Thursday, July 29, 2021

चालू घडामोडी २८ जुलै २०२१

 चालू घडामोडी २८ जुलै २०२१ 




०१.कोरोना मुले झालेली भारतीय अर्थव्यवस्थेच्या झालेल्या हानीतून भारतीय अर्थव्यवस्थेला केवळ निर्यात सावरू शकते असे 'मूडीज अनालीतीक्स ' या अंतरराष्ट्रीय संस्थेने म्हटले आहे.


०२.महाराष्ट्र राज्यातील गेल्या वर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे बाधित शेतकर्यांना मदतीसाठी राज्य सरकारने केंद्र सरकारकडे ३७२१ कोटींची मागणी केली होती मात्र केंद्र सरकारने  ७०१ कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे .


०३.amezon आयनॉक्स या कंपनीमधील हिस्सेदारी खरेदी करणार आहे.


०४.ऑगस्टपासून देशातील लहान मुलांच्या ल्सिक्र्नास सुरुवात होणार असल्याची देशाचे आरोग्यमंत्र्यांनी माहिती दिली आहे .


०५.कौशल्य विकास प्रधीकर्नाबब्त महाराष्ट्र राज्य सरकारने केंद्र सरकारकडे सहकार्य न मागितल्याने राज्याला २०१७-१८ नंतर कोणत्याही प्रकारचे अनुदान देण्यात आले नाही अशी माहिती केंद्रीय कौशल्य विकास मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी संसदेत दिली आहे .

०६.गुजरातमधील हडप्पा काळातील शहर असणारे धोलविरा ला युनेस्कोने जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित केले आहे .आतापर्यंत भारतात एकूण ४० वारसा स्थळे आहेत.


०७.पंतप्रधान व मुख्यमंत्री यांचा उल्लेख प्रसार माध्यमांनी आदरपूर्वक करावा असे मद्रास उच्च न्यायालयाने म्हटले आहे .


०८.कर्नाटकचे नवे मुख्यमंत्री म्हणून बसवराज बोम्मई यांनी शपथ घेतली .


०९.काळ crpf चा ८३ वा वर्धापनदिन साजरा करण्यात आला .



Tuesday, July 27, 2021

*चालू घडामोडी -२७ जुलै २०२१ -

इतिथासात डोकावताना -

जन्म -१९११-भारतीय संख्याशास्त्रज्ञ डॉ.पा.वा.सुखात्मे 

         १९६७-भारतीय पटकथा लेखक राहुल बोस

मृत्यु -२००२-भारताचे १० वे उपराष्ट्रपती कृष्णकांत 
         २०१५ -भारताचे माजी राष्ट्रपती व मिसाईलमेन ए .पी.जे.अब्दुल कलाम 








Monday, July 26, 2021

चालू घडामोडी २६ जुलै

 इतिहासात डोकावताना -


जन्म -

  • १८७४ -समाजसुधारक छत्रपती शाहू महाराज 
  •   १९२७-जि.एस रामचंद्र -भारतीय क्रिकेट खेळाडू    

मृत्यु -
  • २००९-मराठी संगीतकार भास्कर चंदावरकर 

चालू घडामोडी २६ जुलै 

१.महाराष्ट्र राज्याचा शालेय शिक्षण विभाग अनुस्तही असल्याचे दिसतेय .केंद्रीय मंत्रालयाच्या संकल्पनेतून फीत इंडिया हा उपक्रम राबवण्यात येतो .यामध्ये महाराष्ट्रातील केवळ ८८०० शाळांनाच प्रमाणपत्र मिळाले आहे.

२.महाराष्ट्रात ३५ रेल्वे योजनांचे काम सुरु आहे एकूण २०१७ किलोमीटर लांबीच्या १६ मार्गांचे हे काम आहे .यावर ९११३७ कोटी रुपये खर्च होणार आहे .

३.जपान येथे सुरु असलेल्या टोकिओ ऑलिम्पिक स्पर्धा २०२० मध्ये भारताची मल्ल प्रिया मलिक हिने जागतिक कुस्ती स्पर्धेत सुवर्प्द्क पटकावले .

४.प्रिया मलिक सोबतच वेट लिफ्टिंग या क्रीडा प्रकारात भारताची वेट लीफ्तर मीराबाई चानू हिने  रौप्य पदक पटकावत भारताला सुरुवात करून दिली .

५.तेलंगाना मधील राम लिंगेश्वर महादेव मंदिर ( रामप्पा )मंदिराला युनेस्को ने जागतिक वारसा स्थळ(world Herritage) म्हणून घोषित केले आहे.
या  मंदिराची स्थापना १२१३ काकतिया वंशाचे महाराजा गणपती देव यांनी  केली होती .


६.रशिअन नेवी च्या ३२५ व्या वर्धापन दिनानिमित्त भारताचे नौदलप्रमुख कार्मबीर सिंघ प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते .

७.महाराष्ट्र राज्यात काही जिल्ह्यांमध्ये निर्माण झालेल्या पूरस्थितीमुळे जर २७ जुलै रोजी होणार्या jee मुख्य परीक्षेच्या तिसर्या स्तराच्या परीक्षेसाठी परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्याला जाता आले नाही तर त्यांना आणखी एक संधी देण्याचा निर्णय केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र ओर्धन यांनी घेतला आहे .

८.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन कि बात या कार्यक्रमामधून 'देश प्रथम ,नेहमीच प्रथम 'चा नारा दिला आहे .देश स्वन्तान्त्र्याच्या ७५ व्या वर्धापन दिना कडे वाटचाल करत असताना प्रत्येक नागरिकाने भारत जोडो आंदोलन उभे केले पाहिजे असे ते म्हणाले .

९.कर्नाटक राज्याचे मुख्यमंत्री बी .एस.येडीयुरप्पा यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आहे .

१०.आज २२ वा  विजय दिन .१९९ मध्ये कारगिलच्या उंच शिखरांमध्ये  झालेल्या या भारत पाकिस्तान मध्ये झालेल्या या युद्धात भारताने पाकिस्तानला चारीमुंड्या चीत केले होते . 

Friday, July 23, 2021

*चालू घडामोडी -२३ जुलै

  ##इतिहासात डोकावताना###



जन्म-

१८५६ -स्वातंत्र्य सेनानी बाल गंगाधर टिळक (लोकमान्य टिळक )

१९०६-भारतीय क्रांतिकारक चंद्रशेखर आझाद 

मृत्यु -

१९९७- भारतीय गायिका वसुंधरा पंडित 



*चालू घडामोडी -२३ जुलै



०१.महाराष्ट्र सरकारला आरोग्य विभागातील रिक्त जागा कशा  भरणार याचे शपथ पत्राद्वारे उत्तर सादर करण्याचे निर्देश महाराष्ट्र सरकारला मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायाधीश एस.व्ही.गंगापूरवाला व न्या.एम.जि.सेवलकर यांनी दिले आहेत .


०२.ल्यान्सेट या अंतरराष्ट्रीय संस्थेने कोरोनामुळे अनाथ झालेल्या मुलांच्या तयार केलेल्या अहवालानुसार यंदाच्या एप्रिल महिन्यात लहान मुलांच्या अनाथ होण्याचे प्रमाण साडे आठ टक्यांनी वाढले आहे .कोरोनामुळे यावर्षी भारतातील १ लाख १९ हजार मुले अनाथ झाली आहेत .


०३.करोनाच्या दुसर्या लाटेचा फटका देशातील स्मार्ट फोन विक्रीलाही  बसला आहे .एप्रिल-जून या तिमाहीत भारतातील स्मार्ट फोन बाजारात १३ ते १८ टक्यांनी घसरण झाली आहे.



04.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लडाखमध्ये केंद्रीय विश्वविद्यालय निर्मितीसाठी 750 करोड  व एकीकृत अवसंरचना विकास निगम लिमिटेड  च्या एकीकरणासाठी साठी 25 कोटी चे फंड निर्माण करण्याच्या प्रक्रियला  केंद्रीय मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे.


05.स्पेशालिटी स्टीलच्या निर्मतीच्या संबंधित पीएलआय योजनेस केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिलीं आहे.


06.76 व्या युइनजीए मध्ये मालदीव चे प्रमुख अब्दुला शहीद व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यादरम्यान बैठक झाली.






Thursday, July 22, 2021

*चालू घडामोडी -२२ जुलै

  ##इतिहासात डोकावताना###



जन्म-

१९३७-वसंत रांजणे -भारतचे माजी क्रिकेटपटू 

१९७०-देवेंद्र गंगाधरराव फडणवीस -महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री 

१९५९-अजित पवार -महाराष्ट्र राज्याचे सध्याचे उपमुख्यमंत्री 






*चालू घडामोडी -२२ जुलै



०१.वर्ल्ड बायो इकॉनॉमी फोरम च्या सल्लागार मंडळावर प्राज इंडस्ट्रीज चे संस्थापक अध्यक्ष डॉ.प्रमोद चौधरी यांचा समावेश करण्यात आला आहे .


०२.बारावीचा निकाल तयार करण्यासाठी सिबिएसी शाळांसाठी २५ जुलै पर्यंत मुदत वाढविली आहे असे परीक्षा नियंत्रक संयम भारद्वाज यांनी जाहीर केले आहे .


०३.दक्षिण सुदान  येथे संयुक्त राष्ट्र अभियान युएनआयआयएसएस मध्ये तैनात १३३ भारतीय शांती सैनिकांना त्यांच्या उत्कृष्ट सुरक्षा कार्यासाठी संयुक्त राष्ट्र पदकाने सन्मानित करण्यात आले आहे .


०४.२०३२ चे ऑलिम्पिक २२ जुलै ते ८ ऑगस्ट दरम्यान ब्रीस्बैन येथे होईल अशी घोषणा आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने केली आहे .


०५.उत्तर प्रदेशात डाकुरणी फुलंचे पुतळे उभारले जाणार  .



०६.वेगवान ५ जि तंत्रज्ञान निर्मितीसाठी एअरटेल व टाटा समूह इंटेल सोबत व्यावसायिक सहकार्य करणार आहेत .


०७. भारतीय फुटबॉल संघाचा वरिष्ठ खेळाडू संदेश  झिंगण याची भारतीय फुटबॉल महासंघाने वर्षातील सर्वोत्तम खेळाडू म्हणून निवड केली आहे .

०८.चीनमधील हेनन प्रांतामध्ये हजार वर्षातील प्रचंड पाऊस  बरसला,त्यामुळे सर्वत्र पूरस्थिती निर्माण झाली आहे .


०७.

Wednesday, July 21, 2021

चालू घडामोडी -21जुलै

 ##इतिहासात डोकावताना###



जन्म-

1934-भारतीय क्रिकेटर चंदू बोर्डे

1947-भारतीय क्रिकेट खेळाडू चेतन चौहान


मृत्यू-

2002-मराठी चित्रकार गोपाळराव कांबळे




*चालू घडामोडी -21जुलै


1.21 जुलै 1999 रोजी ऑपरेशन विजय पार पाडण्यात आले.1999 मध्ये झालेल्या भारत पाकिस्तान युद्धात भारतीय जवानांनी पराक्रमाची शर्थ करत पाकिस्तानी सैन्य व घुसखोरांना हुसकावून लावले होते.जमू काश्मीर मधील कारगिल,द्रास आणि बटलीक या भागात  भारतीय सैन्याने  ऑपरेशन विजय ही मोहीम राबवली होती.


2.महाराष्ट्र राज्यातील ग्रामपंचायतींच्या पथदिवे आणि पाणी पुरवठा योजनांच्या थकीत विजबिलांच्या तपासणी करून त्यांचा योग्य मेळ घालण्यासाठी संबंधित विभागांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची राज्यस्तरीय समिती स्थापन करण्याचा राज्य सरकारने निर्णय घेतला आहे.


3.97 व्या घटनादुरुस्ती मधील सहकारी संस्थांच्या कारभाराबाबतचे 9बी हे कलम सर्वोच्च न्यायालयाने रद्दबातल ठरविले आहे.




4.महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या अध्यक्षपदी जेष्ठ विचारवंत डॉ रावसाहेब कसबे यांची फेरनिवड करण्यात आली आहे.


5जगभरातील पळत ठेवण्यासाठी समभव्य व्यक्तींची यादी लीक झाली आहे यामध्ये 40भारतीय पत्रकारांची  नवे असल्याचे उघड झाले आहे.


6.ब्रिटन सरकारचे 31 जुलै पूर्वी सर्व प्रौढ नागरिकांना लसीकरण करण्याचे लक्ष पूर्ण झाले आहे.सरकारच्या या यशाबद्दल ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी आनंद व्यक्त केला आहे.



 


7.अमेरिकेच्या नौदलकडून भारतीय नौदलाला दोन एमएच 60 आर सोहक हेलिकॉप्टर आणि एक पी 8 पोसेडॉन हे गस्ती विमान मिळणार आहे,हे दहावे  पोसेडॉन विमान ठरणार आहे.भारतीय नौदलाने लॉकहिड मार्टिन कंपनीकडून 2 अब्ज 40 कोटी रुपयांचा हा करार केला आहे.


8.देशातील 67.6 टक्के नागरिकांना कोरोनाचा संसर्ग होऊन गेला असून त्यांच्यामध्ये प्रतिपिंडे निर्माण झाली आहेत ,प्रौढ व्यक्तींपेक्षा लहान मुलांमध्ये प्रतिकारक्षमता जास्त असते यामुळेच प्राथमिक शाळा सुरू करता येतील असे मत आयसीएमार ने व्यक्त केले आहे .


9.वर्क फ्रॉम होम व वरच्युअल शिक्षण पद्धतीने मोठ्या व्यक्ती व बालकांमध्ये वजन वाढीच्या समस्या वाढल्या आहेत तसेच एकूण लोकसंख्येपैकी 30 टक्के लोकसंखेमध्ये लठ्ठपणा वाढत असल्याचे आयसीएमार इंडिया बी ने अहवालात म्हटले आहे.


10.600 किलोमीटर प्रतितास वेगाने धावणारी म्यागलेव्ह रेल्वे चीनने विकसित केली आहे.जमिनीवर चालणारे हे जगातील सर्वात वेगवान वाहन आहे.या रेल्वेचे वैशिष्ट्य असे की ही रेल्वे चकांविना चालते ,या रेल्वेत विद्युत चुंबकीय शक्तीचा वापर केलेला आहे.


Monday, July 19, 2021

चालू घडामोडी -19जुलै

 इतिहासात डोकावताना###

जन्म-

1861-  1938-भारतीय अंतराळ भौतिकशास्त्रज्ञ जयंत विष्णू नारळीकर.


*चालू घडामोडी -19जुलै


1.जेष्ठ साहित्यिक अनंत मनोहर यांचे निधन झाले आहे.अरण्यकांड,जेष्ठ, द्वारकविनाश या प्रसिद्ध कादंबऱ्या तर  मैत्र, राव हे गाजलेले कथासंग्रह.


2.यूपीएससी च्या धर्तीवर एमपीएससी आयोगाला परीक्षांचे वेळापत्रक एक वर्ष आधीच प्रसिध्द करण्याचे सूचना देण्यात आलेल्या आहेत.तसेच परिक्षार्थींच्या अडचणी दूर करण्यासाठी सुयोग हे ऍप तयार करण्याच्या सूचना आयोगास सरकारने दिल्या आहेत.


3.बनावट शैक्षणिक प्रमानपत्रांना आला घालण्यासाठी ,प्रामाणिक विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्यासाठी महाराष्ट्र राज्य कौशल विकास मंडळाने डिजिटल डिप्लोमा प्रमाणपत्र वितरित करण्याचा निर्णय घेतला आहे.


4.महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या अध्यक्षपदी जेष्ठ विचारवंत डॉ रावसाहेब कसबे यांची फेरनिवड करण्यात आली आहे.


5.जगभरातील पळत ठेवण्यासाठी समभव्य व्यक्तींची यादी लीक झाली आहे यामध्ये 40भारतीय पत्रकारांची  नवे असल्याचे उघड झाले आहे.


6.ब्रिटन सरकारचे 31 जुलै पूर्वी सर्व प्रौढ नागरिकांना लसीकरण करण्याचे लक्ष पूर्ण झाले आहे.सरकारच्या या यशाबद्दल ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी आनंद व्यक्त केला आहे.


Sunday, July 18, 2021

चालू घडामोडी 18जुलै 2021

 

##इतिहासात डोकावताना###



जन्म-

1861-  कादंबिनी गांगुली -भारतीय प्रथम महिला डॉक्टरांपैकी एक असणाऱ्या

 -1918-दक्षिण आफ्रिकेचे महात्मा गांधी म्हणून  ओळखले जाणारे नेल्सन मंडेला 

1982-भारतीय अभिनेत्री प्रियांका चोप्

मृत्यू

2012-हिंदी सिने अभिनेता राजेश खन्ना 

चालू घडामोडी 18 जुलै 2021-


1.एमपीएससी मार्फत निवड झालेले उपजिल्हाधिकारी ,पोलीस,उपअधीक्षक अशा ४१३ अधिकारी व इतर निवड मंडळातर्फे निवडलेल्या उमेदवारांची सर्वोच्च न्यायालयाच्या मराठा आरक्षणावरील  निकाला आधी शिफारस केलेली निवड यादी  रद्द करून सुधारित यादी तयार करण्याचे आदेश महाराष्ट्र शासनाने मंडळाला दिले आहेत.


२.ब्रिटन मधील ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या ऑक्सफर्ड सेंटर फोर हिंदू स्टडीज या अध्ययन केंद्राने वरिष्ठ फेलो म्हणून डॉ.प्राध्यापक श्रीकांत बहुलकर यांची निवड केली आहे .प्राध्यापक बहुलकर हे भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेचे माजी मंड सचिव आहेत .


३.केंद्र सरकारद्वारे राज्य सरकारांना जीएस्तीची महसुली भरपाई देण्यात आली आहे .जीएस्तीची महसूल भरपाई म्हणून केंद्र सरकारने राज्य सरकारांना ७५००० कोटी रुपये देण्यात आले आहेत.केंद्र सरकारने उचलेल्या १.५९ लाख कोटी रुपयांमधील हि रक्कम आहे .


4.विद्यापीठ अनुदान आयोगाने 2021-22 या शैक्षणिक वर्षासाठी मार्गदर्शक सूचना जरी केल्या आहेत,त्यानुसार 01 ऑक्टोबर पासून सर्व पदवी अभ्यासक्रमाचे वर्ग सुरू करण्यात येणार आहेत .


5.देशाच्या अर्थव्यवस्थेचा वृद्धीदर आर्थिक वर्ष २०२२-२३ मध्ये ६.५ ते ७ टक्के राहील असा मुख्य आर्थिक सल्लागार के.सुब्रमण्यम यांनी व्यक्त केला .


6.रस्ते अपघातात बिबट्यांच्या मृत्यूच्या होणारी वाढ लक्षात घेऊन दिल्ली वन विभागाच्या असोला भट्टी वन्यजीव अभ्यारण्याजवळ सुरजकुंड पाली रस्त्यावर वन्यजीवांसाठी देशातील पहिला (कॅरिडॉर) सुरक्षित भ्रमणमार्ग तयार करण्यात येणार आहे 

7.नौदलाच्या ताफ्यात अत्याधुनिक एम एच 60 हेलिकॉप्टर दाखल झाले आहेत.

Thursday, July 15, 2021

चालू घडामोडी 15 जुलै 2021

 


##इतिहासात डोकावताना##

*जन्म-1918-मराठी शिक्षणतज्ञ डॉ. चित्रा नाईक

1947-आय एम ए अहमदाबाद चे माजी संचालक बकुळ ढोलकीया


चालू घडामोडी 15 जुलै 2021

1.मुंबईत देशातील पहिले बहुमजली कारागृह तयार करण्यात येणार आहे.राज्यातील वाढते गुन्हे व त्यामुळे कारागृहावर पडणारा ताण पाहता राज्य कारागृह विभागाने मुंबईत चेंबूर येथे देशातील पहिले बहुमजली कारागृह बनवण्याचा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठवला आहे.


2.राज्यातील गिर्यारोहण,सायकलिंग प्रस्तरारोहण इत्यादी साहसी पर्यटनाकरिता पर्यटकांच्या सुरक्षेकरिता तयार करण्यात आलेल्या साहसी पर्यटन धोरणास राज्याच्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली.


3.राज्यातील पर्यटनदृष्ट्या महत्वाच्या 10 जिल्ह्यात प्रायोगिक तत्वावर जिल्हा पर्यटन अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यास  राज्याच्या मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेण्यात आला आहे.जिल्ह्यातील पर्यटन विकासात खाजगी संस्थांना सहभागी करून घेण्यासाठी जिल्ह्यात पर्यटन सोसायटी स्थापन करण्याचा निर्णय करण्यात आला आहे.



4.देयक पध्दती माहिती साठवणुकीच्या बाबतीतील नियमांच्या भंगप्रकर्णी मास्टर कार्डवर कारवाई करताना कंपनीला नवीन ग्राहक जोडण्यास मनाई करणारा आदेश दिला आहे.मास्टर कार्ड या अमेरिकी कंपनीला त्यांचे क्रेडिट,डेबिट कार्ड भारतात वितरित करता येणार नाही.


5.66 अ या माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या रद्द करण्यात आलेल्या कलमानुसार गुन्हे दाखल न करण्याचे निर्देश राज्याच्या पोलिसांना राज्यांनी द्यावेत असे  केंद्र सरकारने राज्य सरकारांना सांगितले आहे.कलम 66अ या नुसार अपमानास्पद पोस्ट करणे हा कैदेस पात्र असलेला गुन्हा ठरवण्यात आले होते.


6.शांघाय सहकार्य संघटनेचा मूळ हेतू दहशतवादाला अर्थपुरवठा थांबवण्याचा आहे,ते काम या संघटनेने प्रामाणिकपणे करावे असे मत भारताचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी व्यक्त केले आहे.



7.आईनपिटीए (इंडिअन पल्सर टायमिंग अरे) या खगोलशास्त्राचा अभ्यास करणाऱ्या शास्त्रज्ञांच्या गटाने सूर्यापासून उत्सर्जित होणाऱ्या तोफगोळा सदृश्य सौर स्फोटांची वैश्विक स्पंदकाद्वारे निरीक्षणे मिळवण्यात यश मिळवले आहे.




 


Wednesday, July 14, 2021

चालू घडामोडी 14 जुलै 2021

 


##इतिहासात डोकावताना##

*जन्म-1856-गोपाळ गणेश आगरकर थोर समाजसुधारक

1920-महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण.

*मृत्यू-2008-भारताचे माजी सरन्यायाधीश यशवंत चंद्रचूड.


चालू घडामोडी 14 जुलै 2021

1.आरोग्य अधिकारी यांचे सेवनिवृत्तीचे वय महाराष्ट्र राज्य सरकारने 60 वर्षांवरून 62 वर्षांपर्यंत केले आहे.


2.महाराष्ट्र राज्य सरकारने शैक्षणिक आणि सामाजिक दृष्ट्या  मागास  प्रवर्गाच्या आरक्षणास मुंबई उच्च न्यायालयाने स्थगिती देईपर्यंत म्हणजे 14 नोव्हेंबर 2014 पर्यंत ज्या उमेदवारांना SEBC प्रवर्गातून नियुक्त्या देण्यात आल्या असतील त्या कायम करण्याचा निर्णय घेतला आहे.




3.केंद्र सरकार लवकरच लोकसंख्या नियंत्रणाचा कायदा करणार आहे.त्यानुसार आता आता दोन पेक्षा अधिक अपत्य असणाऱ्याना सरकारी योजनांचा लाभ मिलन बंद होणार आहे.


4.जी 20 देशांच्या आर्थिक नियमांचे समनव्हय करणाऱ्या फायनाशील स्टेबिलिटी बोर्डाने जाहीर केलेल्या अहवालानुसार सायबर हल्या मध्ये वाढ झाल्याचे निष्पन्न झाले आहे.


5.कोरोना काळात केंद्र सरकारच्या आस्थापना मध्ये कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता कोरोना काळात रोखण्यात आला होता ,मात्र आता महागाई भत्यावरील सर्व निर्बंध हटवण्यात आले आहेत.


6.भारतीय आयुर्विमा महामंडळ LIC मधील 

केंद्राची हिस्सेदारी विकण्यास केंद्राने मंजुरी दिली आहे.



7.ख्रिस गेलंन 14000 रन्सचा टप्पा ओलांडला आहे .t20 क्रिकेटमध्ये ही एक ऐतिहासिक कामगिरी आहे.



8.नासा या अंतराळ संशोधन संस्थेने चंद्रावर संशोधन केले आहे.त्यानुसार चंद्राच्या कक्षेत झालेल्या परिवर्तनामुळे समुद्राच्या पाणीपातळीत मोठी वाढ होऊन पूर येण्याची शक्यता व्यक्त केली आहे.


Tuesday, July 13, 2021

चालू घडामोडी १३ जुलै २०२१

 


##इतिहासात डोकावताना##

*जन्म-भारतीय उद्योगपती जे.आर.डी.टाटा

1964-भारतीय क्रिकेट खेळाडू उत्पल चटर्जी

*मृत्यू-१६६०-बाजीप्रभू देशपांडे 


चालू घडामोडी १३ जुलै २०२१ 


०१.गेल्या काही वर्षात जमिनीचे तुकडे करून विक्री करण्याचे प्रकार वाढले आहेत .महसूल अधिनियमातील तरतुदीनुसार तुकडेबंदी लागू आहे ,मात्र तरीही असे व्यवहार होऊन त्यांची दस्त नोंदणी होत होती .त्यामुळे राज्याच्या नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने अशा दस्तांची नोंदणी करण्याचे बंद केले आहे .


०२.बालकांचे निमोनिया पासून संरक्षण करण्यासाठी देण्यात  येणारी  'न्युमोकोकल कोन्जुगेट व्याक्सीन 'पिसिवी या लसीचा समावेश राष्ट्रीय लसीकरण कार्यक्रमांतर्गत करण्यात  करण्यात आला आहे.त्यामुळे राज्यात बालकांना हि लस आता मोफत दिली जाणार आहे .

०३.वैद्यकीय अभ्यास क्रमाच्या राष्ट्रीय प्रवेश परीक्षेची तारीख जाहीर झाली आहे १२ सप्टेंबर रोजी हि नित्ची परीक्षा होणार आहे .


०४.निर्मिती क्षेत्र ,कोळसा उत्पादन क्षेत्र ,तसेच वीजनिर्मिती च्या जोरावर देशातील मागील मी महिन्यातील एकूण औद्योगिक उत्पादन  दरात  २९.३ टक्के एवधी वाढ झाली आहे  

०५.देशातील महागाईत वाढ नोंदविण्यात आली आहे .किरकोळ ग्राहक निर्देशांक मात्र ६ टक्यांपुढे कायम आहे .

०६.इंग्लंडच्या वेम्बली स्टेडीअम वर झालेल्या युरो चषक फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पेनल्टी शूट आउट मध्ये इटलीने उत्तम गोल करत ५३ वर्षा नंतर युरो चषक स्पर्धा जिंकली .

०७.मालांकारा ओर्थोडोक्स सिरीआन चर्च ऑफ इंडिया चे सर्वोच प्रमुख बेसेलीउस मार्थोमा पॉलीस द्वितीय यांचे निधन .


०८. रशियाच्या स्पुतनिक वी लसीच्या निर्मितीस सिरम इंस्तीत्युत करणार सप्टेंबर पासून उत्पादन चालू .

०९.भारताचे माजी क्रिकेटपटू यशपाल शर्मा यांचे निधन .यशपाल शर्मा हे १९८८ च्या विश्वचषक विजेत्या भारतीय क्रिकेट संघाचे सदस्य व बीसीसीआय च्या निवड समितीचे सदस्य होते .


Monday, July 12, 2021

चालू घडामोडी 12 जुलै

 


##इतिहासात डोकावताना##

*जन्म-1864-इतिहासाचार्य वि.का.राजवाडे

1965-भारताचे माजी क्रिकेटपटू संजय मांजरेकर

*मृत्यू-200-मराठी कवयित्री-इंदिरा संत


चालू घडामोडी 12 जुलै

1.प्रसिद्ध गझलकार व पत्रकार मधुसूदन नानिवडेकर यांचे निधन.ते नवव्या अखिल भारतीय गझल संमेलनाचे ते अध्यक्ष होते.


2.मुंबई उच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायाधीश व सर्वोच्च न्यायालयाच्या माजी न्यायाधीश सुजाता मनोहर यांचा रूथ ब्याडर जीन्सबर्ग मेडल ऑफ ऑनर ने सन्मानित करण्यात आले आहे.या पुरस्काराने सन्मानित होणाऱ्या त्या पहिल्या भारतीय महिला न्यायाधीश ठरल्या आहेत.वर्ल्ड जुरीयेस्ट असोसिएशन आणि वर्ल्ड लॉ असोसिएशनचा हा पुरस्कार सोहळा माद्रिदमधून ऑनलाइन पार पडला.


3.मागील दोन वर्षात विवरणपत्र न भरणार्यांना आता जास्त टीडीएस भरावा लागणार आहे.प्राप्तिकर 50000 हजारपेक्षा जास्त असणाऱ्या करदात्यांच्या अधिक टीडीएस कापला जानार आहे .


4.देशाचे रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूर येथे  देशातील पहिल्या  एलएनजी स्टेशनचे उदघाटन केले.लिक्विडीफाईड न्याचूरल गॅस हे  एक प्रदूषण रोखणार व स्वस्त इंधन आहे व यामुळे भविष्यात क्रांती घडेल असे त्यांनी म्हटले आहे. 


5.अफगाणिस्तान मधील काही भागांवर तालिबानने कब्जा केला असून कंदहार मधील परिस्थिती बिघडू लागली आहे त्या पार्श्वभूमीवर भारताने कंदाहार मधील दूतावासातील 50राजनैतिक अधिकारी व सुरक्षा रक्षकांना भारतात वापस आणण्यासाठी खास विमान पाठवले आहे.परराष्ट्र मंत्रालयाने तसे स्पष्ट केले आहे.


6.सारबीयाच्या नोवाक जोकोविचने विम्बल्डन  पुरुष एकेरी  टेनिस स्पर्धेचा विजेता ठरला.हे त्याच्या कारकिर्दीतले त्याचे सहावे विम्बल्डन जेतेपद .

7.कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम सामन्यात ब्राझीलला हरवत अर्जेंटिनाचा संघ 28 वर्षांनंतर मोठी स्पर्धा जिंकला आहे.अर्जेंटिनाने 15 व्यांदा कोपा अमेरिका स्पर्धेचे विजेतेपद पटकावले आहे.

 

8.भारतीय वंशाच्या समीर बॅनर्जी याने विम्बल्डन कुमार टेनिस स्पर्धेचे विजेतेपद पटकावले आहे.अमेरिकेकडून खेळताना त्याने अमेरिकेच्या व्हिक्टर लिलाव याला हरवले.


9.नीती आयोगाने भारताचा आर्थिक विकास दोन आकडी राहण्याची आशा व्यक्त केली आहे.



10.अब्जाधीश रिचर्ड ब्रँसन हे स्वतःच्या अंतराळ यानातून अंतराळात पोहचले आहेत .व्हर्जिन गल्याक्तिक या त्यांच्या कम्पणीच्या युनिटी नावाच्या अंतराळ यानातून ते अंतराळात गेले आहेत.


Sunday, July 11, 2021

चालू घडामोडी 11 जुलै 2021

 चालू घडामोडी 11 जुलै 2021




1.उत्तर प्रदेश सरकारकडून लोकसंख्या नियंत्रण विधेयकाचा  मसुदा जाहीर करण्यात आला आहे.यानुसार युपिमधील  दोन मुले धोरणाचे उल्लंघन करणाऱ्याना स्थानिक निवडणूक लढवन्यासाठी मज्जाव करण्यात आला आहे.यानुसार सरकारी नोकरीत पदोन्नती साठी अर्ज करता येणार नाही व सरकारी नोकरीही मिळणार नाही.


2.देशातील 35 टक्के वाघ हे संरक्षित क्षेत्राबाहेर आहे.wwf आणि संयुक्त राष्ट्र पर्यावरण कर्यक्रम यांनी 7 देशांमधील 40 संघटनांमधील 55 तज्ञांच्या सहाय्याने हा अभ्यास करण्यात आला आहे.


3.कोरोनवरील कोव्याकसीन लसीचा आपत्कालीन वापर यादीत समावेश करण्याबाबतचा निर्णय जागतिक आरोग्य संघटना WHO येत्या 4 ते 6 आठवड्यात निर्णय घेन्याची शक्यता आहे असे WHO च्या प्रवक्त्या सौम्या स्वामिनाथन यांनी म्हटले आहे.


4.केरळमधील प्रसिद्ध आयुर्वेदाचार्य डॉ.पी.के .वरीयर यांचे निधन झाले आहे.कोत्तकल आर्य वैद्यशाळेचे व्यवस्थापकीय ते विश्वस्त होते.


5.महाराष्ट्र राज्याचे नवे  प्रधान मुख्य वनसंरक्षक म्हणून सूनऊल लिमये यांनी पदभार स्वीकारला आहे.


6.अमेरिकेच्या भारतातील राजदूतपदी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष  जो बायडेन यांनी लॉस इंजेलीसचे महापौर एरीक गरसोटी यांच्या नावाची शिफारस केली आहे.


7.भारतीय वंशाच्या सिरिशा बांदला या कल्पना चावला,सुनीता विल्यम्स यांच्यानंतर अवकाशात जाणाऱ्या भारतीय वंशाच्या तिसऱ्या महिला ठरणार आहेत.भारतातील आंध्र प्रदेशमधील गुंटूर इथे त्यांचा जन्म झाला आहे.तर अमेरिकेच्या टेक्सस मध्ये त्या लहानाच्या मोठ्या झाल्या आहेत.



8.विम्बल्डन टेनिस स्पर्धेच्या महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलिया च्या आशल्या बर्टीने झेक प्रजासत्ताकच्या कॅरोलिना प्लिस्कोवा हिला नमवत विजेतेपदावर नाव कोरले.




Saturday, July 10, 2021

चालू घडामोडी 10 जुलै

 ##इतिहासात डोकावताना##

*जन्म-1923-कथाकार गुरुनाथ कुलकर्णी

1949-भारतीय क्रिकेट खेळाडू-सुनील गावस्कर

*मृत्यू-2005-मराठी गायक जयवंत कुलकर्णी


चालू घडामोडी 10 जुलै 2021




1.महाराष्ट्र राज्य मागास आयोग ओबीसींचा इंपिरियल डेटा गोळा करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत स्थानिक स्वराज्य संस्था निहाय सर्वेक्षण करणार आहे.ओबीसी आरक्षणाच्या दृष्टीने महत्वाची गोष्ट ठरणार आहे.


2.जेष्ट पत्रकार व लेखिका पुष्पा वर्मा यांचे निधन.वर्मा यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत दैनिक मराठा या वर्तमानपत्रपासून  पत्रकारितेस सुरुवात केली होती.


3.अलाहाबाद उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशांविरोधात दाखल याचिकेवर सुनावणी देताना सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे की माहिती अधिकार कायद्यानुसार देण्यात येणारी माहिती खरी असेलच असे नाही तेव्हा वकिलांनी युक्तिवाद  करताना अधिकाऱ्यांनी दिलेली जशीच्या तशी महिती सादर करणे रेलवे असे न्यायालयाने म्हटले आहे.


4.केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या कामकाजाच्या वेळा बदलण्याच्या योजनेला केंद्र सरकारने सुरुवात केली आहे.याची सुरुवात रेल्वे विभागापासून करण्यात आली .नवे रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी त्याबाबत घोषणा केली आहे.


5.विमानतळाच्या नामंतराबाबत एकसमान धोरण आखले पाहिजे व नव्या नागरी उड्डाण मंत्र्यांनी या कार्यास प्राध्यान्य दिले पाहिजे असे मुंबई उच्च न्यायालयाने म्हटले आहे.


6.व्हाट्सएप च्या गोपनिय धोरणास जोवर संसद मुभा  देत नाही तोवर वापरकर्त्यावर धोरण स्वीकारण्याची सक्ती केली जाणार नसल्याची ग्वाही व्हाट्सएप एलएलसी द्वारे दिल्ली उच्च न्यायालयात देण्यात आली आहे.जोवर माहिती सुरक्षा विधेयक अमलात येत नाही तोवर व्हाट्सपने गोपनीयतेचे धोरण स्थगित केले आहे.


7.अफगाणिस्तानातील अमेरिकेचे सैन्य 20 वर्षांनंतर अमेरिकेतून 31 ऑगस्ट रोजी सम्पूर्ण माघार घेत अमेरिकेत दाखल होणार असल्याचे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडें यांनी म्हटले आहे.





Friday, July 9, 2021

चालू घडामोडी 09 जुलै 2021

 ##इतिहासात डोकावताना##

*जन्म-1925-हिंदी चित्रपट अभिनेते गुरुदत्त

1938-हिंदी चित्रपट अभिनेते संजीव कुमार


चालू घडामोडी 09 जुलै 2021




1.देशाची सार्वजनिक विमा कंपनी असणाऱ्या एलआयसी कंपनीत काही महत्वपूर्ण बदल करण्यात आले आहेत.एलआयसीत आता अध्यक्ष हे सर्वोच्च पद सम्पूष्टात आणले जाणार आहे व मुख्य कार्यकारी अधिकारी व व्यवस्थापकीय संचालक ही सर्वोत पदे असणार आहेत.


2.महाराष्ट्र राज्यात होणार असलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकाना निवडणूक आयोगाने स्थगिती दिली आहे.


3.सार्वजनिक उद्योग विभाग आता अवजड उद्योग मंत्रालयाच्या कक्षेतून काढून वित्त मंत्रालयाच्या कक्षेत टाकण्यात आला आहे.


4.केंद्र सरकारने पायाभूत आरोग्य सुविधांसाठी 23 हजार 123 कोटी रुपयांच्या मदतीची घोषणा केली आहे.


5.समान नागरी कायद्याबाबत दिल्ली उच्च न्यायालयाने भाष्य केले आहे.देशात युनिफॉर्म सिव्हिल कोड गरजेचे आहे व तसेच याबाबत शासनाने आवश्यक पावले उचलायला हवीत असे निर्देश न्यायालयाने दिले आहेत.


6.देशातील कोरोना तज्ञ समितीने लसीचे दोन डोस घेणाऱ्या नागरिकांना देशभरात सर्वत्र प्रवासाची मुभा देण्यात यावी अशी शिफारस केली आहे.


7.अफगाणिस्तान मध्ये बिघडलेल्या परिस्थितीवर मॉस्कोमध्ये भरलेल्या परिषदेमध्ये भारताचे परराष्ट्र मंत्री एस.जयशंकर यांनी चिंता व्यक्त करताना क्षेत्रीय सुरक्षेसाठी हा धोक्याचा इशारा असल्याचे म्हटले आहे.


8.युरो चषक फुटबॉल स्पर्धेच्या सेमिफायनलमध्ये डेन्मार्क ला हरवत इंग्लंड पहिल्यांदाच अंतिम फेरीत दाखल.




Thursday, July 8, 2021

चालू घडामोडी ०८ जुलै २०२१

## इतिहासात डोकावताना ##

  • जन्म -१९१४-बंगाली राजकारणी ज्योती बसू -१९७७ ते २००० या काळात पाचीम बंगालचे मुख्यमंत्री भारतातील सर्वाधिक काळ मुख्यमंत्री राहण्याचा विक्रम .
  • १९१६ -गोपाळ दांडेकर-मराठी कादंबरीकार 
  • १९७२-भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार व सध्याचे बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली 
  • मृत्यु -२००१-तबला विभूषण उस्ताद बाळासाहेब मिरजकर 

*१९१० -नाशिकचा जिल्हाधिकारी जाक्सन च्या खून प्रकरणात  शस्त्रास्त्रे पुरवल्यामुळे ब्रिटिशांनी  स्वातंत्र्यवीर सावरकर यांना अटक केली होती.त्यांना लंडनहून फ्रान्स्मार्गे भारतात आणताना सावरकर यांनी फ्रान्सच्या मोर्सेलीस समुद्रात उडी जहाजातून मारली व पोहत फ्रान्सचा समुद्र किनारा गाठला मात्र किनार्यावरील फ्रेंच रक्षकांना भाषा न समजल्यामुळे ब्रिटीश सैनिकांनी त्यांना ताब्यात घेतले .



*चालू घडामोडी ०८ जुलै २०२१ -

१.राज्यातील कोविडचा प्रभाव नसलेल्या भागात १५ जुलैपासून इयत्ता ८ वी ते १२ वीचे प्रत्यक्ष वर्ग सुरु करण्या बाबतचा सुधारित निर्णय महाराष्ट्र राज्याच्या शिक्षण विभागाकडून जारी करण्यात आला आहे .'चला मुलानो ,शाळेत चला 'या मोहिमेनुसार यास सुरुवात होणार आहे ,मात्र त्यासाठी ग्रामपंचायत समिती आणि पालकांचा ठराव होऊन मान्यता मिळणे आवश्यक आहे .

२.केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तार करण्यात आला आहे ,त्यानुसार ४३ नव्या मंत्र्यांनी पद व गोपनीयतेची शपथ घेतली.केंद्रीय आरोग्यमंत्री म्हणून मुन्सुख मान्दाविया,केंद्रीय माहिती प्रसारण मंत्री-अनुरागसिंग ठाकूर,केंद्रीय शिक्षणमंत्री -धर्मेंद्र प्रधान ,केंद्रीय सहकार व गृहमंत्री -अमित शहा ,माहिती व तंत्रज्ञान,दूरसंचार मंत्री-अश्विनी वैष्णव ,विधी मंत्री-किरण रीजीजू ,पेट्रोलीअम मंत्री-हरदीप पुरी ,नागरी उड्डाण मंत्री-ज्योतिरादित्य शिंदे .

३.हॉकी खेळातील 'सेंटर हाफब्याक' स्थानावर खेळण्यासाठी ओळखल्या जाणारे महान हॉकीपटू व ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेते केशव दत्त यांचे वृद्धापकाळाने निधन .

४.हिमाचल प्रदेशचे माजी मुख्यमंत्री वीरभद्र सिंह यांचे निधन .हिमाचल प्रदेश चे सहा वेळा मुख्यमंत्री म्हणून त्यांनी  काम पहिले  होते .

५.बॉलिवूड मधील हॉरर चित्रपटाचे बादशाह म्हणून ओळख असणारे रामसे बंधूंपैकी कुमार रामसे यांचे निधन झाले .

६.प्रवाशांची सुरक्षा वाढविण्याच्या दृष्टिकोनातून रेल्वे लवकरच भारतातील सर्व प्लेटफॉर्मस वर अत्याधुनिक फेस रेकग्नेशन सिस्टम ने युक्त कॅमेरे बसवणार आहे.

८.हैतीचे राष्ट्रपती जोवेनेल मोसे यांची हत्या करण्यात आली आहे.हैतीमध्ये सध्या अस्तिरता निर्माण झाली आहे.

९.ऑलिम्पिक स्पर्धेच्या आयोजनासाठी टोकियो शहरामध्ये 22 जुलै पर्यंत कडक संचारबंदी लावण्यात आली आहे .हे ऑलिम्पिक प्रेक्षकांविना होणार आहे ,तसेच कोरोनाचा शिरकाव टाळण्यासाठी जपान सरकार कोरोना नियमांची अमलबजावणी करत आहे.

१०.







Wednesday, July 7, 2021

पंतप्रधान मोदींचे नवे मंत्रिमंडळ ४३ नवे मंत्री

  *केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्ताराचा कार्यक्रम काल पार पडला .पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळामध्ये नव्या मंत्र्यांचा समावेश करण्यात आला आहे .तर १३ विद्यमान मंत्र्यांचा   राजीनामा घेण्यात आला आहे .चालातर पाहूयात पंतप्रधान मोदी यांच्या मंत्रिमंडळातील कोणकोण आहेत नवीन मंत्री .

महाराष्ट्रातील ४  नवे मंत्री -

१.नारायण राणे 

२.कपिल पाटील 

३.भागवत कराड 

४.डॉ.भारती पवार 

इतर -

  1. डॉ सुभाष सरकार
  2. डॉ राजकुमार रंजन सिंह
  3. बिश्वेश्वर तुडू
  4. शंतनू ठाकूर
  5. डॉ मुंजापारा महेंद्रभाई
  6. जॉन बार्ला 
  7. डॉ एल मुरुगन
  8. डॉ निशीत प्रामाणिक
  9. सर्बानंद सोनोवाल
  10. डॉ वीरेंद्र कुमार
  11. ज्योतिरादित्य शिंदे
  12. रामचंद्र प्रसाद सिंह
  13. अश्विनी वैष्णव 
  14. पशुपती कुमार पारस
  15. किरण रिजिजु
  16. राजकुमार सिंह
  17. हरदीप सिंह पुरी
  18. मनसुख मंडाविया
  19. भुपेंद्र यादव
  20. पुरुषोत्तम रुपाला
  21. जी किशन रेड्डी
  22. अनुराग सिंह ठाकूर
  23. पंकज चौधरी
  24. अनुप्रिया सिंह पटेल
  25. सत्यपालसिंह बघेल
  26. राजीव चंद्रशेखर
  27. शोभा करंदलजे
  28. भानू प्रतापसिंह वर्मा
  29. दर्शना विक्रम जार्दोस
  30. मीनाक्षी लेखी
  31. अन्नपूर्णा देवी
  32. ए नारायण स्वामी
  33. कौशल किशोर
  34. अजय भट
  35. बीएल वर्मा
  36. अजय कुमार
  37. देवूसिंह चौहान
  38. भगवंत खुबा
  39. निशित प्रामाणिक 
*यातील सात पदसिद्ध  मंत्र्यांना कॅबिनेट मंत्रीपदी बढती देण्यात आली आहे .तर ११ विद्यमान मंत्र्यांचा राजीनामा घेण्यात आला आहे ,जाणून घेऊयात कोणकोणत्या मंत्र्यांनी राजीनामा दिला आहे .
१.केंद्रीय शिक्षण मंत्री -रमेश पोखरियाल निशंक 
२.केंद्रीय माहितीतंत्रज्ञान ,विधी व ज्ञाय  मंत्री -रविशंकर प्रसाद 
३.केंद्रीय आरोग्यमंत्री -डॉ.हर्षवर्धन 
४.समाजिक न्याय व हक्क मंत्री -थावार्चंद गेहलोत 
५.रसायन व खाते मंत्री -सदानंद गौडा 
६.सूक्ष्म,लघु,मध्यम उद्योग राज्यमंत्री -प्रतापचंद सारंगी 
७.पर्यावरण ,वन ,हवामान बदल राज्यमंत्री -बाबुल सुप्रिओ 
८.पर्यावरणमंत्री-प्रकाश जावडेकर 
९.शिक्षण राज्यमंत्री-संजय धोत्रे 
१०.जलश्क्ती  राज्यमंत्री-रतनलाल कटारिया 
११.देवश्री चौधरी-महिला व बाल कल्याण राज्यमंत्री 
१२. कामगार मंत्री -संतोष गंगवार  

चालू घडामोडी 07 जुलै 2021

##इतिहासात डोकावताना##
*जन्म-1981-महेंद्रसिंग धोनी.
1914-अनिल विश्वास भारतीय संगीतकार

*मृत्यू-1999-भारतीय क्रिकेट खेळाडू 
एम .एल.जयसिंह

चालू घडामोडी 07 जुलै 2021

1.जेष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांचे 98 व्या वर्षी निधन.

2.केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आला आहे.43 नव्या मंत्र्यांचा या मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला आहे.यामध्ये महाराष्ट्रातील 3 मंत्र्यांचा समावेश आहे,तर 12 मंत्र्यांना राजीनामा द्यावा लागला आहे.

3.महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरू म्हणून डॉ.माधुरी राजीव कानिटकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोशारी यांनी ही नियुक्ती जाहीर केली.2017 ते 2019 या काळात डॉ कानिटकर यांनी सशस्त्र सेना वैद्यकीय महाविद्यालायच्या अधिष्ठाता म्हणून काम पाहिले आहे.

4.एमपीएससी मार्फत 15511 पदे भरणार असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घोषणा केली आहे.

5.8 राज्यांमध्ये नवीन राज्यपालांची नियुक्ती करण्यात आली आहे.राष्ट्रपती रामनाथ कोविड यांनी काही राज्यपाल बदलण्यास मान्यता दिली आहे.

6.आदिवासींना वणावर अधिकार देण्यासाठी केंद्र सरकारने पुढाकार घेतला आहे.अनुसूचित जमाती व वन मंत्रालयाने एकत्रित रित्या परिपत्रक जारी केले आहे,यानुसार ग्रामसभेला व्यवस्थापनाचे अधिकारबदेण्यात आले आहेत.

7.रिपोर्ट्स विथ आउट बॉर्डर या माध्यमांच्या निरीक्षण संस्थेने जगभरातील माध्यम स्वातंत्र्यावर गदा आणणाऱ्या प्रमुख व्यक्तींची  यादी जाहीर केली आहे.यात एकूण 180 देशांचा समावेश आहे त्यात भारताचा 142 व क्रमांक आहे.




Tuesday, July 6, 2021

चालू घडामोडी ०६ जुलै २०२१

 ##इतिहासात डोकावताना ##

*१८९२-दादाभाई नौरोजी यांची ब्रिटीश संसदेचे पहिले भारतीय सभासद म्हणून निवड .


  • जन्म-१८९७-मराठी कादंबरीकार व्यंकटेश दिगंबर माडगुळकर 
  • १९०१ -भारतीय जनसंघाचे संस्थापक शामाप्रसाद मुखर्जी 
  • मृत्यु -१९८६-भारतीय राजकारणी जगजीवनराम 
  • २००२-भारतीय उद्योगपती ,रिलायन्सउद्योग समुहाचे संस्थापक धीरुभाई अंबानी .

चालू घडामोडी ०६ जुलै -



१  महाराष्ट्र राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने राज्यातील कोरोनापासून मुक्त असणार्या क्षेत्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मान्यतेने .आठवी ते १२ वीचे वर्ग सुरु करण्यास मान्यता दिली आहे .


२.एल्गार परिषद व कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणात  अटकेत असनारे  फादर स्त्यान स्वामी यांचे निधन झाले आहे ..


3.महाराष्ट्र राज्याच्या वैद्यकीय  शिक्षण व संशोधन विभागाच्या संचालकपदावर डॉ.दिलीप म्हैसकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे . वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाचे संचालक तात्याराव लहाने १ जुलै रोजी निवृत्त झाले आहेत .डॉ. म्हैसकर महाराष्ट्र राज्य आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू होते .


४.महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेने विरोधी पक्ष असलेल्या भारतीय जनता पार्टीच्या १२ आमदारांवर १ वर्षाच्या निलंबनाची कारवाही केली आहे .ओबीसी आरक्षणाबाबत मांडलेल्या ठरावादरम्यान हा गदारोळ झाला .विधानसभेचे तालिका अध्यक्ष भास्कर जाधव बोलत असताना विरोधी पक्षातील सदस्यांनी गदारोळ घालत राजदंड पळवण्याचा ,तालिका अध्यक्षांना अपशब्द वापरले होते .

५.महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सदस्यांच्या सर्व जागा येत्या ३१ जुलै २०२१ पर्यंत भरण्यात येतील अशी घोषणा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली .

६.२०१४ च्या SEBCउमेदवारांना सेवेत कायम करण्याचा निर्णय सार्वजनिक बांधकाम मंत्री व मराठा आरक्षण उपसमिती प्रमुख अशोक च्वन यांनी विधानसभेत जाहीर केले .


७.कोरोनामुळे दोन्ही पालक गमावलेल्या विद्यार्थ्यांनं बारावी पर्यंत शिक्षण मोफत देण्याचा महाराष्ट्र इंग्लिश स्कूल तृस्तीज असोसिएशन मेस्त या संघटनेने निर्णय घेतला आहे .


८.२३ जुलैपासून सुरु होत असलेल्या तोकिओ ऑलिम्पिक २०२१ स्पर्धेच्या उद्घाटन समारंभात सहा वेळा बॉक्सिंग चम्पिअन ठरलेली  मेरी कोम व पुरुष हॉकी संघाचा कर्णधार मनप्रीतसिंग हे भारताचे ध्वजवाहक असतील ,तर भारतीय मल्ल बजरंग पुनिया ८ ऑगस्ट रोजी होणाऱ्या समारोप समारंभात ध्वजवाहक असेल .


९.भारताचे तंत्रज्ञान व्यासपीठ असलेले 'कोविन' लवकरच सर्व देशांसाठी उपलब्ध करून दिले  जाणार असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी  यांनी जागतिक कोविन परिषदेला संबोधित करताना सांगितले .  


१०.आयटी कायद्याचे कलम ६६ अ रद्द होऊनही या कलमाद्वारे पोलिसांनी हजार पेक्षा जास्त गुन्हे नोंदविले आहेत .ही माहिती पीपल्स युनिअन ऑफ सिविल लिबर्टीज या संघटनेने याप्रकरणी स्र्वोच्ह न्यायालयात याचिका दाखल केली आहे .