Monday, March 8, 2021

०८/०३/२०२१

*राज्य -

*.आज महारष्ट्र सरकारचा अर्थसंकल्प मांडण्यात आला. जाणून घेऊया अर्थसंकल्पातील तरतुदींबाबत थोडक्यात -

*.महाविकास आघाडी सरकारचा हा दुसरा अर्थसंकल्प .अर्थसंकल्पामध्ये प्रत्येक विभागाला काहीनाकाही दिलासा देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे .कोरोनामुळे राज्याच्या अर्थ व्यवस्थेवर आधीच मोठा ताण आहे .अशा परिस्थितीमध्ये अर्थव्यवस्थेला सावरणे महत्वाचे .

१..अर्थसंकल्पातील काही महत्वाच्या बाबी -

१..महिला दिनानिमित्त खास महिलांकरिता राज्य शासनाने राजमाता जिजाऊ गृहस्वामिनी योजनेमध्ये महिलेच्या  नावाने घराची खरेदी केल्यास मुद्रांक शुक्ल करमध्ये सूट देण्याचा निर्णय घेतला आहे .

२.क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले योजनेंतर्गत ग्रामीण भागातील विद्यार्थीनीना एसटी बसने मोफत प्रवास योजना अधिक कार्यक्षमतेने राबवण्यासाठी राज्य सरकार एसटी महामंडळास १५००ह्याब्रीड आणि  cng  एसटी बस देणार .

३.५०० नवीन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर भाजीपाला रोपवाटिका स्थापन करणार .

४.१२ हजार ९५१ कोटीं जलसंपदा विभागास देण्यात आले .यामध्ये धरणांची दुरुस्ती केली जाणार आहे .

५.वैद्यकीय शिक्षण विभागासाठी १००० हजार ९४१ कोटी ६४ लाखांची तर सार्वजनिक आरोग्य विभागासाठी ८ हजार ९५५ कोटी २९ लाखांची तरतूद करण्यात आली आहे .यासोबतच सरकार ७ जिल्ह्यांमध्ये वैद्यकीय महाविद्यालय स्थापन करणार आहे ते जिल्हे पुढीलप्रमाणे  .-

सिंधुदुर्ग,उस्मानाबाद,नाशिक ,रायगड,सातारा,अमरावती,परभणी.


2.पुण्यातील पाषाण येथील center for materials for electronics technology (सिमेट )या संस्थेच्या परिसरामध्ये स्वदेशी 3d प्रिंटर तयार करण्यासाठीची प्रयोगशाळा येत्या ५ वर्षांमध्ये पूर्ण करण्याचा शास्त्रज्ञांचा मानस  आहे.



३.कंजारभाट या समाजात प्रचलित असणाऱ्या 'कौमार्य'  या अनिष्ट प्रथेच्या चौकशी करण्याचे महाराष्ट्र सरकारला राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने आदेश दिले आहेत .



*राष्ट्रीय 

४.२६ फेब्रुवारी भारतीय रिजर्व बँकेने रोजी संपलेल्या सप्ताहाच्या जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार देशाच्या परकीय चलन गंगाजळीमध्ये वाढ झाल्याचे स्पष्ट केले आहे .परदेशामधील भारतीय मालमत्तांच्या किमतीत झालेल्या वाढीमुळे परकीय चलन गंगाजळीत वाढ झाल्याचे रिजर्व बँकेद्वारे जाहीर करण्यात आले आहे .देशाच्या परकीय चलन गंगाजळीत एकूण ६८.९ कोटी डॉलरच्या झालेल्या  वाढीने  एकूण परकीय चलन गंगाजळी आता ५८४.५५४ अब्ज डॉलर एवढी झाली आहे .    


                     




५ .G-SAT-1हा संरक्षणाच्या दृष्टीने महत्वाचा असणाऱ्या उपग्रहाचे २८ मार्च रोजी इस्त्रो प्रक्षेपण करणार आहे .देशाच्या सीमेवर अन्त्र्रालातून लक्ष्य ठेवणे व नैसर्गिक आपत्तीमुळे  होणाऱ्या आपत्ती वरती लक्ष ठेवणे हे त्याचे काम असणार आहे .



६.Indian Premiar Leage (IPL)चे येत्या ९ एप्रिलपासून आयोजन करण्यात येणार आहे .ipl चा पहिला सामना हा mumbai indian VS Royal challengers Bengluru या दोन संघाच्या दरम्यान होणार आहे .मात्र या सामन्यांसाठी प्रेक्षकांना परवानगी नाकारण्यात आली आहे .



७.पंजाब राज्य सरकारने राज्यातील महिलांना राज्य शासनाच्या बसणे  मोफत प्रवास करता येणार आहे .पंजाब सरकारने विधानसभेमध्ये याबाबतचा प्रस्ताव मंजूर केला आहे .यासाठी पंजाब सरकारने अर्थसंकल्पात विशेष तरतूद केली आहे .जागतिक महिला दिनानिमित्त पंजाब सरकारने महिलांना हि भेट दिली आहे .


८.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वर्चुअल कार्यक्रमाद्वारे शिलॉंग मध्ये ७५०० व्या जन औषधी केंद्राचे उद्घाटन केले .North estarn indira gandhi regional institute of health येथील हे जन औषधी केंद्र आहे .






*अंतरराष्ट्रीय -

९.चीनचे विदेशमंत्री वंग यी यांनी भारत व चीनने सीमावाद प्रश्न सोडवण्यासाठी अनुकूल वातावरण तयार करावे असे म्हटले आहे .



१० .आज अंतरराष्ट्रीय महिला दिवस .महिलांनी स्वतःच्या हक्कांसाठी दिलेल्या लढ्याच्या स्मरणार्थ ८ मार्च हा दिवस अंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून साजरा करण्यात येतो.







*काही माहिती हवी असल्यास 'COMMENT BOX '  मध्ये विचारू शकता किवा खाली दिलेल्या मेल आयडीवर संपर्क साधावा ,व दररोज अशाच चालू घडामोडी वाचण्याकरिता  SUBSCRIBE नक्की करा !! 








*संपर्क -sankalponline0@gmail.com

*sankalponlineworks आता  TELEGRAM वरही उपलब्ध 

##Folow us on facebook,telegram&instagram@sankalponlineworks





                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                            


No comments:

Post a Comment