1.आज राष्ट्रीय दिनदर्शिकेच्या नवीन वर्षांचा पहिला दिवस देशाचे पाहिलेपंतप्रधान दिवंगत श्री पंडित नेहरू यांनी डॉ.मेघनाथ सहा या जेष्ठ शास्त्रज्ञांच्या अध्यक्षतेखालील समितीने तयार केलेल्या दिनदर्शिकेच्या स्वीकार करून त्याची देशभ्रमध्ये अंमलबजावणी करण्यात आली मार्च पासून तिची अंमलबजावणी करण्यात आली खगोलशास्त्र व ऋतू ,भौगोलिक परिस्थितीचा खोलवर अभ्यास करून ही दिनदर्शिका बनवण्यात आली होती .
2.जुना तांदूळ नवा म्हणून विकण्यात आल्याचे प्रकार रोखण्यासाठी म्हणून सरकारने राईस एजिंग चाचणी करण्याचे ठरवले आहे .याद्वारे तांदूळ नवा आहे की जुना याची तपासणी करता येणार आहे .सध्या ही चाचणी आंध्र प्रदेशमध्ये चालू आहे .
3.31 व्या सिनिअर राष्ट्रीय तलवारबाजी चॅम्पियन शिपमध्ये महिला सबरे वयक्तिक या स्पर्धेमध्ये भवानी देवी हिने नवव्या वेळेस स्पर्धेच्या विजेतेपदावर नाव कोरले आहे .भवानी देवी ही टोकियो ऑलिम्पिकसाठी पत्र ठरणारी पहिली भारतीय तलवारबाजीची खेळाडू आहे .
4.प्रसिद्ध ओडिशा नृत्यांगना लक्ष्मीप्रिया मोहापात्रा यांचे निधन झाले .
5.सोने चांदी या यांच्या आयातीत चालू आर्थिक वर्षांमध्ये 3.3 टक्क्यांनी घट झाल्याचे केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाने जाहीर केले आहे .चांदीच्या आयातीमध्ये 70 टक्के एवढी घाट झाली आहे .
6.संयुक्त राष्ट्र व्यापार व विकास परिषदेने जाहीर केलेल्या अहवालानुसार जगाची अर्थव्यवस्था 4.7 टक्क्यांनी वाढणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे .भारतीय अर्थव्यवस्था ही 5 टक्क्यांनी विकास होणार असल्याचे अंदाज वर्तवण्यात आला आहे .
7.जगात लष्करी ताकदीने सामर्थ्यवान देशांच्या यादीमध्ये भारत चौथ्या स्थानी .मिलिटरी डायरेक्ट या वेबसाईटने केलेल्या अध्ययनानुसार जगात सर्वात जास्त लष्करी सामर्थ्यवान चीन आहे.त्यापाठोपाठ अमेरिका व रशिया यांचा क्रमांक लागतो.
8.आययसएफ विश्वकप नेमबाजी स्पर्धेच्या 10 मीटर एअर पिस्तुल टीम स्पर्धेत भारतीय महिला व पुरुष या दोन्ही विभागाच्या गटांनी सुवर्णपदकाची कमाई केली .
9.आंतरराष्ट्रीय पलसार कालमापन रचना गटाचा आता भारत पूर्ण सदस्य बनला आहे .ब्रम्हांडात असणाऱ्या कृष्ण विव्हरांद्वारे निर्माण होणाऱ्या गुरुत्वीय लहरींचा शोध व अभ्यास पलसार या कालमापन रचना गटाद्वारे करण्यात येतो.
10.टोकियो ऑलिम्पिकसाठी जपानने 90 हजार परदेशी रहिवाशांची मर्यादा ठेवली आहे .यामध्ये 15000 हजार खेळाडू व 75 हजार प्रशिक्षक व इतर यांचा समावेश असेल.
दररोज अशाच चालू घडामोडी वाचण्याकरिता SUBSCRIBE नक्की करा !!
*संपर्क -sankalponline0@gmail.com
##Folow us on facebook,telegram&instagram@sankalponlineworks
No comments:
Post a Comment