Friday, July 9, 2021

चालू घडामोडी 09 जुलै 2021

 ##इतिहासात डोकावताना##

*जन्म-1925-हिंदी चित्रपट अभिनेते गुरुदत्त

1938-हिंदी चित्रपट अभिनेते संजीव कुमार


चालू घडामोडी 09 जुलै 2021




1.देशाची सार्वजनिक विमा कंपनी असणाऱ्या एलआयसी कंपनीत काही महत्वपूर्ण बदल करण्यात आले आहेत.एलआयसीत आता अध्यक्ष हे सर्वोच्च पद सम्पूष्टात आणले जाणार आहे व मुख्य कार्यकारी अधिकारी व व्यवस्थापकीय संचालक ही सर्वोत पदे असणार आहेत.


2.महाराष्ट्र राज्यात होणार असलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकाना निवडणूक आयोगाने स्थगिती दिली आहे.


3.सार्वजनिक उद्योग विभाग आता अवजड उद्योग मंत्रालयाच्या कक्षेतून काढून वित्त मंत्रालयाच्या कक्षेत टाकण्यात आला आहे.


4.केंद्र सरकारने पायाभूत आरोग्य सुविधांसाठी 23 हजार 123 कोटी रुपयांच्या मदतीची घोषणा केली आहे.


5.समान नागरी कायद्याबाबत दिल्ली उच्च न्यायालयाने भाष्य केले आहे.देशात युनिफॉर्म सिव्हिल कोड गरजेचे आहे व तसेच याबाबत शासनाने आवश्यक पावले उचलायला हवीत असे निर्देश न्यायालयाने दिले आहेत.


6.देशातील कोरोना तज्ञ समितीने लसीचे दोन डोस घेणाऱ्या नागरिकांना देशभरात सर्वत्र प्रवासाची मुभा देण्यात यावी अशी शिफारस केली आहे.


7.अफगाणिस्तान मध्ये बिघडलेल्या परिस्थितीवर मॉस्कोमध्ये भरलेल्या परिषदेमध्ये भारताचे परराष्ट्र मंत्री एस.जयशंकर यांनी चिंता व्यक्त करताना क्षेत्रीय सुरक्षेसाठी हा धोक्याचा इशारा असल्याचे म्हटले आहे.


8.युरो चषक फुटबॉल स्पर्धेच्या सेमिफायनलमध्ये डेन्मार्क ला हरवत इंग्लंड पहिल्यांदाच अंतिम फेरीत दाखल.




No comments:

Post a Comment