Thursday, April 1, 2021

01.04.2021 चालू घडामोडी

 1.डॉ.वेदवती जोगी यांना अमेरिकेतील जॅकेयोग या संस्थेतर्फे जेकेयोग आंतरराष्ट्रीय महिला दिन पुरस्काराने गौरवण्यात आले आहे.डॉ.जोगी यांना शैक्षणिक आणि सामाजिक कामात प्रसारमाध्यमांच्या उपयोगासाठी  काम केले आहे.



2.मुंबई उच्च न्यायालयाच्या महिल्या महिला चोपदार अनिता आत्माराम मोरे या 36 वर्षाच्या सेवेनंतर निवृत्त झाल्या.


3.जेष्ठ शास्त्रीय गायक पं. राजेश्वर उपाख्य यांचे निधन.


4.महाराष्ट्र राज्य आरोग्य विभागाद्वारे सुधारीत करण्यात आलेल्या कोरोना चाचणीच्या दरानुसार आता कोरोनाच्या आर्टिपीसीआर चाचणीसाठी 500 रुपये व अँटीजन टेस्ट 150 रुपयांना मिळणार आहे.


5.निर्मिती प्रक्रियेवरील जीएस्टीमुळे पुस्तकांच्या किमतीत वाढ झाली आहे.यामुळे प्रकाशकांमध्ये मात्र नाराजी आहे.


6.आजपासून 45 वर्षे वयावंरील सर्वांचे लसीकरण करण्यास सुरुवात होत आहे.जास्तीत जास्त लोकांचे लसीकरण करण्याचा यामागील भारत सरकारचा उद्देश आहे.


7.आयसीसी द्वारे वन डे व T20 ची रँकिंग जाहीर करण्यात आली आहे.त्यानुसार वनडे रँकिंगमध्ये विराट कोहली पहिल्या स्थानी आहे.रोहित शर्मा हा वनडे क्रमवारीत तिसऱ्या स्थानी आहे.


8.भारत बायोटेक च्या kovaxin या लसीला ब्राझील देशाने आयातीची परवानगी देण्यास नकार दिला आहे.लस उत्पादन होताना लस उत्पादन गरजेचे व अटींचे पालन होत नसल्याचा शेरा देण्यात आला आहे.


9.रक्ताच्या गुठळ्या होत असल्याच्या कारणामुळे जर्मनीत ऑक्सफर्ड च्या लसीचा वापर जर्मनी व कॅनडा द्वारे थांबवन्यात आला आहे .









रोज अशाच चालू घडामोडी वाचण्याकरिता  SUBSCRIBE नक्की करा !! 



 

##Folow us on facebook,telegram&instagram@sankalponlineworks





No comments:

Post a Comment