Tuesday, April 20, 2021

चालू घडामोडी 20 एप्रिल 2021


1.शिक्षण क्षेत्रात आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्या शिक्षण सेवेस घेऊन जानारे ग्लोबल टीचर अवॉर्ड ने सन्मानित शिक्षक रणजितसिंह डीसले सर यांच्या नावाने इटली सरकार इटलीतील विद्यार्थ्यांना 400 युरो म्हणजे भारतीय चलनात 36000 रुपये  शिष्यवृत्ती देणार आहे.डीसले सर हे सोलापूर जिल्हा परिषदेत शिक्षक आहेत ,2020 मध्ये त्यांचा ग्लोबल टीचर अवॉर्ड ने सन्मान करण्यात आला आहे.


2.मराठी चित्रपट दिगदर्शिका सुमित्रा भावे यांचे निधन.


3.ऑक्सिजन ची वाहतूक करणाऱ्या  वाहनास रुग्णवाहिकेचा दर्जा देण्याचा राज्य सरकारने निर्णय घेतला आहे.या नियमाची राज्यात अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे.


4.18 वर्षांवरील सर्वाचे लसीकरण करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.1 मे पासून या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.


5.देशी दारूच्या घरपोच सुविधेस राज्य शासनाच्या उत्पादन व शुल्क विभागाने परवानगी दिली आहे.


6.राज्यामध्ये वाढत्या कोरोना रुग्ण संख्येच्या पार्श्वभूमीवर कोरोनवर प्रभावी ठरणाऱ्या रेमडेसीविर या औषधांचा मोठ्या प्रमाणात तुटवडा आहे याची उच्च न्यायालयाने देखील दखल घेतली आहे,व केंद्र सरकारने राज्य सरकारला रेमडेसीविर च्या वाटपासाठी कोणते निकष घालून दिले आहेत याची माहिती देण्याचे निर्देश दिले आहेत.



7.केंद्र सरकारने भारत बायोटेक व सिरम इन्स्टिट्यूट या लस उत्पादन करणाऱ्या कंपन्यांना 4500 कोटी रुपयांचे अर्थ सहाय केले आहे.


8.सोन्याच्या आयातीत मागील वर्षी 22.58 टक्क्यांची वाढ  नोंदवण्यात आली आहे.चांदीच्या आयतीत  घट.


9.केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांच्या हस्ते हिंदुस्थान एरोनॉटिकस लिमिटेड या कंपनीने देशाच्या नौदलासाठी तयार केलेल्या 6 हेलिकॉप्टर चे अनावरण केले.एकूण 16 हेलिकॉप्टर बनवण्यात येणार आहेत.


10.दिल्ली मध्ये कालपासून सहा दिवसांची ताळेबंदी लागू करण्यात आली आहे.वाढत्या कोरोना रुग्ण संख्ये मुळे दिल्ली सरकारने हा निर्णय घेतला आहे.


11.हॉंगकॉंग सरकारने भारत,पाकिस्तान व फिलिपिन्स या देशातून येणाऱ्या लोकांसाठी 10 दिवसांची प्रवासबंदी लागू केली आहे,कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतला आहे.


12.इस्त्रायल या देशाध्ये सार्वजनिक ठिकाणी  मास्क वापरण्यास असणारी सक्ती मागे घेण्यात आली आहे.कोरोनामुक्त झाल्याचा दावा इस्रायलने केला आहे.इस्रायलने वेगाने नागरिकांचे लसीकरणाच्या मोहीमा राबवल्या होत्या.


13.अमेरिकन अंतराळ संशोधन संस्था नासाने लाल ग्रह असलेल्या मंगळ ग्रहावर हेलिकॉप्टर चे  उड्डाण करण्याचा  यशस्वी प्रयोग केला आहे.परग्रहावर हेलिकॉप्टर उड्डाण करण्याची ही नासाची पहिलीच वेळ आहे.








रोज अशाच चालू घडामोडी वाचण्याकरिता  SUBSCRIBE नक्की करा !! 



 

##Folow us on facebook,telegram&instagram@sankalponlineworks






No comments:

Post a Comment