Friday, April 9, 2021

09 april चालू घडामोडी .


*इतिहासात डोकावताना-

1.1953-पहिला 3डी चित्रपट असणारा 'हाऊस ऑफ वॅक्स' प्रदर्शित झाला.या चित्रपटाची निर्मिती वॉर्नर ब्रदर्स यांनी केली होती.


2.1994-पी.एम.भार्गव याना आर.डी. बिर्ला राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.सूक्ष्मजीव शास्त्रामधील त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून त्यांना हा पुरस्कार देण्यात आला.

 

3.1995-लता मंगेशकर याना 'अवधरत्न आणि सूर साहू' या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.हा पुरस्कार उत्तर प्रदेश सरकारद्वारे देण्यात येतो.


*जन्म-

1.1828-गणेश वासुदेव जोशी उर्फ सार्वजनिक काका 

2.1893-बौद्ध धर्म इतिहासकार राहुल संकृत्यायन 

3.1929-सरोद वादक  शरण राणी बखलीवाल.

4.1948- जया बच्चन .जया बच्चन या चित्रपट अभिनेत्री आहेत.


*मृत्यू-

1.1695-.प्रसिद्ध पंडित कवी वामन पंडित यांनी समाधी घेतली.गीतेवरील टीका  यथार्थदीपिका,भतृहरीचा शतककत्रयीचा प्रवास ही त्यांची प्रसिद्ध ग्रंथरचना.


2.2001-डॉ.बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाचे कुलगुरू व दलित सहित्यिक शंकरराव खरात .



 १.डोंबिवली येथील श्रेया शिंदे या विद्यार्थिनीने जागतिक विक्रम केला आहे .तिने बर्फावर ४८ मिनिटे ३८ सेकंद या वेळेमध्ये ९२ योगासनांचे सद्रीक्र्ण केले .भारतीय योग महासंघाने तिच्या या विक्रमाची 'योगा रेकोर्ड बुक 'मध्ये नोंद केली आहे .


२.महाराष्ट्र राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख  यांची मुंबई उच्च न्यायालयाने सीबीआय मार्फत चौकशी करण्याच्या आदेशविरोधात दाखल याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली.उच्च न्यायालयाने दिलेला निर्णय सर्वोच्च न्यायालयाने कायम केला.


3.पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना पुढील वर्षात विना परीक्षा  प्रवेश देण्याचा शिक्षण विभागाने निर्णय घेतला होता ,आता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांच्या प्रगतीपुस्तकावर वरगोन्नत असा शेरा दिला जाणार आहे.

4.महाराष्ट्रामध्ये कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर ऑक्सिजन उत्पादन करणाऱ्या कारखान्यांना अन्न व औषध प्रशासन विभागाने उद्योग क्षेत्राकरिता ऑक्सिजन चे उत्पादन थांबवून केवळ आरोग्य क्षेत्रासाठी ऑक्सिजन उत्पादन करण्याचे आदेश राज्याच्या अन्न व औषध प्रशासन विभागाने दिले आहेत.

5.भारताचे चार नौकानयन पटू टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेसाठी पात्र  ठरले आहेत.भारताच्या चार नौकानयन पटूंनी ओलिम्पिक स्पर्धेसाठी पात्र ठरण्याची ही पहिलीच वेळ आहे.ओमान मध्ये सुरू असलेल्या आशियाई नौकानयन पात्रता पर्धेत भारताच्या विष्णु सारवण ,गणपती चेंगप्पा ,वरून ठक्कर या तिघांनी ओलिम्पिक साठी पात्रता मिळवली.

6.IPL च्या 14 व्या सिजनला आज पासून सुरुवात.मुंबई इंडियन विरुद्ध रॉयल चॅलेंजर बेंगलोर दरम्यान सामना.


7.डॉलरच्या तुलनेत रुपयाच्या मूल्यात घसरण झाली आहे .146 पैशांनी ही घसरण झाली आहे.कोरोनाच्या प्रभावाचा अर्थव्यस्थेवर  परिणाम होत आहे.

 8.'ओडिशा इतिहास'या हरेकृष्ण मेहताब यांच्या ओडिशा राज्याच्या इतिहासबाबत माहिती देणाऱ्या पुस्तकाच्या हिंदी आवृत्तीचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.हरेकृष्ण मेहताब यांचे  स्वातंत्र्य चळवळीत मोठे योगदान होते.त्यांनी 'ओडिशा इतिहास 'हे पुस्तक अहमदनगर येथील कारागृहात कारावास भोगत असताना लिहिले होते.

9.देशामध्ये येत्या 11 एप्रिल ते 14 एप्रिल दरम्यान लस महोत्सव साजरा करण्यात येणार आहे.या लस महोत्सव मध्ये देशामध्ये जास्तीत जास्त लसीकरण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.11 एप्रिल रोजी क्रांतिसूर्य ज्योतिबा फुले यांची जयंती आहे व 14 एप्रिल रोजी महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे,11 ते 14 एप्रिल या दरम्यान या दोन महान व्यक्तीच्या जन्मतिथीचे औचित्य साधत हे विशेष लसीकरणाचे अभियान राबवण्यात येणार आहे.


10.जेष्ठ सिपीआय नेत्या कॉम्रेड सुंदर नवलकर यांचे निधन.


11.प्रिन्स फिलिप यांचं निधन इंग्लंडची दुसरी राणी एलिझाबेथ द्वितीय यांचे ते पती होते.







रोज अशाच चालू घडामोडी वाचण्याकरिता  SUBSCRIBE नक्की करा !! 



 

##Folow us on facebook,telegram&instagram@sankalponlineworks















No comments:

Post a Comment