##इतिहासात डोकावताना-1838 The Great Western या आगबोटीने अटलांटिक महासागर पार केला .ब्रिस्टॉल येथून निघून हे जहाज 15 दिवसांनी नूयॉर्क ला पोहचले .
अटलांटिक महासागर पार करणारी ही पहिली आगबोट होती.
*.1921-आचार्य विनोबा भावे यांनी वर्धा येथे पवनार आश्रमाची स्थापना केली.
1929-बतुकेश्वर दत्त-व भगतसिंग यांनी ब्रिटिश सरकारच्या दिल्ली येथील सेंट्रल असेंम्बलीत बॉम्बस्फोट केला .
*1950-भारत -पाकिस्तान यांच्या दरम्यान लियाकत-नेहरू करार झाला.
1.जेष्ठ गिरणी कामगार नेते दत्ता इस्वलकर यांचे निधन.
2राज्य शासनाला उच्च न्यायालयाने .सार्वजनिक ठिकाणी थुंकणार्यांना आळा घालण्यासाठी कठोरपणे पावले उचलण्याचे निर्देश दिले आहेत.बॉम्बे पोलिस कायद्याच्या अंतर्गत सार्वजनिक ठिकाणी थुंकणार्यांना 1200 रुपयाच्या दंडाची तरतूद असताना प्रत्यक्षात मात्र दोनशे रुपयांच्या दंडाची आकारणी होत असल्याचे निरीक्षण न्यायालयाने नोंदविले.
3.मलेरिया ,पोलिओ या प्रकारच्या रोगावरील लसी जशा केमिस्ट कडे मिळतात त्याप्रमाणे कोरोनाचीही लस मिळायला हवी.केंद्र सरकारने कोरोनाची लस खुल्या बाजारात उपलब्ध करून द्यावी अशी मागणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केली.याबाबतीत त्यांनी एक पत्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठवले आहे.
4.आरटीजीअस व नेफ्ट ची सुविधा बँकेतर डिजिटल प्लॅटफॉर्म साठी उपलब्ध करून देण्याचा निर्णय आरबीआयने जाहीर केला आहे.ऑनलाइन व्यवहारांची व्यापकता वाढवण्यासाठी हा महत्वाचा निर्णय आहे.आरबीआयने सर्व व्याजदर जैसे थे राहणार असल्याचे स्पष्ट केले.
5.'फोर्ब्स 'या प्रसिद्ध मासिकाने जगातील श्रीमंत व्यक्तींच्या नावाची यादी प्रसिद्ध केली आहे .या यादीनुसार 'अमेझॉन 'कंपनीचे सर्वेसर्वां व उद्योगपती जेफ बेझोज जगतील सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरले आहेत. जेफ बेझोज यांच्या मालमत्तेत मागील वर्षीपेक्षा 64 टक्क्यांनी वाढून 177 अब्ज अमेरिकी डॉलर एवढी आहे. टेस्ला चे संस्थापक एलन मस्क हे जगातील दुसरे श्रीमंत व्यक्ती ठरले आहेत. अमेरिका व चिननंतर भारत हा सर्वात जास्त अब्जाधीश व्यक्ती असणारा तिसरा देश ठरला आहे.मुकेश अंबानी हे जगातील दहावे व आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरले आहेत .84.5 अब्ज अमेरिकी डॉलर एवढी त्यांची सम्पत्ती आहे.गौतम अदाणी हे भारतातील दुसरे श्रीमंत व्यक्ती ठरले आहेत.
6.ओमान मध्ये झालेल्या स्पर्धेमध्ये भारताची नौकानयन पटू नेत्रा कुमानन हि टोकियो ऑलिम्पिकसाठी पात्र ठरली आहे.ऑलिम्पिक स्पर्धेसाठी नौकानयन या क्रीडा प्रकारामध्ये पात्र ठरणारी ती पहिली भारतीय महिला बनली आहे.
7.अर्थ व्यवस्थेचा दर 10.5टक्के राहील असा अंदाज आरबीआयने व्यक्त केला आहे.
रोज अशाच चालू घडामोडी वाचण्याकरिता SUBSCRIBE नक्की करा !!
##Folow us on facebook,telegram&instagram@sankalponlineworks
No comments:
Post a Comment