Wednesday, April 21, 2021

21 एप्रिल 2021 चालू घडामोडी

 ##इतिहासात डोकावताना##-

1.१६५९-रामदास स्वामी व छत्रपती शिवाजी महाराज यांची भेट.

2.१७२०-पहिले  बाजीराव पेशवे पेशवेपदावर विराजमान.






***आज चैत्र शुद्ध नवमी ,श्री विष्णूचे अवतार प्रभू श्रीराम चंद्राचा जन्म राम नवमी .राम नवमीचा उत्सव संपूर्ण जगभरात साजरा केला जातो.


1.कवी प्रकाश खरात यांचे कोरोनामुळे निधन.निर्मितीचा प्रदेश,पार्थिव-अपार्थिव हे त्यांचे काव्यसंग्रह.

2.सिरम इन्स्टिट्यूट ने कोविशिल्ड हे लसीचे ट्रेडमार्क वापरण्यास विरोध करणारी क्यूटेक्स बायोटेक कंपनीची याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळून लावली.

3.राज्याच्या अन्न व औषध प्रशासन आयुक्त अभिमन्यू काळे यांच्याकडून पदाचा कार्यभार काढून परिमल सिंग यांच्याकडे राज्य सरकारने सोपवला आहे.

4.कैद्यांना होणाऱ्या कोरोनाच्या बाधेत वाढ झाल्याने कैदी व जेल प्रशास्नानामध्ये वाढणाऱ्या कोरोनाच्या प्रभावाला रोखण्यासाठी राज्य सरकारने केलेल्या उपाययोजना यांचा तपशील सादर करण्याचे उच्च न्यायालयाने आदेश दिले होते त्यावर उत्तर देताना कनिष्ठ न्यायालय आरोपींना पॅरोल व तात्पुरता जमीन देण्यास नकार देत असल्याने कारागृहामधली कोरोनाच्या पराभवने गभिर स्थिती बनल्याचे राज्य सरकारने म्हटले आहे.


5.दहावीची परीक्षा रद्द करण्याचा महत्वाचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.वाढत्या कोरोना रुग्ण संख्येच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे

6.मराठी चित्रपट सृष्टीतील जेष्ठ अभिनेते किशोर नादल्सकर यांचे कोरोनाने निधन..



7.लसीकरणाची मोहीम प्रभावीपणे राबविण्यात येण्यासाठी राज्य सरकार परदेशातून लस आयात करण्यासाठी पाठपुरावा करण्यात येण्या बाबतचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे.


8.राज्य सरकारच्या मुद्रांक शुल्क विभागाने 31 डिसेंबर2020 पूर्वी मुद्रांक शुल्क भरलेल्या नागरिकांना 31 एप्रिल पर्यंत दस्त नोंदणी करण्यासाठी मुदत वाढवून दिली आहे.


9.सहायक प्रोफेसरची पात्रता निर्धारित करणारी नेटची परीक्षा दोन मे रोजी होणार होती मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमी वर परीक्षा स्थगित केली आहे.


10.लस निर्मितीसाठी आवश्यक कच्चा माल अमेरिका पुरवणार.






रोज अशाच चालू घडामोडी वाचण्याकरिता  SUBSCRIBE नक्की करा !! 



 

##Folow us on facebook,telegram&instagram@sankalponlineworks

Tuesday, April 20, 2021

चालू घडामोडी 20 एप्रिल 2021


1.शिक्षण क्षेत्रात आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्या शिक्षण सेवेस घेऊन जानारे ग्लोबल टीचर अवॉर्ड ने सन्मानित शिक्षक रणजितसिंह डीसले सर यांच्या नावाने इटली सरकार इटलीतील विद्यार्थ्यांना 400 युरो म्हणजे भारतीय चलनात 36000 रुपये  शिष्यवृत्ती देणार आहे.डीसले सर हे सोलापूर जिल्हा परिषदेत शिक्षक आहेत ,2020 मध्ये त्यांचा ग्लोबल टीचर अवॉर्ड ने सन्मान करण्यात आला आहे.


2.मराठी चित्रपट दिगदर्शिका सुमित्रा भावे यांचे निधन.


3.ऑक्सिजन ची वाहतूक करणाऱ्या  वाहनास रुग्णवाहिकेचा दर्जा देण्याचा राज्य सरकारने निर्णय घेतला आहे.या नियमाची राज्यात अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे.


4.18 वर्षांवरील सर्वाचे लसीकरण करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.1 मे पासून या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.


5.देशी दारूच्या घरपोच सुविधेस राज्य शासनाच्या उत्पादन व शुल्क विभागाने परवानगी दिली आहे.


6.राज्यामध्ये वाढत्या कोरोना रुग्ण संख्येच्या पार्श्वभूमीवर कोरोनवर प्रभावी ठरणाऱ्या रेमडेसीविर या औषधांचा मोठ्या प्रमाणात तुटवडा आहे याची उच्च न्यायालयाने देखील दखल घेतली आहे,व केंद्र सरकारने राज्य सरकारला रेमडेसीविर च्या वाटपासाठी कोणते निकष घालून दिले आहेत याची माहिती देण्याचे निर्देश दिले आहेत.



7.केंद्र सरकारने भारत बायोटेक व सिरम इन्स्टिट्यूट या लस उत्पादन करणाऱ्या कंपन्यांना 4500 कोटी रुपयांचे अर्थ सहाय केले आहे.


8.सोन्याच्या आयातीत मागील वर्षी 22.58 टक्क्यांची वाढ  नोंदवण्यात आली आहे.चांदीच्या आयतीत  घट.


9.केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांच्या हस्ते हिंदुस्थान एरोनॉटिकस लिमिटेड या कंपनीने देशाच्या नौदलासाठी तयार केलेल्या 6 हेलिकॉप्टर चे अनावरण केले.एकूण 16 हेलिकॉप्टर बनवण्यात येणार आहेत.


10.दिल्ली मध्ये कालपासून सहा दिवसांची ताळेबंदी लागू करण्यात आली आहे.वाढत्या कोरोना रुग्ण संख्ये मुळे दिल्ली सरकारने हा निर्णय घेतला आहे.


11.हॉंगकॉंग सरकारने भारत,पाकिस्तान व फिलिपिन्स या देशातून येणाऱ्या लोकांसाठी 10 दिवसांची प्रवासबंदी लागू केली आहे,कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतला आहे.


12.इस्त्रायल या देशाध्ये सार्वजनिक ठिकाणी  मास्क वापरण्यास असणारी सक्ती मागे घेण्यात आली आहे.कोरोनामुक्त झाल्याचा दावा इस्रायलने केला आहे.इस्रायलने वेगाने नागरिकांचे लसीकरणाच्या मोहीमा राबवल्या होत्या.


13.अमेरिकन अंतराळ संशोधन संस्था नासाने लाल ग्रह असलेल्या मंगळ ग्रहावर हेलिकॉप्टर चे  उड्डाण करण्याचा  यशस्वी प्रयोग केला आहे.परग्रहावर हेलिकॉप्टर उड्डाण करण्याची ही नासाची पहिलीच वेळ आहे.








रोज अशाच चालू घडामोडी वाचण्याकरिता  SUBSCRIBE नक्की करा !! 



 

##Folow us on facebook,telegram&instagram@sankalponlineworks






Monday, April 19, 2021

चालू घडामोडी 19 एप्रिल

 1.राज्यातील वैद्यकीय वापरासाठी आवश्यक ऑक्सिजन ची कमतरता दूर करण्यासाठी रेलवे ऑक्सिजन एक्सप्रेस सुरू करणार आहे.पहिली ऑक्सिजन एक्सप्रेस ही विशाखापट्टणम येथून ,दहा टँकरद्वारे ऑक्सिजन घेऊन महाराष्टात दाखल होणार आहे.


2.शेतकऱ्यांकडील 45 हजार कोटी रुपयांची थकीत वीजबिल थकबाकीत 30 हजार कोटी रुपयांची सूट मिळणार आहे.ही राज्य शासनाची कृषी वीजबिल धोरण योजना आहे.


3.राज्य शासनाने महाराष्ट्र लोकसेवा आयोग MPSC,आयोगाकडे रिक्त पदांच्या मागणीचे पत्र सरकारने न पाठवल्यामुळे यंदा mpsc च्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले नाही त्यामुळे परिक्षे बाबत संभ्रम कायम आहे.


4.जेष्ठ सनदी अधिकारी  अच्युत गोखले यांचे निधन.


5.गेल्या वर्षभरात राज्यातील 3 हजार कैद्यांना कोरोनाची लागण झाली आहे.राज्यातील कारागृहांमध्ये क्षमतेपेक्षा जास्त कैदी आहेत.


6.माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून कोरोनाशी सामना करण्यासाठी लसीकरणाचा वेग वाढवण्याची महत्वाचे  आहे सोबतच लसीच्या पुरवठ्याला चालना देण्यासाठी  एड्सच्या औषधप्रमाणे त्याला परवाना अनिवार्य करण्याची मागणी केलीं आहे.


7.,नीती आयोगाचे उपाध्यक्ष राजीव कुमार यांनी गरज भासेल तेव्हा सरकार ,आर्थिक उपाययोजना करेल असे म्हटले आहे.


8.जगातील सर्वात वयोवृद्ध असणाऱ्या भारतीय 119 वर्षांच्या बचन कोर यांचे निधन झाले आहे.


9.एप्रिल मध्ये होणारी jee ची परीक्षा कोरोनाच्या वाढत्या प्रभावामुळे पुढे ढकलण्याचा nta ने निर्णय घेतला आहे.




रोज अशाच चालू घडामोडी वाचण्याकरिता  SUBSCRIBE नक्की करा !! 



 

##Folow us on facebook,telegram&instagram@sankalponlineworks




Saturday, April 17, 2021

१८ एप्रिल २०२१ चालू घडामोडी


###इतिहासात डोकावताना -

1.*१७२० -छत्रपती शाहू महाराजांकडून पहिले पेशवे बाजीराव भट यांना पेशवाई ची वस्त्रे मिळाली .

२.*ब्रिटीश अधिकारी र्यांड चा खून  करणारे क्रांतिकारक दामोदर चाफेकर यांना फाशी देण्यात आले.

३.*१९३०-नियोजित चितगाव कटानुसार क्रांतिकारकांनी चितगाव येथील शस्त्रागार लुटले.

*जन्म-

*१८५८-भारतरत्न महर्षी धोंडो केशव कर्वे .

*१९५७-मुकेश अंबानी 


*मृत्यू-

*१८५९-क्रांतिकारक तात्या टोपे.

*१९७२-कायदेपंडित भारतरत्न पांडुरंग वामन काणे .

*१९९५-पंचांगकर्ते लक्ष्मन  दाते . 



*चालू घडामोडी 




 १.रेमडेसिवीर या कोरोनावर प्रभावी ठरणाऱ्या औषधाची निर्मिती करणाऱ्या कंपन्यांना केंद्राने केलेल्या निर्देशांमुळे या औषधाच्या किमतीमध्ये घट झाली आहे .

२.आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केंद्र सरकारकडे रेलेवेद्वारे ऑक्सिजनच्या वाहतुकीला परवानगी देण्याची व लसीचे प्रमाण वाढवून देण्याची मागणी  केली आहे.

३.प्रसिद्ध लेखिका व बालसाहित्यिक शकुंतला फडणवीस यांचे निधन.

४.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कुंभमेळा प्रतिकात्मकरित्या साजरा करण्यात यावा या  केलेल्या आवाहना नंतर कुंभ मेळा समाप्तीची घोषणा जुना आखाड्याच्या महंतानी  केली आहे .

५.पद्मश्री पुरस्कार विजेते लोकप्रिय तमिळ अभिनेते विनोद यांचे निधन.

6.2028 मध्ये लॉस एंजलीस येथे होणार असलेल्या ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेकरिता भारतीय पुरुष व महिला क्रिकेट संघ सहभागी होणार असल्याचे बीबीसीआय (भारतीय क्रिकेट नियामक मंडळ )ने मान्य केले आहे.

७. रणजी क्रिकेट स्पर्धेला डिसेंबर पासून सुरुवात होणार आहे.

८.आशिआइ वेट लिफ्टिंग स्पर्धेमध्ये भारताच्या मीराबाई चानुने कांस्य  पदकाची कमी केली आहे.

९.वरिष्ठ गटातील आशिआइ अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेमध्ये भारताच्या रवी कुमारने सलग दुसर्या वर्षी सुवर्ण पदक कमावले .बजरंग पुनियाला रौप्य ,कर्ण सत्यवर्त ,नरसिंह यादवला कांस्य पदक .

१०.प्रो कब्बडी लीग स्पर्धेचे प्रक्षेपणाचे  हक्क स्टार स्पोर्ट कडे  आले आहेत .






रोज अशाच चालू घडामोडी वाचण्याकरिता  SUBSCRIBE नक्की करा !! 



 

##Folow us on facebook,telegram&instagram@sankalponlineworks



चालू घडामोडी 17 एप्रिल 2021

 ###इतिहासात डोकावताना-

*१९४६-सिरियाने फ्रांसकडून स्वातंत्र्य मिळवले.

*१९७०-अपोलो-13 या चांद्र यानातून गेलेले अंतराळवीर पृथ्वीवर सुरक्षित पोहचले.

*१९७१-पाकिस्तान देशाचे विभाजन होऊन बांगलादेश देशाची निर्मिती.



*जन्म-

*१९१६-सिमिराओ भांडर्नयके (श्रीलंकेच्या पहिल्या व जगातील पहिल्या महिला पंतप्रधान)


*मृत्यू-

*सर्वपल्ली राधाकृष्ण (भारततिय राष्ट्रपती)



1.मराठीमधील साहित्याचा कन्नड भाषेत अनुवाद करणार जेष्ठ अनुवादक विरुपक्ष कुलकर्णी यांचे निधन.


2.सीबीआय चे माजी संचालक रणजित सिंन्हा यांचे निधन.


3.सर्वोच्च न्यायालय महिला वकिलांच्या संघटनेने दाखल केलेल्या ,न्यायपालिकेमध्ये महिलांची संख्या वाढण्याबाबत याचिकेवर सुनावणी झाली या दरम्यान देशात आता महिला सरन्यायाधीश बनण्याची वेळ आली आहे असे सरन्यायाधीश शरद बोबडे यांनी वक्तव्य केले आहे.


4.पंजाब नॅशनल बँक घोटाळा प्रकरणी फरार आरोपी निरव मोदीचे प्रत्यार्पण करण्यास इंग्लंडच्या गृह मंत्र्यांनी मंजुरी दिली आहे.


5.स्वतःचे ऑक्सिजन प्रकल्प उभारण्यात देशातील 100 रुग्णालयांना केंद्र सरकार पिएम  केअर फंडमधून निधी देणार आहे.


6.एल आयसिने कर्मचाऱ्यांना वेतनवाढ देण्याचे ठरवले आहे 16 टक्के वेतनवाढ व 5 दिवसांचा आठवडा होणार आहे.


7.मॉस्को येथील आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी विदेशी भाषेतील सर्वोत्कृष्ट चित्रपट म्हणून पगल्या या मराठी चित्रपटाची निवड करण्यात आली.


8.ओलिम्पिकच्या पुढे ढकलण्यात आलेल्या स्पर्धा येत्या जुलै महिन्यात नियोजित कार्यक्रमनुसारच होणार असल्याचे 

आश्वासन ऑलिम्पिक आयोजन समितीने दिले आहे.


9.अमेरिकेने लस निर्मिति करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या कच्च्या मालाच्या निर्यातीवर घातलेली बंदी उठवण्याची विनंती अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांना केली आहे.




रोज अशाच चालू घडामोडी वाचण्याकरिता  SUBSCRIBE नक्की करा !! 



 

##Folow us on facebook,telegram&instagram@sankalponlineworks






Thursday, April 15, 2021

चालू घडामोडी 15 एप्रिल 2021

 ##इतिहासात डोकावताना-

1.1895-रायगड येथे लोकमान्य टिळक यांच्या हस्ते पहिल्या सार्वजनिक शिव जयंती उत्सवास सुरुवात.

2.1912-कधीही न बुडणार जहाज अशी ख्याती असणारे जहाज टायटॅनिक हे जहाज उत्तर अटलांटिक महासागरात बुडाले.

3.1951-आचार्य विनोबा भावे आंध्र प्रदेशातील पोचमपल्ली येथे' भूदान 'चळवळीची सुरुवात केली.

4.1995-जागतिक व्यापार संघटना (wto)ची स्थापना.

*जन्म-

*१४५२-लिओनार्दो द वीची -प्रसिद्ध चित्रकार .

*१४६९-गुरू नानक(शीख धर्मगुरू)

*१९३२-सुरेश भट(मराठी गझलकार, कवी)


*मृत्यू-

*१७९४-मोरोपंत(पंडित कवी)

*१८६५-अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणून अब्राहम लिंकन यांनी शपथ घेतली.

*१९९५-मध्यभारत राज्याचे पहिले मुख्यमंत्री पंडित लीलाधर जोशी.



*चालू घडामोडी


1.केंद्र सरकारने रस्ते विकास करण्यासाठी महाराष्ट्र राज्याच्या सर्वाधिक 682 कोटी रुपयांचा निधी जाहीर केला आहे.विविध राज्यांमधील रस्त्यांच्या विकासासाठी केंद्र सरकारने देशातील राज्य व केंद्र शासित प्रदेशासाठी मिळून 6934 कोटी रुपयांचा निधी जाहीर केला आहे. 



2.भारतीय हवाई वाहतूक कंपनी एअर इंडिया च्या विक्रीसाठी भारत सरकारने निविदा प्रस्ताव मागवण्यास सुरुवात केली आहे.


3.शुद्धतेचे प्रमाण असणारे हॉलमार्क येत्या 1 जून पासून देशभरातील सोन्याच्या दागिन्यांसाठी बंधनकारक असणार आहे .केंद्र सरकार नोव्हेंबर 2019 मध्ये याबाबत घोषणा केली होती.


4.म्युच्युअल फंडाच्या गंगाजळी मध्ये गेल्या आर्थिक वर्ष 2020-21 मध्ये 41 टक्क्यांनी वाढ नोंदवण्यात आली आहे.


5.हिथ स्ट्रीक या झिम्बाब्वे क्रिकेट संघाच्या माजी क्रिकेटपटू वर icc ने 8 वर्षांची बंदी घातली आहे.icc ने स्ट्रिकवर भ्रष्टाचार प्रतिबंधक नियमाचे उल्लंघन केल्याचा आरोप ठेवला होता,स्ट्रिकनेही स्वतःची चूक मेनी केली आहे.स्ट्रीक हा ipl मधील क्रिकेट संघांचा प्रशिक्षक राहिला आहे.


6.भारत हाच रशियाचा खरा सहकारी असल्याचे रशियाने स्पष्ट केले आहे.पाकिस्तान सोबत आपले मर्यादित संबंध असल्याचे स्पष्ट केले.


7.मेडिकलची परीक्षा पुढे ढकलण्याचा राज्य सरकारने निर्णय घेतला आहे.


8.श्रीलंकन सरकारने 11 इस्लामिक जहाल संघटनांवर्ती श्रीलंकेमध्ये बंदी घालण्यात आली आहे.


9.TLP(तेहरिक ए लब्बइक)या पाकिस्तान मधील कट्टरता वादि राजकीय पक्षावर दहशतवादी कायद्या नुसार बंदी घालण्याचा पाकिस्तान सरकारने निर्णय घेतला आहे.


10.पाकिस्तान चा क्रिकेटपटू बाबर आझम हा icc च्या एकदिवसीय क्रिकेट क्रमवारीत प्रथम स्थानी पोहचला आहे.त्याने विराट कोहलीला मागे टाकले आहे.विराट कोहलीला साडेतीन वर्षात पहिल्यांदाच आपले प्रथम स्थान गमवावे लागले आहे.





रोज अशाच चालू घडामोडी वाचण्याकरिता  SUBSCRIBE नक्की करा !! 



 

##Folow us on facebook,telegram&instagram@sankalponlineworks




Wednesday, April 14, 2021

चालू घडामोडी १४ एप्रिल २०२१

##इतिहासात डोकावताना -

*१६६९ -शिखांचे दहावे गुरु गुरु गोविंदसिंग यांनी खालसा 'खाल्साची' स्थापना केली .

*१७३६-चिमाजी अप्पा यांनी जंजिर्याच्या सिद्दीचा पराभव केला .

*१९९४-भारताने GAT करारास मान्यता दिली .

*जन्म-

*१८९१-घटनाकार भारतरत्न डॉ .बाबासाहेब आंबेडकर 

*१९२२-उस्ताद आली अकबर खा (जागतिक स्तरावरील सरोदवादक )

*१९४३-रामदास फुटणे(वात्र  टीकाकार)

*मृत्यू -

*१९५०-रमण महर्षी(भारतीय तत्वज्ञ )

*१९६२-भारतरत्न सर मोक्षगुंडम विश्वेश्वरइया (भारतीय इंजिनिअर यांच्या स्मृती प्रीत्यर्थ १५ सप्टेंबर हा दिन अभियंता दिन म्हणून पाळला  जातो  )  




*चालू घडामोडी 




 1.महाराष्ट्र राज्यातील वाढत्या कोरोना रुग्ण संख्येमुळे राज्यामध्ये सरकारने संचारबंदी कलम 144 चे आदेश दिले आहेत.त्यानुसार अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व आस्थापना 30 एप्रिल पर्यंत बंद राहणार आहेत.


2.महाराष्ट्रामधील sc,st दुर्बल घटकांस महावीतर द्वारे वीज जोडणी उपलब्ध होण्याच्या दृष्टीने राज्य सरकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर जीवन प्रकाश योजना राबवणार आहे.आज डॉ.आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून या योजनेची सुरुवात होत आहे.


3.कोरोनाच्या वाढत्या प्रभावाला रोखण्यासाठी महाराष्ट्र राज्य सरकारने पुन्हा एकदा ताळेबंदि जाहीर केली आहे,मात्र मागच्या वेळेस ताळेबंदीचा जो गरीब वर्गाला फटका बसला तो बसू नये म्हणून राज्य सरकारने काही घोषणा केल्या आहेत त्या खालीलप्रमाणे-

1. परवानाधारक रिक्षा चालक याना 1500 रुपये.

2.नोंदणीकृत बांधकाम कामगार याना-1500 रुपये

3.जेष्ट नागरिक ,वंचित ,निराधार योजनांच्या लाभार्थ्यांना दोन महिण्याकरिता 1000 रुपये.

4.सात कोटी लोकांना गहू व तांदूळ मोफत.

4.वीरा साथीदार यांचे निधन.ते  विचारवंत,लेखक,विद्रोही कार्येकर्ते होते.ऑस्कर पुर्स्क्रासाठी नामांकन मिळालेला चित्रपट 'कोर्ट'या चित्रपटा मध्ये नारायण कांबळे हि भूमिका त्यांनी साकरली होती .


५.औरंगाबाद इथे डॉ.आबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ इथे संशोधन केंद्र निर्माण केले जात आहे .बाबासाहेबांचे विचार व कार्यावर जागतिक पातळीवर संशोधन व्हावे हा या संशोधन केंद्राच्या स्थापनेमागील उद्देश आहे .


६.देशामधून एकूण होणार्या केळीच्या  निर्यातीत  महाराष्ट्र राज्य प्रथम स्थानी आहे .महाराष्ट्रातील जळगाव हा जिल्हा केळीच्या उत्पादनात नेहमीसारखाच पुढे आहे .२०२० या वर्षामध्ये देशामध्ये एकूण ४७० कोटी र्प्यांच्या केळीची विदेशामध्ये निर्यात करण्यात आली होती .त्यापैकी ३४२ कोटी रुपयांची  केळी हि महाराष्ट्रातील होती.

७.देशामध्ये वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भाव पाहता,परदेशी बनावटिच्या लसीना  आपत्कालीन वापरासाठी परवानगी देण्याचा निर्णय भारत सरकारने घेतला आहे.ब्रिटन,अमेरिका,जपान व युरोपीय महासंघ सदस्य देशामधील आरोग्य नियामक मंडळांनी मान्यता दिलेल्या लसिंना आपत्कालीन मान्यता दिली जाणार आहे .

८.कोरोनाचा वाढता प्रसाराचा परिणाम हा वाहन विक्रीवर झाला आहे .आर्थिक वर्ष २०२०-२१ मध्ये चारचाकी वाहनाच्या विक्रीत २.२४ टक्के तर दुचाकी वाहनाच्या विक्रीत १३.१९ टक्के एवढी घसरण नोंदवण्यात आली आहे.


९.भारताचा गोलंदाज भुवनेश्वर कुमारला आयसीसीने 'प्लेअर ऑफ द मंथ' हा पुरस्कार जाहीर केला आहे.

१०.अमेरिकेने जॉन्सन आणि जॉन्सन कंपनीच्या लशीचा वापर करण्यास स्थगिती दिली आहे .काही व्यक्तींच्या शरीरामध्ये या लसीचा डोस घेतल्याने रक्ताच्या गुठळ्या निर्माण झाल्याने या लसीचा वापर थांबवण्यात आला आहे.


११.रशियाच्या युरी गागारीन हा अंतराळात पाय ठेवणारा पहिला मानव होता .युरी गागारीन यांनी अंतराळामध्ये  केलेल्या भ्रमंतीला ६० वर्षे पूर्ण झाली आहेत याचा हिरक महोत्सव रशियामध्ये साजरा करण्यात आला.१२ एप्रिल १९६१ रोजी रशियाने अवकाशामध्ये पहिल्यांदा मानवास  पाठवले होते .


१२.कोरोना हा दीर्घकाळ राहणार असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेच्या(WHO) प्रमुखांनी म्हटले आहे     .





रोज अशाच चालू घडामोडी वाचण्याकरिता  SUBSCRIBE नक्की करा !! 



 

##Folow us on facebook,telegram&instagram@sankalponlineworks



Tuesday, April 13, 2021

चालू घडामोडी १३ एप्रिल.


##इतिहासात डोकावताना -

*१९२२ -१३ एप्रिल १९२२ रोजी जालियानवाला बाग हत्याकांड घडले.


आज चैत्र शुक्ल प्रतिपदा ,अर्थात गुढी पाडवा .आजपासून मराठी व हिंदू  नवीन वर्षास सुरुवात होते .गुढी पाडवा व मरठी नवीन वर्षाच्या सर्व  वाचकांना हार्दिक शुभेच्या गुढीपाडवा हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त .आजच्या दिवशी सोने खरेदी ,वाहन खरेदी करणे शुभ मानले जाते .मात्र सध्याच्या कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सध्या महाराष्ट्रामध्ये टाळेबंदी सदृश्य परिस्थिती निर्माण होत आहे .तेव्हा प्रत्येकाने स्वतःची व स्वतः सोबत आपल्या घरातील जेष्ठ व्यक्ती व लहान मुलाची विशेष काळजी घ्या.मास्क वापरा, विनाकारण घराबाहेर पडणे टाळा .

*मास्क वापरूया कोरोनाला रोखूया !!




*चालू घडामोडी -


 1.कोरोनाच्या पार्श्वभूमी वर राज्यातील सरकारी कर्मचारी,आणि सरकारी अधिकाऱ्यांच्या बदल्यांवर सरकार लवकरच निर्बंध आणणार आहे.


2.महाराष्ट्र राज्य प्रदेश भाजप सरकार महाराष्ट्र राज्य सरकारला 50 हजार रेमडेसीविर इंजेक्शन ची भेट देणार आहे.ब्रूक फार्मा या दमन येथील औषध निर्माण कंपनीकडून रेमदेसीविर इंजेक्शन खरेदी केले जाणार आहेत.


3.'Bombe Natural History Society' मधील संशोधकांनी अरुणाचल प्रदेशच्या जंगलामध्ये थ्री-ब्रँडेड रोजफिंच'या पक्षाची नोंद केली.हा पक्षी दक्षिण चीनमध्ये आढळतो भारतामध्ये त्याची नोंद होण्याची ही पहिलीच वेळ आहे.

4.'NIA' पोलीस महानिरीक्षक अनिल शुक्ला यांचा पदाचा कार्यकाळ १२ एप्रिल रोजी संपुष्टात आला आहे .'सध्या NIA' मुकेश अंबानी धमकी प्रकरण,व मनसुख हिरेन हत्या प्रकरणाचा तपास करत आहे.

५.गेल्या मार्च महिन्यामध्ये किरकोळ ग्राहक किंमत  निर्देशांकवर आधारित महागाई दर ५.५२ टक्के एवढ्या प्रमाणात नोंदवण्यात आला आहे .गेल्या चार महिन्यामधील हा सर्वात उचांक आहे .

6.देशभरामध्ये वाढत्या कोरोना प्रसाराच्या पार्श्वभूमीवर व्यापारी बँकांनी कर्ज वितरणामध्ये  वाढ  करण्याच्या सूचना रिजर्व बँकेने व्यापारी बँकांना केल्या आहेत .

७.निजामुद्दीन मरकज येथे प्राथर्ना करण्याकरिता येणाऱ्या भाविकांच्या संख्येवर निर्बंध  घालण्यात येण्याबाबत  अशा प्रकारची दिल्ली उच्च न्यायालयामध्ये दिल्ली पोलीस व केंद्र सरकारने मागणी केली होती ,ही मागणी न्यायालये फेटाळली आहे .

८.सुशील चंद्र यांची देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली .सध्याचे निवडणूक आयुक्त 'सुनील अरोरा' यांचा आज कार्यकाळ संपत आहे .

९.'इंडिअन प्रीमियर लीग'(IPL)मध्ये ३५० सिक्स मारणारा 'ख्रिस गेल'हा पहिला फलंदाज बनला आहे .

१०.आयपीएल मध्ये १०० पेक्सह जास्त सामने खेळल्यानंतर कर्णधार बनणारा संजू स्यामसन हा चौथा क्रिकेटपटू ठरला आहे . 


११ .अमेरिकेच्या Securities And Exchange Commision  फेसबुक ने सादर केलेल्या माहितीनुसार  फेसबुक चे  अध्यक्ष मार्क झुकेर्बर्ग यांच्या सुरक्षेकरिता २०२० मध्ये तब्बल १७२ कोटी रुपयांचा खर्च झाल्याचे कंपनीने सांगितले आहे .





रोज अशाच चालू घडामोडी वाचण्याकरिता  SUBSCRIBE नक्की करा !! 



 

##Folow us on facebook,telegram&instagram@sankalponlineworks




Monday, April 12, 2021

दहावी बारावीच्या परीक्षा पुढे ढकलल्या!!





दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी*

   


राज्य सरकारच्या शिक्षण विभागाने वाढत्या कोरोना रुग्ण संख्येच्या पार्श्वभूमी वर दहावी व बारावीच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याची घोषणा केली .


     विद्यार्थ्यांच्या आरोग्यास सर्वप्रथम ठेवत दहावी बारावी च्या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.12 वीची परीक्षा मे महिन्याच्या अखेरीस तर 10 वीची परीक्षा जून महिन्यात घेण्यात येणार आहे.आज मुख्यमंत्री व शालेय शिक्षण विभागदरम्यान आज झालेल्या बैठकिट हा निर्णय घेतला गेला आहे.10 वि व 12 वीचे नवीन वेळापत्रक लवकरच जाहिर करन्यात येणार आहेत.CBSE बोर्डाच्या परीक्षा पुढे ढकलण्याचा सूचना राज्य सरकार CBSE बोर्डाला करणार आहे.







 

##Folow us on facebook,telegram&instagram@sankalponlineworks














Sunday, April 11, 2021

12 एप्रिल २०२१ चालू घडामोडी

 

##इतिहासात डोकावताना -

*१९३५ -प्रभात या प्रोडक्शन चा हिंदी चित्रपट ''चंद्रसेना '' हा चित्रपट प्रदर्शित .

*१९४६ -फ्रांस देशापासून सिरीया प्रांत स्वतंत्र झाला .

*१९६१ -सोविअत संघाचा युरी गागारीन हा अंतराळात जाणारा पहिला मानव बनला .पृथ्वीच्या कक्षेबाहेर युरी गागारीन ने ८९ तास भ्रमण केले .

*१९९८ सी .सुब्रमण्यम यांना भारतरत्न प्रदान करण्यात आला .

*जन्म -

*१९१७ -विनू मंकड -भारतीय क्रिकेटर (विनू मंकड यांनी मंकडिंग हा प्रकार शोधला )

*१९४३-केंद्रीय मंत्री सुमित्रा महाजन 


*मृत्यु -

*१७२०-पहिला पेशवा बाळाजी विश्वनाथ भट  

*२००१-हार्वे बॉल (smily चे जनक )



*चालू घडामोडी 


१.देशभरामध्ये वाढत्या कोरोन रुग्ण संखेच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने रेमडेसिवीर औषधाच्या निर्यातीवर बंदी घातली आहे .

२.इजिप्तमधील संशोधकांनी तेथे केलेल्या संशोधना दरम्यान संशोधकांना 3 हजार वर्षांपूर्वीचे शहर सापडले आहे .

3.अभिनेता सोनू सूद याची पंजाब राज्य सरकारने कोरोना  लसीकरणासाठी ब्रांड अम्ब्यासीडर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे .

४.कोरोनाच्या वाढत्या प्रभावामुळे भारतीय डक विभागाने चार  देशांची  टपाल सेवा बंद केली आहे .विमान उड्डाण रद्द झाल्यामुळे निर्णय .न्यूझिलंड,मंगोलिया,सर्बिया,लक्झेंबर्ग या देशांच्या पार्सल बुकिंग सेवा स्थगित  करण्यात आली आहे .

५.देशभरामध्ये आतापर्यंत १० कोटी लोकांचे लसीकरण  पूर्ण झाल्याची माहिती केंद्रीय आरोग्य विभागाने जाहीर केली आहे .

६.महाराष्ट्र राज्य सरकारने राज्य शिक्षण विभागाद्वारे घेण्यात येणाऱ्या इयत्ता 10 वि बारावीच्या परीक्षा कोरोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती पाहता परिक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे.

७.भारत सरकारने कोरोनाच्या वाढत्या रुग्ण संख्येच्या पार्श्वभूमी वर रशियाच्या स्पुतनिक-व्ही या लसीला भारतात वापर करण्यास मान्यता दिली आहे.





रोज अशाच चालू घडामोडी वाचण्याकरिता  SUBSCRIBE नक्की करा !! 



 

##Folow us on facebook,telegram&instagram@sankalponlineworks









Saturday, April 10, 2021

11 एप्रिल २०२१ चालू घडामोडी

##इतिहासात डोकावताना -

*१९१९ -अंतराष्ट्रीय मजूर संघाची स्थापना (International Labour Organisation )

*१९९२-चित्रपट निर्माते भालजी पेंढारकर यांना दादासाहेब फाळके हा चित्रपट सृष्टीतला मनाचा पुरस्कार जाहीर .

*१९९९-भारताने अग्नी -२ या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली .

 


*जन्म -

१.१८२७ -क्रांतिसूर्य समाजसुधारक महात्मा ज्योतिबा गोविंदराव  फुले .

२.१८६९-कस्तुरबा गांधी (महात्मा गांधीजींच्या पत्नी )

३.१९५१-रोहिणी हट्टंगडी 

*मृत्यू -

१.२०००-शास्त्रज्ञ कमल रणदिवे (यांना कर्करोग या रोगावर त्यांनी केलेल्या संशोधनासाठी त्यांना पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते .)

२.२००९-विष्णू प्रभाकर- (भारतीय नाटककार व लेखक होते)



*चालू घडामोडी -


१.आज क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा  फुले यांची १९४ वी जयंती .१८६९ साली जगातील पहिली शिवजयंती त्यांनी साजरी केली होती .


२.जेष्ठ मराठी साहित्यिक प्राध्यापक तु.शं.कुलकर्णी यांचे निधन.वेदना,ग्रीष्म रेषा,अखेरच्या वळणावर हे त्यांचे प्रसिद्ध कथासंग्रह .


3.महाराष्ट्र राज्याच्या पोलीस महासंचालक पदी संजय पांडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे .


4.महाभारत या प्रसिद्ध ऐतिहासिक मालिकेमध्ये इंद्र देवाची भूमिका साकारणारे सतीश कौल यांचे निधन .जंजीर,याराना,इल्जाम या चित्रपटातही त्यांनी काम केले होते .



5.आशिआइ ऑलिम्पिक पात्रता स्पर्धेमध्ये कुस्ती या क्रीडा प्रकारामध्ये भारताच्या महिला कुस्तीपटू अंशू मलिक व सोनम मलिक टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेकरिता पत्र ठरल्या आहेत .


6.भारतात आता लवकरच सिरम व भारत बायोतेक्च्या लसी नंतर तिसरी लस दाखल होणार   .रशियाची स्पुटनिक -व्ही हि लस  ती तिसरी लस असणार आहे व भारतात तिला येत्या ध दिवसात मान्यता मिळू शकते  असे केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ.हर्षवर्धन यांनी सांगितले  .


7.महाराष्ट्रातील वाढत्या कोरोन रुग्ण संख्येमुळे महाराष्ट्रातून दिल्ली येतेहे येणाऱ्या नागरिकांसाठी दिल्ली सरकारने आरटीपीसीआर कोरोना  चाचणी बंधनकारक केली आहे दिल्ली मध्ये प्रवेश करण्यापूर्वी ७२ तास आधी कोरोना चाचणी केलेली असणे आवश्यक आहे .अन्यथा १४ दिवस क्वरांटाईन रहावे लागेल .  

8.जगातील सर्वात उंच रेलेवे पूल असणारा जम्मू -काश्मीर येथील चिनाब नदीवर बांधण्यात येणाऱ्या पुलाचे बांधकामाचा एक टप्पा पूर्ण .


9.अलिबाबा ' या प्रसिद्ध उद्योगपती 'ज्याक  मा 'यांच्या उद्योगसमूहाला चीनच्या नियामक संस्थेने २.८ अब्ज डॉलरचा दंड केला आहे .








रोज अशाच चालू घडामोडी वाचण्याकरिता  SUBSCRIBE नक्की करा !! 



 

##Folow us on facebook,telegram&instagram@sankalponlineworks






Friday, April 9, 2021

09 april चालू घडामोडी .


*इतिहासात डोकावताना-

1.1953-पहिला 3डी चित्रपट असणारा 'हाऊस ऑफ वॅक्स' प्रदर्शित झाला.या चित्रपटाची निर्मिती वॉर्नर ब्रदर्स यांनी केली होती.


2.1994-पी.एम.भार्गव याना आर.डी. बिर्ला राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.सूक्ष्मजीव शास्त्रामधील त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून त्यांना हा पुरस्कार देण्यात आला.

 

3.1995-लता मंगेशकर याना 'अवधरत्न आणि सूर साहू' या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.हा पुरस्कार उत्तर प्रदेश सरकारद्वारे देण्यात येतो.


*जन्म-

1.1828-गणेश वासुदेव जोशी उर्फ सार्वजनिक काका 

2.1893-बौद्ध धर्म इतिहासकार राहुल संकृत्यायन 

3.1929-सरोद वादक  शरण राणी बखलीवाल.

4.1948- जया बच्चन .जया बच्चन या चित्रपट अभिनेत्री आहेत.


*मृत्यू-

1.1695-.प्रसिद्ध पंडित कवी वामन पंडित यांनी समाधी घेतली.गीतेवरील टीका  यथार्थदीपिका,भतृहरीचा शतककत्रयीचा प्रवास ही त्यांची प्रसिद्ध ग्रंथरचना.


2.2001-डॉ.बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाचे कुलगुरू व दलित सहित्यिक शंकरराव खरात .



 १.डोंबिवली येथील श्रेया शिंदे या विद्यार्थिनीने जागतिक विक्रम केला आहे .तिने बर्फावर ४८ मिनिटे ३८ सेकंद या वेळेमध्ये ९२ योगासनांचे सद्रीक्र्ण केले .भारतीय योग महासंघाने तिच्या या विक्रमाची 'योगा रेकोर्ड बुक 'मध्ये नोंद केली आहे .


२.महाराष्ट्र राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख  यांची मुंबई उच्च न्यायालयाने सीबीआय मार्फत चौकशी करण्याच्या आदेशविरोधात दाखल याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली.उच्च न्यायालयाने दिलेला निर्णय सर्वोच्च न्यायालयाने कायम केला.


3.पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना पुढील वर्षात विना परीक्षा  प्रवेश देण्याचा शिक्षण विभागाने निर्णय घेतला होता ,आता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांच्या प्रगतीपुस्तकावर वरगोन्नत असा शेरा दिला जाणार आहे.

4.महाराष्ट्रामध्ये कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर ऑक्सिजन उत्पादन करणाऱ्या कारखान्यांना अन्न व औषध प्रशासन विभागाने उद्योग क्षेत्राकरिता ऑक्सिजन चे उत्पादन थांबवून केवळ आरोग्य क्षेत्रासाठी ऑक्सिजन उत्पादन करण्याचे आदेश राज्याच्या अन्न व औषध प्रशासन विभागाने दिले आहेत.

5.भारताचे चार नौकानयन पटू टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेसाठी पात्र  ठरले आहेत.भारताच्या चार नौकानयन पटूंनी ओलिम्पिक स्पर्धेसाठी पात्र ठरण्याची ही पहिलीच वेळ आहे.ओमान मध्ये सुरू असलेल्या आशियाई नौकानयन पात्रता पर्धेत भारताच्या विष्णु सारवण ,गणपती चेंगप्पा ,वरून ठक्कर या तिघांनी ओलिम्पिक साठी पात्रता मिळवली.

6.IPL च्या 14 व्या सिजनला आज पासून सुरुवात.मुंबई इंडियन विरुद्ध रॉयल चॅलेंजर बेंगलोर दरम्यान सामना.


7.डॉलरच्या तुलनेत रुपयाच्या मूल्यात घसरण झाली आहे .146 पैशांनी ही घसरण झाली आहे.कोरोनाच्या प्रभावाचा अर्थव्यस्थेवर  परिणाम होत आहे.

 8.'ओडिशा इतिहास'या हरेकृष्ण मेहताब यांच्या ओडिशा राज्याच्या इतिहासबाबत माहिती देणाऱ्या पुस्तकाच्या हिंदी आवृत्तीचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.हरेकृष्ण मेहताब यांचे  स्वातंत्र्य चळवळीत मोठे योगदान होते.त्यांनी 'ओडिशा इतिहास 'हे पुस्तक अहमदनगर येथील कारागृहात कारावास भोगत असताना लिहिले होते.

9.देशामध्ये येत्या 11 एप्रिल ते 14 एप्रिल दरम्यान लस महोत्सव साजरा करण्यात येणार आहे.या लस महोत्सव मध्ये देशामध्ये जास्तीत जास्त लसीकरण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.11 एप्रिल रोजी क्रांतिसूर्य ज्योतिबा फुले यांची जयंती आहे व 14 एप्रिल रोजी महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे,11 ते 14 एप्रिल या दरम्यान या दोन महान व्यक्तीच्या जन्मतिथीचे औचित्य साधत हे विशेष लसीकरणाचे अभियान राबवण्यात येणार आहे.


10.जेष्ठ सिपीआय नेत्या कॉम्रेड सुंदर नवलकर यांचे निधन.


11.प्रिन्स फिलिप यांचं निधन इंग्लंडची दुसरी राणी एलिझाबेथ द्वितीय यांचे ते पती होते.







रोज अशाच चालू घडामोडी वाचण्याकरिता  SUBSCRIBE नक्की करा !! 



 

##Folow us on facebook,telegram&instagram@sankalponlineworks















Thursday, April 8, 2021

08 एप्रिल चालू घडामोडी

 ##इतिहासात डोकावताना-1838 The Great Western  या आगबोटीने अटलांटिक महासागर पार केला .ब्रिस्टॉल येथून निघून हे जहाज 15 दिवसांनी नूयॉर्क ला पोहचले .

अटलांटिक महासागर पार करणारी ही पहिली आगबोट होती.


*.1921-आचार्य विनोबा भावे यांनी वर्धा येथे पवनार आश्रमाची स्थापना केली.


1929-बतुकेश्वर दत्त-व भगतसिंग यांनी ब्रिटिश सरकारच्या  दिल्ली येथील सेंट्रल असेंम्बलीत बॉम्बस्फोट केला .


*1950-भारत -पाकिस्तान यांच्या दरम्यान लियाकत-नेहरू करार झाला.




1.जेष्ठ गिरणी कामगार नेते दत्ता इस्वलकर यांचे निधन.


2राज्य शासनाला उच्च न्यायालयाने .सार्वजनिक ठिकाणी थुंकणार्यांना आळा घालण्यासाठी कठोरपणे पावले उचलण्याचे निर्देश दिले आहेत.बॉम्बे पोलिस कायद्याच्या अंतर्गत सार्वजनिक ठिकाणी थुंकणार्यांना 1200 रुपयाच्या दंडाची तरतूद असताना प्रत्यक्षात मात्र दोनशे रुपयांच्या दंडाची आकारणी होत असल्याचे  निरीक्षण न्यायालयाने नोंदविले.


3.मलेरिया ,पोलिओ या प्रकारच्या रोगावरील लसी जशा केमिस्ट कडे मिळतात त्याप्रमाणे कोरोनाचीही लस मिळायला हवी.केंद्र सरकारने कोरोनाची लस खुल्या बाजारात उपलब्ध करून द्यावी अशी मागणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केली.याबाबतीत त्यांनी एक पत्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठवले आहे.


4.आरटीजीअस व नेफ्ट ची सुविधा बँकेतर  डिजिटल प्लॅटफॉर्म साठी उपलब्ध करून देण्याचा निर्णय आरबीआयने जाहीर केला आहे.ऑनलाइन व्यवहारांची व्यापकता वाढवण्यासाठी हा महत्वाचा निर्णय आहे.आरबीआयने सर्व व्याजदर जैसे थे राहणार असल्याचे स्पष्ट केले.


5.'फोर्ब्स 'या प्रसिद्ध मासिकाने जगातील श्रीमंत व्यक्तींच्या नावाची यादी प्रसिद्ध केली आहे .या यादीनुसार 'अमेझॉन 'कंपनीचे सर्वेसर्वां व उद्योगपती जेफ बेझोज जगतील सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरले आहेत. जेफ बेझोज यांच्या मालमत्तेत मागील वर्षीपेक्षा 64 टक्क्यांनी वाढून 177 अब्ज अमेरिकी डॉलर एवढी आहे. टेस्ला चे संस्थापक एलन मस्क हे जगातील दुसरे श्रीमंत व्यक्ती ठरले आहेत. अमेरिका व चिननंतर भारत हा सर्वात जास्त अब्जाधीश व्यक्ती असणारा तिसरा देश  ठरला आहे.मुकेश अंबानी हे जगातील दहावे व आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरले आहेत .84.5 अब्ज अमेरिकी डॉलर एवढी त्यांची सम्पत्ती आहे.गौतम अदाणी हे भारतातील दुसरे श्रीमंत व्यक्ती ठरले आहेत.


6.ओमान मध्ये झालेल्या स्पर्धेमध्ये भारताची नौकानयन पटू नेत्रा कुमानन हि  टोकियो ऑलिम्पिकसाठी पात्र ठरली आहे.ऑलिम्पिक स्पर्धेसाठी नौकानयन या क्रीडा प्रकारामध्ये पात्र ठरणारी ती पहिली भारतीय महिला बनली आहे.


7.अर्थ व्यवस्थेचा दर 10.5टक्के राहील असा अंदाज आरबीआयने व्यक्त केला आहे. 





रोज अशाच चालू घडामोडी वाचण्याकरिता  SUBSCRIBE नक्की करा !! 



 

##Folow us on facebook,telegram&instagram@sankalponlineworks






Wednesday, April 7, 2021

चालू घडामोडी 07.04.2021

 1.पद्मश्री फातमा झकेरीया यांचे निधन.त्या औरंगाबाद येथील 'मौलाना आझाद एज्युकेशन ट्रस्टच्या अध्यक्षा होत्या.शैक्षणिक क्षेत्रामध्ये त्यांनी केलेल्या कामाची दखल घेत भारत सरकारने 2006 मध्येपद्मश्री पुरस्कार देऊन त्यांचा गौरव केला होता.


2. लेह मध्ये झालेल्या बचाव कार्यदरम्यान बदलापूर येथील जवान सुनील शिंदे शहीद .


3.महाराष्ट्र सरकारने उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे.'राज्य सरकारच्या तपास यंत्रणेची बाजू न ऐकुन घेताच केंद्राच्या तपास यंत्रणेला तपासाचे आदेश देने हे राज्याच्या अधिकारावर गदा आणणे असल्याचे राज्य सरकारचे म्हणणे आहे.


4.महाराष्ट्र राज्यातील नववी आणि अकरावीच्या वर्गातील विद्यार्थ्यांना परिक्षेविना पास करण्याचा राज्याच्या शिक्षण विभागाने निर्णय घेतला आहे .कोरोनाच्या वाढत्या प्रभावामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.


5.कोरोनाच्या वाढत्या रुग्ण संख्येच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्यातील सगळ्या सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलन्या बाबतचा आदेश राज्य सरकारने जाहीर केला आहे ,त्यानुसार येत्या 31 ऑगस्ट पर्यंत पुढे निवडणूक ढकलण्यात येणार आहे.


6.गेल्या 121 वर्षांमधील तिसऱ्यांदा 2021 च्या  मार्च महिन्यात सर्वात जास्त  तापमान नोंदवण्यात आले आहे .


7.2021 मध्ये भारताच्या अर्थव्यवस्थेत 12.5टक्क्यांनी वाढ होण्याचा अंदाज आयएमएफ अर्थात आंतरराष्ट्रीय नाणे निधी ने व्यक्त केला आहे.


8.दिल्ली मध्ये वाढत्या कोरोना रुग्ण संख्येच्या पार्श्वभूमीवर रात्रीची 30 एप्रिल पर्यंत संचार बंदी लागू करण्यात आली आहे.


9.स्पेक्ट्रम (वायुतरंग)वापरण्याचे अधिकार संपादन करणारा रिलायन्स जिओ व भारती एअरटेल या दोन कंपन्यांनि सामंजस्य करार केला आहे.या करररानुसार आंध्र प्रदेश ,दिल्ली ,मुंबई या परिमंडलामधील 800 मेगा हर्ट्झ एअरटेलकडे असणारे वायू तरंग वापरण्याचा जिओला अधिकार मिळणार आहे .यासाठी जिओ एअरटेलला 1497 कोटी रुपयांचा मोबदला देणार आहे.यामुळे भांडवलाची एअरटेलची गरज भागण्यास मदत होणार आहे व जिओला नेटवर्क वाढवण्यास मदत होणार आहे.







रोज अशाच चालू घडामोडी वाचण्याकरिता  SUBSCRIBE नक्की करा !! 



 

##Folow us on facebook,telegram&instagram@sankalponlineworks




Tuesday, April 6, 2021

06.04.2021 चालू घडामोडी

1 .'भारतीय जनता 'पक्षाचा आज स्थापना दिवस.


2.सरन्यायाधीश म्हणून ए. व्ही रमण यांच्या नावाला राष्ट्र पतीकडून मंजुरी 24 एप्रिल ला घेणार शपथ.


3.दिलीप वळसे पाटील आता महाराष्टाचे नवे गृहमंत्री .


4.देशात कोरोनच्या रुग्ण संख्येने उचांक गाठला आहे .आता रुग्णसंख्या 1 लाखाच्या पुढे गेली आहे.


5.25 वर्षांवरील राज्यातील सर्व नागरिकांचे लसीकरण करण्याची परवानगी देण्याची विनंती पत्राद्वारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे.


6.केंद्र सरकारने दिवाळखोरी कायद्यात सुधारणा केली आहे.दिवाळखोरी सुधारणेसाठी केंद्र सरकारने 4 एप्रिल रोजी याबाबत एक अधिसूचना जाहीर केली आहे.


7.मार्च महिन्यामध्ये देशातील उत्पादनामध्ये घट झाली आहे.कोविड मुळे झाला परिणाम परेचर्स म्यानेजर इंडेक्स मध्ये सात महिन्याच्या निच्चांकावर पोहचला आहे.


8.रशियाच्या राष्ट्रध्यक्षांचा कार्यकाळ वाढावा म्हणून तेथील सरकारने घटनादुरुस्ती केली.रशियामध्ये कुठल्याही राष्ट्राध्यक्षाला दोन टर्म पेक्षा जास्त कार्यकाळ वाढवता येते नाही,मात्र रशियाचे राष्ट्राध्यक्ष ब्लादमीर पुतीन यांनी घटनादुरुस्ती द्वारे हा नियमच बदलून टाकला आहे.पुतीन यांचा कार्यकाळ हा 2024 पर्यंत होता मात्र आता तो वाढून 2036 पर्यंत असणार आहे.2036 पर्यंत रशियात निवडणूक होणार नाही.यामुळे पुतीन हे आता रशियाचे राष्ट्राध्यक्ष नव्हे तर हुकूमशहा असतील.


9.मुंबईत' आयपीएल 'चे सामने होणार आहेत .महाराष्ट्र सरकारने आयपीएल ला परवानगी दिली आहे.



रोज अशाच चालू घडामोडी वाचण्याकरिता  SUBSCRIBE नक्की करा !! 



 

##Folow us on facebook,telegram&instagram@sankalponlineworks



Monday, April 5, 2021

चालू घडामोडी 05.04.2021

१. जेष्ठ अभिनेत्री शशिकला जवळकर यांचे निधन .त्यांनी शंभर पेक्षा जास्त चित्रपटात  काम केले होते.


२.फेसबुकने वापरकर्त्याच्या गोपनीयतेचा भंग करत १०० हून जास्त देशामधील सुमारे ५३ कोटीपेक्षा जास्त फेसबुक वापरकर्त्यांचा देटा लिक केला आहे .यामध्ये जवळपास ६० लाख भारतीयांच्या डेटाचा  समावेश आहे .या डेटमध्ये वापरकर्त्याच्या नाव ,लिंग, व्यवसाय,कामाचे ठिकाण ,वैवाहिक माहिती याचा समावेश आहे .


३.महाराष्ट्राने लसीकरणाच्या बाबतीत राष्ट्रीय विक्रम केला आहे .०४ एप्रिल रोजी सुमारे ४ लाख ६२ हजार जणांचे लसीकरण करण्यात आले .एकाच दिवशी एवढ्या मोठ्या संखेत लसीकरण होण्याचा हा नवा राष्टीय विक्रम ठरला आहे .


४.सोन्याच्या आयातीमध्ये ४७१ टक्क्यांची वाढ .सोन्याचा कमी झालेले भाव व आयात करात झालेली कपात यामुळे सोन्याच्या आयातीत वाढ झाली आहे.मार्च महिन्यामध्ये भारतात एकूण १६० टन सोन्याची आयात झाली आहे .


५.ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट संघाने इतिहास रचत केला विश्वविक्रम .सलग अंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने जिंकण्याचा हा विक्रम आहे .या संघाने सलग २२ वनडे सामने जिंकले आहेत .२००३ मध्ये कर्णधार रिकी ponting च्या नेतृत्वातील पुरुष क्रिकेट संघाने यापूर्वी २१ सामने जिंकत हा विक्रम आपल्या नावावर ठेवला होता.

6.महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांचा गृहमंत्री पदाचा राजीनामा .


7.गुरुग्राम स्थित National Brain Research Center (NBRC) ने केलेल्या संशोधनामध्ये जेष्ठमध  हे कोरोनाच्या प्रभावावर गुणकारी असल्याचा दावा करण्यात आला आहे.आयुष मंत्रालयाने याबाबत चाचण्या सुरू केल्या आहेत.


8.माजी आंतरराष्ट्रीय टेबल टेनिस पटू सुहास कुलकर्णी यांचे कोरोनामुळे निधन .2019 मध्ये इंदूर येथे झालेल्या राष्ट्रीय जेष्ठांच्या स्पर्धेचे विजेतेपद त्यांनी पटकावले होते.


9.प्रसिद्ध नेमबाजी प्रशिक्षक संजय चक्रवर्ती यांचे निधन.


10.पॅरा बॅडमिंटन च्या जागतिक क्रमवारीत अग्रस्थानी असलेल्या प्रमोद भगतने दुबई पॅरा बॅडमिंटन स्पर्धेत दोन सुवर्ण व एक कांस्य पदक पटकावले.


11.म्यानमारमध्ये  लष्करी राजवटीचा विरोध करत लोकशाहीची मागणी करण्यासाठी काल ईस्टर संडे दिवशी विविध संदेश लिहिलेली अंडी हातात धरत निषेध व्यक्त केला.




रोज अशाच चालू घडामोडी वाचण्याकरिता  SUBSCRIBE नक्की करा !! 



 

##Folow us on facebook,telegram&instagram@sankalponlineworks




Saturday, April 3, 2021

चालू घडामोडी ०४/०४/२०२१


##इतिहासात डोकावताना -

*जन्म -१९०२-पं.नारायणराव व्यास-ग्वाल्हेर घराण्याचे शास्त्रीय गायक होते .


*मृत्यू १९८७  -ज्ञानपीठ पुरस्कार विजेते हिंदी लेखक सच्चिदानंद वात्सायन उर्फ आद्नेय .

२०१६ -भारतीय वकील व राजकारणी पी .ए .संगमा 

२०१७- जेष्ठ शास्त्रीय गायिका किशोरी अमोणकर 

*१९२४-'यंग इंडिया 'आणि नवजीवन या वृत्तपत्रांचे संपादक पद महात्मा गांधी यांनी स्वीकारले .

*१९६८-नासा या अमेरिकेच्या अवकाश संशोधन संस्थेने 'अपोलो -६ 'या यानाचे प्रक्षेपण केले .  

*१९७५-बिल गेट्स व पोप अलेन यांनी मिळून भागीदारीमध्ये microsoft कंपनीची स्थापना केली .

*१९९० -जेष्ठ गायिका लता मंगेशकर यांना 'दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आले .





 १.महाराष्ट्रातील कोरोनाच्या वाढत्या प्रभावामुळे इयत्ता  पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांन परीक्षा न देताच पुढच्या वर्षामध्ये प्रवेश देण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्याच्या शिक्षण विभागाने घेतला आहे .जिल्हा परिषद ,प्राथमिक-माध्यमिक खाजगी ,अनुदानित ,विनानुदानित अशा सर्व शाळांमधील सुमारे १ कोटी ५६ लाख ९३ हजार ५४२ विद्यार्थ्यांना याचा फायदा होणार आहे .


२.माकप (मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष )पक्षाचे जेष्ठ नेते श्रीधर देशपांडे यांचे निधन .

३.'जान हे तो जहान हे 'या वाक्यानुसार जीव राहिला तर व्यायाम करता येईल ,तेव्हा ताळेबंदीच्या जो निर्णय घेण्यात येईल त्यात सर्व जिम चालकांनी सहकार्य करावे असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जिम चालकांना केले .मुख्यमंत्री यांनी  विडीवो कॉलिंग द्वारे राज्यातील जिम संचालकांशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते .मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत 'आपण  घ्याल तो निर्णय आम्हाला मान्य असेल' असे जिम चालकांनी स्पष्ट केले . 


४.बांगलादेशमध्ये ७ दिवसांची टाळेबंदी लागू करण्यात आली आहे .वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर बांगलादेश सरकारचा निर्णय बांगलादेशमधील  उद्योग  धंदे  एक दिवसाआड सुरु राहणार आहेत .५ एप्रिल पासून या निर्णयाची अमलबजावणी केली जाणार आहे .

५.देशांतर्गत अंडर-१९  युवा क्रिकेट सामने देशातील कोरोनाची परिस्थिती सुधारली तर जून-जुलै दरम्यान स्पर्धेचे आयोजन केले जाईल असा आशय असलेले पत्र सर्व राज्य क्रिकेट संघटनांना  बिसिसिआय ने पाठवले आहे .

६.जेएएल (जॉन्स ल्याग लसान )या संस्थेने केलेल्या सर्वेनुसार देशातील सात प्रमुख शहरांमध्ये ९० टक्के एवढ्या प्रमाणात फ्ल्याटची  विक्री झाली आहे .  मुंबई ,पुणे, हैद्राबाद,चेन्नई ,कोलकत्ता ,बंगलोर या शहरांचा यात  समावेश आहे .

7.महाराष्ट्रामध्ये उद्यापासून मिनी लॉक डाऊन लागू होणार आहे.शनिवारी-रविवारी संपूर्ण बंद राहणार.








रोज अशाच चालू घडामोडी वाचण्याकरिता  SUBSCRIBE नक्की करा !! 



 

##Folow us on facebook,telegram&instagram@sankalponlineworks


03.04.2021 चालू घडामोडी


*आज 3 एप्रिल .आज महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची पुण्यतिथी. 3 एप्रिल 1680 रोजी रायगड येथे त्यांचे निधन झाले.

 1.महाराष्ट्र  वाढत्या कोरोनाच्या रुग्ण संख्येमुळे महाराष्ट्रात ऑक्सिजन च्या मागणीत वाढ झाली आहे .तब्बल 4 पटीने जास्त ऑक्सिजन ची मागणी वाढली आहे.


2.(cmie)center for monitoring i Dian economy या संस्थेद्वारे जाहीर करण्यात आलेल्या मासिक आकडेवारी नुसार मार्च महिन्यात शहरी बेरोजगारीमधे वाढ झाली आहे.


3.राष्ट्रीय पंचायत पुरस्कारांमध्ये महाराष्ट्रातील 16 ग्रामपंचायतींनी पुरस्कार पटकावला.गडहिंग्लज  ,राहता ग्राम  पंचायत व सातारा जिल्हा परिषद याना पं. दीनदयाळ उपाध्याय पंचायत सशक्तीकरण करण पुरस्कार जाहीर झाला आहे .


4.ऑक्सिजन सिलिंडरची वाहतूक करणाऱ्या वाहनांना वाहन परवण्यातून दिलेल्या सुटीला 30 सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.


5गोव्याचे नवे लोकायुक्त म्हणून मुंबई उच्च न्यायालयाचे निवृत्त जज अंबादास जोशी यांची नियुक्ती करण्याचे गोवा सरकारने निश्चित केले आहे.


6.रायगडावरील पुरातत्व खात्याने केलेल्या उखनानामध्ये काही वस्तू आढळल्या आहेत.सोन्याची बांगडी,अंगठी,समई व काही नाणी सापडली आहेत.यामुळे इतिहासाचा अभ्यास करण्यास मदत मिळणार आहे .


7.धुती कपाडिया,कुणाल तिवारी या दोन वकिलांनी 75 वर्षे पेक्षा वृद्ध,शारीरिक व्यंग असणाऱ्या,व अंथरुणावर खिळून पडलेल्या व्यक्तींचे लसीकरण करण्याचे आदेश,केंद्र सरकार,राज्य सरकार व पालिकांना द्यावेत अशी जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयात  दाखल केली आहे.


8.हापकीन चे माजी संचालक डॉ. बी.गायतोंडे यांचे निधन.1972 साली हापकीन चे संचालक म्हणून त्यांनी काम पाहिले.हापकीन इन्स्टिट्यूट ही संस्था विविध आजरांवर लस बनवण्यासाठी संशोधन करते.


9.पोर्तुगाल फुटबॉल संघाचा कर्णधार व स्टार फुटबॉल खेळाडू ख्रिस्तीयानो रोनाल्डो याच्या एक  दांडपट्टा तब्बल 75 हजार अमेरिकन डॉलर ला विकला गेला.सारबियामधील एका स्वयंसेवी संस्थेने लहान मुलाच्या मणक्यावर शस्त्रक्रिया करण्यासाठी हा दांडपट्टा विक्रीकरिता ऑनलाईन ठेवला होता.










रोज अशाच चालू घडामोडी वाचण्याकरिता  SUBSCRIBE नक्की करा !! 



 

##Folow us on facebook,telegram&instagram@sankalponlineworks


Friday, April 2, 2021

02.04.2021

 1.शालेय शिक्षण विभागाणे 25 टक्के चतुर्थ श्रेणीतील पदे रद्द करण्याचा निर्णय घेतला

आहे.चौकीदार,पाणीवला,सफाई कामगार ,प्रयोगशाळा परिचर या पदांवर याचा परिणाम होणार आहे.


2.पंचशील उद्योग समूहाचे संस्थापक व जेष्ठ उद्योगपती ईश्वरदास चोरडिया यांचे निधन.


3.सरकारने मार्च महिन्यात गोळा झालेल्या gst कर संकलनाची माहिती जाहीर केली आहे.त्यानुसार मार्च 2021 मध्ये 1.24लाख कोटी एवढ्या विक्रमी कराची नोंद करण्यात आली आहे.फेब्रुवारी 2021 मध्ये 1.13लाख कोटी एवढे gst कर संकलन झाले होते.


4.2020-21या आर्थिक वर्षाची वित्तीय तूट ही 76 टक्के राहिली. एप्रिल ते फेब्रुवारी या 11 महिन्याच्या कालावधी मध्ये केंद्र सरकारच्या सुधारित अंदाजाच्या 76 टक्के तूट राहिली.कोरोनामुळे झालेल्या महसुलात घटीचा हा परिणाम आहे.


5.चार सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्ये केंद्र सरकारने 14500 कोटी रुपयांचे भांडवल गुंतवले आहे.इंडियन ओव्हर्सिज, युको,या त्या बँक आहेत.


6.राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा NCL च्या अध्यक्षपदी डॉ. आशिष लेले यांची निवड करण्यात आली आहे.


7.सुपरस्टार रजनीकांत याना दादासाहेब फाळके पुरस्कार घोषित करण्यात आला आहे.


8.देशांतर्गत लसीकरणाच्या तुलनेत भारताने जगभरात लसीचा पुरवठा केला आहे व कोरोनाच्या फ्रंट वरीअर्स असणाऱ्या 30 कोटी कर्मचाऱ्यांचे लसीकरण करण्यासोबत भारत अनेक देशांना लसीचा पुरवठा करील.अशी माहिती संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत भारताचे प्रतिनिधी के नागराज नायडू यांनी दिली.


9.अँपयर्स कॉल कायम ठेवण्याचा आयसीसी चा निर्णय ,डीआर्यसचे काही निर्णय बदलण्यात आले आहेत.






रोज अशाच चालू घडामोडी वाचण्याकरिता  SUBSCRIBE नक्की करा !! 



 

##Folow us on facebook,telegram&instagram@sankalponlineworks





Thursday, April 1, 2021

01.04.2021 चालू घडामोडी

 1.डॉ.वेदवती जोगी यांना अमेरिकेतील जॅकेयोग या संस्थेतर्फे जेकेयोग आंतरराष्ट्रीय महिला दिन पुरस्काराने गौरवण्यात आले आहे.डॉ.जोगी यांना शैक्षणिक आणि सामाजिक कामात प्रसारमाध्यमांच्या उपयोगासाठी  काम केले आहे.



2.मुंबई उच्च न्यायालयाच्या महिल्या महिला चोपदार अनिता आत्माराम मोरे या 36 वर्षाच्या सेवेनंतर निवृत्त झाल्या.


3.जेष्ठ शास्त्रीय गायक पं. राजेश्वर उपाख्य यांचे निधन.


4.महाराष्ट्र राज्य आरोग्य विभागाद्वारे सुधारीत करण्यात आलेल्या कोरोना चाचणीच्या दरानुसार आता कोरोनाच्या आर्टिपीसीआर चाचणीसाठी 500 रुपये व अँटीजन टेस्ट 150 रुपयांना मिळणार आहे.


5.निर्मिती प्रक्रियेवरील जीएस्टीमुळे पुस्तकांच्या किमतीत वाढ झाली आहे.यामुळे प्रकाशकांमध्ये मात्र नाराजी आहे.


6.आजपासून 45 वर्षे वयावंरील सर्वांचे लसीकरण करण्यास सुरुवात होत आहे.जास्तीत जास्त लोकांचे लसीकरण करण्याचा यामागील भारत सरकारचा उद्देश आहे.


7.आयसीसी द्वारे वन डे व T20 ची रँकिंग जाहीर करण्यात आली आहे.त्यानुसार वनडे रँकिंगमध्ये विराट कोहली पहिल्या स्थानी आहे.रोहित शर्मा हा वनडे क्रमवारीत तिसऱ्या स्थानी आहे.


8.भारत बायोटेक च्या kovaxin या लसीला ब्राझील देशाने आयातीची परवानगी देण्यास नकार दिला आहे.लस उत्पादन होताना लस उत्पादन गरजेचे व अटींचे पालन होत नसल्याचा शेरा देण्यात आला आहे.


9.रक्ताच्या गुठळ्या होत असल्याच्या कारणामुळे जर्मनीत ऑक्सफर्ड च्या लसीचा वापर जर्मनी व कॅनडा द्वारे थांबवन्यात आला आहे .









रोज अशाच चालू घडामोडी वाचण्याकरिता  SUBSCRIBE नक्की करा !! 



 

##Folow us on facebook,telegram&instagram@sankalponlineworks