Thursday, April 15, 2021

चालू घडामोडी 15 एप्रिल 2021

 ##इतिहासात डोकावताना-

1.1895-रायगड येथे लोकमान्य टिळक यांच्या हस्ते पहिल्या सार्वजनिक शिव जयंती उत्सवास सुरुवात.

2.1912-कधीही न बुडणार जहाज अशी ख्याती असणारे जहाज टायटॅनिक हे जहाज उत्तर अटलांटिक महासागरात बुडाले.

3.1951-आचार्य विनोबा भावे आंध्र प्रदेशातील पोचमपल्ली येथे' भूदान 'चळवळीची सुरुवात केली.

4.1995-जागतिक व्यापार संघटना (wto)ची स्थापना.

*जन्म-

*१४५२-लिओनार्दो द वीची -प्रसिद्ध चित्रकार .

*१४६९-गुरू नानक(शीख धर्मगुरू)

*१९३२-सुरेश भट(मराठी गझलकार, कवी)


*मृत्यू-

*१७९४-मोरोपंत(पंडित कवी)

*१८६५-अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणून अब्राहम लिंकन यांनी शपथ घेतली.

*१९९५-मध्यभारत राज्याचे पहिले मुख्यमंत्री पंडित लीलाधर जोशी.



*चालू घडामोडी


1.केंद्र सरकारने रस्ते विकास करण्यासाठी महाराष्ट्र राज्याच्या सर्वाधिक 682 कोटी रुपयांचा निधी जाहीर केला आहे.विविध राज्यांमधील रस्त्यांच्या विकासासाठी केंद्र सरकारने देशातील राज्य व केंद्र शासित प्रदेशासाठी मिळून 6934 कोटी रुपयांचा निधी जाहीर केला आहे. 



2.भारतीय हवाई वाहतूक कंपनी एअर इंडिया च्या विक्रीसाठी भारत सरकारने निविदा प्रस्ताव मागवण्यास सुरुवात केली आहे.


3.शुद्धतेचे प्रमाण असणारे हॉलमार्क येत्या 1 जून पासून देशभरातील सोन्याच्या दागिन्यांसाठी बंधनकारक असणार आहे .केंद्र सरकार नोव्हेंबर 2019 मध्ये याबाबत घोषणा केली होती.


4.म्युच्युअल फंडाच्या गंगाजळी मध्ये गेल्या आर्थिक वर्ष 2020-21 मध्ये 41 टक्क्यांनी वाढ नोंदवण्यात आली आहे.


5.हिथ स्ट्रीक या झिम्बाब्वे क्रिकेट संघाच्या माजी क्रिकेटपटू वर icc ने 8 वर्षांची बंदी घातली आहे.icc ने स्ट्रिकवर भ्रष्टाचार प्रतिबंधक नियमाचे उल्लंघन केल्याचा आरोप ठेवला होता,स्ट्रिकनेही स्वतःची चूक मेनी केली आहे.स्ट्रीक हा ipl मधील क्रिकेट संघांचा प्रशिक्षक राहिला आहे.


6.भारत हाच रशियाचा खरा सहकारी असल्याचे रशियाने स्पष्ट केले आहे.पाकिस्तान सोबत आपले मर्यादित संबंध असल्याचे स्पष्ट केले.


7.मेडिकलची परीक्षा पुढे ढकलण्याचा राज्य सरकारने निर्णय घेतला आहे.


8.श्रीलंकन सरकारने 11 इस्लामिक जहाल संघटनांवर्ती श्रीलंकेमध्ये बंदी घालण्यात आली आहे.


9.TLP(तेहरिक ए लब्बइक)या पाकिस्तान मधील कट्टरता वादि राजकीय पक्षावर दहशतवादी कायद्या नुसार बंदी घालण्याचा पाकिस्तान सरकारने निर्णय घेतला आहे.


10.पाकिस्तान चा क्रिकेटपटू बाबर आझम हा icc च्या एकदिवसीय क्रिकेट क्रमवारीत प्रथम स्थानी पोहचला आहे.त्याने विराट कोहलीला मागे टाकले आहे.विराट कोहलीला साडेतीन वर्षात पहिल्यांदाच आपले प्रथम स्थान गमवावे लागले आहे.





रोज अशाच चालू घडामोडी वाचण्याकरिता  SUBSCRIBE नक्की करा !! 



 

##Folow us on facebook,telegram&instagram@sankalponlineworks




No comments:

Post a Comment