Saturday, April 3, 2021

चालू घडामोडी ०४/०४/२०२१


##इतिहासात डोकावताना -

*जन्म -१९०२-पं.नारायणराव व्यास-ग्वाल्हेर घराण्याचे शास्त्रीय गायक होते .


*मृत्यू १९८७  -ज्ञानपीठ पुरस्कार विजेते हिंदी लेखक सच्चिदानंद वात्सायन उर्फ आद्नेय .

२०१६ -भारतीय वकील व राजकारणी पी .ए .संगमा 

२०१७- जेष्ठ शास्त्रीय गायिका किशोरी अमोणकर 

*१९२४-'यंग इंडिया 'आणि नवजीवन या वृत्तपत्रांचे संपादक पद महात्मा गांधी यांनी स्वीकारले .

*१९६८-नासा या अमेरिकेच्या अवकाश संशोधन संस्थेने 'अपोलो -६ 'या यानाचे प्रक्षेपण केले .  

*१९७५-बिल गेट्स व पोप अलेन यांनी मिळून भागीदारीमध्ये microsoft कंपनीची स्थापना केली .

*१९९० -जेष्ठ गायिका लता मंगेशकर यांना 'दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आले .





 १.महाराष्ट्रातील कोरोनाच्या वाढत्या प्रभावामुळे इयत्ता  पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांन परीक्षा न देताच पुढच्या वर्षामध्ये प्रवेश देण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्याच्या शिक्षण विभागाने घेतला आहे .जिल्हा परिषद ,प्राथमिक-माध्यमिक खाजगी ,अनुदानित ,विनानुदानित अशा सर्व शाळांमधील सुमारे १ कोटी ५६ लाख ९३ हजार ५४२ विद्यार्थ्यांना याचा फायदा होणार आहे .


२.माकप (मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष )पक्षाचे जेष्ठ नेते श्रीधर देशपांडे यांचे निधन .

३.'जान हे तो जहान हे 'या वाक्यानुसार जीव राहिला तर व्यायाम करता येईल ,तेव्हा ताळेबंदीच्या जो निर्णय घेण्यात येईल त्यात सर्व जिम चालकांनी सहकार्य करावे असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जिम चालकांना केले .मुख्यमंत्री यांनी  विडीवो कॉलिंग द्वारे राज्यातील जिम संचालकांशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते .मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत 'आपण  घ्याल तो निर्णय आम्हाला मान्य असेल' असे जिम चालकांनी स्पष्ट केले . 


४.बांगलादेशमध्ये ७ दिवसांची टाळेबंदी लागू करण्यात आली आहे .वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर बांगलादेश सरकारचा निर्णय बांगलादेशमधील  उद्योग  धंदे  एक दिवसाआड सुरु राहणार आहेत .५ एप्रिल पासून या निर्णयाची अमलबजावणी केली जाणार आहे .

५.देशांतर्गत अंडर-१९  युवा क्रिकेट सामने देशातील कोरोनाची परिस्थिती सुधारली तर जून-जुलै दरम्यान स्पर्धेचे आयोजन केले जाईल असा आशय असलेले पत्र सर्व राज्य क्रिकेट संघटनांना  बिसिसिआय ने पाठवले आहे .

६.जेएएल (जॉन्स ल्याग लसान )या संस्थेने केलेल्या सर्वेनुसार देशातील सात प्रमुख शहरांमध्ये ९० टक्के एवढ्या प्रमाणात फ्ल्याटची  विक्री झाली आहे .  मुंबई ,पुणे, हैद्राबाद,चेन्नई ,कोलकत्ता ,बंगलोर या शहरांचा यात  समावेश आहे .

7.महाराष्ट्रामध्ये उद्यापासून मिनी लॉक डाऊन लागू होणार आहे.शनिवारी-रविवारी संपूर्ण बंद राहणार.








रोज अशाच चालू घडामोडी वाचण्याकरिता  SUBSCRIBE नक्की करा !! 



 

##Folow us on facebook,telegram&instagram@sankalponlineworks


No comments:

Post a Comment