*राज्य -
१.साहित्य अकादमी पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे .एकूण २० भाषांसाठी साहित्य अकादमीने पुरस्कार घोषित केले आहेत.जेष्ठ साहित्यिक नंदा खरे यांच्या 'उद्या 'या कादंबरीस साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाला आहे .तर गोविंद महाजन यांच्या 'आबाची गोष्ट 'या लघु कथासंग्रहास 'बाल साहित्य ' पुरस्कार जाहीर झाला आहे .नंदा खरे यांनी मात्र पुरस्कार स्वीकारण्यास नकार दर्शवला आहे .
२. आता अभियांत्रिकी मध्ये प्रवेश घेण्यासाठी इयत्ता बारावी मध्ये गणित व भौतिकशास्त्र विषय असण्याची गरज नाही .'एआयसीटीई' ने नवीन शैक्षणिक धोरणाची अमलबजावणी करताना घेतला निर्णय .
*राष्ट्रीय-
३.सर्वोच्च न्यायालयाच्या 'न्यायमूर्ती ' म्हणून थेट नियुक्त झालेल्या देशातील पहिल्या महिला वकील "इंदू मल्होत्रा"आज दिनांक १३/०३/२०२१ रोजी निवृत्त होत आहेत .
४.NEET (National Eligibility Entrance Test)च्या परीक्षेची तारीख जाहीर झाली आहे .येत्या १ ऑगस्ट रोजी neet च्या परीक्षेचे आयोजन करण्यात येणार आहे .
५.उद्योगपती गौतम अदाणी यांच्या संपत्तीमध्ये २०२१ या वर्षी तब्बल १६.२ अब्ज एवढी वाढ नोंदवण्यात आली आहे .संपत्तीमध्ये भर टाकणाऱ्या अब्जाधीश व्यक्तींमध्ये त्यांनी रिलायन्सचे अध्यक्ष मुकेश अंबानी व टेस्ला ग्रुपचे एलन मस्क यानाही मागे टाकले आहे .
*अंतरराष्ट्रीय -
६.औस्ट्रेलीया ,जपान,अमेरिका व भारत या चार देशांच्या क्वड्ची पहिली शिखर संमेलन परिषद आभासी (Virtual)रित्या संपन्न झाली .या शिखर संमेलन परिषदेचे विषय खालीलप्रमाणे होते .
१.कोरोनावरील लस
२.हवामान बदल
३.उदयोन्मुख तंत्रज्ञान
७.भारताची क्रिकेटपटू "मिथाली राज "हिने अंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १०००० रन्स करण्याचा विक्रम केला आहे .अशी कामगिरी करणारी ती जगातील दुसरी व भारतातील पहिली महिला क्रिकेटपटू ठरली आहे .
*काही माहिती हवी असल्यास 'COMMENT BOX ' मध्ये विचारू शकता किवा खाली दिलेल्या मेल आयडीवर संपर्क साधावा ,व दररोज अशाच चालू घडामोडी वाचण्याकरिता SUBSCRIBE नक्की करा !!
*संपर्क -sankalponline0@gmail.com
##Folow us on facebook,telegram&instagram@sankalponlineworks






No comments:
Post a Comment