Friday, March 26, 2021

26.03.2021

1 .वाढत्या कोरोना रुग्णाच्या पार्श्वभूमीवर गुजरातमध्ये महाराष्ट्रातून येणाऱ्या नागरिकांकरिता गुजरात सरकारने आर्टिपीसी कोरोना चाचणी करणे बंधनकारक केले आहे.


2.देशभरात  महाराष्ट्र राज्य लसीकरणात प्रथम असल्याचा दावा राज्य सरकारने केला आहे.24मार्चपर्यंत 50 लाख 14 हजार 724 लोकांचे लसीकरण करण्यात आल्याचे राज्याचे म्हणणे आहे .


3.येत्या रविवार म्हणजे 28 मार्च2021 पासून महाराष्ट्र राज्यामध्ये रात्रीच्या संचारबंदी लागू करण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला आहे.


4.महाराष्ट्र राज्याच्या सर्वोच्च पुरस्कार 'महाराष्ट्र भूषण' पुरस्कार जेष्ठ गायिका 'आशा भोसले 'यांना जाहीर झाला आहे.


5.आंतरधर्मीय, आंतरजातीय,परिवर्तनवादी जेष्ठ कार्यकर्ते व 'सुगावा 'या प्रकाशनचे प्रमुख प्रा.विलास वाघ यांचे निधन.


6.सरकारसोबत बोलून बँकांच्या खाजगिकर्णाची प्रक्रिया पुढे नेणार असल्याची  भारतीय रिजर्व बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी भूमिका मांडली.


7.लष्करातील महिला अधिकाऱ्यांच्या कायम स्वरूपाच्या नियुक्तीसाठी घालण्यात आलेल्या शारीरिक फिटनेसच्या अटी एकतर्फी व अतार्किक असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने निरीक्षण नोंदवले आहे.तसेच महिला अधिकाऱ्यांच्या कायमस्वरूपी नियुक्ती बाबत तीन महिन्यात निर्णय घेऊन प्रक्रिया पूर्ण करण्यात यावी असे कोर्टाने सांगितले.


8.टोकियो  ओलिम्पिकच्या ज्योत पेटवून ऑलिंपिक ज्योतीचा प्रवास  प्रारंभ झाला.


9.अस्त्रझेनिकाची लस अतिशय परिणामकारी असल्याचा कंपनीने दावा केला. आहे.







दररोज अशाच चालू घडामोडी वाचण्याकरिता  SUBSCRIBE नक्की करा !! 



 

##Folow us on facebook,telegram&instagram@sankalponlineworks














No comments:

Post a Comment