##इतिहासात डोकावताना -
*१६६९ -शिखांचे दहावे गुरु गुरु गोविंदसिंग यांनी खालसा 'खाल्साची' स्थापना केली .
*१७३६-चिमाजी अप्पा यांनी जंजिर्याच्या सिद्दीचा पराभव केला .
*१९९४-भारताने GAT करारास मान्यता दिली .
*जन्म-
*१८९१-घटनाकार भारतरत्न डॉ .बाबासाहेब आंबेडकर
*१९२२-उस्ताद आली अकबर खा (जागतिक स्तरावरील सरोदवादक )
*१९४३-रामदास फुटणे(वात्र टीकाकार)
*मृत्यू -
*१९५०-रमण महर्षी(भारतीय तत्वज्ञ )
*१९६२-भारतरत्न सर मोक्षगुंडम विश्वेश्वरइया (भारतीय इंजिनिअर यांच्या स्मृती प्रीत्यर्थ १५ सप्टेंबर हा दिन अभियंता दिन म्हणून पाळला जातो )
*चालू घडामोडी
1.महाराष्ट्र राज्यातील वाढत्या कोरोना रुग्ण संख्येमुळे राज्यामध्ये सरकारने संचारबंदी कलम 144 चे आदेश दिले आहेत.त्यानुसार अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व आस्थापना 30 एप्रिल पर्यंत बंद राहणार आहेत.
2.महाराष्ट्रामधील sc,st दुर्बल घटकांस महावीतर द्वारे वीज जोडणी उपलब्ध होण्याच्या दृष्टीने राज्य सरकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर जीवन प्रकाश योजना राबवणार आहे.आज डॉ.आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून या योजनेची सुरुवात होत आहे.
3.कोरोनाच्या वाढत्या प्रभावाला रोखण्यासाठी महाराष्ट्र राज्य सरकारने पुन्हा एकदा ताळेबंदि जाहीर केली आहे,मात्र मागच्या वेळेस ताळेबंदीचा जो गरीब वर्गाला फटका बसला तो बसू नये म्हणून राज्य सरकारने काही घोषणा केल्या आहेत त्या खालीलप्रमाणे-
1. परवानाधारक रिक्षा चालक याना 1500 रुपये.
2.नोंदणीकृत बांधकाम कामगार याना-1500 रुपये
3.जेष्ट नागरिक ,वंचित ,निराधार योजनांच्या लाभार्थ्यांना दोन महिण्याकरिता 1000 रुपये.
4.सात कोटी लोकांना गहू व तांदूळ मोफत.
4.वीरा साथीदार यांचे निधन.ते विचारवंत,लेखक,विद्रोही कार्येकर्ते होते.ऑस्कर पुर्स्क्रासाठी नामांकन मिळालेला चित्रपट 'कोर्ट'या चित्रपटा मध्ये नारायण कांबळे हि भूमिका त्यांनी साकरली होती .
५.औरंगाबाद इथे डॉ.आबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ इथे संशोधन केंद्र निर्माण केले जात आहे .बाबासाहेबांचे विचार व कार्यावर जागतिक पातळीवर संशोधन व्हावे हा या संशोधन केंद्राच्या स्थापनेमागील उद्देश आहे .
६.देशामधून एकूण होणार्या केळीच्या निर्यातीत महाराष्ट्र राज्य प्रथम स्थानी आहे .महाराष्ट्रातील जळगाव हा जिल्हा केळीच्या उत्पादनात नेहमीसारखाच पुढे आहे .२०२० या वर्षामध्ये देशामध्ये एकूण ४७० कोटी र्प्यांच्या केळीची विदेशामध्ये निर्यात करण्यात आली होती .त्यापैकी ३४२ कोटी रुपयांची केळी हि महाराष्ट्रातील होती.
७.देशामध्ये वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भाव पाहता,परदेशी बनावटिच्या लसीना आपत्कालीन वापरासाठी परवानगी देण्याचा निर्णय भारत सरकारने घेतला आहे.ब्रिटन,अमेरिका,जपान व युरोपीय महासंघ सदस्य देशामधील आरोग्य नियामक मंडळांनी मान्यता दिलेल्या लसिंना आपत्कालीन मान्यता दिली जाणार आहे .
८.कोरोनाचा वाढता प्रसाराचा परिणाम हा वाहन विक्रीवर झाला आहे .आर्थिक वर्ष २०२०-२१ मध्ये चारचाकी वाहनाच्या विक्रीत २.२४ टक्के तर दुचाकी वाहनाच्या विक्रीत १३.१९ टक्के एवढी घसरण नोंदवण्यात आली आहे.
९.भारताचा गोलंदाज भुवनेश्वर कुमारला आयसीसीने 'प्लेअर ऑफ द मंथ' हा पुरस्कार जाहीर केला आहे.
१०.अमेरिकेने जॉन्सन आणि जॉन्सन कंपनीच्या लशीचा वापर करण्यास स्थगिती दिली आहे .काही व्यक्तींच्या शरीरामध्ये या लसीचा डोस घेतल्याने रक्ताच्या गुठळ्या निर्माण झाल्याने या लसीचा वापर थांबवण्यात आला आहे.
११.रशियाच्या युरी गागारीन हा अंतराळात पाय ठेवणारा पहिला मानव होता .युरी गागारीन यांनी अंतराळामध्ये केलेल्या भ्रमंतीला ६० वर्षे पूर्ण झाली आहेत याचा हिरक महोत्सव रशियामध्ये साजरा करण्यात आला.१२ एप्रिल १९६१ रोजी रशियाने अवकाशामध्ये पहिल्यांदा मानवास पाठवले होते .
१२.कोरोना हा दीर्घकाळ राहणार असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेच्या(WHO) प्रमुखांनी म्हटले आहे .
रोज अशाच चालू घडामोडी वाचण्याकरिता SUBSCRIBE नक्की करा !!
##Folow us on facebook,telegram&instagram@sankalponlineworks
No comments:
Post a Comment