Tuesday, March 23, 2021

चालू घडामोडी 23.03.2021

1.मराठा महासंघाचे संस्थापक अध्यक्ष अण्णासाहेब पाटील यांची आज पुण्यतिथी.

2.आज जागतिक हवामान दिन .हवामान विभागाणे आज क्लायमेट डेटा सर्विस पोर्टल लाँच केले.डेटा सर्विस पोर्टलचे उदघाटन अर्थ सायन्सचे सचिव डॉ. माधवन नायर राजीवन यांच्या हस्ते झाले.

3.देशभरामध्ये हवामान विभाग 200 कृषी हवामान स्वयंचलित पर्जन्य मापन केंद्र सुरू करणार आहे.शेतकऱ्यांना त्यांच्या भागातील हवामान,पाणी,जमीन याविषयीची माहिती मिळावी हा यामागील उद्देश आहे .महाराष्ट्रातील 10 जिल्ह्यांमध्ये ही केंद्रे सुरू करण्यात येणार आहेत.

4.इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाऊंट ऑफ इंडिया (सीए) च्या फायनल परीक्षेत डोंबिवलीच्या वैभव हरिहरन हा देशात दुसरा.

5.प्रसिध्द सिनेलेखक सागर सरहद्दी  यांचे निधन झाले आहे.कभी कभी,सिलसिला,नुरी, बाजार ही त्यांनी सिनेलेखन केलेले सिनेमे.गंगासागर तलवार हे त्यांचे मूळ नाव.

6.काल झालेल्या जागतिक जलदिनी 'कॅच द रेन' या मोहिमेचे   पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले.

7.कोविशिल्ड लसीच्या दोन डोस मधील अंतर 28 दिवसंवरून वाढवून सहा ते आठ आठवडे करण्याच्या सूचना केंद्र सरकारने सर्व राज्य सरकारांना दिल्या आहेत.

8.2020चा गांधी शांतता पुरस्कार बांगलादेशचे राष्ट्रपिता शेख मुजबिर रहमान यांना जाहीर झाला आहे.तसेच 2019 चा गांधी शांतता पुरस्कार ओमानचे दिवंगत सुलतान काबूस बिन सैद अल सैद यांना जाहीर झाला आहे.

9.दिल्लीत राज्यपालांचे अधिकार वाढवणारे 'राष्ट्रीय राजधानी राज्यक्षेत्र शासन (सुधारणा)विधेयक 2021' लोकसभेत मंजूर केले आहे.

10.67 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची कल दिल्ली येथे घोषणा करण्यात आली.'आंनदी गोपाळ' हा चित्रपट सर्वोत्कृष्ट सामाजिक चित्रपट ठरला आहे. त्यापाठोपाठ 'बार्डो 'हा सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट ठरला आहे.मल्ल्याळम चित्रपट 'मरक्कर' -'लायन ऑफ द अरेबियन सी 'हा सर्वोत्कृष्ट राष्ट्रीय चित्रपट ठरला आहे.जलीकट्टू या मल्ल्याळम चित्रपटाला सर्वोत्कृष्ट छायांकन पुरस्कार भेटला आहे.
सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट म्हणून 'छिचोरे' या चित्रपटास पुरस्कार जाहीर झाला आहे.
सर्वोत्कृष्ट अभिनेता हा पुरस्कार मनोज वाजपेयी व धनुष याना विभागून देण्यात आला आहे.
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री पुरस्कार हा कंगना रणावत हिला जाहीर झाला आहे(मनकर्णिका,व पंगा या चित्रपटांसाठी)
सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक पुरस्कार 'तेरी मिट्टी' या केसरी चित्रपटामधील गाण्यासाठी बी .प्राक याला जाहीर झाला आहे.
सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका पुरस्कार बार्डो या चित्रपटतील रान पेटलं या गाण्याकरिता सावनी रवींद्र ला जाहीर झाला आहे.
सर्वोत्कृष्ट बाल चित्रपट पुरस्कार कस्तुरी या चित्रपटास जाहीर झाला आहे.
सामाजिक चित्रपटांवर भाष्य करणारा सर्वोत्कृष्ट चित्रपट म्हणून 'लाडली' या हिंदी चित्रपटाचा सन्मान करण्यात आला आहे.



दररोज अशाच चालू घडामोडी वाचण्याकरिता  SUBSCRIBE नक्की करा !! 



 

##Folow us on facebook,telegram&instagram@sankalponlineworks










No comments:

Post a Comment