१. लेखक पुरुषोत्तम बेर्डे यांच्या "क्लोज एन्काऊंटर " महाराष्ट्र सेवा संघाच्या न.ची केळकर ग्रंथालयाचा "साहित्य साधना "पुरस्कार जाहीर झाला आहे ."साहित्य साधना "हा पुरस्कार मराठी भाषेतील साहित्य ,कथा ,कादंबरी या प्रकारापेक्षा काहीतरी वेगळ्या विषयांवर लेखन करणाऱ्या लेखकांना दिला जातो .
२.MPSC (महाराष्ट्र लोकसेवा आयोग )होणाऱ्या परीक्षेपूर्वी mpsc च्या सर्व कर्मचार्यांना कोरोन चाचणी करणे बंधनकारक केले आहे .
३.मराठा आरक्षणाच्या सुनावणीला स्थगिती देण्यास सुप्रीम कोर्टाने नकार दिला आहे .सर्वोच न्यायलयाने सरकारी नोकर्या व शिक्षणामध्ये आरक्षणाची असणारी ५० टक्क्यांची मर्यादा व आर्थिक आणि सामाजिक मागास प्रवर्ग ठरवण्याचा राज्यांचा अधिकार या दोन राज्यांना बाजू मांडण्यासाठी एका आठवड्याची मुदतवाढ देण्यात आली आहे .सर्वोच्च न्यायालयाने पाठवलेल्या नोटीस ला प्रतिसाद म्हणून तमिळनाडू ,केरळ ,राजस्थान,हरियाना या राज्यांनी मुदतवाढ मागितली होती .केरल व तमिळनाडू या दोन राज्यांनी निवडणुका होईपर्यंत मराठा आरक्षणाच्या सुनावणीस स्थगिती देण्याची केलेली विनंती फेटाळत सर्वोच न्यायालयाने मुदतवाढ दिली आहे .
४.(WPI) इंडेक्स २ त्क्क्यंहून वाढून ४.१७ टक्क्यांवर .घाऊक महागाईचा दर दुप्पट वाढला आहे . अन्न-धान्यांच्या व भाजीपाल्यांच्या वाढत्या किमतीचा परिणाम म्हणून घाऊक महागाईचा दर वाढला आहे .फेब्रुवारी महिन्यामध्ये यात दुपटीने वाढ झाली .
५.मागील दोन वर्षांपासून दोन हजारांच्या नोटांची छपाई बंद करण्यात आल्याची माहिती अर्थ राज्यमंत्र्यांनी लोकसभेत दिली आहे .`साठेबाजी वाढू नये व काळ्या पैशाचे प्रकार वाढू नयेत म्हणून २००० रुपयाच्या नोटांची छपाई बंद केल्या अशी माहिती सरकारने दीली .
६.भारताला कच्या तेलाचा (खनिज तेल)पुरवठा करणारा अमेरिका हा दुसऱ्या क्रमांकाचा देश आहे .अमेरिकेकडून भारताने गेल्या फेब्रुवारीमध्ये आयात केलेल्या कच्च्या तेलाची आकडेवारी खालीलप्रमाणे -
दरदिवसाला ५,४५,३०० ब्यारेल एवढे तेल भारताने अमेरिकेकडून आयत केले आहे .
७.ऑस्कर पुरस्कारांसाठी नामंकन जाहीर करण्यात आली आहेत .मांक या चित्रपटाला सर्वात जास्त नामंकन मिळाले आहे .
८.जीएसटी भरपाईतील तुटीचा राज्यांना संपूर्ण भरणा देऊन झाल्याची माहिती संसदेत अर्थ मंत्री निर्मला सीतारामन यांनी जाहीर केली .
९.अन्नू राणी हिने फेडरेशन चषक राष्ट्रीय athletics अजिंक्यपद स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी नव्या राष्ट्रीय विक्रमाची नोंद केली आहे .तिये ६३.२४ मिटर अशी कामगिरी करत स्वताचाच रेकॉर्ड मोडला .
No comments:
Post a Comment