##इतिहासात डोकावताना ##
*१८९२-दादाभाई नौरोजी यांची ब्रिटीश संसदेचे पहिले भारतीय सभासद म्हणून निवड .
- जन्म-१८९७-मराठी कादंबरीकार व्यंकटेश दिगंबर माडगुळकर
- १९०१ -भारतीय जनसंघाचे संस्थापक शामाप्रसाद मुखर्जी
- मृत्यु -१९८६-भारतीय राजकारणी जगजीवनराम
- २००२-भारतीय उद्योगपती ,रिलायन्सउद्योग समुहाचे संस्थापक धीरुभाई अंबानी .
चालू घडामोडी ०६ जुलै -
१ महाराष्ट्र राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने राज्यातील कोरोनापासून मुक्त असणार्या क्षेत्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मान्यतेने .आठवी ते १२ वीचे वर्ग सुरु करण्यास मान्यता दिली आहे .
२.एल्गार परिषद व कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणात अटकेत असनारे फादर स्त्यान स्वामी यांचे निधन झाले आहे ..
3.महाराष्ट्र राज्याच्या वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाच्या संचालकपदावर डॉ.दिलीप म्हैसकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे . वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाचे संचालक तात्याराव लहाने १ जुलै रोजी निवृत्त झाले आहेत .डॉ. म्हैसकर महाराष्ट्र राज्य आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू होते .
४.महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेने विरोधी पक्ष असलेल्या भारतीय जनता पार्टीच्या १२ आमदारांवर १ वर्षाच्या निलंबनाची कारवाही केली आहे .ओबीसी आरक्षणाबाबत मांडलेल्या ठरावादरम्यान हा गदारोळ झाला .विधानसभेचे तालिका अध्यक्ष भास्कर जाधव बोलत असताना विरोधी पक्षातील सदस्यांनी गदारोळ घालत राजदंड पळवण्याचा ,तालिका अध्यक्षांना अपशब्द वापरले होते .
५.महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सदस्यांच्या सर्व जागा येत्या ३१ जुलै २०२१ पर्यंत भरण्यात येतील अशी घोषणा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली .
६.२०१४ च्या SEBCउमेदवारांना सेवेत कायम करण्याचा निर्णय सार्वजनिक बांधकाम मंत्री व मराठा आरक्षण उपसमिती प्रमुख अशोक च्वन यांनी विधानसभेत जाहीर केले .
७.कोरोनामुळे दोन्ही पालक गमावलेल्या विद्यार्थ्यांनं बारावी पर्यंत शिक्षण मोफत देण्याचा महाराष्ट्र इंग्लिश स्कूल तृस्तीज असोसिएशन मेस्त या संघटनेने निर्णय घेतला आहे .
८.२३ जुलैपासून सुरु होत असलेल्या तोकिओ ऑलिम्पिक २०२१ स्पर्धेच्या उद्घाटन समारंभात सहा वेळा बॉक्सिंग चम्पिअन ठरलेली मेरी कोम व पुरुष हॉकी संघाचा कर्णधार मनप्रीतसिंग हे भारताचे ध्वजवाहक असतील ,तर भारतीय मल्ल बजरंग पुनिया ८ ऑगस्ट रोजी होणाऱ्या समारोप समारंभात ध्वजवाहक असेल .
९.भारताचे तंत्रज्ञान व्यासपीठ असलेले 'कोविन' लवकरच सर्व देशांसाठी उपलब्ध करून दिले जाणार असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जागतिक कोविन परिषदेला संबोधित करताना सांगितले .
१०.आयटी कायद्याचे कलम ६६ अ रद्द होऊनही या कलमाद्वारे पोलिसांनी हजार पेक्षा जास्त गुन्हे नोंदविले आहेत .ही माहिती पीपल्स युनिअन ऑफ सिविल लिबर्टीज या संघटनेने याप्रकरणी स्र्वोच्ह न्यायालयात याचिका दाखल केली आहे .
No comments:
Post a Comment