Tuesday, March 9, 2021

09.03.2021

 1.स्वीझरलँड मध्ये लवकरच सार्वजनिक ठिकाणी महिलांना बुरखाबंदीचा कायदा लवकरच करण्यात येणार आहे .



2.ट्रान्सयुनिअन सिबील या कर्जदारांच्या पतविषयक माहिती ठेवणाऱ्या संस्थेकडे उपलब्ध आकडेवारीनुसार देशातील महिला कर्जदारांच्या संख्येत वाढ होत आहे.मागील सहा वर्षांपासून महिलांचे कर्जा घेण्याचे प्रमाण वाढत आहे .ह्या वाढीचा दर वार्षिक21 %  आहे .


3.पुणे येथील प्रस्तावित साखर संग्रहालयासाठी महाराष्ट्र सरकारने 40 कोटींची तरतूद केल्याची घोषणा अर्थमंत्री अजित पवार यांनी केली आहे .साखर उत्पादनात भारताचा दुसरा क्रमांक लागतो .

hi


4.

लढाऊ विमाने तयार करणारी कंपनी' राफेल ' चे मालक ,व फ्रान्सचे अब्जाधीश उद्योगपती 'ओलिव्हिअर दसा' यांचे एक हेलिकॉप्टर दुर्घटनेत निधन झाले आहे..ते फ्रान्स च्या संसदेचे सदस्य होते.


5.सामाजिक व आर्थिक मागास प्रवर्ग ठरवण्याच्या राज्याच्या हक्कांवर कलम 102 व्या घटना दुरुस्तीमुळे गदा येते का,तसेच इतर मुद्द्यांवर सर्वोच्च न्यायालयाने राज्यांना नोटीस पाठवली आहे.



*संपर्क -sankalponline0@gmail.com

*sankalponlineworks आता  TELEGRAM वरही उपलब्ध 

##Folow us on facebook,telegram&instagram@sankalponlineworks






No comments:

Post a Comment