Sunday, April 11, 2021

12 एप्रिल २०२१ चालू घडामोडी

 

##इतिहासात डोकावताना -

*१९३५ -प्रभात या प्रोडक्शन चा हिंदी चित्रपट ''चंद्रसेना '' हा चित्रपट प्रदर्शित .

*१९४६ -फ्रांस देशापासून सिरीया प्रांत स्वतंत्र झाला .

*१९६१ -सोविअत संघाचा युरी गागारीन हा अंतराळात जाणारा पहिला मानव बनला .पृथ्वीच्या कक्षेबाहेर युरी गागारीन ने ८९ तास भ्रमण केले .

*१९९८ सी .सुब्रमण्यम यांना भारतरत्न प्रदान करण्यात आला .

*जन्म -

*१९१७ -विनू मंकड -भारतीय क्रिकेटर (विनू मंकड यांनी मंकडिंग हा प्रकार शोधला )

*१९४३-केंद्रीय मंत्री सुमित्रा महाजन 


*मृत्यु -

*१७२०-पहिला पेशवा बाळाजी विश्वनाथ भट  

*२००१-हार्वे बॉल (smily चे जनक )



*चालू घडामोडी 


१.देशभरामध्ये वाढत्या कोरोन रुग्ण संखेच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने रेमडेसिवीर औषधाच्या निर्यातीवर बंदी घातली आहे .

२.इजिप्तमधील संशोधकांनी तेथे केलेल्या संशोधना दरम्यान संशोधकांना 3 हजार वर्षांपूर्वीचे शहर सापडले आहे .

3.अभिनेता सोनू सूद याची पंजाब राज्य सरकारने कोरोना  लसीकरणासाठी ब्रांड अम्ब्यासीडर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे .

४.कोरोनाच्या वाढत्या प्रभावामुळे भारतीय डक विभागाने चार  देशांची  टपाल सेवा बंद केली आहे .विमान उड्डाण रद्द झाल्यामुळे निर्णय .न्यूझिलंड,मंगोलिया,सर्बिया,लक्झेंबर्ग या देशांच्या पार्सल बुकिंग सेवा स्थगित  करण्यात आली आहे .

५.देशभरामध्ये आतापर्यंत १० कोटी लोकांचे लसीकरण  पूर्ण झाल्याची माहिती केंद्रीय आरोग्य विभागाने जाहीर केली आहे .

६.महाराष्ट्र राज्य सरकारने राज्य शिक्षण विभागाद्वारे घेण्यात येणाऱ्या इयत्ता 10 वि बारावीच्या परीक्षा कोरोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती पाहता परिक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे.

७.भारत सरकारने कोरोनाच्या वाढत्या रुग्ण संख्येच्या पार्श्वभूमी वर रशियाच्या स्पुतनिक-व्ही या लसीला भारतात वापर करण्यास मान्यता दिली आहे.





रोज अशाच चालू घडामोडी वाचण्याकरिता  SUBSCRIBE नक्की करा !! 



 

##Folow us on facebook,telegram&instagram@sankalponlineworks









No comments:

Post a Comment