*आज 3 एप्रिल .आज महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची पुण्यतिथी. 3 एप्रिल 1680 रोजी रायगड येथे त्यांचे निधन झाले.
1.महाराष्ट्र वाढत्या कोरोनाच्या रुग्ण संख्येमुळे महाराष्ट्रात ऑक्सिजन च्या मागणीत वाढ झाली आहे .तब्बल 4 पटीने जास्त ऑक्सिजन ची मागणी वाढली आहे.
2.(cmie)center for monitoring i Dian economy या संस्थेद्वारे जाहीर करण्यात आलेल्या मासिक आकडेवारी नुसार मार्च महिन्यात शहरी बेरोजगारीमधे वाढ झाली आहे.
3.राष्ट्रीय पंचायत पुरस्कारांमध्ये महाराष्ट्रातील 16 ग्रामपंचायतींनी पुरस्कार पटकावला.गडहिंग्लज ,राहता ग्राम पंचायत व सातारा जिल्हा परिषद याना पं. दीनदयाळ उपाध्याय पंचायत सशक्तीकरण करण पुरस्कार जाहीर झाला आहे .
4.ऑक्सिजन सिलिंडरची वाहतूक करणाऱ्या वाहनांना वाहन परवण्यातून दिलेल्या सुटीला 30 सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
5गोव्याचे नवे लोकायुक्त म्हणून मुंबई उच्च न्यायालयाचे निवृत्त जज अंबादास जोशी यांची नियुक्ती करण्याचे गोवा सरकारने निश्चित केले आहे.
6.रायगडावरील पुरातत्व खात्याने केलेल्या उखनानामध्ये काही वस्तू आढळल्या आहेत.सोन्याची बांगडी,अंगठी,समई व काही नाणी सापडली आहेत.यामुळे इतिहासाचा अभ्यास करण्यास मदत मिळणार आहे .
7.धुती कपाडिया,कुणाल तिवारी या दोन वकिलांनी 75 वर्षे पेक्षा वृद्ध,शारीरिक व्यंग असणाऱ्या,व अंथरुणावर खिळून पडलेल्या व्यक्तींचे लसीकरण करण्याचे आदेश,केंद्र सरकार,राज्य सरकार व पालिकांना द्यावेत अशी जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली आहे.
8.हापकीन चे माजी संचालक डॉ. बी.गायतोंडे यांचे निधन.1972 साली हापकीन चे संचालक म्हणून त्यांनी काम पाहिले.हापकीन इन्स्टिट्यूट ही संस्था विविध आजरांवर लस बनवण्यासाठी संशोधन करते.
9.पोर्तुगाल फुटबॉल संघाचा कर्णधार व स्टार फुटबॉल खेळाडू ख्रिस्तीयानो रोनाल्डो याच्या एक दांडपट्टा तब्बल 75 हजार अमेरिकन डॉलर ला विकला गेला.सारबियामधील एका स्वयंसेवी संस्थेने लहान मुलाच्या मणक्यावर शस्त्रक्रिया करण्यासाठी हा दांडपट्टा विक्रीकरिता ऑनलाईन ठेवला होता.
रोज अशाच चालू घडामोडी वाचण्याकरिता SUBSCRIBE नक्की करा !!
##Folow us on facebook,telegram&instagram@sankalponlineworks
No comments:
Post a Comment