Sunday, March 21, 2021

21.03.2021 चालू घडामोडी

 1.महाराष्ट्रातील वाढत्या कोरोनाच्या रुग्णसंख्येचा विचार करता हाफकीन या लस संशोधन संस्थेने लस निर्मिती करता पुढाकार घ्यावा अशी सूचना महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे.हाफकीन इन्स्टिट्यूट ने याआधी अनेक आजरांवर संशोधन करून औषधे निर्माण केली आहेत.


2.21 मार्च जागतिक वनदीन .या जागतिक वनदीनाचे औचित्य साधत महाराष्ट्र सरकार पहिल्यांदाच राज्यातील वन्य प्राण्यांकरिता संवर्धनासाठी 2021 ते 2031 या कालावधीसाठी वन्यजीव आराखडा तयार करणार आहे .सामान्य नावरीकांमध्ये वन्यजीवांबाबत जनजागृती व वन्यजीव संरक्षण व संवर्धन हा या वन्यजीव आराखड्याचा उद्देश असणार आहे.


3.राज्य गुन्हे अन्वेषण विभागाद्वारे प्रकाशित करण्यात आलेल्या क्राईम इन महाराष्ट्र 2019 या अहवालानुसार महाराष्टात महिला अत्याचारामध्ये वाढ झाल्याचे स्पष्ट झाले आहे.



4.राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह म्हणून दत्तात्रय होसबळे यांची निवड करण्यात आली आहे.राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बंगळुरू येथे आयोजित अखिल भारतीय प्रतिनिधी सभेत त्यांची निवड करण्यात आली.होबळे हे 2009 पासून सहसारकार्यवाह म्हणून कार्यरत होते.या अहवालानुसार महाराष्ट्र गुन्हेगारीत देशामध्ये आठव्या स्थानी आहे.


5.मँगोनेट या निर्यातीसाठी आवश्यक वेबसाईट वरती देशभरातून 33 हजार 513 आमराई ची नोंद झाली आहे.यामध्ये हापूस व केशर या आंब्याच्या दोनच प्रकारांच्या आमराया जास्त आहेत.11 हजार 470 आमरायच्या नोंदनिमुळे महाराष्ट्र यामध्ये पहिल्या स्थानी आहे.



6.महिला अत्याचाराच्या वाढत्या घटना रोखण्यासाठी रेल्वे प्रशासनाने नवे दिशानिर्देश जारी केले आहेत.त्यानुसार आता रेल्वे पोलिसांना मागील पाच वर्षामधील रेल्वे स्थानकांमध्ये वावरणाऱ्या गुन्हेगार व त्यांच्या गुन्ह्यांचा डेटाबेस तयार करावा लागणार आहे.



7.देशभरातील कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पाश्वभूमीवर केंद्रीय गृहसचिव अजय भल्ला यांनी राज्यांना कोरोना नियमांची सक्तीने अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले आहेत .


8.भारत विरुद्ध इंग्लंड या दोन देशांच्या संघा दरम्यान सुरू असलेल्या पाच t20 आंतरराष्ट्रीय सामन्यांच्या मालिकेत भारताने इंग्लंडचा 3-2 ने पराभव केला आहे .कॅप्टन म्हणून विराट कोहलीने या सामन्यात आणखीन एक विक्रम केला आहे .विराट कोहली हा कॅप्टन म्हणून t20 इंटरनॅशनल मध्ये सर्वाधिक अर्धशतक करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत अववल स्थानी पोहोचला .(12 अर्धशतक)


9.फ्रान्समध्ये एस्राझिनेकाची लस घेण्यासाठी वयाच्या बंधनाची अट ठेवण्यात आली आहे.फ्रान्समध्ये 55 व त्यापेक्षा जास्त वयोगटातील व्यक्तींनाच लस देण्यात येणार आहे .


10.ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी सेंट थॉमस रुग्णालयातील कोरोना लसीकरण केंद्रावर एस्राझिनेकाची कोरोना प्रतिबंधक लस घेतली.




No comments:

Post a Comment