1.महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी इलेल्क्ट्रिक विक्टोरिया ब्ग्गीचे अनावरण केले .मुंबईच्या पर्यटनात याने आणखीनच भर पडणार आहे .घोडागाडी व्यवसायातील जवळपास२५० बेरोजगारांना पुन्हा रोजगार उपलब्ध होणार आहे .
२.पुण्यामध्ये मिसळ तयार करण्याचा विश्वविक्रम करण्यात आला आहे .पुण्यामध्ये शेफ विष्णू मनोहर यांनी सात तासात सात हजार किलोची मिसळ बनवण्याचा विश्वविक्रम केला आहे .या विश्वविक्रमाची नोंद गिनीज बुक ,लिम्का ,गोल्डन बुक ऑफ रेकॉर्ड्स मध्ये नोंद करण्यात येणार आहे .
३.जागतिक महिला आयोगातर्फे आजपासून जागतिक महिला अधिवेशन सुरु करण्यात आले आहे .स्त्री आधार केंद्राच्या मानद अध्यक्ष म्हणून विधान परिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे या अधिवेशनात भारताचे प्रतिनिधित्व करणार आहेत .हे अधिवेशन online आयोजित करण्यात आले आहे .१५ मार्च ते २६ मार्च पर्यंत हे अधिवेशन सुरु राहणार आहे .
४. विजय हजारे एकदिसीय क्रिकेट स्पर्धेत उत्तर प्रदेशच्या संघाला हरवत मुंबई संघाने विजय मिळवला .या स्पर्धेचे चौथ्यांदा मुंबईच्या संघाने विजेतेपद मिळवले .
५.आजपासून सार्वजनिक व प्रादेशिक क्षेत्रातील बँकेच्या कर्मचार्यांनी दोन दिवसाच्या संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे .बँकांच्या होणार्या खाजगीकरणाच्या विरोधात बँक कर्मचारी व अधिकारी हा संप करणार आहेत .
६.भारताची महिला क्रिकेट संघाची कर्णधार मिथाली राज हिने आणखी एका विक्रमाला गवसणी घातली आहे .अंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ७००० रन्स पूर्ण करणारी ती क्रिकेट विश्वातील पहिली महिला क्रिकेटपटू बनली आहे .इंग्लंडची चार्लोट एडवर्ड दुसर्या स्थानी आहे .
७.टोकिओ ऑलिम्पिक स्पर्धेसाठी भारतीय तलवारबाज भवानी देवी पात्र ठरली आहे . .तलवारबाजी या खेळासाठी ऑलिम्पिक स्पर्धेकरता पात्र ठरणारी ती पहिली भारतीय खेळाडू आहे .
८.क्वाड गट तयार करणाऱ्या लशीचे हैद्राबाद मध्ये उत्पादन घेतले जाणार आहे .भारत ,अमेरिका ,जपान व औस्ट्रेलीया या चार देशांनी मिळून क्वाड ची स्थापना केली आहे .हिंद व प्रशांत महासागरामध्ये चीनचा वाढता हस्तक्षेप रोखण्यासाठी क्वाड गट प्रयत्नशील आहे.चीनने कोरोन लसीचा इतर देशांना पुरवठा करण्यासाठी आखलेल्या योजनेला उत्तर म्हणून क्वाड देशांचा हा गट लसींची निर्मिती करणार आहे व या लसींची निर्मिती हैद्राबाद येथे करण्यात येणार आहे .भारत बायोटेक,शांता बायोटेक्निक्स ,इंडिअन इम्युनोलोजीकल्स या व अशा महत्वाच्या लस उत्पादक कंपन्या लस निर्माण करणार आहेत .बायोलोजीक्ल इ या कंपनी सोबत जोन्सन &जॉन्सन या कंपनीने लस निर्मितीबाबत करार केला आहे .या कार्रानुसार ५० कोटी डोसचे उत्पादन घेतले जाणार आहे .
९.spice jet या विमान प्रवास कंपनीने प्रवाशांना २९९ रुपयात कोरोनाची आरटी -पीसीआjeर चाचणी ची सोय उपलब्ध करून दिली आहे .विमानाने प्रवास करण्यापूर्वी कोरोन चाचणी करणे सक्तीचे करण्यात आले आहे .
१०.२३ व २४ मार्च रोजी भारत व पाकिस्तान या दोन देशांच्या सिंधू आयुक्तांची बैठक होणार आहे भारताने लडाखमध्ये अनेक जलविद्युत प्रकल्पांना मंजुरी दिली आहे त्या पार्श्वभूमीवर हि बैठक महत्वपूर्ण आहे .सिंधू जल कराराच्या तरतुदीनुसार दोन्ही देशांच्या आयुक्तांना वर्षातून किमान एकदा क्रमवार भारत व पाकिस्तानमध्ये भेट घेऊन चर्चा करावी लागते .जम्मू व काश्मीर केंद्र शासित प्रदेश केल्यानंतर पहिल्यांदाच हि बैठक होत आहे .
११.सार्वजनिक क्षेत्रामधील १०० पेक्षा जास्त उद्योग ५ लाख कोटी रुपयांमध्ये विकण्यासाठी सरकार तयारी करत आहे .आर्थिक वर्ष २०२१ -२२ मध्ये १ लाख ७५ कोटी रुपये विक्रीतून मिळवण्याचे सरकारचे लक्ष आहे .
दररोज अशाच चालू घडामोडी वाचण्याकरिता SUBSCRIBE नक्की करा !!
*संपर्क -sankalponline0@gmail.com
##Folow us on facebook,telegram&instagram@sankalponlineworks
No comments:
Post a Comment