Friday, April 2, 2021

02.04.2021

 1.शालेय शिक्षण विभागाणे 25 टक्के चतुर्थ श्रेणीतील पदे रद्द करण्याचा निर्णय घेतला

आहे.चौकीदार,पाणीवला,सफाई कामगार ,प्रयोगशाळा परिचर या पदांवर याचा परिणाम होणार आहे.


2.पंचशील उद्योग समूहाचे संस्थापक व जेष्ठ उद्योगपती ईश्वरदास चोरडिया यांचे निधन.


3.सरकारने मार्च महिन्यात गोळा झालेल्या gst कर संकलनाची माहिती जाहीर केली आहे.त्यानुसार मार्च 2021 मध्ये 1.24लाख कोटी एवढ्या विक्रमी कराची नोंद करण्यात आली आहे.फेब्रुवारी 2021 मध्ये 1.13लाख कोटी एवढे gst कर संकलन झाले होते.


4.2020-21या आर्थिक वर्षाची वित्तीय तूट ही 76 टक्के राहिली. एप्रिल ते फेब्रुवारी या 11 महिन्याच्या कालावधी मध्ये केंद्र सरकारच्या सुधारित अंदाजाच्या 76 टक्के तूट राहिली.कोरोनामुळे झालेल्या महसुलात घटीचा हा परिणाम आहे.


5.चार सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्ये केंद्र सरकारने 14500 कोटी रुपयांचे भांडवल गुंतवले आहे.इंडियन ओव्हर्सिज, युको,या त्या बँक आहेत.


6.राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा NCL च्या अध्यक्षपदी डॉ. आशिष लेले यांची निवड करण्यात आली आहे.


7.सुपरस्टार रजनीकांत याना दादासाहेब फाळके पुरस्कार घोषित करण्यात आला आहे.


8.देशांतर्गत लसीकरणाच्या तुलनेत भारताने जगभरात लसीचा पुरवठा केला आहे व कोरोनाच्या फ्रंट वरीअर्स असणाऱ्या 30 कोटी कर्मचाऱ्यांचे लसीकरण करण्यासोबत भारत अनेक देशांना लसीचा पुरवठा करील.अशी माहिती संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत भारताचे प्रतिनिधी के नागराज नायडू यांनी दिली.


9.अँपयर्स कॉल कायम ठेवण्याचा आयसीसी चा निर्णय ,डीआर्यसचे काही निर्णय बदलण्यात आले आहेत.






रोज अशाच चालू घडामोडी वाचण्याकरिता  SUBSCRIBE नक्की करा !! 



 

##Folow us on facebook,telegram&instagram@sankalponlineworks





No comments:

Post a Comment