Tuesday, March 23, 2021

चालू घडामोडी 24.03.2021

 1.जागतिक क्षयरोग दिन.24 मार्च 1882 रोजी डॉ.रॉबर्ट कॉक यांनी क्षयरोग (tb)च्या जिवाणूंचा  शोध लावला व त्याचा प्रबंध जागतिक शास्त्रज्ञांच्या परिषदेमध्ये सादर केला.या प्रबंधास 24 मार्च रोजी मान्यता मिळाली व जागतिक क्षयरोग दिन म्हणून  24 मार्चला सुरुवात झाली .


2.येत्या 1 एप्रिलपासून देशातील 45 वर्षांवरील सगळ्यांना कोरोना प्रतिबंधक लस घेता येणार आहे.केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे .


3.आयसीसी महिला t 20 क्रिकेट रँकिंगमध्ये भारतीय महिला क्रिकेटपटू शेफाली वर्मा प्रथम स्थानी.


4.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर  सहा महिन्यांमधील कर्ज हप्त्यांवर आकरण्यात येणारे व्याज व दंड व्याज माफ करण्याबाबत गजेंद्र सिंग शर्मा यांनी दाखल केलेल्या याचिकेवर निकाल देताना सहा महिन्यांच्या काळातील 2 कोटी रुपयांच्या आतील कर्जदारांच्या कर्जावरील चक्रवाढ व्याज व व्याज दंड आकारू नयेत असा आदेश न्यायालयाने दिला आहे.


5.बँकांच्या थकीत कर्जाच्या रकमेमध्ये घट झाल्याची माहिती राज्यसभेमध्ये बोलताना अर्थ राज्यमंत्री अनुराग ठाकूर यांनी दिली आहे.2018 मध्ये बँकांकडे 8.96लाख कोटी रुपयांची थकीत कर्ज रक्कम होती डिसेंबर 2020 मध्ये त्यात घट होऊन 5.7लाख कोटी झाली आहे.


6.पीएफवरील वार्षिक करमुक्त व्याज मिळवण्याची मर्यादा केंद्र सरकारने वाढून पाच लाख रुपये केली आहे.पेंशन फंडमधील कर्मचाऱ्यांनाही योजना लागू असेल.


7.दिल्ली येथे सुरू असलेल्या नेमबाजी विश्वचषक स्पर्धेमध्ये स्किट मिश्र सांघिक गटामध्ये भारताच्या गनेमत सेखा आणि अंगड वीर सिंग बाजवा या जोडीने सुवर्णपदक पटकाविले.


8.डिजीसीय ने नव्याने आदेश काढत आंतरराष्ट्रीय प्रवासी विमान वाहतुकीवर 30 एप्रिल पर्यंत स्थगिती वाढवली आहे.


9.कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे जर्मन सरकारने लोकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.जर्मनीच्या चान्सलर अँजेला मर्केल यांनी लॉकडाऊन 18 एप्रिल पर्यंत वाढवला असल्याची घोषणा केली.

No comments:

Post a Comment