1.पद्मश्री फातमा झकेरीया यांचे निधन.त्या औरंगाबाद येथील 'मौलाना आझाद एज्युकेशन ट्रस्टच्या अध्यक्षा होत्या.शैक्षणिक क्षेत्रामध्ये त्यांनी केलेल्या कामाची दखल घेत भारत सरकारने 2006 मध्येपद्मश्री पुरस्कार देऊन त्यांचा गौरव केला होता.
2. लेह मध्ये झालेल्या बचाव कार्यदरम्यान बदलापूर येथील जवान सुनील शिंदे शहीद .
3.महाराष्ट्र सरकारने उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे.'राज्य सरकारच्या तपास यंत्रणेची बाजू न ऐकुन घेताच केंद्राच्या तपास यंत्रणेला तपासाचे आदेश देने हे राज्याच्या अधिकारावर गदा आणणे असल्याचे राज्य सरकारचे म्हणणे आहे.
4.महाराष्ट्र राज्यातील नववी आणि अकरावीच्या वर्गातील विद्यार्थ्यांना परिक्षेविना पास करण्याचा राज्याच्या शिक्षण विभागाने निर्णय घेतला आहे .कोरोनाच्या वाढत्या प्रभावामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.
5.कोरोनाच्या वाढत्या रुग्ण संख्येच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्यातील सगळ्या सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलन्या बाबतचा आदेश राज्य सरकारने जाहीर केला आहे ,त्यानुसार येत्या 31 ऑगस्ट पर्यंत पुढे निवडणूक ढकलण्यात येणार आहे.
6.गेल्या 121 वर्षांमधील तिसऱ्यांदा 2021 च्या मार्च महिन्यात सर्वात जास्त तापमान नोंदवण्यात आले आहे .
7.2021 मध्ये भारताच्या अर्थव्यवस्थेत 12.5टक्क्यांनी वाढ होण्याचा अंदाज आयएमएफ अर्थात आंतरराष्ट्रीय नाणे निधी ने व्यक्त केला आहे.
8.दिल्ली मध्ये वाढत्या कोरोना रुग्ण संख्येच्या पार्श्वभूमीवर रात्रीची 30 एप्रिल पर्यंत संचार बंदी लागू करण्यात आली आहे.
9.स्पेक्ट्रम (वायुतरंग)वापरण्याचे अधिकार संपादन करणारा रिलायन्स जिओ व भारती एअरटेल या दोन कंपन्यांनि सामंजस्य करार केला आहे.या करररानुसार आंध्र प्रदेश ,दिल्ली ,मुंबई या परिमंडलामधील 800 मेगा हर्ट्झ एअरटेलकडे असणारे वायू तरंग वापरण्याचा जिओला अधिकार मिळणार आहे .यासाठी जिओ एअरटेलला 1497 कोटी रुपयांचा मोबदला देणार आहे.यामुळे भांडवलाची एअरटेलची गरज भागण्यास मदत होणार आहे व जिओला नेटवर्क वाढवण्यास मदत होणार आहे.
रोज अशाच चालू घडामोडी वाचण्याकरिता SUBSCRIBE नक्की करा !!
##Folow us on facebook,telegram&instagram@sankalponlineworks
No comments:
Post a Comment