबाबतचे आदेश मणिपूर सरकारने वापस घेतले आहेत.


8.'ओसीआय' ओव्हर्सिज सिटीजन्स ऑफ इंडिया कार्ड असेल त्यांना भारतात जुने पासपोर्ट दाखवावे लागणार नाहीत याचा जगामध्ये इतरत्र राहणाऱ्या भारतीय नागरिकांना लाभ होणार आहे.




रोज अशाच चालू घडामोडी वाचण्याकरिता  SUBSCRIBE नक्की करा !! 



 

##Folow us on facebook,telegram&instagram@sankalponlineworks





Saturday, March 27, 2021

27/03/2021 चालू घडामोडी

 १.महाराष्ट्र राज्यातील १००० पेक्षा जास्त व्यवसायिक शिक्षण संस्थांनी फीवाढ न करण्याचा निर्णय घेतला आहे .इन्जिनीअरिन्ग ,मेडिकल ,management  या अभ्यासक्रमांना प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना याचा लाभ होणार आहे .


२.लेखक व पत्रकार अनिल धारकर यांचे निधन.ते मुंबई अंतरराष्ट्रीय साहित्य महोत्सवाचे अध्यक्ष होते.


3.महाराष्ट्र राज्य सरकारने सहा आएएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या.लोकेश चंद्र,राजीवकुमार मित्तल,एमडी सिंह ,अमोल येडगे, अविनाश पांडा,व्सुम्ना पंत या अधिकाऱ्यांची बदली करण्यात आली आहे .

१.लोकेश चंद्रा -प्रधान सचिव सामान्य प्रशासन 

२.राजीवकुमार मित्तल-आयुक्त विक्रीकर विभाग 

3.एम .डी . सिंह-नियुक्ती प्रतीक्षेत 

४.अमोल येडगे-जिल्हाधिकारी यवतमाळ 

५.अविनाश पांडा-ceo अमरावती जिल्हा परिषद 

6.वसुमना पंत -ceo वाशीम जि.परिषद  

या अधिकाऱ्यांची वरील ठिकाणी बदली करण्यात आली आहे .


४.अपारंपरिक उर्जा स्त्रोतापासून तयार होणाऱ्या हरित उर्जेच्या वापरला प्राधान्य देण्यासाठी  महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगाने मंजुरी दिली आहे.वीजमागणी हरित ऊर्जेपासून तयार करण्याचा पर्याय वीज कंपन्यांच्या ग्राहकांना मिळणार आहे.


५.शेतीसाठी हा मुलभूत अधिकार असल्याचा अलाहाबाद उच्च न्यायालयाने निर्णय सुनावला.उत्तर प्रदेशमधील बंद जिल्ह्यामधील एका शेतकर्याने वीज कनेक्शन कापल्यामुळे वीज कंपनीविरुद्ध उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती यावर सुनावणी  देताना उच्च न्यायालयाने हा निर्णय दिला आहे .


6.पंतप्रधान नरेंद्र मोडी बांगलादेशच्या दौऱ्यावर  गेले आहेत.वंगबंधू शेख मुज्बीर रहीम यांच्या जन्मशताब्दी कार्यक्रमाला ते उपस्थित राहणार आहेत.



७.निवृत्त जनरल व्हालटर पिंटो यांचे निधन.पाकिस्तानमध्ये १९७१ मध्ये झालेले बसंतर युद्धात त्यांनी महत्वाची भूमिका बजावली होती.त्यांच्या नेतृत्वात भारताने त्या युद्धात विजय मिळवला होता .

८.२०२२ मध्ये होणाऱ्या आशियाई महिला फुटबॉल स्पर्धेचे भारतात पाह्ल्यंदच आयोजन केले जाणार आहे.नवी मुंबई,अहमदाबाद व भुवनेश्वर च्या स्टेडीअम वरती याचे आयोजन केले जाणार आहे.












दररोज अशाच चालू घडामोडी वाचण्याकरिता  SUBSCRIBE नक्की करा !! 



 

##Folow us on facebook,telegram&instagram@sankalponlineworks





Friday, March 26, 2021

26.03.2021

1 .वाढत्या कोरोना रुग्णाच्या पार्श्वभूमीवर गुजरातमध्ये महाराष्ट्रातून येणाऱ्या नागरिकांकरिता गुजरात सरकारने आर्टिपीसी कोरोना चाचणी करणे बंधनकारक केले आहे.


2.देशभरात  महाराष्ट्र राज्य लसीकरणात प्रथम असल्याचा दावा राज्य सरकारने केला आहे.24मार्चपर्यंत 50 लाख 14 हजार 724 लोकांचे लसीकरण करण्यात आल्याचे राज्याचे म्हणणे आहे .


3.येत्या रविवार म्हणजे 28 मार्च2021 पासून महाराष्ट्र राज्यामध्ये रात्रीच्या संचारबंदी लागू करण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला आहे.


4.महाराष्ट्र राज्याच्या सर्वोच्च पुरस्कार 'महाराष्ट्र भूषण' पुरस्कार जेष्ठ गायिका 'आशा भोसले 'यांना जाहीर झाला आहे.


5.आंतरधर्मीय, आंतरजातीय,परिवर्तनवादी जेष्ठ कार्यकर्ते व 'सुगावा 'या प्रकाशनचे प्रमुख प्रा.विलास वाघ यांचे निधन.


6.सरकारसोबत बोलून बँकांच्या खाजगिकर्णाची प्रक्रिया पुढे नेणार असल्याची  भारतीय रिजर्व बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी भूमिका मांडली.


7.लष्करातील महिला अधिकाऱ्यांच्या कायम स्वरूपाच्या नियुक्तीसाठी घालण्यात आलेल्या शारीरिक फिटनेसच्या अटी एकतर्फी व अतार्किक असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने निरीक्षण नोंदवले आहे.तसेच महिला अधिकाऱ्यांच्या कायमस्वरूपी नियुक्ती बाबत तीन महिन्यात निर्णय घेऊन प्रक्रिया पूर्ण करण्यात यावी असे कोर्टाने सांगितले.


8.टोकियो  ओलिम्पिकच्या ज्योत पेटवून ऑलिंपिक ज्योतीचा प्रवास  प्रारंभ झाला.


9.अस्त्रझेनिकाची लस अतिशय परिणामकारी असल्याचा कंपनीने दावा केला. आहे.







दररोज अशाच चालू घडामोडी वाचण्याकरिता  SUBSCRIBE नक्की करा !! 



 

##Folow us on facebook,telegram&instagram@sankalponlineworks














Thursday, March 25, 2021

चालू घडामोडी 25.03.2021

 1.महाराष्ट्रातील मराठा आरक्षणाला इतर राज्यांचा पाठिंबा.सर्वोच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीवेळी 50 %आरक्षण मर्यादा वाढवने योग्य असल्याचा युक्तिवाद मांडला.102 व्या घटनादुरुस्ती च्या मुद्द्यावर हा कायदा योग्य असल्याचे केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात म्हटले आहे.


2.केंद्र सरकार महाराष्ट्र राज्यामध्ये 10,000 कृषी उत्पादक कंपन्या स्थापन करण्याची योजना राबवणार आहे.


3.महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत गौण खनिज स्वामित्व दरात दीड पटीने वाढ करन्याच्या प्रस्तावास मंजुरी देण्यात आली आहे.येत्या जुलै महिन्यापासून ही वाढ होणार आहे .याचा परिणाम म्हणून बांधकाम साहित्याच्या किमतीमध्ये वाढ होणार आहे.


3.पुणे येथील महाराष्ट्र ग्रंथोत्तेजक संस्था 'कोशांचा कोष 'हा प्रकल्प राबवणार आहे.कोणत्याही विषयातील माहिती ,कोशातील माहितीचा शोध कसा घ्यावा याचे लेखक ,भाषा अभ्यासकांना दिशा दाखवणे हा यामागील प्रमुख हेतू आहे.


4.इचलकरंजी येथील अश्विनी काणेकर ही युवतीने 'गेट' परीक्षेमध्ये देशामधून पहिली येण्याचा मॅन मिळवला आहे.


5.रिजर्व बँकेने दोन किंवा जास्त नागरी सहकारी बँकांचे विलीनिकरण सोपे होईल अशा नवीन मार्गदर्शक तत्वांना मंजुरी दिली आहे.यानुसार आर्थिक स्थिती भक्कम असणाऱ्या नागरी बँकेला दुसऱ्या बँकेचे अधिग्रहण करून विशेष लाभ व सवलती मिळवता येणार आहेत.


6.सरन्यायाधीश' शरद बोबडे' यांनी भारताचे सरन्यायाधीश म्हणून एन. व्ही .रमण  यांच्या नावाची सरकारकडे शिफारस केली आहे.सरन्यायाधीश शरद बोबडे 23 एप्रिल रोजी निवृत्त होणार आहेत.


7.दिल्ली येथे सुरू असलेल्या विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत 50 थ्री रायफल पोझिशन गटात भारताच्या ऐश्वर्य तोमर याने सुवर्णपदक पटकावले.आतापर्यंत भारताने या स्पर्धेत 9 सुवर्ण पदकांची कमाई केली आहे.


8.गेल्या वर्षभरामध्ये इंधन दरात पहिल्यांदाच घट नोंदवण्यात आली आहे. फेब्रुवारी महिन्यानंतर पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय स्तरावर खनिज  तेलाच्या किमतीमध्ये दरकपात झाली आहे .


9.भारतामध्ये गेल्या काही दिवसांमध्ये कोरोनाच्या रुग्ण संख्येमध्ये होणाऱ्या वाढीमुळे भारताने देशांतर्गत कोरोना लसीची मागणीची पूर्तता करण्यासाठी astrazeneca काच्या लसीची इतर देशांना होणारी निर्यात तूर्तास थांबवण्याचा निर्णय घेतला आहे.


10.हँगकाँगमध्ये फायझरच्या लसीचा होणार वापर थांबवण्यात आला आहे.तेथील एक लस वितरकाणे लसीच्या बाटल्यांचा झाकण व्यवस्थित बंद नसल्याची तक्रार केल्याने लसीचा वापर बंद करण्यात आला आहे.








दररोज अशाच चालू घडामोडी वाचण्याकरिता  SUBSCRIBE नक्की करा !! 



 

##Folow us on facebook,telegram&instagram@sankalponlineworks













Tuesday, March 23, 2021

चालू घडामोडी 24.03.2021

 1.जागतिक क्षयरोग दिन.24 मार्च 1882 रोजी डॉ.रॉबर्ट कॉक यांनी क्षयरोग (tb)च्या जिवाणूंचा  शोध लावला व त्याचा प्रबंध जागतिक शास्त्रज्ञांच्या परिषदेमध्ये सादर केला.या प्रबंधास 24 मार्च रोजी मान्यता मिळाली व जागतिक क्षयरोग दिन म्हणून  24 मार्चला सुरुवात झाली .


2.येत्या 1 एप्रिलपासून देशातील 45 वर्षांवरील सगळ्यांना कोरोना प्रतिबंधक लस घेता येणार आहे.केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे .


3.आयसीसी महिला t 20 क्रिकेट रँकिंगमध्ये भारतीय महिला क्रिकेटपटू शेफाली वर्मा प्रथम स्थानी.


4.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर  सहा महिन्यांमधील कर्ज हप्त्यांवर आकरण्यात येणारे व्याज व दंड व्याज माफ करण्याबाबत गजेंद्र सिंग शर्मा यांनी दाखल केलेल्या याचिकेवर निकाल देताना सहा महिन्यांच्या काळातील 2 कोटी रुपयांच्या आतील कर्जदारांच्या कर्जावरील चक्रवाढ व्याज व व्याज दंड आकारू नयेत असा आदेश न्यायालयाने दिला आहे.


5.बँकांच्या थकीत कर्जाच्या रकमेमध्ये घट झाल्याची माहिती राज्यसभेमध्ये बोलताना अर्थ राज्यमंत्री अनुराग ठाकूर यांनी दिली आहे.2018 मध्ये बँकांकडे 8.96लाख कोटी रुपयांची थकीत कर्ज रक्कम होती डिसेंबर 2020 मध्ये त्यात घट होऊन 5.7लाख कोटी झाली आहे.


6.पीएफवरील वार्षिक करमुक्त व्याज मिळवण्याची मर्यादा केंद्र सरकारने वाढून पाच लाख रुपये केली आहे.पेंशन फंडमधील कर्मचाऱ्यांनाही योजना लागू असेल.


7.दिल्ली येथे सुरू असलेल्या नेमबाजी विश्वचषक स्पर्धेमध्ये स्किट मिश्र सांघिक गटामध्ये भारताच्या गनेमत सेखा आणि अंगड वीर सिंग बाजवा या जोडीने सुवर्णपदक पटकाविले.


8.डिजीसीय ने नव्याने आदेश काढत आंतरराष्ट्रीय प्रवासी विमान वाहतुकीवर 30 एप्रिल पर्यंत स्थगिती वाढवली आहे.


9.कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे जर्मन सरकारने लोकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.जर्मनीच्या चान्सलर अँजेला मर्केल यांनी लॉकडाऊन 18 एप्रिल पर्यंत वाढवला असल्याची घोषणा केली.

चालू घडामोडी 23.03.2021

1.मराठा महासंघाचे संस्थापक अध्यक्ष अण्णासाहेब पाटील यांची आज पुण्यतिथी.

2.आज जागतिक हवामान दिन .हवामान विभागाणे आज क्लायमेट डेटा सर्विस पोर्टल लाँच केले.डेटा सर्विस पोर्टलचे उदघाटन अर्थ सायन्सचे सचिव डॉ. माधवन नायर राजीवन यांच्या हस्ते झाले.

3.देशभरामध्ये हवामान विभाग 200 कृषी हवामान स्वयंचलित पर्जन्य मापन केंद्र सुरू करणार आहे.शेतकऱ्यांना त्यांच्या भागातील हवामान,पाणी,जमीन याविषयीची माहिती मिळावी हा यामागील उद्देश आहे .महाराष्ट्रातील 10 जिल्ह्यांमध्ये ही केंद्रे सुरू करण्यात येणार आहेत.

4.इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाऊंट ऑफ इंडिया (सीए) च्या फायनल परीक्षेत डोंबिवलीच्या वैभव हरिहरन हा देशात दुसरा.

5.प्रसिध्द सिनेलेखक सागर सरहद्दी  यांचे निधन झाले आहे.कभी कभी,सिलसिला,नुरी, बाजार ही त्यांनी सिनेलेखन केलेले सिनेमे.गंगासागर तलवार हे त्यांचे मूळ नाव.

6.काल झालेल्या जागतिक जलदिनी 'कॅच द रेन' या मोहिमेचे   पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले.

7.कोविशिल्ड लसीच्या दोन डोस मधील अंतर 28 दिवसंवरून वाढवून सहा ते आठ आठवडे करण्याच्या सूचना केंद्र सरकारने सर्व राज्य सरकारांना दिल्या आहेत.

8.2020चा गांधी शांतता पुरस्कार बांगलादेशचे राष्ट्रपिता शेख मुजबिर रहमान यांना जाहीर झाला आहे.तसेच 2019 चा गांधी शांतता पुरस्कार ओमानचे दिवंगत सुलतान काबूस बिन सैद अल सैद यांना जाहीर झाला आहे.

9.दिल्लीत राज्यपालांचे अधिकार वाढवणारे 'राष्ट्रीय राजधानी राज्यक्षेत्र शासन (सुधारणा)विधेयक 2021' लोकसभेत मंजूर केले आहे.

10.67 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची कल दिल्ली येथे घोषणा करण्यात आली.'आंनदी गोपाळ' हा चित्रपट सर्वोत्कृष्ट सामाजिक चित्रपट ठरला आहे. त्यापाठोपाठ 'बार्डो 'हा सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट ठरला आहे.मल्ल्याळम चित्रपट 'मरक्कर' -'लायन ऑफ द अरेबियन सी 'हा सर्वोत्कृष्ट राष्ट्रीय चित्रपट ठरला आहे.जलीकट्टू या मल्ल्याळम चित्रपटाला सर्वोत्कृष्ट छायांकन पुरस्कार भेटला आहे.
सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट म्हणून 'छिचोरे' या चित्रपटास पुरस्कार जाहीर झाला आहे.
सर्वोत्कृष्ट अभिनेता हा पुरस्कार मनोज वाजपेयी व धनुष याना विभागून देण्यात आला आहे.
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री पुरस्कार हा कंगना रणावत हिला जाहीर झाला आहे(मनकर्णिका,व पंगा या चित्रपटांसाठी)
सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक पुरस्कार 'तेरी मिट्टी' या केसरी चित्रपटामधील गाण्यासाठी बी .प्राक याला जाहीर झाला आहे.
सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका पुरस्कार बार्डो या चित्रपटतील रान पेटलं या गाण्याकरिता सावनी रवींद्र ला जाहीर झाला आहे.
सर्वोत्कृष्ट बाल चित्रपट पुरस्कार कस्तुरी या चित्रपटास जाहीर झाला आहे.
सामाजिक चित्रपटांवर भाष्य करणारा सर्वोत्कृष्ट चित्रपट म्हणून 'लाडली' या हिंदी चित्रपटाचा सन्मान करण्यात आला आहे.



दररोज अशाच चालू घडामोडी वाचण्याकरिता  SUBSCRIBE नक्की करा !! 



 

##Folow us on facebook,telegram&instagram@sankalponlineworks










Monday, March 22, 2021

22.03.2021 चालू घडामोडी

  1.आज  राष्ट्रीय दिनदर्शिकेच्या नवीन वर्षांचा पहिला दिवस देशाचे पाहिलेपंतप्रधान दिवंगत श्री पंडित नेहरू यांनी डॉ.मेघनाथ सहा या जेष्ठ शास्त्रज्ञांच्या अध्यक्षतेखालील समितीने तयार केलेल्या दिनदर्शिकेच्या स्वीकार करून त्याची देशभ्रमध्ये अंमलबजावणी करण्यात आली  मार्च  पासून तिची अंमलबजावणी करण्यात आली खगोलशास्त्र व ऋतू ,भौगोलिक परिस्थितीचा खोलवर अभ्यास करून ही दिनदर्शिका बनवण्यात आली होती  .


2.जुना तांदूळ नवा म्हणून विकण्यात आल्याचे प्रकार रोखण्यासाठी म्हणून सरकारने राईस एजिंग चाचणी करण्याचे ठरवले आहे .याद्वारे तांदूळ नवा आहे की जुना याची तपासणी करता येणार आहे .सध्या ही चाचणी आंध्र प्रदेशमध्ये चालू आहे . 


3.31 व्या सिनिअर राष्ट्रीय तलवारबाजी चॅम्पियन शिपमध्ये महिला सबरे वयक्तिक या स्पर्धेमध्ये  भवानी देवी हिने नवव्या वेळेस  स्पर्धेच्या विजेतेपदावर नाव कोरले आहे .भवानी देवी ही टोकियो ऑलिम्पिकसाठी पत्र ठरणारी पहिली भारतीय तलवारबाजीची खेळाडू आहे .


4.प्रसिद्ध ओडिशा नृत्यांगना लक्ष्मीप्रिया मोहापात्रा यांचे निधन झाले .


5.सोने चांदी या यांच्या आयातीत चालू आर्थिक वर्षांमध्ये 3.3 टक्क्यांनी घट झाल्याचे केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाने जाहीर केले आहे .चांदीच्या आयातीमध्ये 70 टक्के एवढी घाट झाली आहे .


6.संयुक्त राष्ट्र व्यापार व विकास परिषदेने जाहीर केलेल्या अहवालानुसार जगाची अर्थव्यवस्था 4.7 टक्क्यांनी वाढणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे .भारतीय अर्थव्यवस्था ही 5 टक्क्यांनी विकास होणार असल्याचे अंदाज वर्तवण्यात आला आहे .


7.जगात लष्करी ताकदीने सामर्थ्यवान देशांच्या यादीमध्ये भारत चौथ्या स्थानी .मिलिटरी डायरेक्ट या वेबसाईटने केलेल्या अध्ययनानुसार जगात सर्वात जास्त लष्करी सामर्थ्यवान चीन आहे.त्यापाठोपाठ अमेरिका व रशिया यांचा क्रमांक लागतो.


8.आययसएफ विश्वकप नेमबाजी स्पर्धेच्या 10 मीटर एअर पिस्तुल टीम स्पर्धेत भारतीय महिला व पुरुष या दोन्ही विभागाच्या गटांनी सुवर्णपदकाची कमाई केली .


9.आंतरराष्ट्रीय पलसार कालमापन रचना गटाचा आता भारत पूर्ण सदस्य बनला आहे .ब्रम्हांडात असणाऱ्या कृष्ण विव्हरांद्वारे निर्माण होणाऱ्या गुरुत्वीय लहरींचा शोध व अभ्यास पलसार या कालमापन रचना गटाद्वारे करण्यात येतो. 


10.टोकियो ऑलिम्पिकसाठी जपानने 90 हजार परदेशी रहिवाशांची मर्यादा ठेवली आहे .यामध्ये 15000 हजार खेळाडू व 75 हजार प्रशिक्षक व इतर यांचा समावेश असेल







 दररोज अशाच चालू घडामोडी वाचण्याकरिता  SUBSCRIBE नक्की करा !! 




*संपर्क -sankalponline0@gmail.com

*sankalponlineworks आता  TELEGRAM वरही उपलब्ध 

##Folow us on facebook,telegram&instagram@sankalponlineworks








Sunday, March 21, 2021

21.03.2021 चालू घडामोडी

 1.महाराष्ट्रातील वाढत्या कोरोनाच्या रुग्णसंख्येचा विचार करता हाफकीन या लस संशोधन संस्थेने लस निर्मिती करता पुढाकार घ्यावा अशी सूचना महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे.हाफकीन इन्स्टिट्यूट ने याआधी अनेक आजरांवर संशोधन करून औषधे निर्माण केली आहेत.


2.21 मार्च जागतिक वनदीन .या जागतिक वनदीनाचे औचित्य साधत महाराष्ट्र सरकार पहिल्यांदाच राज्यातील वन्य प्राण्यांकरिता संवर्धनासाठी 2021 ते 2031 या कालावधीसाठी वन्यजीव आराखडा तयार करणार आहे .सामान्य नावरीकांमध्ये वन्यजीवांबाबत जनजागृती व वन्यजीव संरक्षण व संवर्धन हा या वन्यजीव आराखड्याचा उद्देश असणार आहे.


3.राज्य गुन्हे अन्वेषण विभागाद्वारे प्रकाशित करण्यात आलेल्या क्राईम इन महाराष्ट्र 2019 या अहवालानुसार महाराष्टात महिला अत्याचारामध्ये वाढ झाल्याचे स्पष्ट झाले आहे.



4.राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह म्हणून दत्तात्रय होसबळे यांची निवड करण्यात आली आहे.राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बंगळुरू येथे आयोजित अखिल भारतीय प्रतिनिधी सभेत त्यांची निवड करण्यात आली.होबळे हे 2009 पासून सहसारकार्यवाह म्हणून कार्यरत होते.या अहवालानुसार महाराष्ट्र गुन्हेगारीत देशामध्ये आठव्या स्थानी आहे.


5.मँगोनेट या निर्यातीसाठी आवश्यक वेबसाईट वरती देशभरातून 33 हजार 513 आमराई ची नोंद झाली आहे.यामध्ये हापूस व केशर या आंब्याच्या दोनच प्रकारांच्या आमराया जास्त आहेत.11 हजार 470 आमरायच्या नोंदनिमुळे महाराष्ट्र यामध्ये पहिल्या स्थानी आहे.



6.महिला अत्याचाराच्या वाढत्या घटना रोखण्यासाठी रेल्वे प्रशासनाने नवे दिशानिर्देश जारी केले आहेत.त्यानुसार आता रेल्वे पोलिसांना मागील पाच वर्षामधील रेल्वे स्थानकांमध्ये वावरणाऱ्या गुन्हेगार व त्यांच्या गुन्ह्यांचा डेटाबेस तयार करावा लागणार आहे.



7.देशभरातील कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पाश्वभूमीवर केंद्रीय गृहसचिव अजय भल्ला यांनी राज्यांना कोरोना नियमांची सक्तीने अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले आहेत .


8.भारत विरुद्ध इंग्लंड या दोन देशांच्या संघा दरम्यान सुरू असलेल्या पाच t20 आंतरराष्ट्रीय सामन्यांच्या मालिकेत भारताने इंग्लंडचा 3-2 ने पराभव केला आहे .कॅप्टन म्हणून विराट कोहलीने या सामन्यात आणखीन एक विक्रम केला आहे .विराट कोहली हा कॅप्टन म्हणून t20 इंटरनॅशनल मध्ये सर्वाधिक अर्धशतक करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत अववल स्थानी पोहोचला .(12 अर्धशतक)


9.फ्रान्समध्ये एस्राझिनेकाची लस घेण्यासाठी वयाच्या बंधनाची अट ठेवण्यात आली आहे.फ्रान्समध्ये 55 व त्यापेक्षा जास्त वयोगटातील व्यक्तींनाच लस देण्यात येणार आहे .


10.ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी सेंट थॉमस रुग्णालयातील कोरोना लसीकरण केंद्रावर एस्राझिनेकाची कोरोना प्रतिबंधक लस घेतली.




Saturday, March 20, 2021

20/03/2021चालू घडामोडी

 1.इंधन दर,अर्थात पेट्रोल-डीजल च्या किमतिच दररोज घेतला जाणारा आढावा गेल्या 20 दिवसांपासून बंद करण्यात आला आहे.यामुळे तेल वितरण कंपन्यांना पेट्रोल-डिजेलच्या विक्री वर कंपन्यांना तोटा सहन करवा लागत आहे.


2.खनिज व खान सुधारने विषयिचे विधेयक लोकसभेमधे मंजूर करण्यात आले आहे.केंद्राने जरी खाणीचा लिलाव केला तरी त्याचा महसूल संबंधित राज्यांना मिळणार आहे.

भारतात सुमारे 95%खनिजनिर्मिती होते.


3.ईव्हीएम व मतपत्रिका यावरील राजकीय पक्षांची चिन्हे काढून त्याऐवजी उमेदवाराचे नाव ,वय ,शिक्षण व फोटो अशी माहिती द्यावी असा आदेश राष्ट्रीय निवडणूक आयोगास देण्यात यावा अशी मागणी करणारी एक जनहित याचिका सुप्रीम कोर्टात जाहीर करण्यात आली आहे.


4.गोपनीयता व व्यक्तीगतता धोरणाची अंमलबजावणी करण्यापासून व्हाट्सप ला रोखण्याची मागणी दिल्ली उच्च न्यायालयात केंद्र सरकारने केली आहे.


5.भारताची बॉक्सिंगपटू  निकहत झरीन इस्तंबूल येथे सुरू असलेल्या बास्फोरस बॉक्सिंग स्पर्धेच्या उपांत्य फेरीत दाखल झाली आहे.


6.अमेरिकेचे संरक्षण मंत्री लॉएड ऑस्टिन सध्या भारत दौऱ्यावर आलेले आहेत.या दरम्यान त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. इंडो पॅसिफिक क्षेत्रात शांतता,स्थैर्य आणि भरभराट होण्यासाठी अमेरिकेची भरतासोबत जास्तीत जास्त काम करण्याची इच्छा असल्याचे स्पष्ट केले.ऑस्टिन हे संरक्षणमंत्री म्हणून पहिल्यांदाच भारतात आले होते.


7.अमेरिकन वित्तसंस्था मुडिज ने भारतीय अर्थ व्यवस्थेविषयी अर्थव्यवस्था 2021 मध्ये 12 %वेगाने प्रवास करील असा विश्वास व्यक्त केला आहे.


8.टांझानिया या पूर्व आफ्रिकन देशाची पहिली महिला राष्ट्राध्यक्ष म्हणून सानिया सुलुहू हासान यांनी शपथ घेतली.टांझानियाचे सरन्यायाधीश इब्राहिम जुमावोविंग यांनी त्यांना शपथ दिली.







*काही माहिती हवी असल्यास 'COMMENT BOX '  मध्ये विचारू शकता किवा खाली दिलेल्या मेल आयडीवर संपर्क साधावा ,व दररोज अशाच चालू घडामोडी वाचण्याकरिता  SUBSCRIBE नक्की करा !! 




*संपर्क -sankalponline0@gmail.com

##Folow us on facebook,telegram&instagram@sankalponlineworks





Friday, March 19, 2021

चालू घडामोडी १९/०३/२०२१

१. फेडरेशन चषक athletics मध्ये एक आणखीन नव्या विक्रमाची नोंद .२०० मिटर धावण्याच्या शर्यतीत पी.टी .उषा हिचा २२.८० सेकंदांचा विक्रम धनलक्ष्मी हिने मोडीत काढला .


२.athletics  मार्गदर्शक,व प्रशिक्षक राम भागवत यांचे निधन .athletics खेळाचे भीष्माचार्य म्हणून त्यांना ओळखले जात होते .athletics आणि मैदानी व नियम आयोजन या त्यांच्या दोन पुस्तकांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता .


3.उत्तर प्रदेश येथे आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांसाठी राबवण्यात येणाऱ्या कल्याणकारी योजनेचा भाग म्हणून ३५०० हून जास्त जोडप्यांचा सामुहिक विवाह आयोजित करण्यात आला होता .


४.भारतीय  तांदुळाच्या  निर्यातीमध्ये वाढ झाली आहे .बासमती तांदळाच्या निर्यातीत ५.३१ % तर बिगर बासमती तांदळाच्या निर्यातीमध्ये १२२.६१ %एवढी वाढ झाली आहे .बासमती तांद्लापैकी ८०%तांदूळ हा मध्य व पूर्व देशांना निर्यात केला जातो .


५. भारतामध्ये सर्वाधिक आयात ही चीनमधून करण्यात येत आहे .दोन्ही देशांच्या सैन्यामध्ये कितीही तणाव असला तरी भारतात मात्र सर्वाधिक जास्त आयात ही चीनमधूनच होत आहे .अशी माहिती वाणिज्य व उद्योग राज्यमंत्री हरदीप सिंग पुरी  यांनी लोकसभेमध्ये एका प्रश्नाला उत्तर देताना दिली .


6.राज्यसभेमध्ये विमा कंपनीत विदेशी गुंतवणुकीच्या मर्यादा  ७४ % पेक्षा जास्त वाढवण्याच्या विधेयकाला मंजुरी देण्यात आली आहे .


७. जेष्ठ निवेदक व मुलाखतकार अशोक शेवडे यांचे निधन .


८.t20क्रिकेट मध्ये ९००० रन्स पूर्ण करणारा रोहित शर्मा बनला दुसरा भारतीय खेळाडू .t20क्रिकेटचा ३४२ वा सामना खेळताना रोहित शर्माने हा विक्रम  केला आहे .  








*काही माहिती हवी असल्यास 'COMMENT BOX '  मध्ये विचारू शकता किवा खाली दिलेल्या मेल आयडीवर संपर्क साधावा ,व दररोज अशाच चालू घडामोडी वाचण्याकरिता  SUBSCRIBE नक्की करा !! 




*संपर्क -sankalponline0@gmail.com

##Folow us on facebook,telegram&instagram@sankalponlineworks




Thursday, March 18, 2021

चालू घडामोडी 18/03/2021



 १.मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंघ यांची बदली .हेमंत नगराळे यांची  मुंबईच्या आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे .


२.हरून इंडिया हेल्थ रिपोर्ट नुसार देशातील सर्वाधिक श्रीमंत कुटुंबे हि मुंबई व महाराष्ट्रा मध्ये वास्तव्य करीत आहेत .या सर्वेनुसार सर्वात जास्त श्रीमंत कुटुंब वास्तव्यास असणार्या शहरांमध्ये मुंबई पहिल्या व दिल्ली दुसऱ्या स्थानी  आहे .


३.दूरदर्शन वरती गाजलेल्या गजरा या कार्यक्रमाचे निर्माते विनायक चासकर यांचे निधन झाले .


४.प्रसिद्ध सतारवादक नासीर खान यांचे निधन .ते नागपूर आकाश्वानीचे अ श्रेणीचे कलाकार होते .


५.स्वातंत्र्यपूर्व काळातील प्रसिद्ध सर्कसपटू मल्ल भागवत राय यांच्या "पहलवान  साहेब" या जीवनचरित्र पर  पुस्तकाचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले .भागवत राय सर्कसमध्ये ताकदीचे प्रयोग करण्याकरिता प्रसिद्ध होते .


६.अविनाश साबळे ठरला पतियाळा ओलीम्पिक्साठी पात्र .अविनाशने फेडरेशन चषक अथ्लेतीक्स स्पर्धेत ३००० स्टीपलचेस मध्ये राष्ट्रीय विक्रमाची नोंद केली .त्याने त्याचाच ०८:२१:३७ सेकंदाचा विक्रम मोडून ०८:२०:२० सेकंदाचा नवीन विक्रम केला आहे .


 ७.दहावीच्या बारावीच्या परीक्षेत उत्तीर्ण निकष बदलून ३५ ऐवजी २५ टक्के करण्यात यावा अशी सूचना विदर्भ मुख्यध्यापक संघाने केली आहे .कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम अपूर्ण असल्यामुळे असे झाल्यास विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार आहे .


८.देशातील टोलनाके वर्षभरामध्ये  हटवण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिली आहे .यासोबतच टोल ऐवजी gps tracker प्रणाली बसवण्यात येणार असल्याची घोशना त्यांनी केली .


९.45 वर्षांपुढील सर्वांचे लसीकरण करण्याची मागणी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्राकडे केली आहे .




\

ररोज अशाच चालू घडामोडी वाचण्याकरिता  SUBSCRIBE नक्की करा !! 




*संपर्क -sankalponline0@gmail.com

*sankalponlineworks आता  TELEGRAM वरही उपलब्ध 

##Folow us on facebook,telegram&instagram@sankalponlineworks





Tuesday, March 16, 2021

१६/०३/२०२१

१. लेखक पुरुषोत्तम बेर्डे यांच्या "क्लोज एन्काऊंटर " महाराष्ट्र सेवा संघाच्या न.ची केळकर ग्रंथालयाचा "साहित्य साधना "पुरस्कार जाहीर झाला आहे ."साहित्य साधना "हा पुरस्कार मराठी भाषेतील साहित्य ,कथा ,कादंबरी या प्रकारापेक्षा काहीतरी वेगळ्या विषयांवर लेखन करणाऱ्या लेखकांना दिला जातो .

  २.MPSC (महाराष्ट्र लोकसेवा आयोग )होणाऱ्या परीक्षेपूर्वी mpsc च्या सर्व कर्मचार्यांना कोरोन चाचणी करणे बंधनकारक केले आहे .

३.मराठा आरक्षणाच्या सुनावणीला स्थगिती देण्यास सुप्रीम कोर्टाने नकार दिला आहे .सर्वोच न्यायलयाने सरकारी नोकर्या व शिक्षणामध्ये आरक्षणाची असणारी ५० टक्क्यांची मर्यादा व आर्थिक आणि  सामाजिक मागास प्रवर्ग ठरवण्याचा राज्यांचा अधिकार या दोन राज्यांना बाजू  मांडण्यासाठी एका आठवड्याची मुदतवाढ देण्यात आली आहे .सर्वोच्च न्यायालयाने पाठवलेल्या नोटीस ला प्रतिसाद म्हणून तमिळनाडू ,केरळ ,राजस्थान,हरियाना या राज्यांनी मुदतवाढ मागितली होती .केरल व तमिळनाडू या दोन राज्यांनी निवडणुका होईपर्यंत मराठा आरक्षणाच्या सुनावणीस स्थगिती देण्याची केलेली विनंती फेटाळत सर्वोच न्यायालयाने मुदतवाढ दिली आहे .


४.(WPI) इंडेक्स २ त्क्क्यंहून वाढून ४.१७ टक्क्यांवर .घाऊक महागाईचा दर दुप्पट वाढला आहे . अन्न-धान्यांच्या व भाजीपाल्यांच्या वाढत्या किमतीचा परिणाम म्हणून घाऊक महागाईचा दर वाढला आहे .फेब्रुवारी महिन्यामध्ये यात दुपटीने वाढ झाली .

५.मागील दोन वर्षांपासून दोन हजारांच्या नोटांची छपाई बंद करण्यात आल्याची माहिती अर्थ राज्यमंत्र्यांनी लोकसभेत दिली आहे .`साठेबाजी वाढू नये व काळ्या पैशाचे प्रकार वाढू नयेत म्हणून २००० रुपयाच्या नोटांची छपाई बंद केल्या अशी माहिती सरकारने दीली .


६.भारताला कच्या   तेलाचा  (खनिज तेल)पुरवठा करणारा अमेरिका हा दुसऱ्या क्रमांकाचा देश आहे .अमेरिकेकडून भारताने गेल्या फेब्रुवारीमध्ये आयात केलेल्या कच्च्या तेलाची आकडेवारी खालीलप्रमाणे -

दरदिवसाला ५,४५,३०० ब्यारेल एवढे तेल भारताने अमेरिकेकडून आयत केले आहे .


७.ऑस्कर पुरस्कारांसाठी नामंकन जाहीर करण्यात आली आहेत .मांक या चित्रपटाला सर्वात जास्त नामंकन मिळाले आहे .


८.जीएसटी भरपाईतील तुटीचा राज्यांना संपूर्ण भरणा देऊन झाल्याची माहिती संसदेत अर्थ मंत्री निर्मला सीतारामन यांनी जाहीर केली .


९.अन्नू राणी हिने फेडरेशन चषक राष्ट्रीय athletics अजिंक्यपद स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी नव्या राष्ट्रीय विक्रमाची नोंद केली आहे .तिये ६३.२४ मिटर अशी कामगिरी करत स्वताचाच रेकॉर्ड मोडला .

Monday, March 15, 2021

15/03/2021

 1.महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी इलेल्क्ट्रिक विक्टोरिया ब्ग्गीचे अनावरण केले .मुंबईच्या पर्यटनात याने आणखीनच भर पडणार आहे .घोडागाडी व्यवसायातील जवळपास२५०  बेरोजगारांना पुन्हा रोजगार उपलब्ध होणार आहे .


२.पुण्यामध्ये मिसळ तयार करण्याचा विश्वविक्रम करण्यात आला आहे .पुण्यामध्ये शेफ विष्णू मनोहर यांनी सात तासात सात हजार किलोची मिसळ बनवण्याचा विश्वविक्रम केला आहे .या विश्वविक्रमाची नोंद गिनीज बुक ,लिम्का ,गोल्डन बुक ऑफ रेकॉर्ड्स मध्ये नोंद करण्यात येणार आहे .


३.जागतिक महिला आयोगातर्फे आजपासून जागतिक महिला अधिवेशन सुरु करण्यात आले आहे .स्त्री आधार केंद्राच्या मानद  अध्यक्ष म्हणून विधान परिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे या अधिवेशनात भारताचे प्रतिनिधित्व करणार आहेत .हे अधिवेशन online आयोजित करण्यात आले आहे .१५ मार्च ते २६ मार्च पर्यंत हे अधिवेशन सुरु राहणार आहे .


४. विजय हजारे एकदिसीय क्रिकेट  स्पर्धेत उत्तर प्रदेशच्या संघाला हरवत मुंबई संघाने विजय मिळवला .या स्पर्धेचे चौथ्यांदा मुंबईच्या संघाने विजेतेपद मिळवले .

५.आजपासून सार्वजनिक व प्रादेशिक क्षेत्रातील बँकेच्या कर्मचार्यांनी दोन दिवसाच्या संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे .बँकांच्या होणार्या खाजगीकरणाच्या विरोधात बँक कर्मचारी व अधिकारी हा संप करणार आहेत .

६.भारताची महिला क्रिकेट संघाची कर्णधार मिथाली राज हिने आणखी एका विक्रमाला गवसणी घातली आहे .अंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ७००० रन्स पूर्ण करणारी ती क्रिकेट विश्वातील पहिली महिला क्रिकेटपटू बनली आहे .इंग्लंडची चार्लोट एडवर्ड दुसर्या स्थानी आहे .


७.टोकिओ ऑलिम्पिक स्पर्धेसाठी भारतीय तलवारबाज भवानी देवी पात्र ठरली आहे . .तलवारबाजी या खेळासाठी  ऑलिम्पिक स्पर्धेकरता पात्र ठरणारी ती पहिली भारतीय खेळाडू आहे .


८.क्वाड गट तयार करणाऱ्या लशीचे हैद्राबाद मध्ये उत्पादन घेतले जाणार आहे .भारत ,अमेरिका ,जपान व औस्ट्रेलीया या चार देशांनी मिळून क्वाड ची स्थापना केली आहे .हिंद व प्रशांत महासागरामध्ये चीनचा वाढता हस्तक्षेप रोखण्यासाठी क्वाड गट प्रयत्नशील आहे.चीनने कोरोन लसीचा इतर देशांना पुरवठा करण्यासाठी आखलेल्या योजनेला उत्तर म्हणून क्वाड देशांचा हा गट लसींची निर्मिती करणार आहे व या लसींची निर्मिती हैद्राबाद येथे करण्यात येणार आहे .भारत बायोटेक,शांता बायोटेक्निक्स ,इंडिअन इम्युनोलोजीकल्स या व अशा महत्वाच्या लस उत्पादक कंपन्या लस निर्माण करणार आहेत .बायोलोजीक्ल इ या कंपनी सोबत जोन्सन &जॉन्सन या कंपनीने लस निर्मितीबाबत करार केला आहे .या कार्रानुसार ५० कोटी डोसचे उत्पादन घेतले जाणार आहे .

९.spice jet या विमान प्रवास  कंपनीने प्रवाशांना २९९ रुपयात कोरोनाची आरटी -पीसीआjeर चाचणी ची सोय उपलब्ध करून दिली आहे .विमानाने प्रवास करण्यापूर्वी कोरोन चाचणी करणे सक्तीचे करण्यात आले आहे .


१०.२३ व २४ मार्च रोजी भारत व पाकिस्तान या दोन देशांच्या सिंधू आयुक्तांची बैठक होणार आहे भारताने लडाखमध्ये अनेक जलविद्युत प्रकल्पांना मंजुरी दिली आहे त्या पार्श्वभूमीवर हि बैठक महत्वपूर्ण आहे .सिंधू जल कराराच्या तरतुदीनुसार दोन्ही देशांच्या आयुक्तांना वर्षातून किमान एकदा क्रमवार भारत व पाकिस्तानमध्ये भेट घेऊन चर्चा करावी लागते .जम्मू व काश्मीर केंद्र शासित प्रदेश केल्यानंतर पहिल्यांदाच हि बैठक होत आहे  .


११.सार्वजनिक क्षेत्रामधील १०० पेक्षा जास्त उद्योग ५ लाख कोटी रुपयांमध्ये विकण्यासाठी सरकार तयारी करत आहे .आर्थिक वर्ष २०२१ -२२ मध्ये १ लाख ७५  कोटी रुपये विक्रीतून मिळवण्याचे सरकारचे लक्ष आहे .




 दररोज अशाच चालू घडामोडी वाचण्याकरिता  SUBSCRIBE नक्की करा !! 




*संपर्क -sankalponline0@gmail.com

*sankalponlineworks आता  TELEGRAM वरही उपलब्ध 

##Folow us on facebook,telegram&instagram@sankalponlineworks






    

Sunday, March 14, 2021

१४/०३/२०२१


##इतिहासात डोकावताना## -

*जन्म 

-१४ /०३/१८७९ 

* भौतिकशास्त्रज्ञ अल्बर्ट आईनस्टाईन यांचा जन्मदिवस . सापेक्षवादाच्या  सिंधान्तासाठी ते ओळखले जातात .१९२१ साली त्यांनि भौतिकशास्त्रा मध्ये केलेल्या कार्याचा गौरव म्हणून त्यांना नोबेल परीतोशिक देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला होता .१८ एप्रिल 1९५५ रोजी त्यांचा मृत्यु झाला .

*प्रसिद्ध bollywood अभिनेता आमिरखान यांचा जन्म -१४/०३/१९६५  


*मृत्यु -

*भौतिकशास्त्रज्ञ स्टीफन  हौकिंग -१४/०३/२०१८ 

*थोर विचारवंत कार्ल मार्क्स -१४/०३/१८८३ 


*पहिला भारतीय बोलपट असणारा अर्देशीर इराणी यांच्याद्वारे दिग्दर्शित करण्यात आलेला "आलम आरा "१४/०३/१९३१ रोजी प्रदर्शित करण्यात आला होता . 




१.कोरोनाच्या पाश्वभूमीवर मास्क योग्यरीत्या न वापरणाऱ्या प्रवाशांना विमानाबाहेर काढण्याचे निर्देश डीजिसिएने विमान कंपन्यांना  दिले आहेत  


२.२८ वर्षांनी मुंबई -आग्रा हि विमानसेवा पुन्हा सुरु होणार आहे .इंडिगो हि कंपनी २९ मार्चपासून हि सेवा पुरवणार आहे .


३.गृहनिर्माण सोसायट्याना गृह वित्तीय कंपन्यांकडून कर्ज घेण्यास रिजर्व बँकेने मान्यता दिली आहे .


४.आज विजय हजारे करंडक राष्ट्रीय एकदिवसीय स्पर्धेचा अंतिम सामना होणार आहे .हा अंतिम सामना मुंबई व उत्तरप्रदेश या दोन संघाच्या दरम्यान होत आहे .


५.कोरोनाला प्रतिबंध करण्यासाठी भारतात आणखी ६ पेक्षा जास्त लसींची निर्मिती होणार असल्याची घोषणा केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी केली .

६.श्रीहरी कोट्टा येथील सतीश धवन स्पेस सेंटर येथून इस्त्रो (indian space reserch organisation)ने "sounding rocket RH-560 "चे प्रक्षेपण यशस्वीरीत्या केले .उंचीवरील हवेमध्ये होणारे बदल ,वातावरणातील प्लाझमाची गतिशीलता याचा अभ्यास याद्वारे करण्यात येणार आहे .


७.१५ वर्षांपेक्षा जुन्या सरकारी कार्यालयांच्या वाहनांची नुतनिकारणासाठी   नोंदणी होणार नाही . हा नियम येत्या १ एप्रिल २०२२ पुन लागू करण्यात येणार आहे .


८.श्रीलंकेमध्ये बुरखा घालण्यास बंदी करण्यात आली आहे .याचबरोबर श्रीलंकेमधील  १००० मदरसे बंद केले जाणार आहेत .श्रीलंका सरकारच्या गृहमंत्र्यांनी तशी  घोषणा केली आहे.२०१९ मध्ये श्रीलंकेतील चर्चवर दहशतवादी हल्ला झाला होता .त्यावेळेसही काही काळासाठी श्रीलंका सरकारने बुरखा बंदी केली होती .  


९.ISL(Indian Super Leage)च्या अंतिम लढतीमध्ये ATK mohan bagan ला हरवत MUMBAI City ने विजेतेपद आपल्या नावावर केले .



 दररोज अशाच चालू घडामोडी वाचण्याकरिता  SUBSCRIBE नक्की करा !! 




*संपर्क -sankalponline0@gmail.com

*sankalponlineworks आता  TELEGRAM वरही उपलब्ध 

##Folow us on facebook,telegram&instagram@sankalponlineworks






Saturday, March 13, 2021

चालू घडामोडी १३/०३/२०२१

*राज्य -

१.साहित्य अकादमी पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे .एकूण २० भाषांसाठी साहित्य अकादमीने पुरस्कार घोषित केले आहेत.जेष्ठ साहित्यिक नंदा खरे यांच्या 'उद्या 'या कादंबरीस साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाला आहे .तर गोविंद महाजन यांच्या 'आबाची गोष्ट 'या लघु कथासंग्रहास 'बाल साहित्य ' पुरस्कार जाहीर झाला आहे .नंदा खरे यांनी मात्र पुरस्कार स्वीकारण्यास नकार दर्शवला आहे .



२. आता अभियांत्रिकी मध्ये  प्रवेश घेण्यासाठी इयत्ता बारावी मध्ये गणित व भौतिकशास्त्र विषय असण्याची गरज नाही .'एआयसीटीई' ने नवीन शैक्षणिक धोरणाची अमलबजावणी करताना घेतला निर्णय .



*राष्ट्रीय-

३.सर्वोच्च न्यायालयाच्या 'न्यायमूर्ती ' म्हणून थेट नियुक्त झालेल्या देशातील पहिल्या महिला वकील "इंदू मल्होत्रा"आज दिनांक १३/०३/२०२१ रोजी निवृत्त होत आहेत .


४.NEET (National Eligibility Entrance Test)च्या परीक्षेची तारीख जाहीर झाली आहे .येत्या १ ऑगस्ट रोजी neet च्या परीक्षेचे आयोजन करण्यात येणार आहे .


५.उद्योगपती गौतम अदाणी यांच्या संपत्तीमध्ये २०२१ या वर्षी तब्बल १६.२ अब्ज एवढी वाढ नोंदवण्यात आली आहे .संपत्तीमध्ये भर टाकणाऱ्या अब्जाधीश व्यक्तींमध्ये त्यांनी रिलायन्सचे अध्यक्ष मुकेश अंबानी व टेस्ला ग्रुपचे एलन मस्क यानाही मागे टाकले आहे .


*अंतरराष्ट्रीय -

६.औस्ट्रेलीया ,जपान,अमेरिका व भारत या चार देशांच्या क्वड्ची पहिली शिखर संमेलन  परिषद आभासी (Virtual)रित्या संपन्न झाली .या शिखर संमेलन परिषदेचे विषय खालीलप्रमाणे होते .

१.कोरोनावरील लस 

२.हवामान बदल 

३.उदयोन्मुख तंत्रज्ञान 


७.भारताची क्रिकेटपटू "मिथाली राज "हिने अंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १०००० रन्स करण्याचा विक्रम केला आहे .अशी कामगिरी करणारी ती जगातील दुसरी व भारतातील पहिली महिला क्रिकेटपटू ठरली आहे .






*काही माहिती हवी असल्यास 'COMMENT BOX '  मध्ये विचारू शकता किवा खाली दिलेल्या मेल आयडीवर संपर्क साधावा ,व दररोज अशाच चालू घडामोडी वाचण्याकरिता  SUBSCRIBE नक्की करा !! 




*संपर्क -sankalponline0@gmail.com

*sankalponlineworks आता  TELEGRAM वरही उपलब्ध 

##Folow us on facebook,telegram&instagram@sankalponlineworks






  

Wednesday, March 10, 2021

चालू घडामोडी 10.03.2021

 *राज्य-


1.जिल्ह्यातील विकास कामांकरिता दिल्या जाणाऱ्या निधींच्या यादीमध्ये पुणे पहिल्या ,अहमदनगर दुसऱ्या तर नागपूर तिसऱ्या स्थानी.

1.पुणे-६९५ कोटी

2.अहमदनगर-510 कोटी

3.नागपूर-500कोटी


2.राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 च्या तरतुदीनुसार राज्यातील अंगणवाड्या प्राथमिक शाळांना जोडण्यात येणार आहेत.


3.मराठी एमटीएलडी टूल मुंबई विद्यापीठाच्या विद्यार्थिने विकसित केले आहे .याद्वारे व्यक्तीचा मराठी भाषा विकास मोजता येणार आहे .


*राष्ट्रीय-


4.केंद्रीय अर्थ राज्यमंत्री अनुराग ठाकूर यांनी लोकसभेत दिलेल्या माहितीनुसार lockdown मुळे 10113 कंपन्या बंद  झाल्याची माहिती देण्यात आली .एप्रिल 2020 ते फेब्रुवारी2021 दरम्यानची आकडेवारी .महाराष्ट्रातील 1297 कंपन्या बंद .


5.उत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्रसिंह रावत यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला.



6.जुन्या गाड्या भंगारात काढण्यासाठी प्रोत्साहनपर एक योजना भारत सरकार राबवणार आहे.जुन्या गाड्या भंगारात काढल्यास नवीन गाडी खरेदी करताना 5 टक्क्यांपर्यंत सूट देण्यात येणार आहे.



7.महिन्यातील सर्वोत्तम क्रिकेटपटूच्या पुरस्कारासाठी icc ने  रवीचंद्रन अश्विनची निवड केली आहे.



8.भारताची महिला क्रिकेटपटू स्मृती मानधना हिने विश्वविक्रम केला आहे.रण चेस करताना सलग दहाव्यांदा अर्धशतक करणारी ती पहिली क्रिकेटपटू आहे,असा विक्रम पुरुष क्रिकेटपटू देखील करू शकले नाहीत.







*संपर्क -sankalponline0@gmail.com

*sankalponlineworks आता  TELEGRAM वरही उपलब्ध 

##Folow us on facebook,telegram&instagram@sankalponlineworks








Tuesday, March 9, 2021

09.03.2021

 1.स्वीझरलँड मध्ये लवकरच सार्वजनिक ठिकाणी महिलांना बुरखाबंदीचा कायदा लवकरच करण्यात येणार आहे .



2.ट्रान्सयुनिअन सिबील या कर्जदारांच्या पतविषयक माहिती ठेवणाऱ्या संस्थेकडे उपलब्ध आकडेवारीनुसार देशातील महिला कर्जदारांच्या संख्येत वाढ होत आहे.मागील सहा वर्षांपासून महिलांचे कर्जा घेण्याचे प्रमाण वाढत आहे .ह्या वाढीचा दर वार्षिक21 %  आहे .


3.पुणे येथील प्रस्तावित साखर संग्रहालयासाठी महाराष्ट्र सरकारने 40 कोटींची तरतूद केल्याची घोषणा अर्थमंत्री अजित पवार यांनी केली आहे .साखर उत्पादनात भारताचा दुसरा क्रमांक लागतो .

hi


4.

लढाऊ विमाने तयार करणारी कंपनी' राफेल ' चे मालक ,व फ्रान्सचे अब्जाधीश उद्योगपती 'ओलिव्हिअर दसा' यांचे एक हेलिकॉप्टर दुर्घटनेत निधन झाले आहे..ते फ्रान्स च्या संसदेचे सदस्य होते.


5.सामाजिक व आर्थिक मागास प्रवर्ग ठरवण्याच्या राज्याच्या हक्कांवर कलम 102 व्या घटना दुरुस्तीमुळे गदा येते का,तसेच इतर मुद्द्यांवर सर्वोच्च न्यायालयाने राज्यांना नोटीस पाठवली आहे.



*संपर्क -sankalponline0@gmail.com

*sankalponlineworks आता  TELEGRAM वरही उपलब्ध 

##Folow us on facebook,telegram&instagram@sankalponlineworks






Monday, March 8, 2021

०८/०३/२०२१

*राज्य -

*.आज महारष्ट्र सरकारचा अर्थसंकल्प मांडण्यात आला. जाणून घेऊया अर्थसंकल्पातील तरतुदींबाबत थोडक्यात -

*.महाविकास आघाडी सरकारचा हा दुसरा अर्थसंकल्प .अर्थसंकल्पामध्ये प्रत्येक विभागाला काहीनाकाही दिलासा देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे .कोरोनामुळे राज्याच्या अर्थ व्यवस्थेवर आधीच मोठा ताण आहे .अशा परिस्थितीमध्ये अर्थव्यवस्थेला सावरणे महत्वाचे .

१..अर्थसंकल्पातील काही महत्वाच्या बाबी -

१..महिला दिनानिमित्त खास महिलांकरिता राज्य शासनाने राजमाता जिजाऊ गृहस्वामिनी योजनेमध्ये महिलेच्या  नावाने घराची खरेदी केल्यास मुद्रांक शुक्ल करमध्ये सूट देण्याचा निर्णय घेतला आहे .

२.क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले योजनेंतर्गत ग्रामीण भागातील विद्यार्थीनीना एसटी बसने मोफत प्रवास योजना अधिक कार्यक्षमतेने राबवण्यासाठी राज्य सरकार एसटी महामंडळास १५००ह्याब्रीड आणि  cng  एसटी बस देणार .

३.५०० नवीन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर भाजीपाला रोपवाटिका स्थापन करणार .

४.१२ हजार ९५१ कोटीं जलसंपदा विभागास देण्यात आले .यामध्ये धरणांची दुरुस्ती केली जाणार आहे .

५.वैद्यकीय शिक्षण विभागासाठी १००० हजार ९४१ कोटी ६४ लाखांची तर सार्वजनिक आरोग्य विभागासाठी ८ हजार ९५५ कोटी २९ लाखांची तरतूद करण्यात आली आहे .यासोबतच सरकार ७ जिल्ह्यांमध्ये वैद्यकीय महाविद्यालय स्थापन करणार आहे ते जिल्हे पुढीलप्रमाणे  .-

सिंधुदुर्ग,उस्मानाबाद,नाशिक ,रायगड,सातारा,अमरावती,परभणी.


2.पुण्यातील पाषाण येथील center for materials for electronics technology (सिमेट )या संस्थेच्या परिसरामध्ये स्वदेशी 3d प्रिंटर तयार करण्यासाठीची प्रयोगशाळा येत्या ५ वर्षांमध्ये पूर्ण करण्याचा शास्त्रज्ञांचा मानस  आहे.



३.कंजारभाट या समाजात प्रचलित असणाऱ्या 'कौमार्य'  या अनिष्ट प्रथेच्या चौकशी करण्याचे महाराष्ट्र सरकारला राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने आदेश दिले आहेत .



*राष्ट्रीय 

४.२६ फेब्रुवारी भारतीय रिजर्व बँकेने रोजी संपलेल्या सप्ताहाच्या जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार देशाच्या परकीय चलन गंगाजळीमध्ये वाढ झाल्याचे स्पष्ट केले आहे .परदेशामधील भारतीय मालमत्तांच्या किमतीत झालेल्या वाढीमुळे परकीय चलन गंगाजळीत वाढ झाल्याचे रिजर्व बँकेद्वारे जाहीर करण्यात आले आहे .देशाच्या परकीय चलन गंगाजळीत एकूण ६८.९ कोटी डॉलरच्या झालेल्या  वाढीने  एकूण परकीय चलन गंगाजळी आता ५८४.५५४ अब्ज डॉलर एवढी झाली आहे .    


                     




५ .G-SAT-1हा संरक्षणाच्या दृष्टीने महत्वाचा असणाऱ्या उपग्रहाचे २८ मार्च रोजी इस्त्रो प्रक्षेपण करणार आहे .देशाच्या सीमेवर अन्त्र्रालातून लक्ष्य ठेवणे व नैसर्गिक आपत्तीमुळे  होणाऱ्या आपत्ती वरती लक्ष ठेवणे हे त्याचे काम असणार आहे .



६.Indian Premiar Leage (IPL)चे येत्या ९ एप्रिलपासून आयोजन करण्यात येणार आहे .ipl चा पहिला सामना हा mumbai indian VS Royal challengers Bengluru या दोन संघाच्या दरम्यान होणार आहे .मात्र या सामन्यांसाठी प्रेक्षकांना परवानगी नाकारण्यात आली आहे .



७.पंजाब राज्य सरकारने राज्यातील महिलांना राज्य शासनाच्या बसणे  मोफत प्रवास करता येणार आहे .पंजाब सरकारने विधानसभेमध्ये याबाबतचा प्रस्ताव मंजूर केला आहे .यासाठी पंजाब सरकारने अर्थसंकल्पात विशेष तरतूद केली आहे .जागतिक महिला दिनानिमित्त पंजाब सरकारने महिलांना हि भेट दिली आहे .


८.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वर्चुअल कार्यक्रमाद्वारे शिलॉंग मध्ये ७५०० व्या जन औषधी केंद्राचे उद्घाटन केले .North estarn indira gandhi regional institute of health येथील हे जन औषधी केंद्र आहे .






*अंतरराष्ट्रीय -

९.चीनचे विदेशमंत्री वंग यी यांनी भारत व चीनने सीमावाद प्रश्न सोडवण्यासाठी अनुकूल वातावरण तयार करावे असे म्हटले आहे .



१० .आज अंतरराष्ट्रीय महिला दिवस .महिलांनी स्वतःच्या हक्कांसाठी दिलेल्या लढ्याच्या स्मरणार्थ ८ मार्च हा दिवस अंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून साजरा करण्यात येतो.







*काही माहिती हवी असल्यास 'COMMENT BOX '  मध्ये विचारू शकता किवा खाली दिलेल्या मेल आयडीवर संपर्क साधावा ,व दररोज अशाच चालू घडामोडी वाचण्याकरिता  SUBSCRIBE नक्की करा !! 








*संपर्क -sankalponline0@gmail.com

*sankalponlineworks आता  TELEGRAM वरही उपलब्ध 

##Folow us on facebook,telegram&instagram@sankalponlineworks