1.महाराष्ट्रातील मराठा आरक्षणाला इतर राज्यांचा पाठिंबा.सर्वोच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीवेळी 50 %आरक्षण मर्यादा वाढवने योग्य असल्याचा युक्तिवाद मांडला.102 व्या घटनादुरुस्ती च्या मुद्द्यावर हा कायदा योग्य असल्याचे केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात म्हटले आहे.
2.केंद्र सरकार महाराष्ट्र राज्यामध्ये 10,000 कृषी उत्पादक कंपन्या स्थापन करण्याची योजना राबवणार आहे.
3.महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत गौण खनिज स्वामित्व दरात दीड पटीने वाढ करन्याच्या प्रस्तावास मंजुरी देण्यात आली आहे.येत्या जुलै महिन्यापासून ही वाढ होणार आहे .याचा परिणाम म्हणून बांधकाम साहित्याच्या किमतीमध्ये वाढ होणार आहे.
3.पुणे येथील महाराष्ट्र ग्रंथोत्तेजक संस्था 'कोशांचा कोष 'हा प्रकल्प राबवणार आहे.कोणत्याही विषयातील माहिती ,कोशातील माहितीचा शोध कसा घ्यावा याचे लेखक ,भाषा अभ्यासकांना दिशा दाखवणे हा यामागील प्रमुख हेतू आहे.
4.इचलकरंजी येथील अश्विनी काणेकर ही युवतीने 'गेट' परीक्षेमध्ये देशामधून पहिली येण्याचा मॅन मिळवला आहे.
5.रिजर्व बँकेने दोन किंवा जास्त नागरी सहकारी बँकांचे विलीनिकरण सोपे होईल अशा नवीन मार्गदर्शक तत्वांना मंजुरी दिली आहे.यानुसार आर्थिक स्थिती भक्कम असणाऱ्या नागरी बँकेला दुसऱ्या बँकेचे अधिग्रहण करून विशेष लाभ व सवलती मिळवता येणार आहेत.
6.सरन्यायाधीश' शरद बोबडे' यांनी भारताचे सरन्यायाधीश म्हणून एन. व्ही .रमण यांच्या नावाची सरकारकडे शिफारस केली आहे.सरन्यायाधीश शरद बोबडे 23 एप्रिल रोजी निवृत्त होणार आहेत.
7.दिल्ली येथे सुरू असलेल्या विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत 50 थ्री रायफल पोझिशन गटात भारताच्या ऐश्वर्य तोमर याने सुवर्णपदक पटकावले.आतापर्यंत भारताने या स्पर्धेत 9 सुवर्ण पदकांची कमाई केली आहे.
8.गेल्या वर्षभरामध्ये इंधन दरात पहिल्यांदाच घट नोंदवण्यात आली आहे. फेब्रुवारी महिन्यानंतर पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय स्तरावर खनिज तेलाच्या किमतीमध्ये दरकपात झाली आहे .
9.भारतामध्ये गेल्या काही दिवसांमध्ये कोरोनाच्या रुग्ण संख्येमध्ये होणाऱ्या वाढीमुळे भारताने देशांतर्गत कोरोना लसीची मागणीची पूर्तता करण्यासाठी astrazeneca काच्या लसीची इतर देशांना होणारी निर्यात तूर्तास थांबवण्याचा निर्णय घेतला आहे.
10.हँगकाँगमध्ये फायझरच्या लसीचा होणार वापर थांबवण्यात आला आहे.तेथील एक लस वितरकाणे लसीच्या बाटल्यांचा झाकण व्यवस्थित बंद नसल्याची तक्रार केल्याने लसीचा वापर बंद करण्यात आला आहे.
दररोज अशाच चालू घडामोडी वाचण्याकरिता SUBSCRIBE नक्की करा !!
##Folow us on facebook,telegram&instagram@sankalponlineworks
No comments:
Post a Comment