Thursday, July 8, 2021

चालू घडामोडी ०८ जुलै २०२१

## इतिहासात डोकावताना ##

  • जन्म -१९१४-बंगाली राजकारणी ज्योती बसू -१९७७ ते २००० या काळात पाचीम बंगालचे मुख्यमंत्री भारतातील सर्वाधिक काळ मुख्यमंत्री राहण्याचा विक्रम .
  • १९१६ -गोपाळ दांडेकर-मराठी कादंबरीकार 
  • १९७२-भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार व सध्याचे बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली 
  • मृत्यु -२००१-तबला विभूषण उस्ताद बाळासाहेब मिरजकर 

*१९१० -नाशिकचा जिल्हाधिकारी जाक्सन च्या खून प्रकरणात  शस्त्रास्त्रे पुरवल्यामुळे ब्रिटिशांनी  स्वातंत्र्यवीर सावरकर यांना अटक केली होती.त्यांना लंडनहून फ्रान्स्मार्गे भारतात आणताना सावरकर यांनी फ्रान्सच्या मोर्सेलीस समुद्रात उडी जहाजातून मारली व पोहत फ्रान्सचा समुद्र किनारा गाठला मात्र किनार्यावरील फ्रेंच रक्षकांना भाषा न समजल्यामुळे ब्रिटीश सैनिकांनी त्यांना ताब्यात घेतले .



*चालू घडामोडी ०८ जुलै २०२१ -

१.राज्यातील कोविडचा प्रभाव नसलेल्या भागात १५ जुलैपासून इयत्ता ८ वी ते १२ वीचे प्रत्यक्ष वर्ग सुरु करण्या बाबतचा सुधारित निर्णय महाराष्ट्र राज्याच्या शिक्षण विभागाकडून जारी करण्यात आला आहे .'चला मुलानो ,शाळेत चला 'या मोहिमेनुसार यास सुरुवात होणार आहे ,मात्र त्यासाठी ग्रामपंचायत समिती आणि पालकांचा ठराव होऊन मान्यता मिळणे आवश्यक आहे .

२.केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तार करण्यात आला आहे ,त्यानुसार ४३ नव्या मंत्र्यांनी पद व गोपनीयतेची शपथ घेतली.केंद्रीय आरोग्यमंत्री म्हणून मुन्सुख मान्दाविया,केंद्रीय माहिती प्रसारण मंत्री-अनुरागसिंग ठाकूर,केंद्रीय शिक्षणमंत्री -धर्मेंद्र प्रधान ,केंद्रीय सहकार व गृहमंत्री -अमित शहा ,माहिती व तंत्रज्ञान,दूरसंचार मंत्री-अश्विनी वैष्णव ,विधी मंत्री-किरण रीजीजू ,पेट्रोलीअम मंत्री-हरदीप पुरी ,नागरी उड्डाण मंत्री-ज्योतिरादित्य शिंदे .

३.हॉकी खेळातील 'सेंटर हाफब्याक' स्थानावर खेळण्यासाठी ओळखल्या जाणारे महान हॉकीपटू व ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेते केशव दत्त यांचे वृद्धापकाळाने निधन .

४.हिमाचल प्रदेशचे माजी मुख्यमंत्री वीरभद्र सिंह यांचे निधन .हिमाचल प्रदेश चे सहा वेळा मुख्यमंत्री म्हणून त्यांनी  काम पहिले  होते .

५.बॉलिवूड मधील हॉरर चित्रपटाचे बादशाह म्हणून ओळख असणारे रामसे बंधूंपैकी कुमार रामसे यांचे निधन झाले .

६.प्रवाशांची सुरक्षा वाढविण्याच्या दृष्टिकोनातून रेल्वे लवकरच भारतातील सर्व प्लेटफॉर्मस वर अत्याधुनिक फेस रेकग्नेशन सिस्टम ने युक्त कॅमेरे बसवणार आहे.

८.हैतीचे राष्ट्रपती जोवेनेल मोसे यांची हत्या करण्यात आली आहे.हैतीमध्ये सध्या अस्तिरता निर्माण झाली आहे.

९.ऑलिम्पिक स्पर्धेच्या आयोजनासाठी टोकियो शहरामध्ये 22 जुलै पर्यंत कडक संचारबंदी लावण्यात आली आहे .हे ऑलिम्पिक प्रेक्षकांविना होणार आहे ,तसेच कोरोनाचा शिरकाव टाळण्यासाठी जपान सरकार कोरोना नियमांची अमलबजावणी करत आहे.

१०.







No comments:

Post a Comment