१. जेष्ठ अभिनेत्री शशिकला जवळकर यांचे निधन .त्यांनी शंभर पेक्षा जास्त चित्रपटात काम केले होते.
२.फेसबुकने वापरकर्त्याच्या गोपनीयतेचा भंग करत १०० हून जास्त देशामधील सुमारे ५३ कोटीपेक्षा जास्त फेसबुक वापरकर्त्यांचा देटा लिक केला आहे .यामध्ये जवळपास ६० लाख भारतीयांच्या डेटाचा समावेश आहे .या डेटमध्ये वापरकर्त्याच्या नाव ,लिंग, व्यवसाय,कामाचे ठिकाण ,वैवाहिक माहिती याचा समावेश आहे .
३.महाराष्ट्राने लसीकरणाच्या बाबतीत राष्ट्रीय विक्रम केला आहे .०४ एप्रिल रोजी सुमारे ४ लाख ६२ हजार जणांचे लसीकरण करण्यात आले .एकाच दिवशी एवढ्या मोठ्या संखेत लसीकरण होण्याचा हा नवा राष्टीय विक्रम ठरला आहे .
४.सोन्याच्या आयातीमध्ये ४७१ टक्क्यांची वाढ .सोन्याचा कमी झालेले भाव व आयात करात झालेली कपात यामुळे सोन्याच्या आयातीत वाढ झाली आहे.मार्च महिन्यामध्ये भारतात एकूण १६० टन सोन्याची आयात झाली आहे .
५.ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट संघाने इतिहास रचत केला विश्वविक्रम .सलग अंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने जिंकण्याचा हा विक्रम आहे .या संघाने सलग २२ वनडे सामने जिंकले आहेत .२००३ मध्ये कर्णधार रिकी ponting च्या नेतृत्वातील पुरुष क्रिकेट संघाने यापूर्वी २१ सामने जिंकत हा विक्रम आपल्या नावावर ठेवला होता.
6.महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांचा गृहमंत्री पदाचा राजीनामा .
7.गुरुग्राम स्थित National Brain Research Center (NBRC) ने केलेल्या संशोधनामध्ये जेष्ठमध हे कोरोनाच्या प्रभावावर गुणकारी असल्याचा दावा करण्यात आला आहे.आयुष मंत्रालयाने याबाबत चाचण्या सुरू केल्या आहेत.
8.माजी आंतरराष्ट्रीय टेबल टेनिस पटू सुहास कुलकर्णी यांचे कोरोनामुळे निधन .2019 मध्ये इंदूर येथे झालेल्या राष्ट्रीय जेष्ठांच्या स्पर्धेचे विजेतेपद त्यांनी पटकावले होते.
9.प्रसिद्ध नेमबाजी प्रशिक्षक संजय चक्रवर्ती यांचे निधन.
10.पॅरा बॅडमिंटन च्या जागतिक क्रमवारीत अग्रस्थानी असलेल्या प्रमोद भगतने दुबई पॅरा बॅडमिंटन स्पर्धेत दोन सुवर्ण व एक कांस्य पदक पटकावले.
11.म्यानमारमध्ये लष्करी राजवटीचा विरोध करत लोकशाहीची मागणी करण्यासाठी काल ईस्टर संडे दिवशी विविध संदेश लिहिलेली अंडी हातात धरत निषेध व्यक्त केला.
रोज अशाच चालू घडामोडी वाचण्याकरिता SUBSCRIBE नक्की करा !!
##Folow us on facebook,telegram&instagram@sankalponlineworks
No comments:
Post a Comment