##इतिहासात डोकावताना##
*जन्म-1923-कथाकार गुरुनाथ कुलकर्णी
1949-भारतीय क्रिकेट खेळाडू-सुनील गावस्कर
*मृत्यू-2005-मराठी गायक जयवंत कुलकर्णी
चालू घडामोडी 10 जुलै 2021
1.महाराष्ट्र राज्य मागास आयोग ओबीसींचा इंपिरियल डेटा गोळा करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत स्थानिक स्वराज्य संस्था निहाय सर्वेक्षण करणार आहे.ओबीसी आरक्षणाच्या दृष्टीने महत्वाची गोष्ट ठरणार आहे.
2.जेष्ट पत्रकार व लेखिका पुष्पा वर्मा यांचे निधन.वर्मा यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत दैनिक मराठा या वर्तमानपत्रपासून पत्रकारितेस सुरुवात केली होती.
3.अलाहाबाद उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशांविरोधात दाखल याचिकेवर सुनावणी देताना सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे की माहिती अधिकार कायद्यानुसार देण्यात येणारी माहिती खरी असेलच असे नाही तेव्हा वकिलांनी युक्तिवाद करताना अधिकाऱ्यांनी दिलेली जशीच्या तशी महिती सादर करणे रेलवे असे न्यायालयाने म्हटले आहे.
4.केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या कामकाजाच्या वेळा बदलण्याच्या योजनेला केंद्र सरकारने सुरुवात केली आहे.याची सुरुवात रेल्वे विभागापासून करण्यात आली .नवे रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी त्याबाबत घोषणा केली आहे.
5.विमानतळाच्या नामंतराबाबत एकसमान धोरण आखले पाहिजे व नव्या नागरी उड्डाण मंत्र्यांनी या कार्यास प्राध्यान्य दिले पाहिजे असे मुंबई उच्च न्यायालयाने म्हटले आहे.
6.व्हाट्सएप च्या गोपनिय धोरणास जोवर संसद मुभा देत नाही तोवर वापरकर्त्यावर धोरण स्वीकारण्याची सक्ती केली जाणार नसल्याची ग्वाही व्हाट्सएप एलएलसी द्वारे दिल्ली उच्च न्यायालयात देण्यात आली आहे.जोवर माहिती सुरक्षा विधेयक अमलात येत नाही तोवर व्हाट्सपने गोपनीयतेचे धोरण स्थगित केले आहे.
7.अफगाणिस्तानातील अमेरिकेचे सैन्य 20 वर्षांनंतर अमेरिकेतून 31 ऑगस्ट रोजी सम्पूर्ण माघार घेत अमेरिकेत दाखल होणार असल्याचे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडें यांनी म्हटले आहे.
No comments:
Post a Comment