##इतिहासात डोकावताना##
*जन्म-1856-गोपाळ गणेश आगरकर थोर समाजसुधारक
1920-महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण.
*मृत्यू-2008-भारताचे माजी सरन्यायाधीश यशवंत चंद्रचूड.
चालू घडामोडी 14 जुलै 2021
1.आरोग्य अधिकारी यांचे सेवनिवृत्तीचे वय महाराष्ट्र राज्य सरकारने 60 वर्षांवरून 62 वर्षांपर्यंत केले आहे.
2.महाराष्ट्र राज्य सरकारने शैक्षणिक आणि सामाजिक दृष्ट्या मागास प्रवर्गाच्या आरक्षणास मुंबई उच्च न्यायालयाने स्थगिती देईपर्यंत म्हणजे 14 नोव्हेंबर 2014 पर्यंत ज्या उमेदवारांना SEBC प्रवर्गातून नियुक्त्या देण्यात आल्या असतील त्या कायम करण्याचा निर्णय घेतला आहे.
3.केंद्र सरकार लवकरच लोकसंख्या नियंत्रणाचा कायदा करणार आहे.त्यानुसार आता आता दोन पेक्षा अधिक अपत्य असणाऱ्याना सरकारी योजनांचा लाभ मिलन बंद होणार आहे.
4.जी 20 देशांच्या आर्थिक नियमांचे समनव्हय करणाऱ्या फायनाशील स्टेबिलिटी बोर्डाने जाहीर केलेल्या अहवालानुसार सायबर हल्या मध्ये वाढ झाल्याचे निष्पन्न झाले आहे.
5.कोरोना काळात केंद्र सरकारच्या आस्थापना मध्ये कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता कोरोना काळात रोखण्यात आला होता ,मात्र आता महागाई भत्यावरील सर्व निर्बंध हटवण्यात आले आहेत.
6.भारतीय आयुर्विमा महामंडळ LIC मधील
केंद्राची हिस्सेदारी विकण्यास केंद्राने मंजुरी दिली आहे.
7.ख्रिस गेलंन 14000 रन्सचा टप्पा ओलांडला आहे .t20 क्रिकेटमध्ये ही एक ऐतिहासिक कामगिरी आहे.
8.नासा या अंतराळ संशोधन संस्थेने चंद्रावर संशोधन केले आहे.त्यानुसार चंद्राच्या कक्षेत झालेल्या परिवर्तनामुळे समुद्राच्या पाणीपातळीत मोठी वाढ होऊन पूर येण्याची शक्यता व्यक्त केली आहे.
No comments:
Post a Comment