Sunday, July 11, 2021

चालू घडामोडी 11 जुलै 2021

 चालू घडामोडी 11 जुलै 2021




1.उत्तर प्रदेश सरकारकडून लोकसंख्या नियंत्रण विधेयकाचा  मसुदा जाहीर करण्यात आला आहे.यानुसार युपिमधील  दोन मुले धोरणाचे उल्लंघन करणाऱ्याना स्थानिक निवडणूक लढवन्यासाठी मज्जाव करण्यात आला आहे.यानुसार सरकारी नोकरीत पदोन्नती साठी अर्ज करता येणार नाही व सरकारी नोकरीही मिळणार नाही.


2.देशातील 35 टक्के वाघ हे संरक्षित क्षेत्राबाहेर आहे.wwf आणि संयुक्त राष्ट्र पर्यावरण कर्यक्रम यांनी 7 देशांमधील 40 संघटनांमधील 55 तज्ञांच्या सहाय्याने हा अभ्यास करण्यात आला आहे.


3.कोरोनवरील कोव्याकसीन लसीचा आपत्कालीन वापर यादीत समावेश करण्याबाबतचा निर्णय जागतिक आरोग्य संघटना WHO येत्या 4 ते 6 आठवड्यात निर्णय घेन्याची शक्यता आहे असे WHO च्या प्रवक्त्या सौम्या स्वामिनाथन यांनी म्हटले आहे.


4.केरळमधील प्रसिद्ध आयुर्वेदाचार्य डॉ.पी.के .वरीयर यांचे निधन झाले आहे.कोत्तकल आर्य वैद्यशाळेचे व्यवस्थापकीय ते विश्वस्त होते.


5.महाराष्ट्र राज्याचे नवे  प्रधान मुख्य वनसंरक्षक म्हणून सूनऊल लिमये यांनी पदभार स्वीकारला आहे.


6.अमेरिकेच्या भारतातील राजदूतपदी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष  जो बायडेन यांनी लॉस इंजेलीसचे महापौर एरीक गरसोटी यांच्या नावाची शिफारस केली आहे.


7.भारतीय वंशाच्या सिरिशा बांदला या कल्पना चावला,सुनीता विल्यम्स यांच्यानंतर अवकाशात जाणाऱ्या भारतीय वंशाच्या तिसऱ्या महिला ठरणार आहेत.भारतातील आंध्र प्रदेशमधील गुंटूर इथे त्यांचा जन्म झाला आहे.तर अमेरिकेच्या टेक्सस मध्ये त्या लहानाच्या मोठ्या झाल्या आहेत.



8.विम्बल्डन टेनिस स्पर्धेच्या महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलिया च्या आशल्या बर्टीने झेक प्रजासत्ताकच्या कॅरोलिना प्लिस्कोवा हिला नमवत विजेतेपदावर नाव कोरले.




No comments:

Post a Comment