Saturday, March 20, 2021

20/03/2021चालू घडामोडी

 1.इंधन दर,अर्थात पेट्रोल-डीजल च्या किमतिच दररोज घेतला जाणारा आढावा गेल्या 20 दिवसांपासून बंद करण्यात आला आहे.यामुळे तेल वितरण कंपन्यांना पेट्रोल-डिजेलच्या विक्री वर कंपन्यांना तोटा सहन करवा लागत आहे.


2.खनिज व खान सुधारने विषयिचे विधेयक लोकसभेमधे मंजूर करण्यात आले आहे.केंद्राने जरी खाणीचा लिलाव केला तरी त्याचा महसूल संबंधित राज्यांना मिळणार आहे.

भारतात सुमारे 95%खनिजनिर्मिती होते.


3.ईव्हीएम व मतपत्रिका यावरील राजकीय पक्षांची चिन्हे काढून त्याऐवजी उमेदवाराचे नाव ,वय ,शिक्षण व फोटो अशी माहिती द्यावी असा आदेश राष्ट्रीय निवडणूक आयोगास देण्यात यावा अशी मागणी करणारी एक जनहित याचिका सुप्रीम कोर्टात जाहीर करण्यात आली आहे.


4.गोपनीयता व व्यक्तीगतता धोरणाची अंमलबजावणी करण्यापासून व्हाट्सप ला रोखण्याची मागणी दिल्ली उच्च न्यायालयात केंद्र सरकारने केली आहे.


5.भारताची बॉक्सिंगपटू  निकहत झरीन इस्तंबूल येथे सुरू असलेल्या बास्फोरस बॉक्सिंग स्पर्धेच्या उपांत्य फेरीत दाखल झाली आहे.


6.अमेरिकेचे संरक्षण मंत्री लॉएड ऑस्टिन सध्या भारत दौऱ्यावर आलेले आहेत.या दरम्यान त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. इंडो पॅसिफिक क्षेत्रात शांतता,स्थैर्य आणि भरभराट होण्यासाठी अमेरिकेची भरतासोबत जास्तीत जास्त काम करण्याची इच्छा असल्याचे स्पष्ट केले.ऑस्टिन हे संरक्षणमंत्री म्हणून पहिल्यांदाच भारतात आले होते.


7.अमेरिकन वित्तसंस्था मुडिज ने भारतीय अर्थ व्यवस्थेविषयी अर्थव्यवस्था 2021 मध्ये 12 %वेगाने प्रवास करील असा विश्वास व्यक्त केला आहे.


8.टांझानिया या पूर्व आफ्रिकन देशाची पहिली महिला राष्ट्राध्यक्ष म्हणून सानिया सुलुहू हासान यांनी शपथ घेतली.टांझानियाचे सरन्यायाधीश इब्राहिम जुमावोविंग यांनी त्यांना शपथ दिली.







*काही माहिती हवी असल्यास 'COMMENT BOX '  मध्ये विचारू शकता किवा खाली दिलेल्या मेल आयडीवर संपर्क साधावा ,व दररोज अशाच चालू घडामोडी वाचण्याकरिता  SUBSCRIBE नक्की करा !! 




*संपर्क -sankalponline0@gmail.com

##Folow us on facebook,telegram&instagram@sankalponlineworks





No comments:

Post a Comment