##इतिहासात डोकावताना -
*१९२२ -१३ एप्रिल १९२२ रोजी जालियानवाला बाग हत्याकांड घडले.
आज चैत्र शुक्ल प्रतिपदा ,अर्थात गुढी पाडवा .आजपासून मराठी व हिंदू नवीन वर्षास सुरुवात होते .गुढी पाडवा व मरठी नवीन वर्षाच्या सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्या गुढीपाडवा हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त .आजच्या दिवशी सोने खरेदी ,वाहन खरेदी करणे शुभ मानले जाते .मात्र सध्याच्या कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सध्या महाराष्ट्रामध्ये टाळेबंदी सदृश्य परिस्थिती निर्माण होत आहे .तेव्हा प्रत्येकाने स्वतःची व स्वतः सोबत आपल्या घरातील जेष्ठ व्यक्ती व लहान मुलाची विशेष काळजी घ्या.मास्क वापरा, विनाकारण घराबाहेर पडणे टाळा .
*मास्क वापरूया कोरोनाला रोखूया !!
*चालू घडामोडी -
1.कोरोनाच्या पार्श्वभूमी वर राज्यातील सरकारी कर्मचारी,आणि सरकारी अधिकाऱ्यांच्या बदल्यांवर सरकार लवकरच निर्बंध आणणार आहे.
2.महाराष्ट्र राज्य प्रदेश भाजप सरकार महाराष्ट्र राज्य सरकारला 50 हजार रेमडेसीविर इंजेक्शन ची भेट देणार आहे.ब्रूक फार्मा या दमन येथील औषध निर्माण कंपनीकडून रेमदेसीविर इंजेक्शन खरेदी केले जाणार आहेत.
3.'Bombe Natural History Society' मधील संशोधकांनी अरुणाचल प्रदेशच्या जंगलामध्ये थ्री-ब्रँडेड रोजफिंच'या पक्षाची नोंद केली.हा पक्षी दक्षिण चीनमध्ये आढळतो भारतामध्ये त्याची नोंद होण्याची ही पहिलीच वेळ आहे.
4.'NIA' पोलीस महानिरीक्षक अनिल शुक्ला यांचा पदाचा कार्यकाळ १२ एप्रिल रोजी संपुष्टात आला आहे .'सध्या NIA' मुकेश अंबानी धमकी प्रकरण,व मनसुख हिरेन हत्या प्रकरणाचा तपास करत आहे.
५.गेल्या मार्च महिन्यामध्ये किरकोळ ग्राहक किंमत निर्देशांकवर आधारित महागाई दर ५.५२ टक्के एवढ्या प्रमाणात नोंदवण्यात आला आहे .गेल्या चार महिन्यामधील हा सर्वात उचांक आहे .
6.देशभरामध्ये वाढत्या कोरोना प्रसाराच्या पार्श्वभूमीवर व्यापारी बँकांनी कर्ज वितरणामध्ये वाढ करण्याच्या सूचना रिजर्व बँकेने व्यापारी बँकांना केल्या आहेत .
७.निजामुद्दीन मरकज येथे प्राथर्ना करण्याकरिता येणाऱ्या भाविकांच्या संख्येवर निर्बंध घालण्यात येण्याबाबत अशा प्रकारची दिल्ली उच्च न्यायालयामध्ये दिल्ली पोलीस व केंद्र सरकारने मागणी केली होती ,ही मागणी न्यायालये फेटाळली आहे .
८.सुशील चंद्र यांची देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली .सध्याचे निवडणूक आयुक्त 'सुनील अरोरा' यांचा आज कार्यकाळ संपत आहे .
९.'इंडिअन प्रीमियर लीग'(IPL)मध्ये ३५० सिक्स मारणारा 'ख्रिस गेल'हा पहिला फलंदाज बनला आहे .
१०.आयपीएल मध्ये १०० पेक्सह जास्त सामने खेळल्यानंतर कर्णधार बनणारा संजू स्यामसन हा चौथा क्रिकेटपटू ठरला आहे .
११ .अमेरिकेच्या Securities And Exchange Commision फेसबुक ने सादर केलेल्या माहितीनुसार फेसबुक चे अध्यक्ष मार्क झुकेर्बर्ग यांच्या सुरक्षेकरिता २०२० मध्ये तब्बल १७२ कोटी रुपयांचा खर्च झाल्याचे कंपनीने सांगितले आहे .
रोज अशाच चालू घडामोडी वाचण्याकरिता SUBSCRIBE नक्की करा !!
##Folow us on facebook,telegram&instagram@sankalponlineworks
No comments:
Post a Comment